Q: सद्गुरू, सूर्योदय किंवा सूर्यास्ताआधी काही विशिष्ट  साधना करण्याचे काय महत्त्व आहे?

सद्गुरु: सूर्य नमस्कार आणि शिव नमस्कार संध्या समयी किंवा संक्रमणाच्या वेळी, दिवस आणि रात्रीच्या संधिप्रकाश कालावधीत केले पाहिजेत.  संध्या समयी, सुर्योदय आणि सुर्यास्ताच्या आसपास सर्वकाही एक प्रकारच्या उलथ-पालथीच्या स्थिती असते.  जर आपण त्या वेळी साधना केली, तर तुमची मर्यादा ओलांडण्याची क्षमता उत्तम असते कारण तुमची उर्जा सुद्धा एक उलथ-पालथीच्या स्थिती असते. हा त्यामागचा एक पैलू आहे.

वातावरण उष्ण आहे? तर ती सर्वोत्तम वेळ नाही!

आणखी एक पैलू असा की या सर्व साधना ठराविक प्रमाणात शरीरातउष्णा  निर्माण करतात. इंग्रजीत "उष्णा" शब्दाचा समतुल्य शब्द नाही, परंतु सामान्यतः इंग्रजीत हिट (Heat) म्हणतात. उष्णता, तापमानाच्या संदर्भात नव्हे तर तीन पैलूंपैकी एक म्हणून - आणि इतर आहेत शीत आणि पित्त - जे मानव शरीर प्रणालीत विविध कार्यांवर नियंत्रण ठेवतात. जर आपणाकडे अधिक उष्णा असेल, किंवा अन्य शब्दात, तर आपला समत प्राण उच्च असेल तर, आपले शरीर गरम आहे असे तुम्हाला वाटते, पण जर तुम्ही तुमचे तापमान तपासले, तर ते सामान्य असते.  उष्णा म्हणजे ताप येणे नाही - हा एक अनुभवात्मक ताप आहे.

योगाचा विकास भारतीय उष्णकटिबंधीय वातावरणात झाला असल्याने, आम्ही नेहमीच हे सांगत आलोत की सर्व योगाभ्यास नेहमी सकाळी 8:30 च्या अगोदर किंवा संध्याकाळी 4:00 किंवा 4:30च्या नंतर केले पाहिजेत.

समत प्राण किंवा समान वायू  शरीराचा उबदारपणा कायम ठेवण्याचे काम करतो.  एक योगी नेहमी आपल्या शरीराला थोडेसे उबदार ठेवत असतो कारण उष्णतेचा अर्थ तीव्रता आणि गतिशीलता देखील होतो. जर शरीर एखाद्या विशिष्ट बिंदूच्या खाली थंड झाले, ते शरीरात जड़त्व (Inertia) निर्माण करते. बहुतांशी सर्व साधना, सर्वसाधारणपणे तुम्ही ज्या स्तरावर आहात त्यापेक्षा काहीशा उच्च पातळीवर घेऊन जाण्यासाठी निर्माण केलेल्या आहेत.  एक उच्च पातळी म्हणजे चयापचयाची उच्च पातळी नव्हे. जर चयापचयाची पातळी वाढली, तर तुम्ही शारीरिकदृष्ट्या स्वतःला कमजोर करून टाकाल.

जेव्हा तुमच्या ऊर्जा उच्च स्तरावर असतात, तेव्हा तुमचं शरीर एका सहज गतीने कार्यशील असते. आपण तुम्हाला हे तीन ते सहा आठवड्यां सिद्ध करू शकतो - जर तुम्ही एक विशिष्ठ साधना केलीत आणि तुमची ऊर्जा एका विशिष्ट स्तरावर घेऊन जाल, तेव्हा तुमचे शारीरिक घटक स्थिर होतील आणि एका सहज गतीने कार्यशील होतील.  जेव्हा तुमच्या ऊर्जा खालच्या स्तरावर असतात, तेव्हा शरीराच्या प्रक्रिया चालू ठेवण्यासाठी शरीराचा अधिक जास्त गतीने कार्य करण्याकडे कल असतो, यामुळे शरीर प्रणाली खालावते.  जर तुमची शारीरिक कार्ये एका विशिष्ट वेगाने चालू राहिली, तर तुमचे मन वेडावून जाईल आणि शिवाय यामुळे तुमचं आयुष्य कमी होईल.

आपल्याला हे ठाऊक आहे की साधना केल्यामुळे शरीर प्रणालीमधील उष्णामध्ये वाढ होतो. जर बाहेरील तापमान जास्त असेल आणि जर उष्णा विशिष्ठ बिंदूच्या बाहेर गेली, तर त्यामुळे शरीरातील पेशींना नुकसान पोचते. म्हणूनच योग साधना नेहमीच दिवसाच्या थंड वेळी केल्या पाहिजेत. दिवस आणि रात्रीच्या दरम्यान एक संक्रमण असते जे शरीर प्रणालीमधील संघर्ष कमी करते आणि म्हणूनच या साधनेमुळे कमी उष्णा निर्माण होते. योगाचा विकास भारतातील उष्णकटिबंधीय वातावरणात झाला असल्याने, आम्ही नेहमीच हे सांगत आलोत की सगळे योगाभ्यास नेहमी सकाळी 8:30 च्या अगोदर किंवा संध्याकाळी 4:00 किंवा 4:30च्या नंतर केले पाहिजेत.

योग आणि ध्यान यातील वेळेचे संक्रमण

Click Image to Enlarge

Infographic - The Sadhaka's Timings

योगाभ्यास करून, तुम्ही स्वत:ची पुनर्चना करण्याचा प्रयत्न करीत आहात. तुम्हाला तुमच्या पालकांबद्दल भरपूर सन्मान आणि आदर असेल, परंतु त्यांनी तुम्हाला ज्याप्रकारे घडवले किंवा ते जसे आहेत तसे तुम्हाला व्हायला इच्छा नाही. तुम्हाला त्यांच्याहून काहीतरी वेगळे किंवा जरा अधिक व्हायची इच्छा आहे. जर तुम्ही केवळ मानसिक आणि भावनिकरित्या स्वत:ची पुनर्चना केली, तर आयुष्यात असा क्षण येईल तुम्ही जुन्या स्थितीत याल. असे बरेच लोक आहेत, जेव्हा ते 18 वर्षाचे होते तेव्हा ते म्हणत, "अजिबात मी त्यांच्यासारखा होणार नाही!" आणि आपल्या आईवडिलांच्या विरोधात बंड केलं, पण जसे ते 45 वर्षांचे झाले, की त्यांच्या आईवडिलांप्रमाणे चालतात, बसतात, बोलतात आणि वागतात कारण मानसिक बदल हे केवळ तिथपर्यंतच जाऊ शकतात.

जर तुम्हाला भविष्यातील मनुष्य व्हायचं असेल तर, तुमच्या मुलभूत तत्वांची पुनर्चना करणे गरजेचे आहे.  योगाभ्यासाद्वारे आपण हेच करण्याचा प्रयत्न करत आहोत – आपलं रुपांतर एक संपूर्ण वेगळ्या रुपात करायचं आहे.

मानसिक दृष्टीकोण बदल फार काळ टिकणार नाहीत. काही काळानंतर, आयुष्यातील  परिस्थिती जशा बदलत जातील, आणि तुम्ही कमी सजग होत जाता, तसे तुम्ही पुन्हा जुन्या स्थितीत याल.  जर तुम्ही म्हणता की असा आहे आहे कारण माझे वडील तसे होते किंवा हे सगळं अनुवांशिक आहे, तर तुम्ही म्हणत आहात की ‘माझं अस्तित्व भूतकाळाचा परिणाम आहे.  जर तुम्हाला भविष्यातील मनुष्य व्हायचं असेल तर, तुमच्या मुलभूत तत्वांची पुनर्चना करणे गरजेचे आहे.  योगाभ्यासाद्वारे आपण हेच करण्याचा प्रयत्न करत आहोत आपलं रुपांतर एक संपूर्ण वेगळ्या रुपात करायचं आहे.

म्हणून साधना करण्यासाठीची सर्वोत्तम वेळ नेहमी संध्या समय असतो, जेव्हा पृथ्वीच्या ऊर्जा एका विशिष्ट संक्रमणातून जात असतात आणि शरीर प्रणातील संघर्ष मोठ्या प्रमाणत कमी झालेला असतो; त्यामुळे शरीर नव्याने साकार करणे सुलभ होऊ शकते.  याचे इतर काही पैलू देखील आहेत, पण योग साधना सकाळी आणि संध्याकाळी का केली जाते, त्याची ही दोन मूलभूत कारणे आहेत.

ब्रह्म मुहूर्त - आध्यात्मिक प्रगतीसाठी सर्वोत्तम वेळ

जर तुम्ही एका अनपेक्षित जबरदस्त अध्यात्मिक प्रगतीच्या शोधात असाल, तर तुम्ही योगसाधना सुर्योदयापूर्वी केली पाहिजे, म्हणजे साधना तुम्ही ब्रह्म मुहूर्तापासून सुरुवात  करणे असा होतो. ब्रह्म मुहूर्त हा रात्रीचा शेवटचा चौथा भाग असतो - पहाटे 3:30 ते 5:30 किंवा 6:00 वाजेपर्यंतची वेळ, किंवा सूर्योदय होण्याची जी कोणती वेळ असेल ती. या समयी, एक विशिष्ट प्रणाली कार्यरत असते जेणेकरून या दरम्यान जर तुम्ही साधना एक प्रकारे केली तर स्वाभाविकपणे त्याप्रती तुम्ही अधिक सजग होता.  जर तुम्ही योगासने करत असाल तर, एकदा तुमची तुमची शारीरिक प्रणाली पृथ्वीच्या जीवन प्रणालीशी संलग्न झाली की दररोज पहाटे, तुम्ही स्वतःहून 3:20 आणि 3:40 च्या दरम्यान जागे व्हाल.

जर तुम्हाला तुमच्या भौतिक स्वरूपाच्या पलीकडे जायचं असेल किंवा तुम्हाला अध्यात्मिक पैलू जाणून घ्यायचे असतील ब्रह्म मुहूर्त ही साधना करण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे.

हा एक कबुलीजबाब नव्हे, पण ही माझ्यासाठी एक अभिमानाची बाब ठरली पाहिजे - जेव्हा मी एक लहान मुलगा होतो आणि मी थोडा मोठा झाल्यानंतर देखील, काहीही झाले तरी मला सकाळी जाग येत नसे. मला जागे करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांना सुमारे एक तास लागत असे. काही काळानंतर त्यांनी मला हाका मारणे सोडून दिले कारण हाका मारून मला जागे करण्याचा फायदा होत नसे.  मला हलवून जागे करण्याचा देखील फायदा होत नसल्याने, ते मला उठवून बसवत असत - मी उठून बसत असे आणि पुन्हा झोपी जात असे.

मग ते मला बेडच्या बाहेर ओढत असत. माझी आई ब्रशवर टूथपेस्ट लावत असे आणि तो ब्रश मला देत असे. मी त्याला तोंडात दाबून झोपी जात असे.  मी दात घासल्यानंतर ती म्हणत असे, "शाळेत जाण्यापूर्वी स्नान करून घे." मी स्नानगृहात जाऊन, तिथे बसून झोपी जात असे. मी एकदा जागे झाल्यानंतर, मला कुणीही थांबवू शकत नसे, पण मला झोपेतून उठवणे ही वेगळी बाब असे.  जर कोणी मला झोपेतून उठवलं नाही, तर मी दुपारपर्यंत झोपत असे. फक्त जेव्हा मला खूप भूक लागत असे तेव्हा मला जाग येत असे - अन्यथा मला कोणीही उठवू शकत असे.

मी वयाच्या 11 वर्षी योगाभ्यासाची सुरुवात केली आणि 12 ते 18 महिन्यांनंतर, तसे आपोआप घडण्यास सुरुवात झाली आणि तेव्हापासून असेच घडत आले आहे की जेव्हा मला पहिल्यांदा जाग येते आणि जेव्हा मी वेळ तपासतो, तेव्हा ती वेळ नेहमी पहाटे 3:40 पूर्वीचीच असते. मी केव्हा झोपी गेलो, केव्हा उठावे किंवा पुन्हा केव्हा झोपावे या बाबी मी निवडू शकतो, परंतु प्रत्येक दिवशी, मी जगात कोणत्याही ठिकाणी असो, कमीत कमी एक क्षण तरी मला त्या वेळी जाग येते.  कारण तुमच्या शरीर व्यवस्थेशी काही विशिष्ठ क्रिया करता, तेव्हा आपल्या शरीराची प्रक्रिया ग्रहाच्या प्रक्रियेशी समक्रमित झालेली असते. पहाटे 3:40 ची वेळ हि कुणी तरी शोधून काढलेली नाही – मानवी शरीर प्रणालीमध्ये असं काहीतरी आहे जे पृथ्वीशी जोडलं गेलं आहे आणि ती तुम्हाला झोपेतून जागं करते

जर तुम्हाला तुमच्या भौतिक स्वरूपाच्या पलीकडे जायचं असे किंवा तुम्हाला अध्यात्मिक पैलू जाणून घ्यायचे असतील ब्रह्म मुहूर्त ही साधना करण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे. परंतु जर तुम्हाला फक्त शारीरिक आरोग्याचा हवं असेल तर, सुर्योदयाच्या आसपासचा संध्यासमय हा साधना करण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे.

தினமும் யோகா செய்ய சரியான நேரம் எது? 

Editor’s Note: The 21-week Isha Hatha Yoga Teacher Training program offers an unparalleled opportunity to acquire a profound understanding of the yogic system and the proficiency to teach Hatha Yoga. For dates and more information, visit www.ishahathayoga.com or mail info@ishahatayoga.com

A version of this article was originally published in Isha Forest Flower October 2015. Download as PDF on a “name your price, no minimum” basis or subscribe to the print version.