Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
तुमचं आरोग्य आणि तुमचा आजार, तुमचा आनंद आणि तुमचं दुःख, हे सगळं आतूनच येतं. जर तुम्हाला सुख पाहिजे, तर त्यासाठी 'आत' वळायला हवं.
एकदा का तुम्ही तुमच्या अस्तित्वाच्या आंतरिक आनंदांचा आस्वाद घेतलात, की बाहेरील आनंद तुम्हाला क्षुल्लक वाटतील.
जर तुम्ही तुमचं शरीर, मन, ऊर्जा आणि भावना एका ठराविक पातळीपर्यंत परिपक्व केल्या, तर 'ध्यान' स्वाभाविकपणे बहरून येईल
जीवनातलं सगळ्यात मोठं समाधान म्हणजे स्वतःपेक्षा खूप मोठं असं काहीतरी करणं.
तुम्ही विश्वातला एक लहानसा कण आहात. पण या लहान कणामध्ये संपूर्ण विश्व सामावून घेण्याची क्षमता आहे.
जीवनाचा मुख्य उद्देश केवळ जीवनाचा सखोल आणि विस्तृत अनुभव घेणे हा आहे.
कर्म तुमच्या कृतीत नाही - ते तुमच्या संकल्पात असतं. जीवनातल्या घडामोडी नाही, तर जीवनाचे संदर्भ तुमचे कर्म तयार करतात.
आसपासच्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही सखोल, जाणीवपूर्वक सहभागी झालात तर तुम्ही त्यात अडकून पडणार नाहीत; तिथं फक्त आनंद असेल
आनंद बाहेर शोधायची गरज नाही - तो आतच असतो. जर तुम्ही स्वतःच्या मनात गोंधळ निर्माण केला नाही, तर तुम्ही स्वाभाविकपणे आनंदी व्हाल.
जर संपूर्ण स्पष्टता असेल, तर धैर्याची गरज नाही कारण स्पष्टता तुम्हाला पलीकडे नेईल.