गर्भवती महिला वगळता, इतर सर्व म्हणजे, मासिक पाळीच्या स्त्रियांसह आणि दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त किंवा इतर वैद्यकीय (दमा, मायग्रेन, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, फुफ्फुसांशी संबंधित आजार, काचबिंदू, मोतीबिंदू, रेटिनल डिटैचमेंट, हर्निया इ.). परिस्थितीत असलेले लोक ही साधना करू शकतात.
पाठ, मान किंवा गुडघ्याची दुखापत झालेले लोक शक्य तितकी काळजी घेऊन ही साधना करू शकतात.
नाही, गर्भवती महिलांनी ही साधना करू नये.
नाही, सर्व वयोगटातील लोक ही साधना करू शकतात.
मोठ्या शस्त्रक्रियेनंतर ६ महिने आणि किरकोळ शस्त्रक्रियेनंतर ६ आठवड्यांसाठी थांबावे.
ही साधना केवळ रिकाम्या पोटी असतानाच केली पाहिजे.
याचा अर्थ, कमीतकमी खालील प्रमाणे अंतर ठेवा:
पूर्ण जेवणानंतर - ४ तास
फळ किंवा काही बिस्किटे / क्रॅकर्स सारख्या उपहारानंतर - २ तास
चहा, कॉफी किंवा पाण्याव्यतिरिक्त अन्य पेय पदार्थांनंतर - 1.5 तासांनंतर.
तुम्ही पाणी कधीही पिऊ शकता.
हो, साधनेनंतर लगेच तुम्ही खोलीच्या तापमानाएवढे किंवा त्यापेक्षा गरम असलेले खाद्य पदार्थ खाऊ किंवा पिऊ शकता. थंड पदार्थांचे (फ्रीज मधले) सेवन करण्यापूर्वी १०-१५ मिनिटे थांबावे.
साधनेनंतर, गरम पाण्याने आंघोळ करण्यापूर्वी १५-२० मिनिटे आणि थंड पाण्याने आंघोळ करण्यापूर्वी २५-३० मिनिटे थांबावे.
एका वेळेस ३ आवर्तने, असे दिवसातून जास्तीत जास्त ४-५ वेळा तुम्ही ही साधना करू शकता.
नाही. ही पद्धत अगदी सूक्ष्म विज्ञानावर आधारित आहे. हे योग सराव योग्य पद्धतीने केल्यास ,तु मच्या जीवनात मोठे परिवर्तन घडविण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. ते योग्य मार्गाने शिकविले जात आहे याची खात्री करण्यासाठी अनेक वर्षे प्रशिक्षण घ्यावे लागते. म्हणून इतरांना सराव प्रदान करण्यासाठी तुम्ही व्हिडिओचा वापर केला पाहिजे. जर तुम्हाला हे आणि इतर पद्धती शिकवण्यास रस असेल कृपया शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.
नाही, कोणताही विशिष्ट क्रम नाही.
आदर्श आसनामध्ये, फक्त ८ ठिकाणी शरीर जमिनीला स्पर्श करते. याचा अर्थ असा होतो की पोट आणि नाकदेखील जमिनीला स्पर्श करता कामा नाही. जर आत्ता हे तुमच्यासाठी शक्य नसेल तर काही हरकत नाही. तुम्हाला शक्य तितके हे करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही नियमितपणे हा सराव केला तर शरीराच्या लवचिकतेमध्ये हळूहळू सुधार होईल आणि तुम्ही आदर्श आसनाच्या जवळ जाऊ लागाल.
जर तुम्हाला ६-७ मिनिटे आसन धरून ठेवता येत नसेल, तर तुम्ही ३ मिनिटांनी सुरु करू शकता आणि हळूहळू ६-७ मिनिटे धरून ठेवण्याच्या दिशेने प्रयत्न करू शकता.
कोणताही टाइमर किंवा गजर सेट न करणे खूप महत्वाचे आहे. ही एक आंतरिक प्रक्रिया आहे. कोणत्याही प्रकारचा गजर तुमचे लक्ष बाहेरच्या दिशेला नेईल. तुमच्या वेळेच्या अंदाजानुसार आसन धरा. सुरवातीला, पुढील टप्प्यावर जाण्यापूर्वी तुम्ही सरावाच्या प्रत्येक टप्प्यात तुमचे घड्याळ तपासू शकता.
उदाहरणार्थ, तुम्ही साष्टांग सुरू करण्यापूर्वी तुमचे घड्याळ तपासा. साष्टांगातून बाहेर आल्यानंतर, जर वेळ 6-7 मिनिटांच्या दरम्यान असेल तर पुढील टप्प्यावर जा. जर 6 मिनिटांपेक्षा कमी वेळ असेल तर आणखी काही काळ साष्टांग धरून ठेवा.
हळू हळू तुम्हाला वेळेचे भान ठेवणे जमू लागेल. जर वेळेच्या बाबतीत थोडे पुढे मागे झाले तरी काही हरकत नाही.
साष्टांग मध्ये पोट वर खेचून पाठीचा कणा आणि मान ताणले जातात. यामुळे तुमच्या लक्षात येईल की तुमचे कपाळ आणि पायाची बोटे घसरू शकतात, खासकरून जर तुम्ही गुळगुळीत फरशीवर सराव करत असाल तर. आसन धरून मदत म्हणून तुम्ही योगा मॅटवर सराव करू शकता किंवा अधिक चांगली पकड असलेल्या पृष्ठभागावर सराव करू शकता.
जसे तुम्ही सराव दररोज करत जाल आणि लवचिकता वाढत जाईल, तुमच्या लक्षात येईल की आसन धरून ठेवणे अधिक सोपे आणि सोयीस्कर होत आहे.
तुम्ही शरीराने धारण केलेल्या प्रत्येक आसनामध्ये तुमच्या लक्षात येईल की तुमचा श्वास बदलतो. म्हणून तुम्ही साष्टांगात गेल्यानंतर लक्ष देऊन पहा की तुमचा श्वास स्वाभाविकपणे कसा चालू आहे आणि त्यापेक्षा किंचित दीर्घ श्वास घ्या.
साष्टांगात असताना, तुम्ही उभे किंवा बसलेल्या अवस्थेत असतो तितका तुमचा श्वास दीर्घ किंवा आरामदायक नसेल. तो किंचित उथळ वाटू शकते, जे की ठीक आहे. जर त्याने तुम्हाला खूप अस्वस्थ वाटत असेल तर तुम्ही शक्य होईल तितक्याच वेळ आसन धरून ठेवावे. जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर सध्या तुम्ही तुमचं डोकं थोडं सैल करू शकता, तुमचं नाक जमिनीपासून शक्य तितक्या वर ठेवून.
आसन धारण केल्यावर तुमचं शरीर आरामात राहील याची खात्री करा आणि सामान्यापेक्षा किंचित दीर्घ श्वास घ्या.
जर तुम्हाला अजूनही श्वास घेण्यास अडचण येत असल्यास, तर तुम्ही तुमचं पोट थोडसं खाली करू शकता, जमिनीपासून शक्य तितक्या वर ठेवून.
जर तुम्हाला सरावाबद्दल इतर प्रश्न असतील, तर तुम्ही hatha.support@ishafoundation.org ला लिहू शकता.