प्रश्न: नैराश्य आणि चिंता यासारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या सध्या भारतासह जगाच्या बर्याच भागात सर्रासपणे दिसत आहेत. यावर तुमचे काय मत आहे?

सद्गुरु: मानसिकरित्या आजारी पडणे ही विनोदाची गोष्ट नाही. ही अत्यंत दुःखदायक बाब आहे. जर तुम्ही शारीरिकदृष्ट्या आजारी असाल तर तुम्हाला प्रत्येकाची सहानुभूती मिळते, पण जेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या आजारी असता तेव्हा दुर्दैवाने तुम्हाला लोक हसतात. याचे कारण म्हणजे मानसिकदृष्ट्या एखादी व्यक्ती केव्हा आजारी आहे आणि केव्हा मुर्खासारखी वागते हे ठरवणे फार कठीण आहे. ज्यांच्या कुटुंबातली एखादी व्यक्ती मानसिक आजाराने त्रस्त असते तेव्हा त्यांच्यासाठी ही सर्वात मोठी समस्या असते. ते कधी सोंग करत आहेत आणि कधी त्यांना खरोखर त्रास होत आहे हे तुम्हाला माहिती नाही. त्यांच्यासाठी कधी दयाळू व्हावे, कधी कठोर व्हावे हे तुम्हाला समजत नाही.

मानवी शहाणपणा ही एक अत्यंत नाजूक गोष्ट आहे. शहाणपणा आणि वेडेपणा दरम्यानची सीमा खूपच धूसर आहे. जर तुम्ही दररोज ही ढकललीत तर एक दिवस तुम्ही ती ओलांडाल. जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा कोणत्या शब्दांचा वापर केला जातो? “माझं डोकं तुझ्यामुळे फिरलं आहे ,” किंवा “मला वेडं करून सोडलंय.” तुम्ही त्या वेडाचा थोडासा आनंद घ्याल - तुम्ही ती रेषा ओलांडली आणि एक प्रकारची मोकळीक आणि सामर्थ्य अनुभवलं. पण एक दिवस जेव्हा तुम्ही मागे फिरू शकत नाही, तेव्हा त्रास सुरू होतो. हे शारीरिक वेदनांसारखे नाही - या भयानक वेदना आहेत. मी मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या लोकांच्या संपर्कात राहिलो आहे, त्यांना मदत करण्याच्या प्रयत्नात. कोणाबरोबरही असे होऊ नये. पण दुर्दैवाने आज तो जगात एक साथीचा रोग बनत चालला आहे.

मानसिक आजार का वाढत आहे

पाश्चात्य समाजात हे मोठ्या प्रमाणात घडत आहे. भारत यात फार मागे राहणार नाही. भारतातील शहरं विशेषत: या दिशेने वाटचाल करतील कारण अनेक प्रकारे शहरी भारत पाश्चिमात्य देशांपेक्षाही अधिक पाश्चिमात्य झालेला आहे. अमेरिकेपेक्षा इथे जास्त लोक जीन्स प्यांट वापरत आहेत!

मानसिक आजार पूर्वीपेक्षा खूपच वाढत आहेत कारण आपण लोकांच्या आसपास असलेली सर्व आधार व्यवस्था काढून घेत आहोत, आपण त्या काढून घेतलेल्या आधार व्यवस्थेला काहीच पर्याय दिलेला नाही. जर लोक स्वत: मध्ये इतके जागरूक आणि सक्षम बनले तर तुम्ही सर्व आधार काढले तरीही सर्वकाही ठीक असेल. पण ती क्षमता न देता, तुम्ही फक्त आधारच काढलात तर लोक वेडावतील यात शंकाच नाही.

तुम्ही केलेल्या सर्कसासाठी तुमचे कुटुंबातले लोक एका जाळ्यासारखे होते. तुम्ही कसेही पडलात तरी कोणीतरी काही क्षणांसाठी तुम्हाला धरून ठेवायला होतं.

आपल्या मानसिक आणि भावनिक स्थिरतेसाठी आपण बर्याच काळापासून काही गोष्टींवर अवलंबून आहोत. पण आता या सर्व गोष्टी काढून घेतल्या आहेत. यापैकी एक गोष्ट म्हणजे कुटुंब. कुटुंब आपल्याला एक निश्चित आधार, दिलासा देतं - काहीही झाले तरी आपल्यासाठी नेहमीच कोणीतरी असतं. जेव्हा तुम्ही योग्य गोष्टी करता तेव्हा इतर प्रत्येकजण तुमच्याबरोबर असतो. जर तुम्ही चुकीच्या गोष्टी केल्या तर ते स्वत:ला दूर ठेवतात. तुम्ही केलेल्या सर्कसासाठी तुमचे कुटुंबातले लोक एका जाळ्यासारखे होते. तुम्ही कसेही पडलात तरी कोणीतरी काही क्षणांसाठी तुम्हाला धरून ठेवायला होतं. पण हे जाळं आजकाल बर्याच लोकांसाठी नाहीसं झालं आहे. आता, जेव्हा तुम्ही पडता तेव्हा तुम्ही जमिनीवरआपटता. त्यामुळे लोक कोलमडून पडत आहेत.

भारतीय संस्कृतीत अशी परंपरा होती एकेकाळी जेव्हा एकूण लोकसंख्येपैकी तीस टक्के लोक संन्यासी मार्ग अवलंबत होते. जाणीवपूर्वक, त्यांनी कुटुंबाशिवाय जगणे, आधार न घेता जगणे, घर न घेता जगणे निवडले - बेघरपणा पण गरिबीतून नाही, पण स्वतःच्या जागरूक निवडीतुन. त्यापैकी कोणालाही कधीच औदासिन्य आले नाही कारण त्यांनी आधारभूत जाळीची गरज पार केली.

जर तुम्ही तुमची तारेवरची कसरत खरोखर चांगली शिकला असाल तर तुम्ही ते सुरक्षाजाळीशिवाय करू शकता. पण तुम्ही त्यात कुशल नसाल तर तुमच्याकडे चांगली जाळी असलीच पाहिजे, नाहीतर तुमचे डोके फुटेल. आज हेच सगळीकडे घडत आहे. आपल्याकडे असलेली पारंपारिक आधारभूत व्यवस्था आपण काढून टाकत आहोत.

दुसरा पैलू म्हणजे धर्म. धर्माने मानवी मानसिक संतुलन सहजतेने हाताळले. "देव तुझ्याबरोबर आहे, काळजी करू नकोस." याने बर्याच लोकांना शांत, निवांत, चिंतामुक्त केले. धर्माचे योगदान आपण कमी लेखू शकत नाही. आज लोक मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. 1.3 अब्ज लोकांसाठी भारतात पुरेसे मानसोपचारतज्ज्ञ नाहीत. कोणत्याही देशाकडे नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते खूप अकार्यक्षम आहेत, कारण एका वेळी ते फक्त एकच रुग्ण पाहू शकतात आणि त्यांना बर्याच फर्निचरची आवश्यकता असते! थोड्या आदरानं, आपण धर्माच्या या योगदानाची दाद दिलीच पाहिजे. धर्म ही खूप स्वस्त जन-मनोचिकित्सा आहे.

प्रश्नः हे नक्कीच एक संकट आहे जे आपल्याला त्रस्त करत आहे आणि काही जण मदत घेतात. कधीकधी, निदान हे रासायनिक असंतुलन असे असते आणि औषधे दिली जातात. तुम्ही आतून ते सुख शोधण्याविषयी बोलले आहात. अशा परिस्थितीत ते कशा प्रकारे मदत करू शकेल?

रसायनशास्त्र एक ऑर्केस्ट्रा

सद्गुरु: मानवी सुखानुभवाकडे अनेक प्रकारे पाहिले जाऊ शकते. त्याकडे पाहण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे प्रत्येक मानवी अनुभवाला त्याचा एक रासायनिक आधार असतो. ज्याला आपण शांती, आनंद, प्रेम, दुःख, अशांती, क्लेश, परमानंद म्हणतो - प्रत्येक गोष्टीला एक रासायनिक आधार आहे.

स्वास्थ्य आणि आजारपणाला देखील रासायनिक आधार असतो. वैद्याचे काम म्हणजे रसायनांचा हा खेळ सांभाळण्याचा प्रयत्न करणे. आज संपूर्ण औषधविज्ञान फक्त रसायनांचा वापर करून तुमचे आरोग्य व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करीत आहे. अगदी मानसिक आजार देखील बहुतकरून बाहेरून रसायनं देऊन व्यवस्थित केले जाते. परंतु तुम्ही या ग्रहावरील ज्या ज्या रसायनांचा विचार करू शकता अशी सर्व रसायने या शरीरात आधीपासून अस्तित्त्वात आहेत.

मानसिक आरोग्यासाठी योग

मुळात: स्वास्थ्य म्हणजे एक प्रकारचा आनंद. जर तुमचे शरीर आनंदी झाले तर आपण याला आरोग्य म्हणतो. जर ते खूपच आनंदी झाले तर आपण याला सुख म्हणतो. जर तुमचे मन आनंदी झाले तर आपण याला शांती म्हणतो. जर ते खूप खूश झाले तर आपण याला आनंद म्हणतो. जर तुमच्या भावना आनंदी झाल्या तर आपण याला प्रेम म्हणतो. जर त्या खूपच आनंदी झाल्या तर आपण त्याला करुणा म्हणतो. जर तुमची उर्जा आनंदमय झाली तर आपण याला उल्हास म्हणतो. जर ती खूपच आनंदी झाली तर आम्ही त्याला परमानंद म्हणतो. जर आपला परिसर आनंददायी झाला तर आपण याला यश म्हणतो.

योगामुळे तुमच्यात धगधगणाऱ्या निर्मितीच्या स्त्रोतापर्यंत तुम्हाला पोहोचता येतं. तुमच्यात अशी एक बुद्धिमत्ता आहे जी भाताचं किंवा एक केळं किंवा भाकरीचा तुकडा माणसामध्ये बदलू शकतं.

शरीरात आपण रसायनं टाकून आनंदाचं प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. असं म्हणतात की अमेरिकेत सत्तर टक्के लोक काही ना काही औषधं घेत आहेत. अत्यंत संपन्न देश, जिथे पोषण आणि जीवनशैलीची प्रचंड पर्याय आणि उपलब्धता आहे, सत्तर टक्के लोक डॉक्टरांच्या औषधावर जगात आहेत. तुम्ही बाहेरून रसायनं टाकून तुमचा शहाणपणा आणि आरोग्य व्यवस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहात.

मानवी शरीर एक अतिशय जटिल रासायनिक कारखाना आहे. बाहेरून त्याचं व्यवस्थापन करणं फार कठीण आहे. तुम्ही ते आतून व्यवस्थापित करू शकता पण त्यासास्ठी तुम्हाला तुमच्या आत प्रवेश कसं करणे हे माहिती असणं आवश्यक आहे! योगामुळे तुमच्यात धगधगणाऱ्या निर्मितीच्या स्त्रोतापर्यंत तुम्हाला पोहोचता येतं. तुमच्यात अशी एक बुद्धिमत्ता आहे जी भाताचं किंवा एक केळं किंवा भाकरीचा तुकडा माणसामध्ये बदलू शकतं. ब्रेडच्या तुकड्याने, तुम्ही या धरतीवरची सर्वात जटिल अशी मनुष्य यंत्रणा तयार करता! जर या बुद्धिमत्तेचा एक थेंब जरी तुमच्या दैनंदिन जीवनात प्रवेश केला तर तुम्ही दयनीय नव्हे तर जादुई आयुष्य जगाल.

लोक ज्या त्रासात आहेत तो म्हणजे त्यांचं मानसिक नाटक. ते तुमचं नाटक आहे पण अत्यंत वाईट रीतीने दिग्दर्शित केलेलं नाटक आहे. जर तुम्हाला त्याचा त्रास होत असेल तर, तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येकाला पण त्याचा त्रास होतच आहे. जर तुमचे नाटक वाईट रीतीने दिग्दर्शित केलं असेल तर फक्त तुम्हीच ते एक मजेदार नाटक बनवू शकता. तुमच्या मनात जे घडत आहे ते फक्त तुमचं नाटक आहे. तुम्हाला फक्त एक चांगला दिग्दर्शक बनलं पाहिजे, जेणेकरून तुमचं नाटक तुम्हाला हवं तसं सादर करता येईल. जगातलं नाटक तुम्हाला हवं तसं घडणार नाही कारण ते तुमच्यापेक्षा मोठं आहे, पण तुमच्या डोक्यात जे घडत आहे ते तुम्हाला हवं तसंच घडलं पाहिजे. याची जबाबदारी स्वीकारण्याची वेळ आता आली आहे.

तुम्ही जसं बाहेरचं जग इंजिनिअर अर्थात घडवू शकता तसंच तुम्ही तुमचं आंतरिक विश्व देखील तुम्हाला हवं तसं इंजिनिअर अर्थात घडवू शकता. बाह्य आराम आणि सुविधा निर्माण करण्यासाठी आपल्याजवळ एक विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे, आंतरिक कल्याण साधण्यासाठी सुद्धा आपल्याजवळ एक विस्तृत परिपूर्ण विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे. तुमची आंतरिकता इंजिनियर करण्याचा एक मार्ग आहे. तुम्ही कोण आहात याबद्दलचे मूलभूत रसायनशास्त्र कसे बदलू शकता आणि परमानंदांचे रसायन कसे तयार करू शकता याबद्दल योग्य वैज्ञानिक मार्ग आहेत. एकदा तुम्ही आनंदाची केमिस्ट्री तयार केली की तुम्ही तुमच्या स्वभावाने आनंदी होता, दुसर्या कशामुळे नाही. आम्ही हे इनर इंजिनिअरिंग ध्यान योग प्रोग्रॅम म्हणून जगभर सर्वांसाठी हे देऊ केलं आहे.

इनर इंजिनीरिंगऑनलाईन तुम्हाला नैराश्य आणि चिंता यातून बाहेर पडायला मदत करू शकतो.

इंडियाना युनिव्हर्सिटी, बेथ इस्त्राईल डिकनॉस मेडिकल सेंटर, रटगर्स आणि फ्लोरिडा विद्यापीठातील संशोधकांनी एक व्यापक अभ्यास केला आहे, ज्यामध्ये असं आढळलं आहे की केवळ 90 दिवसांच्या इनर इंजिनीरिंग सरावामुळे मेंदू-व्युत्पन्न मज्जा वाहिनी घटकाची ( Brain-Derived Neurotrophic Factor) (बीडीएनएफ) पातळी 300% वाढते. हे एक सिद्ध झालेलं सत्य आहे की जर बीडीएनएफ कमी पातळीवर असेल तर ते चिंता, नैराश्य, अल्झाइमर, भावनिक थकवा होण्यास कारणीभूत ठरतं. इनर इंजिनीरिंगमुळे, लोक त्यांच्या उदास मूड आणि चिंताग्रस्त परिस्थितीतून बाहेर पडण्यास सक्षम झाले आहेत.

आमच्या इनर इंजिनीअरिंगच्या प्रक्रियेमध्ये शरीर, मन, भावना आणि ऊर्जा यांचा समावेश आहे. तुमच्या शरीर आणि उर्जेवर जे कार्य करावे लागते ते आम्हाला थेटच करावं लागेल कारण तो उर्जेचा दीक्षाविधी आहे, शिकवण नव्हे. पण मन आणि भावनांवर जे कार्य करावे लागते ती एक प्रकारची शिकवण आहे. तुम्ही ते ऑनलाइनच्या माध्यमातून शिकून अनुभवू शकता.

....केवळ 90 दिवसांच्या इनर इंजिनीरिंग सरावामुळे मेंदू-व्युत्पन्न मज्जा वाहिनी घटकाची ( Brain-Derived Neurotrophic Factor) (बीडीएनएफ) पातळी 300% वाढते

बहुतेक लोकांमध्ये , जर त्यांच्या भावना आणि विचार करण्याची पद्धत बदलली तर तुम्ही पाहाल त्यांच्या आयुष्यात अविश्वसनीय बदल घडून येतो. जर तुम्हाला हवं त्या गोष्टीबद्दल विचार करू लागलात, पण सक्तपूर्वकपणे नव्हे, तर तुम्ही स्वाभाविकपणे आनंदी व्हाल. आत्ता जर तुम्ही तुमच्या भावना खूप आनंदी ठेवू शकला तर, तुमचे घरदार आनंददायी होईल. सामाजिक वर्तनामध्ये नैसर्गिकरित्या रूपांतरित होणारे सर्व मानसिक आणि भावनिक फायदे इनर इंजिनीअरिंग ऑनलाइन मध्ये आहेत. ऊर्जेचे आणि शारीरिक पैलूची दीक्षा व्यक्तिगतरित्या हजर होऊन घेणे आवश्यक आहे. ते ऑनलाईनच्या माध्यमातून शिकवले जाणार नाही कारण त्याचे बरेच पैलू आहेत. तुम्हाला शंभवी महामुद्रा स्वतंत्रपणे शिकावी लागेल. इनर इंजिनीअरिंग ऑनलाइन तुमच्या विचार आणि भावनांचे रूपांतर करेल.

बहुतेक लोकांना वाटते की भावनिक आणि वैचारिक हेच अंतिम परिवर्तन आहे. जर एखादी व्यक्ती वेगळ्या प्रकारे विचार करू लागली आणि अनुभवू लागली आणि ते आनंदी मनुष्य बनले तर लोक सहसा असे म्हणू लागतात की "तो एक अध्यात्मिक व्यक्ती आहे, तो अदभूत आहे." नाही, तो सुद्धा एक सर्वसामान्य माणूस आहे, आणि इतर लोक त्यादिशेने अजूनही वाटचाल करत आहेत!