सद्गुरुंनी केलेल्या सुस्पष्ट वर्णनातून आदियोगी, सर्वप्रथम योगी, ज्यांनी मानवजातीला योगाची ओळख करून दिली, त्याकडे आपण पाहणार आहोत.

सद्गुरू: योग संस्कृतीमध्ये शिवाकडे एखादा देव म्हणून बघितलं गेलं नाही, पण आदियोगी किंवा सर्वप्रथम योगी - योगाचा आरंभकर्ता म्हणून पाहिले गेले. ते पहिले होते ज्यांनी हे (योगाचे) बीज मानवी मनामध्ये पेरले. योग परंपरेनुसार, १५,००० वर्षांपूर्वी शिवाला संपूर्ण आत्मसाक्षात्कार झाला आणि हिमालायमध्ये परामानंदामध्ये नाचत त्यांनी स्वतःला बंधमुक्त केले. जेव्हा त्यांच्या परमानंदाने थोडाशी हालचाल करायला परवानगी दिली, तेव्हा त्यांनी अगदी बेभानपणे नृत्य केले. जेव्हा ते कुठल्याही गतिमानतेच्या पल्याड गेले, तेव्हा ते पूर्णपणे निश्चल बनले.

लोकांनी पाहिले की ते काहीतरी अनुभूती घेत आहेत जी याआधी कोणालाही माहीत नाही, असं काहीतरी ज्याची ते कल्पनाही करू शकत नाहीत. ते काय आहे याची जिज्ञासा जागृत झाली आणि लोकं जमा होऊ लागले. लोकं जमा झाले, वाट पाहू लागले, आणि परत निघून जायला लागले, कारण ते इतर लोकांच्या जमा होण्याकडे त्यांचे लक्ष नव्हते. ते एकतर तीव्र नृत्यामध्ये असत अथवा अगदी निश्चल, अविचल, आजूबाजूला काय चाललंय याबद्दल पूर्णपणे बेफिकीर. लवकरच बाकीचे पण सगळे निघून गेले....

फक्त सात लोकसोडून...

या सात जणांचा आग्रह होता की या मनुष्यामध्ये काय आहे ते त्यांनीही शिकलेच पाहिजे, परंतु शिवाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी याचना केली व विनंती केली, “कृपा करा, तुम्हाला जे ज्ञान आहे ते आम्हाला पण जाणण्याची ईच्छा आहे.” शिवाने त्यांना झिडकारले आणि म्हणाले, “अरे मूर्खांनो, तुम्ही ज्या पद्धतीने सध्या आहात, दहा लाख वर्षातसुद्धा तुम्हाला ते जाणणे शक्य होणार नाही. ते जाणण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात तयारी आवश्यक आहे. हे काही मनोरंजन नाही."

म्हणून त्यांनी तयारी सुरू केली. दिवसांमागून दिवस, आठवड्यांमागून आठवडे, महिन्यांमागून महिने, वर्षानुवर्षे त्यांनी तयारी केले. शिवाने त्यांच्याकडे केवळ दुर्लक्ष करणे निवडले. अशाप्रकारे चौऱ्याऐंशी वर्षांच्या साधनेनंतर एका पौर्णिमेच्या दिवशी, जेव्हा अयन बदलते - ज्याला या परंपरेत दक्षिणायन म्हटले जाते - आदीयोगीने या सात जणांकडे पाहिले आणि त्याच्या लक्षात आले की ते ज्ञानाचे तेजस्वी ग्रहणकर्ते बनलेले आहेत. तो यापुढे त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकला नाही. त्यांनी त्याचे लक्ष वेधून घेतले.

"कांतीसरोवरावर सद्गुरू"

पुढचे काही दिवस त्याने त्यांचे लक्ष देऊन निरीक्षण केले आणि मग जेव्हा पुढची पौर्णिमा आली, तेव्हा त्याने गुरू बनण्याचे ठरविले. आदीयोगीने स्वतःला आदीगुरुमध्ये रुपांतरीत केले : पहिला गुरू त्या दिवशी अस्तित्वात आला ज्याला आपण आज गुरुपौर्णिमा म्हणून जाणतो. केदारनाथच्या वर काही किलोमीटरवर एक कांतीसरोवर नावाचे तळ्याच्या किनारी, मानवजातीवर आपला कृपाप्रकाश टाकण्यासाठी ते दक्षिणमुखी होऊन बसले, आणि मग या सात जणांना योगविज्ञानाचे प्रसारण सुरू झाले. ही योगविद्या म्हणजे तुम्ही ज्या योगवर्गाला जाता आणि शरीराचे व्यायाम करता ते नव्हे - जे की कोणत्याही नवजात शिशूला माहिती असते - किंवा तुमचा श्वास कसा रोखून ठेवायचा - जे कोणत्याही न जन्मलेल्या शिशूला माहिती असते. संपूर्ण मानवी प्रकृतीची रचना जाणून घेण्याचे हे एक विज्ञान आहे.

बऱ्याच वर्षांनंतर, जेव्हा हा योगचे प्रसारण पूर्ण झाले, त्यातून सात पूर्ण साक्षात्कारी अस्तित्वात आले - सुप्रसिद्ध सात ऋषी ज्यांना आज आपण सप्तर्षी म्हणून ओळखतो, आणि भारतीय संस्कृतीमध्ये त्यांची पूजा केली जाते. शिवाने त्या प्रत्येक सात लोकांमध्ये योगाचे वेगवेगळे वैशिष्ट्य पेरले, आणि हेच सात पैलू पुढे योगाचे मूळ सात भाग बनले. आजसुद्धा, योगामध्ये हे सात भाग विशिष्टपणे राखले गेले आहेत.

"योगविद्येचे सप्तर्षींमध्ये प्रसारण"

मानवाच्या सध्याच्या मर्यादा आणि सक्तीतून तो उत्क्रांत होऊ शकतो, या मार्गाच्या प्रचार-प्रसारासाठी जगाच्या सात वेगवेगळ्या भागांत सात वेगवेगळ्या दिशांनी सप्तर्षींना पाठवण्यात आले. ते जणू शिवाचे अंग बनले, मनुष्य कशाप्रकारे इथे सृष्टीचा निर्माता म्हणून राहू शकतो याचे ज्ञान आणि तंत्रज्ञान जगाला देण्यासाठी ते निघाले. काळाच्या ओघात बऱ्याच गोष्टींचा नाश झाला, पण त्या त्या ठिकाणची संस्कृती जेव्हा लक्ष देऊन बघितली जाते, तेव्हा या लोकांच्या कार्याची पुसटशी चिन्हे आजही आपल्याला पाहायला मिळतात, अगदी ज्वलंत. त्याने वेगवेगळे रंग आणि आकार घेतले आहेत, आणि त्यातली क्लिष्टता लाखो वेगवेगळ्या पद्धतीने बदलली आहे, पण ती चिन्हे आजही पाहायला मिळतात.

मनुष्य त्याच्या निर्धारित मर्यादित साच्यामध्येच राहावा, असं काही गरजेचे नाही, हे आदियोगीने शक्य केले. असा एक मार्ग आहे ज्याने तुम्ही शरीरामध्ये राहूनसुद्धा त्यात जखडले जात नाहीत. शरीरात राहूनसुद्धा शरीरात अडकून न बसण्याचा एक मार्ग आहे. मनाला वेदना न होता सुद्धा मनाला सर्वोत्तम पद्धतीने वापरण्याचा एक मार्ग आहे. ज्या कोणत्या अस्तित्वाच्या पैलूमध्ये तुम्ही सध्या असाल, त्याच्या पलीकडे जाण्याचा मार्ग आहे - जगण्याचा एकवेगळा मार्ग आहे. ते म्हणाले, "जर तुम्ही स्वतःवर योग्य काम केले तर तुम्ही तुमच्या आत्ताच्या मर्यादांच्या पलीकडे उत्क्रांत होऊ शकता." हेच तर आदियोगीचे महत्व आहे.