इनर इंजिनीयरिंग: ‘अ योगिज गाईड टू जॉय’ ची मराठी आवृत्ती
‘ इनर इंजिनिअरींग ' या आध्यात्मिक प्रक्रियेच्या आधुनिक व्याख्येने सद्गुरूंनी अध्यात्माला नवीन अर्थ प्राप्त करून दिला आहे. ही व्याख्या आजच्या पिढीला। विशेष भावते आहे. त्यामुळेच जगभरातील असंख्य तरुण सद्गुरूंच्या विचारांचे। चाहते आहेत. याचे कारण सदगुरूंना अवगत असलेली युवा पिढीची भाषा, । सदगुरूंचा एकेक शब्द स्वानुभूतीने भारलेला आहे. अंधश्रद्धेपासून दूर असणारी आंतर्विज्ञानाची अभियांत्रिकी सद्गुरू ‘ आत्मज्ञानाचे विज्ञान ' मधून सर्वसामान्यांना सांगत आहेत. "" डॉ . विजय भटकर या क्रांतिकारी पुस्तकात सद्गुरू सामान्य रुढी - विचारांना छेद देतात. एक थोर विचारवंत, द्रष्टा आणि योगी, सद्गुरू, आपल्या आध्यात्मिक आणि यौगिक अनुभवांचे सार यात| प्रकट करून जीवनामध्ये विलक्षण कायापालट घडवून आणू शकणाच्या, ‘ इनर इंजिनिअरींग ' च्या मार्गाची ओळख करून देतात. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनी त्यांनी प्रगत केलेली ही शक्तिशाली प्रणाली, शरीराचा आणि मनाचा, आतल्या व बाहेरच्या जीवनउर्जेशी योग्य प्रकारे समन्वय साधून अनंताच्या अमर्याद शक्ती व संभावना आवाक्यात आणते.
‘ इनर इंजिनिअरींग ' हे तुमचेच, तुमच्या आनंदाचे आणि स्वास्थ्याचे सॉफ्टवेअर आहे.