टाइम्स नाव या टीव्ही चॅनेलवर सद्गुरुंसोबत नंदिता दास आणि प्रल्हाद कक्कर यांची मुलाखत घेतली जात असताना सदगुरू  "अध्यात्म म्हणजे काय "आणि त्यात सर्वांचे कल्याण कसे दडले आहे यावर बोलत आहेत.

सद्गुरु: अध्यात्म म्हणजे काही विशिष्ट सराव किंवा साधना नव्हे. तो आपल्या अस्तित्वाचा एक निश्चित असा मार्ग आहे. तेथपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक गोष्टी करता येतात. हे आपल्या घरातील बागेसारखे आहे. जर माती, सूर्यप्रकाश आणि रोप उत्तम स्थितीत नसतील, तर त्याला फुले येणार नाहीत, आणि तुम्हाला त्यासाठी काहीतरी करावे लागेल. तुम्हाला त्या सर्व गोष्टींची सुव्यवस्था आणि काळजी घ्यावी लागेल. तर तुम्ही तुमचे शरीर, मन, भावना आणि ऊर्जा यांना एका विशिष्ट पातळीपर्यन्त परिपक्व केलीत, तर तुमच्यामध्ये काहीतरी अदभूत असे फुलून येईल – हेच अध्यात्म आहे. जेंव्हा तुमचा तर्क अपरिपक्व असतो, तेंव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीवर शंका घेता. जेंव्हा तुमचा तर्क परिपक्व होतो, तेंव्हा तुम्ही सर्वकाही संपूर्णपणे वेगळ्याच दृष्टीकोणातून पाहायला सुरुवात करता.

जेंव्हा एखादा मनुष्य स्वतःपेक्षा अदभूत आणि विशाल असं काही अनुभवतो, तेंव्हा पारंपारिकदृष्ट्या त्याकडे पाहण्याची पद्धत म्हणजे, “हा देव आहे...” असे म्हणतो. देवाबद्दलची संपूर्ण कल्पना तशीच आहे – तुमच्यापेक्षा मोठी असणारी कोणतीही गोष्ट. मग तो एखादा मनुष्य असू शकतो, किंवा एखादा अनुभव असू शकतो किंवा ते निसर्गाचे एखादे स्वरूप असू शकते. पण हे आध्यात्मिक आहे का? नाही, हे फक्त जीवन आहे. मी जेंव्हा “फक्त जीवन” असे म्हणतो, तेंव्हा मी ती एक छोटी तुच्छ गोष्ट म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत नाही. ही एक सर्वात महान गोष्ट आहे. जेंव्हा जीवन तुमच्यासाठी एक जबरदस्त, शक्तीशाली, आनंददायी अनुभव बनते, तेंव्हाच याची निर्मिती कुणी केली असेल हे जाणून घेण्याची इच्छा तुमच्या मनात निर्माण होते.

जर तुम्हाला सृष्टीच्या निर्मितीची प्रक्रिया किंवा स्रोत जाणून घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी तुम्हाला सर्वात निकटचा निर्मितीचा भाग म्हणजे तुमचे आपले शरीर आहे, नाही का? तुमच्या स्वतःमध्येच दडलेला तो सृष्टीकर्ता, तुमच्यातच अडकून बसलेला आहे. तुम्ही त्याला मुकु नये. तुम्ही त्याला या ठिकाणी गाठले, तुम्हाला तुमच्यामधील सृष्टी रचनेचा स्रोत गवसला, तर तुम्ही आध्यात्मिक आहात. 

देवावर तुमचा विश्वास असणे हे आध्यात्मिकतेचे लक्षण आहे का?

एखादी नास्तिक व्यक्ती आध्यात्मिक असू शकत नाही, पण एक आस्तिक व्यक्तीदेखील अध्यात्मिक असू शकत नाही. कारण नास्तिक आणि आस्तिक हे दोघे वेगळे नाहीत. एक म्हणतो देव आहे, आणि दुसरा म्हणतो देव नाही. दोघेही अशा गोष्टीवर विश्वास ठेवत आहेत, ज्याबद्दल त्यांना काहीच माहिती, अनुभव नाही. तुम्हाला माहित नाही हे मान्य करण्यायेवढे तुम्ही प्रामाणिक नाही, पण ही समस्या तुमचा आहे. तर आस्तिक आणि नास्तिक यांच्यात काही फरक नाही. वेगवेगळे आहोत असे भासविणारी ती एक सारखीच माणसे आहेत. अध्यात्माची आस असणारी व्यक्ती आस्तिक देखील नसते, किंवा नास्तिक देखील नसते. आपल्याला माहित नाही हे त्याला समजलेले असते, म्हणूनच ज्ञानप्राप्तीच्या शोधात आहे.

ज्या क्षणी तुम्ही एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवता, तेंव्हा तुम्ही इतर गोष्टींप्रती आंधळे होता. या पृथ्वीवर सुरू असलेला संपूर्ण संघर्ष हा तुम्हाला भासाविल्याप्रमाणे बरं आणि वाईट यांच्यामधील नाही. तो नेहमीच एका मनुष्याच्या विश्वास आणि धारणां विरुद्ध दुसर्‍या मनुष्याच्या विश्वास व धारणा असा असतो. विश्वास, धारणांची गरज आध्यात्मिक कारणांपेक्षा मानसिक कारणांसाठी अधिक असते. तुम्हाला कोणत्या तरी गोष्टीला कवटाळून बसायचे असते, तुम्हाला सुरक्षित असावेसे वाटते, आपल्याला सर्वकाही माहित आहे असा पोकळ आत्मविश्वास हवा असतो. हे सर्व एका अतिशय बालिश मनातून येत आहे. या अस्तित्वाबद्दल तुम्हाला काहीही माहित नसले तर काय अडचण आहे, वास्तविकतः तुम्हाला खरेच काही माहिती नाही. हे खूप सुंदर आहे! आणि तुम्ही स्वतःला आतून सुंदर आणि आनंदी कसे बनवायचे हे पहा, ते तुमच्याच हातात आहे. 

आध्यात्मिक अनुभव म्हणजे काय?

अनुभवाच्या शोधात महासागरात किंवा पर्वतांवर जाणे कदाचित विलक्षण, अदभूत असू शकते, तुम्ही सृष्टी जशी आहे तसा त्याचा आनंद घ्यायला हवा, पण तुम्ही हे मात्र लक्षात घेणे आवश्यक आहे की समुद्रातील माशाला तो एक आध्यात्मिक अनुभव आहे असे वाटत नाही, किंवा पर्वतावरील शेळीला पर्वत म्हणजे आध्यात्मिक अनुभव आहे असे वाटत नाही, कारण ते नेहेमी तेथेच असतात. तुम्ही जर त्यांना शहरात आणले, तर कदाचित त्यांना तो आध्यात्मिक अनुभव वाटेल. हे आपल्या स्वतःमधील बाधा मोडण्याविषयी आहे– तुमच्यामधील एखादी गोष्ट तुटून पडली आहे. तुम्ही सुरक्षित कवचात होतात. ते कवच फुटले आणि एक मोठे कवच बनले. मला असे म्हणायचे आहे, की तुम्हाला जर मोठ्या कवचाची सवय झाली, तर ते आधी असलेल्या कवचासारखेच वाटू लागते.

म्हणून तुम्हाला जर अमर्याद बनण्याची इच्छा असेल आणि तुम्ही जर भौतिकतेतून तसा प्रयत्न करत असाल, तर तुम्ही टप्प्याटप्प्याने असीमतेकडे जाण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही 1,2,3,4,5 असे मोजून एके दिवशी अनंताचा शेवटचा आकडा मोजू शकाल का? तुम्ही एक अनंत आकडे मोजक होऊन बसाल. तो मार्ग नाही. भौतिकत्वाद्वारे तुम्ही कधीही अमर्याद स्वरूपाकडे पोहोचू शकणार नाही. प्रत्येक मनुष्यप्राणी अमर्याद बनण्यास इच्छुक आहे. त्याला जे काही हवे आहे ते तुम्ही त्याला दिलेत, तर तीन दिवस त्याला बरे वाटेल. चौथ्या दिवशी तो आणखी काहीतरी वेगळे शोधायला लागेल. एखादी व्यक्ती याला लोभ असे म्हणू शकते, मला फक्त हे म्हणायचे आहे की हा जीवनाचा चुकीच्या दिशेने चाललेला प्रवास आहे. तुम्हाला सृष्टीचे अमर्याद स्वरूप माहित करून घ्यायचे असेल, तर तुम्ही भौतिकत्वाच्या पलीकडे असलेली एखादी गोष्ट अनुभवणे, तिचा ध्यास घेणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही समुद्रात उडी मारलीत, जेव्हा तुम्ही एक प्रचंड पर्वत पाहिलात, जेव्हा तुम्ही एखादे गाणे गायलेत, जेव्हा तुम्ही नृत्य केलेत, जेंव्हा तुम्ही तुमचे डोळे मिटून घेतलेत, अशा अनेकविध मार्गांनी तुम्हाला एखादीगोष्ट स्पर्शून गेली असेल. तुम्ही तिला स्पर्श केलात, पण आता प्रश्न आहे ती टिकवून ठेवण्याचा. हो ना?

एक सोपी साधना

एक गोष्ट म्हणजे आम्ही तुम्हाला एका अगदी सोप्या प्रक्रियेत प्रस्थापित करू शकतो, जी वस्तुनिष्ठ नाही. आणि जे तंत्रज्ञान व्यक्तीनिष्ठ आहे, ते कटिबद्धतारहित वातावरणात शिकवले जाऊ शकत नाही. म्हणून तुमची स्वतःसाठी थोडासा वेळ संपूर्णपणे लक्ष एकाग्र करून देण्याची इच्छा असेल, तर आम्ही तुम्हाला एक सोपी साधना शिकवू, ज्यात दिवसाच्या सुरूवातीला केवळ 21 मिनिटांचा वेळ तुम्ही दिलात (इनर इंजीनीरिंग), तर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात स्वतःमध्ये एका अतिशय अद्भुत आध्यात्मिक अनुभूतीद्वारे करू शकता. तुम्हाला दिवसभर शांत आणि आनंदी ठेवणारा एक अतिशय शक्तीशाली अनुभव.  

या व्यतिरिक्त, ते टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक मनुष्याने करायला हवी अशी गोष्ट म्हणजे, तुमच्यातील समरस आणि सर्वसमावेशकतेची भावना भेदभावरहित ठेवा. तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे, एखाद्या झाडाकडे, एखाद्या ढगाकडे पहिले, तर यासर्वांशी तुम्ही एक सारखेच समरस होणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचे शरीर आणि श्वासासोबत त्यात समरस झाला आहात. कोणती गोष्ट अधिक चांगली आहे याबद्दल तुम्ही जर भेदभाव केला नाही, आणि जीवनातील प्रत्येक गोष्टीत तुम्ही सारखेच समरस राहिलात, तर तुम्ही निरंतर आध्यात्मिक राहाल. कोणालाही तुम्हाला अध्यात्म म्हणजे काय हे शिकवावे लागणार नाही. 

Editor’s Note: Sadhguru offers Isha Kriya, a free, online guided meditation that helps bring health and wellbeing. Daily practice of this simple yet effective 12-minute process can transform one’s life.

Try Isha Kriya