सद्गुरु: वयाच्या १६ व्या वर्षी, कंसाचा शिरच्छेद केल्यावर, श्रीकृष्णाला एक नेता म्हणून गणलं जाऊ लागलं. तरीसुद्धा, त्याचे गुरु गर्गाचार्य त्याला म्हणाले, "आता, जे नियतीने तुझ्यासाठी ठरवलेले आहे, त्याकरिता तुला शिक्षणाची गरज आहे. तुझ्याकडे बाकी सर्व काही आहे परंतु तुला एका विशिष्ट अनुशासनातून जावं लागेल. म्हणून तू सांदीपनी ऋषींचा विद्यार्थी हो." आणि श्रीकृष्णाने त्यांनी सांगितल्याप्रमाणे केलं. जेव्हा त्याला ब्रम्हचर्येची दीक्षा देण्यात येणार होती, बलराम आणि त्याच्याबरोबर आलेले काही इतर राजपुत्र हसले आणि म्हणाले, "तू इतका खोडकर आयुष्य जगला आहेस, तू एक ब्रम्हचारी कसा होऊ शकतोस?" श्रीकृष्ण म्हणाला, "विशिष्ट परिस्थितींमध्ये मी जे केले ते मी केले. पण मी नेहमीच एक ब्रम्हचारी राहिलो आहे. आता तुम्ही पाहाल मी ही प्रतिज्ञा घेणार आहे आणि ती पूर्णपणे निभावेन.

सहा वर्ष, कृष्ण त्याला विविध कला व इतर प्रकारचे शिक्षण देणाऱ्या सांदिपनींच्या मार्गदर्शनखाली आणि कृपाछत्रात एक ब्रह्मचारी म्हणून राहिला. त्याने प्रत्येक प्रकारचे अस्त्र वापरण्यास शिकले आणि थाळीफेक मध्ये विशेष प्राविण्य विकसित केले. थाळी एक धातूची चकती असते जी योग्यरीत्या वापरल्यास एक प्राणघातक शस्त्र ठरू शकते. कृष्णाने ते एका वेगळ्याच आयामात नेऊन ठेवले.

कृष्ण कधीही सम्राट होण्याची निवड करू शकला असता, परंतु त्याने आपल्या आयुष्याची सहा वर्षं रस्त्यावर भिक्षा मागुन काढली.

त्या काळात, कृष्ण इतर ब्रम्हाचाऱ्यांप्रमाणे रस्त्यावर जाऊन अन्नासाठी भिक्षा मागत असे. जेंव्हा तुम्ही भिक्षा मागण्यासाठी बाहेर जाता, तेंव्हा तुम्ही तुमचे भोजन निवडत नाही. तुमच्या भिक्षापात्रात त्यांनी टाकलेले अन्न चांगले आहे कि सडलेले किंवा कसेही आहे, तरी तुम्ही ते भक्तिभावाने सहजपणे खाता. एका ब्रह्मचाऱ्याने त्याला दिल्या जाणाऱ्या अन्नाचे स्वरूप कधीही पाहू नये. त्याने काय खावे, काय खाऊ नये याबद्दल कधीच निवड करायला नाही पाहिजे. जेंव्हा तुम्ही म्हणता तुम्ही ब्रह्मचारी आहात, तेंव्हा तुम्ही दिव्यत्वाच्या मार्गावर असता. अन्नाची आवश्यकता आहे, परंतु तुमचे पोषण केवळ अन्नामध्ये नाही.

तर, कृष्ण एक परिपूर्ण ब्रह्मचारी झाला. कृष्ण, ज्याने नेहमीच मुकुट, मोराचे पंख आणि रेशमी वस्त्रांनी सुशोभित पोषाख परिधान केला होता, अचानक फक्त हरीणीच्या कातड्याने बनवलेल्या पट्ट्यामध्ये होता, त्याच्या नवीन साधनेला १००% समर्पित झालेला. जगाने यापूर्वी कधीही असा वैभवशाली फकीर पाहिला नव्हता, लोक आश्चर्यचकित झाले होते, केवळ त्याच्या सौंदर्याकडे बघून, त्याची जीवनशैली बघून, एका दिवसाच्या गोळा करावयाच्या थोड्याश्या अन्नासाठी किती कृपेने, समर्पणाने, आणि एकाग्रतेने तो रस्त्यावर चालत असे. तो कधीही सम्राट होण्याची निवड करू शकला असता, परंतु त्याने आपल्या आयुष्याची सहा वर्षं रस्त्यावर भिक्षा मागत काढली.

कृष्ण द्वैपायन

कृष्ण द्वैपायन नावाचा आणखी एक तितकाच सुंदर ब्रह्मचारी होता. कृष्ण द्वैपायन, ज्याला नंतर व्यास म्हणून ओळखले जाऊ लागले, वयाच्या सहाव्या वर्षी ब्रह्मचारी झाले.

त्याच्या ब्रह्मचर्याच्या पहिल्या दिवशी, हा लहान मुलगा मुंडण केलेले डोके आणि लाकडाच्या सालीपासून बनवलेल्या कपड्यांनी अन्नाची भिक्षा मागण्यासाठी बाहेर गेला, त्याच्या पोरकट वरच्या पट्टीतल्या आवाजात म्हणाला, "भिक्षांदेही." जेंव्हा लोकांनी या गोंडस लहान मुलाकडे पाहिले, तेंव्हा त्यांनी त्याला भरपूर प्रमाणात अन्न दिले, ते देऊ शकतील अशा सर्वोत्तम गोष्टीं त्यांनी त्याला दिल्या कारण त्यांनी त्याचे सामर्थ्य ओळखले होते, तो जसा रस्त्यावर एकटाच चालत होता आणि स्वतःसाठी व आपल्या गुरुसाठी अन्नाची भिक्षा मागत होता. तो घेऊन जाऊ शकेल त्याहूनही जास्त अन्न त्याला मिळाले. तो जसा चालत निघाला, त्याने रस्त्यावर खूप मुलं पाहिली ज्यांनी चांगलं काही खाल्लं नव्हतं, तो हे त्यांच्या चेहऱ्याकडे बघून सांगू शकत होता. म्हणून त्याने सर्व अन्न त्यांना देऊन टाकले आणि रिकामं भिक्षापात्र घेऊन तो परत आला.

कृष्ण द्वैपायन, ज्याला नंतर व्यास म्हणून ओळखले जाऊ लागले, वयाच्या सहाव्या वर्षी ब्रह्मचारी झाले.

पराशर, त्याचे गुरु आणि वडील, यांनी त्याच्याकडे पाहिले आणि विचारले, "काय झाले? तू भिक्षा मागितली नाहीस? का तुला कोणी काहीच दिलं नाही?" कृष्ण द्वैपायन म्हणाला, "त्यांनी मला अन्न दिले. पण मी हि लहान मुले पहिली ज्यांनी काहीच खाल्ले नव्हते, म्हणून मी सर्व अन्न देऊन टाकले." पराशरांनी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, "छान." याचा अर्थ त्यांच्यासाठी भोजन नव्हतं.

हे असं दिवसागणिक होत राहिलं. मुलाने कधीच काही खाल्लं नाही. जेंव्हा पराशरांनी हा सहा वर्षांचा मुलगा तीन, चार दिवस उपाशी पोटी राहतो आणि आपली सर्व कर्तव्य पार पडतो आणि अभ्यासही चालू ठेवतो हे पाहिलं, त्यांना या मुलामध्ये प्रचंड संभावना दिसली आणि त्यांनी स्वतःला त्याच्यात पूर्णपणे ओतलं. शंभर वर्षांत त्यांनी एखाद्याला जे काय शिकवलं असतं, ते त्यांनी त्याच्यात फार कमी वेळात ओतून टाकलं.

लीला

उच्च संभावनेसाठी मनुष्याला खुलं करण्यासाठी बऱ्याच परंपरा आणि प्रणालींनी अनेक मार्ग तयार केले आहेत. ब्रह्मचर्य एक मार्ग आहे. लीला एक वेगळा मार्ग आहे. लीला म्हणजे सर्व गोष्टींचा वापर करून तुम्ही जे "मी" म्हणून समजत आहात त्याला तुमच्या शरीरातून, तुमच्या मनातून आणि सर्वकाही गोष्टींतून हळूवारपणे बाहेर काढण्याबद्दल आहे. तुम्ही जप करा, नृत्य करा, खा, गाणं गा, किंवा तुम्ही काहीही करा, फक्त तुमचं सर्वस्व द्या आणि त्याला शरण जा. तुमच्यात स्त्रीत्व असणं आवश्यक आहे.

स्त्रीत्वाचं प्रत्यक्ष स्वरूपच शरण जाणे, विलीन होणे, स्वीकारणे आहे.

स्त्रीत्वाचं प्रत्यक्ष स्वरूपच शरण जाणे, विलीन होणे, स्वीकारणे आहे. चंद्राला स्वतःचा असा गुणधर्म नाही आहे. तो फक्त सूर्याला परावर्तित करतो - आणि पहा तो किती सुंदर झाला आहे ते. जर चंद्राने स्वत:चे असे काहीतरी केले, तर ते तसे होणार नाही. सूर्य जीवन देणारा आणि टिकवणारा आहे - ती गोष्ट वेगळी. परंतु तुम्हाला काही स्वर्गीय गोष्टींना खुलं करण्याच्या दृष्टीने, तुमच्यात काही कवित्व किंवा प्रेमास प्रेरणा देण्याच्या दृष्टीने चंद्र सूर्यापेक्षा खूप मोठी भूमिका बजावत आहे, नाही का? कारण त्याला स्वतःचा असा कोणताही गुणधर्म नाही - तो फक्त परावर्तित करत आहे.

जर तुम्हाला दिव्यत्व जाणून घ्यायचे असेल, तर एकमात्र मार्ग म्हणजे तुम्हाला स्वतःचा असा कोणताही गुणधर्म नाही. तुम्ही फक्त एक प्रतिबिंब बनता. तुम्ही जर प्रतिबिंब बनलात, तर तुम्ही काय प्रतिबिंबित कराल? फक्त सर्वोच्च.