प्रश्न: जर आपले विचार हे आपल्या कर्माचं प्रतिबिंब असतं तर आपले विचार बदलले तर ते आपल्या कर्मावर प्रभाव पाडू शकतील का? आणि कर्मामधून आपण मुक्त कसे होऊ?

सद्गुरू: विचार आणि विचार करणे यात फरक आहे. तुमच्या मनातील आशयाप्रमाणे तुमचे विचारांचे चक्र चालू असते. पण विचार करणे हे कुठल्यातरी गोष्टीबद्दल जाणीवपूर्वक केलेलं असतं. तुमच्या विचारप्रक्रियेवर तुमच्या मनातील विषयांचा प्रभाव असतो पण तुमची तयारी असेल तर तुमच्या बुद्धीच्या मदतीने मनाच्या पलीकडे जाऊन विवेक दाखवू शकता. इनर इंजिनीरिंग आणि अन्य ईशा कार्यक्रमांमध्ये २१ मिनिटांची प्रक्रिया समजावण्यासाठी आम्ही तीस तासांपेक्षा जास्त वेळ घालवतो. एवढा वेळ आम्ही काय करतो तर तुम्हाला तुमच्या कर्माच्या मर्यादेपलीकडे जाऊन जाणीवपूर्वक विचार करण्यास मदत करतो. तुम्ही एखाद्या प्रकारची क्रिया किंवा साधना केली आणि जर तुमच्या विचारांनी याला मदत केली नाही तर तुमची ऊर्जा वरच्या दिशेने जाईल पण तुमचे विचार खालच्या दिशेने जातील. जर तुमची ऊर्जा आणि विचार परस्पर विरोधी झाले तर एक प्रकारचे घर्षण आणि संघर्ष निर्माण होईल.

हेच बऱ्याच लोकांच्या बाबतीत घडतंय. तुम्ही कार्यक्रमात बसलात आणि तुमच्या लक्षात येतं की होय खरंच मीच आहे जो हे सगळं घडवून आणतोय. दुसरं कुणीतरी काहीतरी करतंय माझ्या बाबतीत असंच मला कायम वाटत आलंय पण खरंतर तो मीच आहे. साधनेच्या पहिल्या तीन महिन्यापुरतं ते खरं असतं. ते स्वप्नवत भासतं जसकाही सगळं आमूलाग्र बदललंय. पण थोड्या काळातच लोक त्यांच्या जुन्या सवयींवर परत येतात. तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांसाठी तुम्ही दुसऱ्याला दोष देऊ लागता. म्हणजे तुम्ही तुमचं अज्ञान पुनःप्रस्थापित करता. मग तुमच्या साधना फुलण्यासाठी पोषक वातावरण उरत नाही. आवश्यक मानसिक स्थिती तयार झाल्याशिवाय जर तुम्ही साधना केलीत तर त्यातून शारीरिक आरोग्य चांगलं राहील पण कायापालट होणार नाही.

जर तुम्ही आवश्यक मानसिक वातावरण तयार केल्याशिवाय, शाम्भवी महामुद्रा क्रिया करत असाल (इनर इंजिनीरिंग कार्यक्रमात असलेली) तर तुमची आंतरिक ऊर्जा वाढेल पण तुमचं मन तीला मागे खेचेल.

हे ती क्रिया बोथट झाल्यामुळे होत नाही किंवा तुमची साधना प्रभावहीन झाली आहे असंही नाही. साधनेला यश मिळण्यासाठी गरजेचं असलेलं मानसिक वातावरण फक्त निर्माण केलं नाहीये म्हणून असं होतंय. जर तुम्ही आवश्यक मानसिक वातावरण तयार केल्याशिवाय, शाम्भवी महामुद्रा क्रिया करत असाल (इनर इंजिनीरिंग कार्यक्रमात असलेली) तर तुमची आंतरिक ऊर्जा वाढेल पण तुमचं मन तीला मागे खेचेल. यासाठीच ज्यांनी ज्यांनी हा कोर्स केला आहे त्यांनी दररोज ३ मिनोटाचा इनर इंजीनीरिंग चा क्रॅश कोर्स तुमची शाम्भवी साधना करण्याआधी करा.

हा क्रॅश कोर्स तुमचे कर्म आणि तुम्ही ह्यामध्ये अंतर राखता येईल अशी आवश्यक मानसिक स्थिती निर्माण करेल. जर हे मानसिक वातावरण तयार झाले नाही तर मन तुमचा ताबा घेतील. हे सगळं दुरुस्त करण्यासाठीचा एक अचूक मार्ग इनर इंजिनीरिंग मध्ये आम्ही तुम्हाला दिला. यामुळे कुठल्या गोष्टीला तुम्ही अडकून बसणार नाही. तुम्ही जर हे मानसिक वातावरण तयार करूनसाधना केलीत तर परिवर्तन ही एक अविरत क्रिया होईल. जोपर्यंत तुम्ही जीवंत आहात तो पर्यंत परिवर्तन अधिक सखोल होत जाईल. हि एकच साधना पुरेशी आहे. सतत निरनिराळ्या गोष्टी करत बसण्याची गरज नाही. या एका गोष्टीसाठी तुम्ही समर्पित असाल, तर ही साधना तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन जाईल.

तुमच्या कर्मापासून दूर जाणे म्हणजे त्याचा विसर पडणे नव्हे. विसरणे म्हणजे मुक्ती नाही. त्याचे ज्ञान असणे अत्यावश्यक आहे पण त्यात अडकता कामा नये. एखाद्या गोष्टीबद्दल अज्ञान असणे म्हणजे स्वातंत्र्य नव्हे. माहिती असूनही त्यापासून वेगळे असणे हे महत्वाचे आहे. हे मानसिक वातावरण निर्माण केले की ते तुम्हाला तुमच्या कर्माच्या पलीकडे घेऊन जाईल.