खालील लेख ईशा योग्य केंद्रात संपन्न झालेल्या सद्गुरूंसोबत २१ दिवसीय हठ योग कार्यक्रमाच्या एका सत्रातील भाग आहे. निष्कर्ष किंवा गृहीते तयार करण्याऐवजी, सद्गुरू आपल्याला सत्याचे शोधक होण्यासाठी लागणारे धाडस आणि वचनबद्धता जोपासण्यासाठी आवाहन करतात.

प्रश्न: लहानपणापासून, मला देवावर विश्वास ठेवायला सांगितले गेले आहे आणि त्यामुळे मी एक भक्त झालो आहे. पण मग जेव्हा मी हठ योग कार्यक्रमाला सुरुवात केली तेव्हा माझ्या लक्षात आले की ईशामध्ये संपूर्ण दृष्टिकोन हा कर्म-केंद्रित आहे. याचा अर्थ देवाचा कुठेच काहीच सहभाग नाही. एकवीस वर्षांसाठी मी देवावर विश्वास ठेवला आहे - आणि तो आता तोडणे इतके सोपे नाही. कृपया मला यासाठी मदत करा.

सद्गुरू: शंकरन पिल्लईच्या लग्नाची वाट लागली होती. तो मॅरेज कौनसेलरकडे गेला आणि विचारले, "मी काय करावं? मी काहीही केलं, तरी सगळं चुकीचं ठरतं." मॅरेज कौनसेलरने त्याला सांगितलं, "तू तिला नेमकं काय हवं आहे ते विचारलं पाहिजे," आणि ते कसे करायचे याबाबद्दल काही टिप्स दिल्या. जेव्हा शंकरन पिल्लई घरी आली तेव्हा, त्याची बायको स्त्रियांसाठीचे मॅगझीन वाचत बसली होती आणि तिने वर पाहायचे कष्ट घेतले नाही. त्याने कुठले शब्द वापरावे याबद्दल काही क्षण विचार केला; आणि मग तो म्हणाला, "तुला बुद्धिमान पुरुष आवडेल की आकर्षक दिसणारा पुरुष आवडेल?" ती काहीच बोलली नाही. मग तो आणखी जवळ गेला, तिच्या शेजारी बसून त्याने पुन्हा विचारले, "ऐक ना. बुद्धिमान पुरुष आवडेल की आकर्षक दिसणारा पुरुष आवडेल?" मॅगझीनमधून डोके वर न काढता ती म्हणाली "कुठलाच नाही - माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे."

ती प्रेम संबंध चालू ठेवण्याऐवजी निदान लग्न शाबूत ठेवण्याइतकी हुशार आहे. आता जरा तुमच्या भक्तीकडे पाहूया. सुरुवातीला तुम्ही असा निष्कर्ष काढला की देव आहे. आता तुम्ही या कार्यक्रमात येऊन असा निष्कर्ष काढला की ईशामध्ये कर्माला जास्त महत्त्व आहे. या कार्यक्रमातून गेल्यानंतर, न जाणो तुम्ही आणखी काय काय निष्कर्ष काढाल. निष्कर्ष काढणे बंद करा. योग म्हणजे आपण शोध घेत आहोत. शोधणे म्हणजे तुमच्या लक्षात आले आहे की तुम्हाला माहित नाही. आणि तुमच्या आत प्रामाणिकतेची एवढी पातळी आलेली आहे की केवळ सोयीसाठी तुम्ही कुठलीही गोष्ट गृहीत धरायला तयार नाही आहात.

एका गृहिताकडून दुसऱ्याकडे

तुमच्या समाजामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये, देवावर विश्वास ठेवणे, किंवा ते सगळे ज्या देवावर विश्वास ठेवतात त्या देवावर विश्वास ठेवणे, सोयीचे आहे, म्हणून तुम्ही तसे केले. मग तुम्ही इथे आला आणि तुम्हाला वाटले, जर तुम्ही 'राम, राम',"शिवा, शिवा', म्हणत राहिला, तर कदाचित लोक तुम्हाला हसतील. म्हणून आता तुम्ही कर्मावर विश्वास ठेवू लागला. किती वेळ लागला तुम्हाला बदलायला? कृपया स्वतःसोबत असे करू नका. तुम्ही इतक्या सहज बदलता याचे कारण तुम्ही सत्य शोधण्यासाठी पुरेसे धाडस आणि वचनबद्धता एकवटण्याऐवजी, एका गृहिताकडून दुसऱ्या गृहिताकडे जात आहात. सत्याचा शोधक असणे म्हणजे हे मान्य करणे की तुम्हाला माहित नाही. तुम्हाला माहित नाही की या जगावर देव राज्य करतो की कर्म राज्य करते - ही वस्तुस्थिती आहे.

सुरुवातीला तुम्ही याने घाबरून जाल. पण ज्या काशीची तुम्हाला भीती वाटते, त्याची काही वेळानंतर सवय करून घेता येते. समजा तुम्हाला एखाद्या खोलीमध्ये आग ओकणाऱ्या ड्रॅगनसोबत बंद करून ठेवले असेल. जर तुम्ही जळून खाक झाला नाही, तर तीन दिवसांनंतर, तुम्ही त्या ड्रॅगनसोबत संवाद सुरू कराल. म्हणून कृपया कुठलीही गृहीते निर्माण करू नका किंवा एकापासून दुसऱ्याकडे बदलत राहू नका. वस्तुस्थिती अशी आहे की तुम्हाला माहित नाही. ही जाण तुम्हाला सकाळी उठून तुमचा योग सराव करायला लावेल. कुणास ठाऊक, तिथे वर स्वर्ग आहे की नरक, देव आहे की सैतान. निदान तुम्हाला जे माहित आहे - तुमचे शरीर, तुमचे मन, तुमच्या ऊर्जा, तुमच्या भावना - ते तुम्ही सुस्थितीत ठेवा.

समजा तुम्ही स्वर्गात गेला - तर त्याचा उपभोग घेण्यासाठी तुमच्या चांगल्या स्थितीत असले पाहिजे. समजा तुम्ही नरकात गेला - तरी तिथे टिकाव धरण्यासाठी तुम्ही चांगल्या स्थितीत असले पाहिजे. तर काहीही झाले, तरी तुम्ही चांगल्या स्थितीत असले पाहिजे. आणि या धरतीवर जगण्यासाठी, आणि यशस्वीपणे कार्य करण्यासाठीसुद्धा, तुम्ही चांगल्या स्थितीत असले पाहिजे. म्हणून तुम्ही देवावर विश्वास ठेवता की नाही याने काही फरक पडत नाही. तुम्ही शाररिक, मानसिक, भावनिक आणि ऊर्जेच्या स्तरावर, चांगल्या स्थितीत असले पाहिजे.