प्रश्न: तीव्रता म्हणजे काय? तीव्रता नेहमी प्रखर कशी ठेवावी?

सद्गुरु: जीवन तीव्रता आहे. तुम्हाला असे जाणवले असेल की तुमच्यातले जीवन एका क्षणासाठी देखील ढिले पडत नाही. जर काही ढिले पडत आहे तर ते तुमचे मन आणि भावना जे कधी चालू असतात कधी नाही. तुमचा श्वास पहा, तो कधी  ढिला पडतो? तो जर ढिला पडला तर त्याचा अर्थ मृत्यू नाही का? जेव्हा मी तुम्हाला बऱ्याच मार्गांनी प्रखर होण्यासाठी सांगत असतो, तेव्हा मी फक्त असे म्हणत असतो की, तुम्ही जीवनासारखे बनले पाहिजे. आत्ता तुमच्या आत चालू असलेल्या विचारांना आणि भावनांना तुम्ही खूप महत्त्व दिले आहे, परंतु तुमच्या आत घडणाऱ्या जीवनाला महत्त्व दिलेले नाही. तुमचा विचार हा तुम्ही जिवंत असण्यापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे का? मोठा फ्रेंच तत्त्वज्ञानी डेस्कारटेस म्हणतो, "मी विचार करतो, म्हणूनच मी आहे".

Life is always intense. It is only thought and emotion, which is deceptive.

बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की, ते विचार करतात म्हणूनच ते अस्तित्वात आहेत. नाही, असे नाही, तुम्ही अस्तित्वात आहात म्हणून विचार करू शकता किंवा नाही करत, नाही का? तुमचे जिवंत असणे, हे तुमच्या विचार आणि भावनांपेक्षा अधिक मूलभूत आणि महत्त्वपूर्ण आहे. परंतु तुम्ही केवळ तुमचे विचार आणि भावना काय बोलत आहेत हेच ऐकता. जर तुम्ही तुमच्या जीवन प्रक्रिये बघितलेत, तर ती तीव्र आहे, तुम्ही जागे आहात किंवा झोपलेले तरीही. तुम्ही झोपेत असताना तुमचे जीवन सुस्त होते का? जर ते सुस्त झाले तर तुम्ही उद्या सकाळी उठू शकणार नाही. तुम्ही तुमच्या आवडीचे करत आहात किंवा नाही किंवा तुम्ही काय करत आहात हे महत्त्वाचे नाही, तुमचे जीवन सुस्त होत आहे का? नाही, तुमचे मन म्हणते की "मला हे आवडते म्हणून मी हे आवडीने करेन, मला ते आवडत नाही म्हणून मी ते मनापासून करणार नाही". परंतु तुमचे जीवन असे नाही, ते नेहमीच तीव्र असते.

इतर सर्व गोष्टी काही वेळे पुरत्या मर्यादित आहेत आणि मी मूलभूत जीवन आहे, याची जर तुम्हाला सतत जाणीव असेल तर तुम्ही तीव्र असाल. याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही, कारण जीवनाला इतर कोणताही मार्ग माहितच नाही. जीवन नेहमीच तीव्रच असते. फक्त भावना आणि विचार संभ्रम निर्माण करतात.

तुमच्या भावना आणि विचारांचे स्वरूप पाहिल्यावर, आयुष्यात असे अनेक प्रसंग आले असतील जेव्हा या विचारांमुळे आणि भावनांमुळे तुम्ही बऱ्याच गोष्टींवर विश्वास ठेवला असेल आणि काही काळानंतर असे वाटते की त्या गोष्टींवर विश्वास ठेवणे हे तुमच्यासाठी मूर्खपणाच होता. आज तुमची भावना सांगते की ही व्यक्ती खूप चांगली आहे मग उद्या तुमची भावना तुम्हाला सांगते की ही सर्वात धोकादायक व्यक्ती आहे आणि त्या दोन्ही शंभर टक्के सत्य असल्याचे दिसते. तुमची भावना आणि विचार तुम्हाला फसरवण्याचे एक चांगले साधन आहे. ते तुम्हाला कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवायला भाग पाडू शकतात. 

फक्त तुमच्या स्वतःच्या श्रद्धा पहा - त्यापैकी कोणत्याही कोणत्याच प्रकारच्या प्रश्नांसमोर टिकू शकत नाहीत. जर मी तुम्हाला तीन प्रश्न विचारले तर तुमची श्रद्धा पूर्णपणे तुटेल. पण आयुष्यातील वेगवेगळ्या प्रसंगी तुमच्या मनाने तुम्हाला त्या वेगवेगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यास आणि ते अगदी खरे आहे असे वाटून घेण्यास भाग पाडले.

तीव्रता म्हणजेच जीवनाच्या मार्गाने जाणे. जर तुम्ही येथे जीवन म्हणून, फक्त शुद्ध जीवन म्हणून उपस्थित रहाल तर ते नैसर्गिक रित्या तुमच्या अंतिम स्वरूपाकडे जाईल. परंतु कल्पना, भावना, पूर्वग्रह, क्रोध, द्वेष आणि बाकी सर्व गोष्टी मिळून तुम्ही जीवन प्रक्रियेला एक मोठा अडथळा निर्माण करत आहात. जर तुम्ही फक्त जीवनाचा एक भाग म्हणून असाल तर स्वाभाविकच तुम्ही तुमच्या अंतिम स्वरुपापर्यंत पोहोचाल.

तुम्हाला प्रयत्न किंवा संघर्ष करावा लागणारी ही गोष्ट नाही. मी नेहमी म्हणतो - फक्त तुमची तीव्रता ठेवा, बाकीच्या सर्व गोष्टी होतील. तुम्हाला स्वर्गाचा मार्ग शोधण्याची आवश्यकता नाही. फक्त तुमची तीव्रता कायम ठेवा. असे कोणी नाही, जो या जीवनात त्याच्या अंतिम स्वरूपाकडे नेईल किंवा जाण्यापासून रोखेल. आपण याला उशीर करू शकतो किंवा कोणत्याही अडथळ्याशिवाय त्याला वेगाने जाऊ देऊ शकतो. हेच आपण करू शकतो.

कोणतीही अध्यात्मिक प्रक्रिया ही ते शक्य तितक्या लवकरात लवकर होऊ देण्याविषयीची असते. त्यासाठी तुम्हाला देवाच्या मदतीच्या हाक मारण्याची गरज नाही, तुम्ही फक्त जीवन बनले पाहिजे फक्त जीवन. जर तुम्ही शुद्ध जीवन म्हणून इथे असाल, तर तुम्ही नैसर्गिक रित्या तुम्ही तिथेच असाल.