प्रश्न: प्रणाम सद्गुरू आपल्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाची घटना ही कर्माचा परिणाम आहे की, परिस्थितीजन्य आहे?

सद्गुरू: इथे व्यक्तिगत कर्म आहे आणि सामूहिक कर्म सुद्धा आहे. एक कुटुंब म्हणून, एक समाज म्हणून, एक राष्ट्र म्हणून, आणि एक मानवजात म्हणून, आपण कर्माची स्मृती एकमेकांसोबत सामायिक करतो. कदाचित वैयक्तिकरीत्या आपण काहीच केले नसेल. पण आपला समाज काही गोष्टी करीत असतो. त्यामुळे त्याचे परिणाम असतील. कर्माला बक्षीस आणि शिक्षेची यंत्रणा समजू नका. ते तसे नाही. तो फक्त जीवनाचा पाया आहे. स्मृतीशिवाय जीवन नाही. स्मृतीच्या सामग्रीशिवाय अमिबा किंवा मानव निर्माण करणे शक्य नाही. जर जीवनाला स्वतःची पुनरावृत्ती करायची असेल, तर त्याला स्मृतीची गरज असते. कर्म जीवनाची स्मृती आहे. शरीराची रचना ज्या प्रकारे बनली आहे, त्याचे कारण एक-पेशीय प्राण्यापासून ते प्रत्येक रूपापर्यंत जीवनाच्या स्मृती उपस्थित असल्यामुळेच.

सामाजिक वास्तव किंवा जागतिक वास्तवांमुळे तुमच्यासोबत घटना घडू शकतात. अशा लाखो परिस्थिती आहेत जिथे लोक दररोज अशा गोष्टींसाठी मारले जातात ज्या त्यांनी कधीच केल्या नाहीत. बरेच लोक त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींशी कोणत्याही प्रकारे संबंधित नसतानाही खूप दुःख आणि वेदनांमधून जातात. पण ते त्या परिस्थितीमध्ये आहेत - हे त्यांचे कर्म आहे.

तुम्ही कर्माकडे असे पाहताय की, "ही माझी चूक आहे का? मी हे केलेले नाही. माझ्याबाबतीत असे का घडले?" कर्म असे नसते. कर्म हे फक्त एक स्मृतीची यंत्रणा आहे. या स्मृतीशिवाय कोणतीही रचना अस्तित्वात असू शकत नाही. सर्व रचना बनवल्या जातात, आणि विशेषतः जीवनाच्या रचना पुन्हा-पुन्हा साकार होतात कारण प्रत्येक जीवनात एक सुरक्षित स्मृतीची साठवण असते. समजा माझ्याबाबत काही घडले ज्याची स्मृती माझ्याकडे नाही. बरं, तुमच्या आजूबाजूच्या समाजाकडे त्याची स्मृती आहे, त्यामुळे परिस्थिती घडतात. जगाकडे स्मृती असते, त्याप्रमाणे परिस्थिती घडतात. आणि

तुमच्या आजूबाजूला ज्या काही घटना घडतात त्या तुम्हाला प्रभावित करतील.

सामाजिक वास्तव किंवा जागतिक वास्तवांमुळे तुमच्यासोबत घटना घडू शकतात. अशा लाखो परिस्थिती आहेत जिथे लोक दररोज अशा गोष्टींसाठी मारले जातात ज्या त्यांनी कधीच केल्या नाहीत. बरेच लोक त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींशी कोणत्याही प्रकारे संबंधित नसतानाही खूप दुःख आणि वेदनांमधून जातात. पण ते त्या परिस्थितीमध्ये आहेत - हे त्यांचे कर्म आहे.

तुम्ही कर्माकडे असे पाहताय की, "ही माझी चूक आहे का? मी हे केलेले नाही. माझ्याबाबतीत असे का घडले?" कर्म असे नसते. कर्म हे फक्त एक स्मृतीची यंत्रणा आहे. या स्मृतीशिवाय कोणतीही रचना अस्तित्वात असू शकत नाही. सर्व रचना बनवल्या जातात, आणि विशेषतः जीवनाच्या रचना पुन्हा-पुन्हा साकार होतात कारण प्रत्येक जीवनात एक सुरक्षित स्मृतीची साठवण असते. समजा माझ्याबाबत काही घडले ज्याची स्मृती माझ्याकडे नाही. बरं, तुमच्या आजूबाजूच्या समाजाकडे त्याची स्मृती आहे, त्यामुळे परिस्थिती घडतात. जगाकडे स्मृती असते, त्याप्रमाणे परिस्थिती घडतात. आणि तुमच्या आजूबाजूला ज्या काही घटना घडतात त्या तुम्हाला प्रभावित करतील.

सध्या, न्यूयॉर्क शहरामध्ये प्रदूषण आहे. मी काहीच केलेले नाही, पण मी सुद्धा विषारी श्वास घेईन. इथे मी कार्बन डायॉक्साईड किंवा कदाचित मोनॉक्साईड श्वासाने आत घेत आहे. मी काही कर्म केलेले नाही. मी खूप झाडे लावली आहेत. काय करणार? एकदा तुम्ही न्यूयॉर्क शहरात आलात की, तुम्हाला श्वासासोबत हे आत घ्यावेच लागते. मग त्याची किंमत मोजावी लागेल का? नक्कीच, मी इथे पुरेसा वेळ राहिलो तर त्याची किंमत मोजावी लागेल.

तुमचे वैयक्तिक कर्म काहीही असो, एक सामूहिक कर्म असते. तुमचे कर्म मुख्यतः हे ठरवते की, तुम्ही जग कसे अनुभवता, ते हे ठरवत नाही की, तुम्ही जगात कुठे आहात किंवा काय करत आहात. तुम्ही कदाचित एखाद्या महालात जन्मले असू शकता, पण तुमचे कर्म कदाचित असे असू शकते की तुम्हाला दुःख भोगावे लागते. तुम्ही कदाचित रस्त्यावर जन्मले असू शकता, पण तुमचे कर्म कदाचित असे असू शकते की तुम्ही एक आनंदी व्यक्ती असू शकता. पूर्वीच्या कर्मामुळे एक ठराविक बाह्य परिणाम किंवा परिस्थिती निर्माण होते, जी तुम्ही लगेच १०० टक्के बदलू शकत नाही, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. एखाद्या परिस्थितीसाठी फक्त तुम्ही नाही तर बऱ्याच गोष्टी कारणीभूत ठरतात. पण तुमचे कर्म लगेच बदलले जाऊ शकते.

तुम्ही आत्ता लगेच तुमचे कर्म बदलू शकता, म्हणजेच तुम्ही सध्या जीवनाला कसे अनुभवता ते बदलू शकता. यामध्ये फक्त तुमचाच समावेश असतो, म्हणून जर तुम्ही इच्छुक असाल तर हे लगेच बदलले जाऊ शकते. पण जरी तुम्ही आणि मी इच्छुक असलो, तरी जग सध्या बदलण्यास तयार नसेल. म्हणून

सामूहिक कर्मामुळे काही बाह्य परिणाम निर्माण केले जाऊ शकतात, पण तुम्ही जीवनाला सध्या कसे अनुभवता हे तुमच्याकडूनच ठरवले जाते.