सद्गुरु: प्रदक्षिणा म्हणजे परिक्रमा. परिक्रमा म्हणजे घड्याळाच्या दिशेने जाणे, विशेषत: उत्तर गोलार्धात. ग्रहाच्या उत्तर गोलार्धात ही एक नैसर्गिक घटना आहे. जर आपण बारकाईने लक्ष दिलेत तर बर्‍याच नैसर्गिक घटना विषुववृत्ताच्या वरच्या बाजूस घड्याळाच्या दिशेने व त्यापासून खाली घड्याळाच्या उलट्या दिशेने जातात. हे फक्त हवा किंवा पाण्याच्या बाबतीतच नाही, तर सर्व ऊर्जा प्रणाली अशा प्रकारे कार्य करते.

म्हणूनच जर उत्तर गोलार्धात ऊर्जायुक्त स्थान असेल आणि तुम्हाला उर्जेचा फायदा घ्यायचा असेल किंवा ती आत्मसात करायची असेल तर तुम्ही त्याभोवती घड्याळाच्या दिशेने जाणे आवश्यक आहे. जर तुम्हाला अधिक फायदा घ्यायचा असेल तर तुमचे केस ओले असले पाहिजेत. जर तुम्हाला आणखी अधिक फायदा घ्यायचा असेल तर तुमचे कपडेदेखील ओले असले पाहिजेत. जर तुम्हाला अजून अधिक फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही नग्न व्हायलाच पाहिजे. पण ओले कपडे कदाचित नग्नतेपेक्षा चांगले असतील कारण शरीर लवकरच कोरडे पडेल. कपडे बराच काळ ओले राहतात. म्हणून कोणत्याही ऊर्जेच्या स्थानी ओल्या कपडयात फिरणे हा एक चांगला मार्ग आहे कारण तुम्ही उत्कृष्ट प्रकारे ग्रहण करू शकाल - या प्रकारे तुम्ही सर्वात जास्त ग्रहणक्षम असता.

भारतातील हम्पी येथे कृष्ण मंदिराच्या पूर्वेकडील बाजूला विजयनगरच्या काळात तयार केलेली पवित्र पुष्करणी किंवा टाकी

म्हणूनच प्रत्येक मंदिरात जलसंचय असे ज्याला सामान्यत: कल्याणी म्हणतात. तामिळनाडूमध्ये त्याला कुलम म्हणतात. तुम्ही स्नान करून ओल्या कपड्यांसह मंदिरात जाणे अपेक्षित होते जेणेकरुन तुम्हाला पवित्र स्थानाची उर्जा शक्य तितक्या उत्तम मार्गाने प्राप्त होईल. परंतु आज बहुतेक कुलम कोरडे पडले आहेत किंवा घाणेरडे झाले आहेत.

ऊर्जेचा भोवरा

जेव्हा तुम्ही घड्याळाच्या दिशेने जाता, तेव्हा तुम्ही विशिष्ट नैसर्गिक शक्तींसह जात आहात. कोणतेही पवित्र स्थान भोवऱ्यासारखे कार्य करते ज्याचा अर्थ असा होतो की ते कंप पावते आणि बाहेर फेकते. दोन्ही मार्गांनी, ज्याला आपण दैवी म्हणून संबोधत आहोत आणि ज्याला आपण स्वतः म्हणून संबोधत आहोत त्याचे एकत्रीकण होते. या संस्कृतीत अशी कल्पना आहे की आम्हाला देवाला भेटायचे नाही, आपल्याला स्वर्गात जाऊन त्याच्या मांडीवर बसायचे नाही. येथे आपल्याला देव बनायचे आहे - आम्ही खूप महत्वाकांक्षी लोक आहोत. आम्हाला देव पाहायचा नाही. आम्हाला जाणीव करून घेऊन दैवी व्हायचे आहे. एखाद्या पवित्र जागेत असण्याची कल्पना सतत हा व्यवहार होऊ देणे आहे, जेणेकरून हळूहळू, सजीव शरीर स्वतःच दैवी अस्तित्वासारखे होईल. तुम्ही इच्छित असल्यास, तुम्ही हे शरीर पशूसारखे ठेवू शकता. किंवा तुम्ही ते पवित्र स्वरूप किंवा देवत्वसारखे बनवू शकता.

पवित्र स्थानाभोवती घड्याळाच्या दिशेने जाणे ही शक्यता प्राप्त करून घेण्याचा एक सोपा मार्ग आहे. विशेषत: विषुववृत्तापासून तेहतीस डिग्री अक्षांश पर्यंत, हे खूप तीव्र आहे. म्हणूनच आम्ही या प्रदेशात बरीच मंदिरे बांधली कारण येथून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होतो. तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की जसजसे उत्तर दिशेला जाता, मंदिरे मुख्यतः भक्तीसाठी तयार केली गेली आहेत. दक्षिणेस, भक्तीचा पैलू आहे परंतु सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ती वैज्ञानिकदृष्ट्या एका विशिष्ट मार्गाने तयार केली गेली आहे - जे बनवायला अनेक जीवन काळ गेले अशा भव्य रचना.

एका वेगळ्या प्रकारची मानवता

अनेक मंदिरे बांधायला अनेक पिढ्या गेल्या. उदाहरणार्थ, राष्ट्रकुटांनी बांधलेल्या वेरूळ येथील कैलास मंदिरास १३५ वर्षाचे काम लागले. म्हणजेच चार पिढ्या लोकांनी त्याच योजनेवर काम केले, जरासाही बदल न करता. हा मानवतेचा वेगळा प्रकार आहे. आज संपूर्ण मानवजात अशी बनली आहे की, तुम्ही त्यांना काहीही द्या, त्यांना एक मूर्ख नावीन्य करायचे आहे. तो किती मूर्ख आहे याने फरक पडत नाही, परंतु प्रत्येक गोष्टींवर ते आपला ठसा उमटवू इच्छितात. अशी भव्य मंदिरे बांधली गेली, परंतु “मी ते केले.” असे कुणीही आपले नाव किंवा आद्याक्षरे कोठेही सोडली नाहीत. त्यांनी फक्त काम केले आणि ते पूर्ण न करता मरण पावले. पुढच्या पिढीने हे चालू ठेवले, काम केले आणि पूर्ण न करता मरण पावले. पुढची पिढी पुढे आली, त्यांनी काम केले आणि त्यांचा मृत्यू झाला. कोणीतरी हे पूर्ण करणार आहे हे त्यांना ठाऊक होते.

वेरूळ येथील कैलास मंदिर

हा मानवतेचा वेगळा प्रकार आहे. आम्हाला अशा प्रकारचे लोक तयार करायचे आहेत कारण तेच लोक असे कार्य करतील जे मानवतेसाठी खरोखर उपयुक्त ठरतील. आम्हाला अशा प्रकारची मानवता निर्माण करायची आहे जी देवासारखी आहे. जेव्हा मी देव-म्हणतो, तेव्हा ही एक भव्य निर्मिती आहे, परंतु निर्मात्याने आपली सही कोठे सोडली आहे का? नाही. तो इतका मागे उभा आहे की आपण येथे बसून तेथे एखादा निर्माता आहे की नाही यावर वाद घालू शकतो.