ह्या लेखामध्ये कडुलिंबाचे अनेक फायदे जाणून घेऊ या, एक अष्टपैलू नैसर्गिक उत्पादन जे त्वचेवर, कर्करोग व जीवाणूविरूद्ध आणि योगिक साधनेमध्ये फायदेशीरपणे वापरता येते.

सद्गुरु:कडुलिंब हे एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण झाड आहे आणि कडुनिंबाची पाने ही पृथ्वीवरील सर्वात गुंतागुंतीची पाने आहेत. कडुलिंबाच्या झाडामध्ये 130 पेक्षा जास्त वेगवेगळ्या जैविक दृष्ट्या सक्रिय संयुगे आहेत आणि कडुनिंबाची पाने ह्या ग्रहावरील सर्वात जटिल पानांपैकी एक आहे.

Neem leaves uses and benefits

१. कडुलिंब कर्करोगाशी लढायला मदत करते का?

कडुलिंबाचे अनेक आश्चर्यकारक औषधी फायदे आहेत, परंतु सर्वात महत्वाची एक बाब म्हणजे ते कर्करोगाच्या पेशी नष्ट करते. प्रत्येकाच्या शरीरात कर्करोगाच्या पेशी असतात, परंतु सामान्यत: त्या विस्कळीत अवस्थेत असतात. पण , तुम्ही शरीरात काही विशिष्ट परिस्थिती निर्माण केल्यास त्या संघटित होतात. जोपर्यंत या पेशी एकट्याने फिरत आहेत तोपर्यंत काही अडचण नाही. जर त्या सर्व एका ठिकाणी एकत्र जमल्या आणि त्यांचे संघटन झाले तर ही एक समस्या बनते. हे क्षुद्र गुन्हेगारीपासून संघटित गुन्हेगारीकडे वळण्यासारखे आहे. ही एक गंभीर समस्या आहे. जर तुम्ही दररोज कडुनिंबाचे सेवन केले तर ते शरीरात कर्करोगाच्या पेशींची संख्या एका मर्यादेच्या आत ठेवते, जेणेकरून ते तुमच्या शरीर व्यवस्थेच्या विरूद्ध जाऊ शकणार नाहीत.

२.जंतू संसर्गासाठी कडूलिंब

Neem and Turmeric Balls Benefits

जग जीवाणूंनी भरलेले आहे. त्याचप्रमाणे शरीर देखील. तुम्ही कल्पनाही करू शकत नाही त्यापेक्षा जास्त सूक्ष्मजीव तुमच्या शरीरामध्ये राहतात. यातील बहुतेक जीवाणू (बॅक्टेरिया) उपयुक्त आहेत. त्यांच्याशिवाय तुम्ही अन्न पचवू शकणार नाही. खरं तर, त्यांच्याशिवाय तुमचे अस्तित्वच असू शकत नाही. परंतु काही जीवाणू तुम्हाला त्रास देऊ शकतात. अशा जीवाणूंना ताब्यात ठेवण्यासाठी तुमचे शरीर सतत ऊर्जा खर्च करते. जर जीवाणूंची पातळी जास्त झाली तर तुम्हाला गळून गेल्यासारखं वाटेल कारण तुमच्या संरक्षण यंत्रणेस त्यांच्याशी लढण्यासाठी जास्त ऊर्जा खर्च करावी लागेल. शरीराच्या आत आणि बाहेर कडुलिंबाचा वापर करून, तुम्ही या जीवाणूंना अशा प्रकारे व्यवस्थापित करू शकता की ते जास्त प्रमाणात वाढणार नाहीत आणि तुमच्या शरीराला लढा देण्यासाठी खूप ऊर्जा खर्च करावी लागणार नाही. जर तुम्ही दररोज ठराविक प्रमाणात कडूलिंबाचे सेवन केले तर ते आतड्यांमधील त्रासदायक जीवाणू नष्ट करेल आणि सामान्यतः तुमचे मोठे आतडे (colon) स्वच्छ आणि संसर्गमुक्त राहील.

शरीराच्या आत आणि बाहेर कडुलिंबाचा वापर करून, तुम्ही या जीवाणूंना अशा प्रकारे व्यवस्थापित करू शकता की ते जास्त प्रमाणात वाढणार नाहीत आणि तुमच्या शरीराला लढा देण्यासाठी खूप ऊर्जा खर्च करावी लागणार नाही.

तसेच, जर शरीराच्या काही भागात थोडासा वास येत असेल तर याचा अर्थ असा की तेथे जीवाणू थोडे अधिक सक्रिय असतात..

त्वचेच्या आजारासाठी घरगुती उपचार

बहुतेक सगळ्यांनाच त्वचेच्या किरकोळ समस्या असतात परंतु जर तुम्ही तुमचे शरीर कडुलिंबाने धुतले तर ते स्वच्छ आणि तेजस्वी होईल. जर तुम्ही आंघोळ करण्यापूर्वी तुमच्या शरीर कडुलिंबाच्या पेस्टने घासले, थोडावेळ सुकू दिले आणि नंतर ते पाण्याने धुतले, तर ते एक उत्तम बॅक्टेरिया प्रतिबंधक म्हणून काम करेल. किंवा, तुम्ही कडुलिंबाची काही पाने रात्रभर पाण्यात भिजवून ठेऊन सकाळी या पाण्याने आंघोळ करू शकता.

३. योग साधनेमध्ये कडुनिंबाचे फायदे

Benefits of neem for Hatha yogi

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कडुनिंब शरीरात उष्णता निर्माण करतो. ही उष्णता तुमच्या शरीरात तीव्र उर्जा निर्मिती करण्यासाठी सहाय्यक आहे. शरीरात भिन्न गुण प्रबळ असू शकतात - पारंपारिक दृष्टीने यापैकी दोन शीत आणि उष्ण आहेत. इंग्रजीमध्ये “शीत” चा सर्वात जवळचा शब्द “कोल्ड” आहे, परंतु तो अगदी तसा नाही. जर तुमचे शरीर शीत होऊ लागले तर शरीरातील श्लेष्माची (mucus) पातळी वाढेल. शरीरामध्ये अतिरिक्त श्लेष्म, सामान्य सर्दी आणि सायनसपासून ते इतर अनेक समस्यांपर्यंत विविध परिस्थितीशी जोडलेले आहे.

कडुनिंब शरीरात उष्णता निर्माण करतो. ही उष्णता तुमच्या शरीरात तीव्र उर्जा निर्मिती करण्यासाठी सहाय्यक आहे.

एका हठ योग्यासाठी कडुलिंबाचे विशेष महत्त्व असते कारण ते तुमच्या शरीराला किंचित उष्ण ठेवते. उष्ण म्हणजे तुमच्याकडे अतिरिक्त "इंधन" आहे. अज्ञात भूप्रदेशाचा वेध घेणार्‍या साधकासाठी, तुमच्या शरीर प्रणालीला अतिरिक्त शक्तीची गरज भासल्यास थोडे अतिरिक्त इंधन बाळगणे अधिक सुरक्षित आहे. तुम्हाला आवश्यक आहे त्यापेक्षा ऊर्जा थोडी जास्त ठेवायची असते. जर शरीर शीत स्थितीमध्ये असेल तर तुम्ही जास्त क्रियाशील राहू शकणार नाही. परंतु तुम्ही तुमचे शरीर किंचित उष्ण ठेवल्यास, जरी तुम्ही प्रवास केला, बाहेर खाल्ले किंवा इतर कशाच्याही संपर्कात आल्यास, तुमच्यातील ही अतिरिक्त उष्णता जळेल आणि हे बाह्य प्रभाव हाताळू शकेल. त्या दिशेने कडुलिंबाचा मोठा आधार आहे.

लक्षात ठेवण्याजोग्या काही गोष्टी

एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे ती म्हणजे, कडुनिंब जास्त प्रमाणात सेवन केल्यास शुक्राणूंच्या पेशी नष्ट करते. गर्भधारणेच्या पहिल्या चार ते पाच महिन्यांत, जेव्हा गर्भाचा विकास होत असतो, तेव्हा गर्भवती महिलांनी कडुनिंब खाऊ नये. कडुलिंबामुळे अंडाशयाचे कोणतेही नुकसान होत नाही परंतु त्यामुळे जास्त उष्मा होतो. जेव्हा एखाद्या स्त्रीने नुकतीच गर्भधारणा केली असेल आणि शरीरात खूपच उष्णता असेल तेव्हा ती गर्भ गमावू शकते. जर एखाद्या स्त्रीने गर्भधारणेची योजना आखली असेल तर तिने कडुलिंबाचे सेवन करू नये कारण जास्त उष्णता होईल आणि शरीर बाळाला बाहेरचे असल्यासारखे वागवेल.

जर एखाद्या स्त्रीने गर्भधारणेची योजना आखली असेल तर तिने कडुलिंबाचे सेवन करू नये कारण जास्त उष्णता होईल

जर उष्णता वाढली तर शरीरात काही बदल घडून येतील - पुरुषांपेक्षा स्त्रियांना हे अधिक लक्षात येईल. जर शरीराच्या सामान्य प्रक्रियेवर याचा परिणाम होत असेल तर आम्ही उष्णता काही प्रमाणात खाली आणतो, परंतु सामान्यत: तुम्ही कडुनिंबाचा त्याग करू इच्छित नाही कारण जे लोक साधना करतात त्यांच्यासाठी शरीर प्रणालीमध्ये काही प्रमाणात उष्णता असणे आवश्यक असते. एकदा का त्यांनी दररोज कडुनिंबाचे सेवन सुरु केले कि काही स्त्रियांना मासिक पाळीचा काळ कमी झाल्याचे आढळू शकते. अशा परिस्थितीत, फक्त अधिक पाणी प्या. उष्णता कमी करण्यासाठी फक्त पाणी पुरेसे नसल्यास, लिंबाचा तुकडा किंवा अर्ध्या लिंबाचा रस पाण्यात घाला. जर तेही पुरेसे नसेल, तर एका ग्लास कोहोळ्याचा रस घ्या, जो थंड आहे. दुसरा पर्याय म्हणजे एरंडेल तेल. जर तुम्ही थोडेसे एरंडेल तेल तुमच्या नाभीमध्ये, तुमच्या अनाहतावर, घश्याच्या मुळाशी आणि कानांच्या मागे लावले तर ते त्वरित शरीराला थंड करते.