राजा सुद्युम्न शिकारीला जातो

सद्गुरु: एक दिवस, राजा सुद्युम्न शिव आणि त्यांची पत्नी पार्वती राहत असलेल्या जंगलात शिकार करायला गेला. प्राण्यांकडे पाहत, ती लहरीपणाने म्हणाली, "माझं तुमच्यावरील प्रेम असं आहे कि मला हे हत्ती, हे अवाढव्य आयाळवाले सिंह, अविश्वसनीय पिसारे असलेले हे मोर हे सर्व तुमचा अपमान वाटतात. मला तुम्ही हे जंगल अशा प्रकारे बनवावं कि इथे तुमच्याशिवाय दुसरा कोणीही नर असणार नाही." शिव स्वछंदी रंगात होते, ते म्हणाले,"ठीक आहे. या जंगलातील प्रत्येक गोष्ट मादीमध्ये बदलून जाऊ दे." जंगलातील प्रत्येक गोष्ट मादी बनली. सिंह सिंहीण बनले, हत्ती हत्तिणी बनल्या, मोर लांडोर बनले, आणि राजा सुद्युम्न एक स्त्री झाला!

त्याने स्वत:कडे पाहिले - एक शूर राजा, जो जंगलात शिकार करण्यासाठी आला होता, तो अचानक स्त्री बनला होता. तो रडला, "हे मला कोणी केलं? कोणत्या यक्षाने, कोणत्या राक्षसाने, मला असे शापित केले?" मोठ्या उद्वेगाने, त्याने आजूबाजूला शोध घेतला. तेंव्हा त्याला प्रेमात असलेले शिव आणि पार्वती सापडले. तो शिवांच्या पायांवर पडला आणि म्हणाला, "हे बरोबर नाही. मी एक राजा आहे. मी एक पुरुष आहे. माझं एक कुटुंब आहे. मी फक्त शिकार करायला आलो होतो, आणि तुम्ही मला एका स्त्रीमध्ये बदलून टाकलंत. मी असा कसा परत जाऊ शकतो?" शिव म्हणाले, "मी जे काय केलंय ते परत घेऊ शकत नाही, परंतु मी ते थोडे सुधारू शकतो. आम्ही ते अशा प्रकारे बनवू कि जेंव्हा चंद्राला उतरती कला लागेल, तेंव्हा तू एक स्त्री होशील. जेंव्हा चंद्राची कला वाढत जाईल, तेंव्हा तू एक पुरुष होशील."

चंद्रवंशी राजवंश जन्माला आले.

महाभारत भाग २: चंद्रवंशींचा उगम

सुद्युम्नने परत त्याच्या राजवाड्यात जाण्यास नकार दिला. तो जंगलात राहिला आणि एला म्हणून ओळखला जाऊ लागला, जो महिन्याच्या अर्ध्या भागात नर होता, तर महिन्याच्या दुसऱ्या निम्म्या भागात मादी होता. एके दिवशी, असे घडले कि बुधा आणि एला भेटले. तो एक परिपूर्ण जोडा होता. ते दोघेही समान मात्रांमध्ये स्त्री आणि पुरुष होते. त्यांच्यामध्ये, त्यांना खूप मुले झाली. हि मुले पहिले चंद्रवंशी बनले.

चंद्रवंशी दररोज भिन्न असतात. ते खूप भावनिक, कलात्मक, आणि अत्यंत बेभरवशाचे असतात.

या देशातील राजांच्या परंपरेत, सूर्यवंशी आणि चंद्रवंशी राजे आहेत - सूर्याचे वंशज आणि चंद्राचे वंशज. ते स्पष्टपणे भिन्न प्रकारची लोकं आहेत. सूर्याची लोकं विजेते आहेत - अगदी स्पष्ट, हे किंवा ते या प्रकारची लोकं. चंद्रवंशी दररोज भिन्न असतात. ते खूप भावनिक, कलात्मक, आणि अत्यंत बेभरवशाचे असतात. सूर्यवंशींमध्ये श्रेष्ठ स्वत: मनु होते; मग इक्ष्वाकु आला. त्यांच्या खालोखाल, बरेच लोकं होते - जसे की भगीरथ, दशरथ, अयोध्येचा राम आणि हरिश्चंद्र. येथे, आपण चंद्रवंशींबद्दल बोलणार आहोत कारण कुरु प्रामुख्याने चंद्रवंशी आहेत. यातून त्यांच्या भावनिक भडक्याचा खुलासा होतो ज्याच्यातून त्यांनी कृती केल्या.

नहुष - सम्राट ते अजगर

बुधा आणि एलाच्या मुलांपैकी एक होता नहुष, जो एक महान सम्राट बनला. एकदा, त्याला इंद्राच्या राजवाड्यात, देवलोकात बोलवण्यात आले. इंद्राला कुठेतरी जावं लागणार होतं, म्हणून त्याने नहुषाला सांगितले, "थोडा काळ माझ्या देवलोकाची काळजी घ्या. येथे रहा, मजा कर, आणि या ठिकाणाची चांगली व्यवस्था ठेव." ज्या क्षणी इंद्र निघून गेला, नहुष त्याला दिलेल्या या छोट्याश्या कामाबद्दल, इंद्र नसताना त्या ठिकाणाची काळजी घेण्याच्या कामगिरीने खूप अभिमानी बनला. तो इंद्राच्या सिंहासनावर बसला. त्याने त्याला हव्या असलेल्या कोणत्याही अप्सरेला बोलावले.

तेवढे पुरेसे नव्हते - त्याची नजर इंद्राच्या पत्नीवर शचीवर पडली. त्याने तिचे लक्ष वेधण्यास सुरवात केली, "आता मी सिंहासनावर बसलो आहे. मी इंद्र आहे. तू माझी आहेस." तिने त्याला अनेक प्रकारे टाळण्याचा प्रयत्न केला, परंतु तरीही त्याने तिच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. शची म्हणाली, "हो, आता तू इंद्र आहेस. फक्त एकच गोष्ट आहे कि, सप्तऋषी, सात मुनींनी तुला माझ्याकडे पालखीतून घेऊन आणलं पाहिजे. मग मी तुझी होईल." नहुषाने सप्तऋषींना त्याला पालखीतून शचीच्या महालाकडे घेऊन जाण्याचा आदेश दिला, जे त्यांनी केलं.

नहुष देवलोकातून खाली पडतो

तो गर्वाने भरला होता आणि खूप घाईत होता. त्याला वाटले की ते पुरेसे वेगाने चालत नाहीत. म्हणून त्याने अगस्त्य मुनी, ज्यांनी पालखीची उजवी बाजू धरली होती, त्यांच्या डोक्यात लाथ मारली आणि म्हणाला, "जोरात चला." अगत्स्यांनी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, "सगळी गोष्ट तुझ्या डोक्यात गेली आहे. तू इतका खालचा झाला आहेस कि, तू देवलोकात राहण्यास पात्र तर नाहीच आहेस - पण तू एक मानव असण्यासही अपात्र आहेस. तू एक अजगर बनशील." अजगर हा एक अतिशय खालचा प्राणी आहे. नहुष एका अजगराच्या रूपात देवलोकातून खाली पडला. आपण अजगराकडे नंतर परत येऊ.

नहुषाला मुलं होती - त्यातील दोन महत्वाचे यती आणि ययाती आहेत. यती त्याच्या चारित्र्य आणि अपूर्व बुद्धिमत्तेने ओळखला जात होता. त्याने जगाकडे एक नजर टाकली आणि म्हणाला, "मला याच्याशी काहीही घेणंदेणं नाही आहे," तो हिमालयात निघून गेला, आणि एक वैरागी बनला. ययाती राजा बनला.

देव आणि असुरांचे सततचे युद्ध

आधीच नमूद केल्याप्रमाणे, बृहस्पती हे देवांचे पुजारी होते, आणि त्यांच्यासाठी कर्मकांड विधी करत असत. शुक्राचार्य हे असुरांचे पुजारी होते. देव आणि असुर गंगेच्या खोऱ्यात सतत युद्ध करत असत. देव उंच प्रदेशातून खाली उतरण्याचा प्रयत्न करत होते, आणि असुर वाळवंटातून वरच्या भारताच्या सुपीक मध्यवर्ती प्रदेशात जाण्याचा प्रयत्न करत होते. या सततच्या युद्धात, असुरांना एक फायदा होता - त्यांच्याकडे शुक्राचार्य होते. त्यांच्याकडे अफाट क्षमता होती. आणि त्यांच्याकडे संजीविनीची शक्ती होती. संजीविनी मंत्राने, ते जो कोणी युद्धात मरण पावला त्याला पुनर्जीवित करू शकत होते.

प्रत्येक दिवसाच्या शेवटी, युद्धात मरण पावलेले सर्व असुर पुनर्जीवित होत असत आणि पुन्हा, ते पुढील सकाळी लढायला तयार होत असत.

प्रत्येक दिवसाच्या शेवटी, युद्धात मरण पावलेले सर्व असुर पुनर्जीवित होत असत आणि पुन्हा, ते पुढील सकाळी लढायला तयार होत असत. तुम्ही अशा सैन्याशी कसे युद्ध कराल, जी जर तुम्ही त्यांना मारलंत, तर ते मेलेले राहत नाहीत? शुक्राचार्यांमुळे, ते पुन्हा पुन्हा जिवंत झाले. देव नाउमेद झाले होते. म्हणून बृहस्पतींचा मुलगा कच शुक्राचार्यांकडे आला, त्यांच्यापुढे वाकून त्यांना म्हणाला, "मी अंगिराचा नातू आणि बृहस्पतींचा मुलगा आहे. मी चांगल्या वंशातून आलो आहे. कृपया मला तुमचा शिष्य म्हणून स्वीकारा."

कच शुक्राचार्यांचा शिष्य बनतो

असुरांनी शुक्राचार्यांना चेतावणी दिली, "हा माणूस विरुद्ध गटातील आहे. साहजिकच तो संजीविनीचे रहस्य जाणून घेण्यासाठी आला आहे. चला त्याला आत्ताच मारून टाकूया." शुक्राचार्य म्हणाले, "नाही, मुलाने आपले काही नुकसान केले नाही. आणि माझा शिष्य होण्यासाठी त्याच्याकडे आवश्यक पात्रता आहेत. मी त्याला नाकारू शकत नाही." त्यावेळचा धर्म सांगतो की जर कोणी शिकवण्यास पात्र असेल, तर त्याला नाकारता येणार नाही.

कचाला एक शिष्य म्हणून स्वीकारण्यात आलं, आणि तो एक योग्यतेचा शिष्य असल्याचे सिद्ध झाले. त्याने त्याच्या गुरुची सेवा केली, प्रत्येक निर्देश पाळले, आणि प्रत्येक गोष्टीत सहभाग घेतला. शुक्राचार्य यांना एक मुलगी होती जिचे नाव देवयानी होते. देवयानीने या तरूणाकडे पाहिले आणि हळूहळू ती त्याच्या प्रेमात पडली. पण या तरुण मुलीकडे त्याचे लक्ष नव्हते. तिने जे काही केले, ते एक क्षणदेखील त्याचे लक्ष वेधू शकले नाही. तो ज्या उद्देशाने आला होता त्यापासून तो विचलित होऊ शकला नाही, आणि असुरांना माहित होते की तो संजीविनीसाठी आला आहे.

असुर कचावर हल्ला करतात

एके दिवशी, कच त्याच्या गुरुचे पशु जंगलात चरत होता. असुरांनी त्याच्यावर झडप घातली, त्याला ठार केले, त्याचे तुकडे केले, आणि वन्य प्राण्यांसमोर फेकले. जेंव्हा संध्याकाळी, फक्त गायी परत आल्या पण मुलगा नव्हता, देवयानीच हृदय दुखावलं गेलं. ती वडिलांकडे गेली आणि रडली, "कच परत आला नाही. कोणीतरी त्याला काहीतरी केले आहे. तो जेथे आहे, तेथे तुम्ही त्याला जिवंत केले पाहिजे.” त्यांच्या मुलीची विनवणी मान्य करत, शुक्राचार्यांनी कचाला पुन्हा जिवंत करण्यासाठी संजीविनीचा उपयोग केला.

त्यांच्या मुलीची विनवणी मान्य करत, शुक्राचार्यांनी कचाला पुन्हा जिवंत करण्यासाठी संजीविनीचा उपयोग केला.

जेंव्हा त्याला विचारले गेले कि काय घडले, तेंव्हा कचाने असुरांनी त्याच्यावर कशी झडप मारली आणि त्याला ठार केले याचे वर्णन केले. शुक्राचार्य म्हणाले, "सावध रहा. असुरांना तू आवडत नाहीस, कारण तू शत्रूंच्या गटातील आहेस. तरीही मी तुला माझा शिष्य म्हणून वागवत आहे." काही दिवसांनी, कच पहाटेच्या पूजेसाठी फुले तोडण्यासाठी गेला. असुरांनी त्याला पकडले, त्याला ठार केले, त्याचे मांस आणि हाडं दळली, समुद्राच्या खाऱ्या पाण्यात मिसळली, त्याचे अवयव दळले, आणि त्यातील थोडेसे शुक्राचार्यांच्या मदिरेत मिसळले. नकळत, शुक्राचार्यांनी ते प्यायलं.

जेंव्हा कच पुन्हा संध्याकाळी परत आला नाही, देवयानीने हंबरडा फोडला. पण शुक्राचार्य म्हणाले, "असे दिसते कि मृत्यू पावणे हि त्याची नियतीच आहे. तो सारखा मरत आहे. त्याला परत आणण्यात काहीच अर्थ नाही. तुझ्यासारख्या बुद्धिमान असलेल्या, तुझ्यासारखी निपज असलेली, तुझ्यासारख्या जीवनाचा अनुभव असलेल्याने जीवन आणि मृत्यूबद्दल रडत बसले नाही पाहिजे. हि अशी गोष्ट आहे जी प्रत्येक प्राण्यांसोबत घडते. त्याला मरु दे. एखाद्याला बर्याचदा पुन्हा जिवंत करणे चांगले नाही." पण देवयानीच हृदय तुटलं होतं, "एकतर कच परत येईल किंवा मी स्वतःला तळ्यामध्ये बुडवून घेईल." तसे होऊ देण्यास तयार नसल्याने, शुक्राचार्य म्हणाले, "एकदा हे शेवटच्या वेळी करूया."

कच संजीविनी मंत्र शिकतो

जेंव्हा शुक्राचार्यांनी मंत्र वापरण्याचा प्रयत्न केला, तेंव्हा त्यांना त्यांच्या पोटात एक गडगडाट जाणवला. तो कच होता. शुक्राचार्य संतापले. "हे कोणी केले? हे सुद्धा असुरांचे काम आहे का? ते हे कसे करू शकतात?" त्यांच्या पोटातून, कचाने सगळी गोष्ट सांगितली - असुरांनी त्याला कसे मारले, त्याला दळले, त्याला खाऱ्या पाण्यात मिसळले, त्यांनी कसे अवयव घेतले, त्यांना दळले, आणि त्यातील थोडंसं मदिरेत मिसळले. शुक्राचार्य खूप संतापले. "हे जरा जास्तच होतंय, त्यांनी आता त्याला माझ्या पोटात घातले आहे. एकतर मला त्याला मृत ठेवावं लागेल, किंवा, मी जर त्याला पुन्हा जिवंत केलं, तर मला मरावं लागेल." त्यांनी विचार केला, "कदाचित मी हि नोकरी सोडावी आणि देवांना जाऊन मिळावं. मला खूप वाईट वागणूक दिली जात आहे. माझ्या पोटामध्ये या मुलाला घालण्याचे धैर्य त्यांनी कसे केले?" परंतु देवयानी रडली. ती म्हणाली, "मला कचाशिवाय किंवा तुमच्याशिवाय जगण्याची इच्छा नाही आहे. जर तुमच्यातील एकाच मृत्यू झाला, तर मी स्वत:ला बुडवीन."

तो सोडून जात असताना, देवयानी म्हणाली, "तू जाऊ शकत नाहीस. मी तुझ्यावर प्रेम केले आहे."

शुक्राचार्य कचाला म्हटले, "तू ज्या मोहिमेसाठी आला होतास त्यात यशस्वी झाला आहेस. तुला संजीविनीचे रहस्य जाणून घ्यायचे होते, आणि तू एक पात्र उमेदवार आहेस. आता मी तुला हे शिकवीन. मग मी ते तुला पुनर्जीवित करण्यासाठी वापरेन. तू माझ्या शरीरातून फुटून बाहेर येशील, जे मला मारून टाकेल. मग तू संजीविनी मंत्र वापर, मला पुन्हा जिवंत कर, आणि तू इतरत्र एक नवीन आयुष्य सुरु कर." शुक्राचार्यांनी संजीविनी मंत्र वापरला, आणि एका वाढत्या चंद्राप्रमाणे, कच त्यांचा पोटात वाढला आणि त्यांच्यातून फुटून बाहेर आला. शुक्राचार्य मरण पावले. देवयानीने एक जोरदार किंचाळी ठोकली. मग कचाने संजीविनी मंत्र वापरलं आणि शुक्राचार्यांना पुन्हा जिवंत केलं.

तो सोडून जात असताना, देवयानी म्हणाली, "तू जाऊ शकत नाहीस. मी तुझ्यावर प्रेम केले आहे." पण तिने कितीही याचना केली, तरी कचा म्हणाला, "मी तुझ्या वडिलांचा शिष्य आहे. त्या दृष्टीने तू मला बहिणीसारखी आहेस. दुसरी गोष्ट म्हणजे, मी नुकताच तुझ्या वडिलांच्या शरीरातून बाहेर आलो, म्हणून ते माझी आई सुद्धा आहेत. त्या दृष्टीने देखील तू माझी बहीण आहेस. म्हणून कोणताही मार्ग नाही," आणि तो दूर निघून गेला.

पुढे चालू ..