सद्गुरू: शंकरन पिल्लै एका लोकल बसमध्ये चढला. अचानक त्याने शालीने स्वतःचा चेहरा झाकला आणि वाकून बसला. एका प्रवाशाने गोंधळून विचारले, "साहेब, तुम्ही ठीक आहात ना?" शंकरन पिल्लै म्हणाला, की तो ठीक आहे आणि बोलला , "तिकडच्या त्या वृद्ध महिलेला मी पाहिलं, तर मला माझी जागा तिला द्यावी लागेल म्हणून मी दडून बसलोय."

शंकरन पिल्लैच्या समोर दोन पर्याय होते - एकतर स्वतः उभं राहून जागा देणे किंवा बसून राहणे. पण बरेच लोक विविध प्रकारच्या सहभागापासून पळ काढतात, हे न जाणता, की टाळणे हे मोठे कर्म आहे. जेव्हा तुम्ही सहभाग टाळण्याचा प्रयत्न करता, तेव्हा कर्म वाढते. आणि "मी जागा द्यावी की नाही" हा विचार करणे हे तर त्याहूनही मोठे कर्म आहे.

मानवी इच्छा मर्यादित किंवा अमर्याद असू शकते. जर तुम्ही अमर्याद इच्छा निवडली, तर तो कर्माचा शेवट आहे.

या गुंतागुंत-टाळाटाळीच्या सापळ्यातून सुटायचे कसे ? हा प्रश्न अनेकांना गोंधळात टाकतो. अशा गोंधळाच्या स्थितीत, तुमच्या भोवतालची प्रत्येक गोष्ट तुम्हाला चिकटते! जणू काही तुम्ही अतिशय चिकट डिंकाच्या आवरणाने झाकले गेला आहात, आणि प्रत्येक धूलिकण चिकटत आहे. कर्म जमा करणे हे चांगल्या किंवा वाईट कृतींशी संबंधित नाही. तुम्ही गोंधळलेल्या हेतूंनी आणि मर्यादित इच्छांनी स्वतःमध्ये कर्म जमा करता. काही काळानंतर, तुमच्या भोवती कर्माचा इतका मोठा पर्वत तयार होतो की श्वास घेणेही कठीण होते.

या प्रचंड कर्माच्या पर्वताचे विघटन कसे करायचे? उत्तर सोपे आहे: तुम्ही त्याचे विघटन करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त डिंक धुवून टाका. संपूर्ण पर्वत क्षणात कोसळेल. हा डिंक काढायचा कसा? टाळून नाही, तर जाणीवपूर्वक सहभागाने. अशा जाणीवपूर्वक सहभागाने, की पुन्हा कधीही चिकटून जाण्याची शक्यता उरणार नाही.

pullquote]योगची संपूर्ण प्रणाली कोणत्याही विशिष्ट हेतू किंवा उद्देशाशिवाय सखोल सहभाग जोपासण्याबद्दल आहे..

मानवी इच्छा मर्यादित किंवा अमर्याद असू शकते. जर तुम्ही अमर्याद इच्छा निवडली, तर तो कर्माचा शेवट आहे. किंवा, जेव्हा  तुम्ही तुमच्या आवडी आणि नावड यांच्या पलीकडे जाता, "हे माझे आहे" आणि "हे माझे नाही" या संकुचित कल्पनांच्या पलीकडे जाता, तर तो देखील कर्माचा शेवट आहे. तुमची इच्छा सर्वसमावेशक करा, सर्व काही आपले करा, जगाची आई व्हा, आणि यामुळे चिकटून पडण्याची शक्यता कायमची नाहीशी होते.

आध्यात्मिक मार्गाचे अंतिम ध्येय म्हणजे निःपक्षपाती सहभाग आणि अविचल लक्ष. तुम्ही कशामध्ये गुंतला आहात किंवा तुम्ही देव, दगड, पुरुष अथवा स्त्री यापैकी कशावर लक्ष केंद्रित केले आहे याला महत्त्व नाही. कशावर लक्ष हा विषय महत्त्वाचा नाही. योगिक परंपरेतील आकाशी मुद्रा काहीच नसलेल्या गोष्टीवर ध्यान केंद्रित करते; हे केवळ रिक्त जागेवर अविचल लक्ष केंद्रित करणे आहे. अशी स्थिती जिथे मुक्ती तुमच्या एकाग्रतेच्या माध्यमावर अवलंबून नसते, तर ती एकाग्रतेवरच असते.

योगची संपूर्ण प्रणाली कोणत्याही विशिष्ट हेतू किंवा उद्देशाशिवाय सखोल सहभाग जोपासण्याबद्दल आहे. कालांतराने, याचा अर्थ अलिप्तता असा चुकीचा समजला गेला: लोकांनी सहभाग आणि गुंतागुंत तसेच निःपक्षपातीपणा आणि उदासीनता यात गोंधळ केला. ते जे विसरले - आणि जे शंकरन पिल्लैला त्या बसमध्ये समजले - की कुणाकडे दुर्लक्ष करण्यासाठी देखील खूप सहभाग असावा लागतो!

हा एक समावेश करण्याचा प्रवास आहे जो तुम्हाला मुक्त करतो, ते गंतव्यस्थान नाही. अलिप्ततेमुळे तुम्ही अडकले जाता. समावेश केल्याने मुक्त होता.

जीवन स्वतःच एक उद्देश नसलेली प्रक्रिया असल्याने, या प्रक्रियेत पूर्ण सहभागानेच जीवनाचा रस चाखता येतो. प्रक्रिया हाच उद्देश आहे; ध्येय हा केवळ परिणाम आहे. आणि ही गोष्टी सोपी करण्यासाठीच अनेक प्राचीन परंपरा "भक्ती" विषयी बोलतात.

भक्तीमध्ये भावनिक काहीही नाही. जर खऱ्या भक्तीची ज्योत तुमच्या आत जळत असेल, तर ती सर्व काही जाळून टाकेल. ती तुम्हाला ध्येय काय आहे याची पर्वा न करता या प्रक्रियेत पूर्णपणे समर्पित असल्याची खात्री देईल. हा एक समावेश करण्याचा प्रवास आहे जो तुम्हाला मुक्त करतो, ते गंतव्यस्थान नाही. अलिप्ततेमुळे तुम्ही अडकले जाता. समावेश केल्याने मुक्त होता.