सद्गुरु: आधुनिक काळात मानवी मन ही एक आश्चर्यजनक गोष्ट वाटण्याऐवजी वेदनेचा एक स्त्रोत म्हणून पाहिले जात आहे. दुर्दैवाने, जादूच्या या स्रोताचं गोंधळात रूपांतर झालं आहे, एक चमत्काराने परिपूर्ण साधन दु: ख-उत्पादक मशीन बनून गेलं आहे.

मनाचं सर्कशीत रूपांतर कसं झालं? ज्ञान योग - “जाणण्याचा एक मार्ग” हा काळाच्या कसोटीवर खरा उतरलेला दैवी शक्तीकडे नेणारा मार्ग मानला जातो, मग काय चुकले? आता आपले मन आपल्या अंतिम गंतव्यस्थानाकडे नेण्यास सक्षम राहिले नाही का?

मनाचा वापर कसा करावा हे जर माहित असेल तर प्रत्येक मनुष्य त्याच्या आतील जीवनाचा एकमेव आर्किटेक्ट होण्यासाठी सक्षम आहेत. समस्या फक्त इतकी आहे की त्यांचे मन त्यांच्याकडून सूचना घेत नाही. एखादा गुहेत राहणारा माणूस संगणकाचा की-बोर्ड दाबताना कल्पना करा: त्याचा परिणाम अश्लील मालिकेसारखा दिसेल! बहुतेक लोकांच्या मनाचा वापर करण्याच्या पद्धतीचा हा सारांश आहे.

बुद्धीचे सार

ज्ञान योगी त्याची बुद्धी वापरुन सुरूवात करतो, परंतु लवकरच या शाखेच्या मर्यादा लक्षात येतात. मूलत: बुद्धीचे काम ज्ञानेंद्रियांद्वारा बाहेरच्या जगाकडून एकत्रित केलेल्या माहितीचा पुनर्वापर करणे आहे. थोडक्यात, बुद्धी शुद्ध माहिती तंत्रज्ञान आहे. हे एक आश्चर्यकारक साधन आहे, आणि आपल्या जगण्यासाठी पूर्णपणे आवश्यक आहे. मानवी संस्कृती आणि सभ्यता यासाठी बुद्धीचे योगदान खूप मोठे आहे.

पण, आज समस्या अशी आहे की बुद्धीने एक प्रमाणापेक्षा जास्त महत्त्वपूर्ण भूमिका स्वीकारली आहे. बुद्धीचे सार तुकडे पाडण्यात आहे. म्हणजे मानवजातीने घाऊक विच्छेदनाच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. आम्ही अदृश्य अणूसह सर्व काही विभाजित केले आहे.

आपण विसरलो आहोत की मानवी तर्क मर्यादित आहे कारण ते आपल्या ज्ञानेंद्रियांच्या तुकड्या-तुकड्याने जमा केलेल्या आणि चुकीच्या माहितीवर आधारित आहे. असे म्हटले जाते की जेव्हा युरोपियन जहाजे पहिल्यांदा उत्तर अमेरिकेत गेली तेव्हा तिथल्या मूळ आदिवासी लोकांना त्यांच्या दिशेने येणारे लोक दिसले पण जहाज त्यांना दिसले नाही. ह्याचे कारण त्यांनी यापूर्वी कधीही जहाज पाहिलेच नव्हते. ही कहाणी खरी असु देत किंवा दंतकथा, ही वस्तुस्थिती आहे की जर तुमच्या मनात एखाद्या वस्तूबद्दल पूर्वीची माहिती नसेल तर तुम्ही ती पाहू शकत नाही. कुठलाही धर्म हे आपल्याला सांगत नाही, तर आधुनिक न्यूरोसायन्स हे सांगत आहे.

अनंताला गवसणी घालणे

ज्ञान योग्याला हे समजण्यास सुरवात होते की जेव्हा गूढ पैलूंचा विषय येतो तेव्हा बुद्धीचा काहीच उपयोग होत नाही. त्याच्या हे लक्षात येते की बुद्धीने गोळा केलेली माहिती कितीही अफाट असली तरी ती नेहमीच मर्यादित राहील. अशा मर्यादितातून असीमताकडे जाणे अशक्य आहे. आणि म्हणून, ज्ञान योगी बुद्धीचा वापर - एक दारुडा जसा एखादा दिव्याचा खांब प्रकाशझोता ऐवजी आधारासाठी वापरतो तसा करायला शिकतो. तो जमा केलेल्या ज्ञानाचे प्रमाणिकरण करण्यासाठी तो पीएचडी घेत नाही. त्याऐवजी, तो समजून घेतो की बुद्धिमत्ता हे विश्लेषणाचे साधन आहे, आकलनाचे नव्हे. आकलनासाठी, वेगळ्या शाखेची आवश्यकता आहे.

ह्याचवेळी, कदाचित जगात इतरत्र कोठेही बुद्धीचा वापर भारताएवढ्या प्रभावी अचूकतेसह केला गेलेला नाही. भारतीय उपखंडाने तत्वज्ञान विषयक तर्क चरम पातळीला पोहोचलेला पाहिला आहे. वेदांताच्या अभ्यासकांनी मांडलेले तत्वज्ञानाचे स्तर तुम्हाला चक्कर आणू शकतात आणि झिंगावुन टाकू शकतात. परंतु हळूहळू, खऱ्या साधकांना कळून चुकते की हा उत्कट उत्साह त्यांना कुठेही घेऊन जाऊ शकत नाही.

शुद्ध बुद्धिमत्ता

हळूहळू, ज्ञान योगाच्या मार्गावरील लोक मानवी बुद्धिमत्तेच्या सर्वांत खोल आयामाला गवसणी घालायला शिकतात, जो त्यांना सृष्टीच्या मूळ तत्वाशी जोडतो. हे क्षेत्र चित्त म्हणून ओळखले जाते. त्यांना हे समजते की जर तुम्ही तुमची बुद्धी चित्तामध्ये - स्मृतीविरहित जागरूकतेत - बुडवलीत तर ती अत्यंत धारदार बनू शकते, आनंद आणि मुक्तीच्या चमत्कारी साधनात बदलू शकते आणि अंतिमतेपर्यंत तुम्हाला सहजपणे पोहोचवू शकते.

ज्ञान योगाच्या मार्गावरील लोक मानवी बुद्धिमत्तेच्या सर्वांत खोल आयामाला गवसणी घालायला शिकतात, जो त्यांना सृष्टीच्या मूळ तत्वाशी जोडतो. हे क्षेत्र चित्त म्हणून ओळखले जाते.

तुम्ही तुमच्या शरीराकडे नीटपणे पाहिल्यास, हे समजते की ते एक अतिशय गुंतागुंतीचा रासायनिक कारखाना आहे. या महान रासायनिक नृत्याचे व्यवस्थापन करण्यासाठी निश्चितपणे सखोल बुद्धिमत्ता आहे. पण तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही हे रासायनिक नृत्य तुमच्या बुद्धीने करण्यास सक्षम आहात? तुम्ही तुमच्या शरीरात एक पेशी सुद्धा अशा प्रकारे सांभाळू शकत नाही!

मानवाच्या शरीरातील रसायनशास्त्र आणि मज्जातंतूचे अभूतपूर्व नृत्य फक्त चित्त किंवा शुद्ध बुद्धिमत्ता सांभाळू शकतात. आणि ही शुद्ध बुद्धिमत्ता तुम्ही ज्याला देव किंवा निर्माता म्हणतो त्यापेक्षा वेगळी नाही. जर तुम्ही तर्काच्या अरुंद कक्षेतूनच सर्व गोष्टी चालवल्यात तर जीवनाच्या सर्कशीत तुम्ही फक्त एक विदूषक बनून राहता. परंतु जेव्हा तुम्ही चित्ताच्या अमर्यादित आयामातून तुमचे आयुष्य चालवता तेव्हा तुम्ही जीवनाच्या प्रक्रियेत आनंदीपणे सहभागी होता. मन यापुढे सर्कस राहत नाही. आता, आयुष्य एखाद्या नृत्यापेक्षा कमी राहत नाही - आयुष्य म्हणजे तुम्ही आणि संपूर्ण विश्व यांच्यामध्ये एक उत्कृष्टपणे रचलेले नृत्य बनते.