बुद्धीमानी लोकांना मजा कशी करायची हे माहित असतं का?

'युथ अँड ट्रुथ' शृंखलेत एका विद्यार्थ्याने बुद्धिमत्ता आणि आनंद ह्यांच्यातील संबंधांबद्दल सद्‌गुरूंना विचारलं. जे बौद्धिक सुख उपभोगतात, त्यांच्यासाठी सद्‌गुरू म्हणतात, भलेही त्यांना पार्ट्या आणि पब्जचा अर्थ कळत नसेल पण ह्याचा अर्थ हा नाही की ते मजा करत नाहीत!
Sadhguru plays chess in Russia | Do Intelligent People Know How to Have Fun?
 

प्रश्न: सद्‌गुरू, मी माझ्या शाळेत आणि महाविद्यालयात होतो तेव्हा पाहिलंय की बरेच हुशार लोक स्वतःमध्येच असतात. ज्या सर्वसाधारण गोष्टी दुसरे जण करतात ते हे करत नाहीत. ते बाहेर पडत नाहीत, मजा करत नाहीत, पार्ट्यांमध्ये जात नाहीत - ते फक्त त्यांच्या कामात
गुंतलेले असतात. बुद्धिमत्ता आणि आनंद ह्यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का?

सद्‌गुरू: आयुष्यात आनंद अनेक प्रकारचा असतो: शारिरीक सुख, जन्म देण्याचा आनंद, बौद्धिक सुख, सखोल ज्ञानाचे सुख, भावनिक आनंद आणि सदैव जागरूक असणं ह्याचाही मोठा आनंद. जो कोणी आपली बुद्धी किंवा हुशारीचा आनंद घेतोय, त्याला तुम्ही जे काही करून आनंदी होता, उदा: पबमध्ये जाऊन मजा करणं किंवा इतर काहीही, त्यांना तसं करावंसं वाटत नाही कारण त्यांचा आनंद
दुसऱ्या गोष्टींत असतो.

प्रत्येकाला मिळणारा आनंद हा वेगळा असू शकतो आणि तो तसा असला पाहिजे. जर सगळे एकाच गोष्टीत मग्न असतील तर त्याला एक मूर्ख समाज म्हणावं लागेल.

इतर सर्व प्राण्यांसाठी त्यांचे शरीर हे त्यांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावते. पण एकदा इथे आपण मानव म्हणून आलात, की शरीर आपल्यासाठी अग्रस्थानी नसतं. तुम्ही अठरा किंवा वीस वर्षांचे असता तेव्हा असं वाटू शकतं, परंतु नंतर तुम्हाला कळेल की असं नसतं. एकदा आपण मानव म्हणून जन्म घेतला की, तिथे एक प्रचंड बुद्धीमत्ता गवसते. बुद्धिमत्ता, भावना आणि चेतना ह्यांना अनेक पैलू आहेत. काही लोक केवळ भौतिक गोष्टींचा आनंद घेऊ शकतात. काहींना बौद्धिक किंवा इतर गोष्टींमधून आनंद लुटता येतो. तुमच्या सुखाच्या ज्या कल्पना आहेत तसे लोक वागत नाहीत याचा अर्थ ते मजा करत नाहीत असा होत नाही. आपण शतरंज खेळत आहात आणि दुसरा एखादा ह्याला मूर्खपणा समजतो - आयुष्यात काय नुसती प्यादी फिरवायची! मला खात्री आहे की बरेच लोक असा विचार करतात. पण तुम्हाला एखादे प्यादे
चलाखीने फिरवून पण खूप आनंद मिळू शकतो. प्रत्येकाला मिळणारा आनंद हा वेगळा असू शकतो आणि तो तसा असला पाहिजे. जर सगळे एकाच गोष्टीत मग्न असतील तर त्याला एक मूर्ख समाज म्हणावं लागेल.

 

प्रत्येकाला मिळणारा आनंद हा वेगळा असू शकतो आणि तो तसा असला पाहिजे. जर सगळे एकाच गोष्टीत मग्न असतील तर त्याला एक मूर्ख समाज म्हणावं लागेल.

संपादकीय टीप: कुठल्या वादग्रस्त मुद्द्याबाबत जर तुमच्या मनात वादळ उठत असेल, कुणीच ज्या बाबत बोलत नाही अश्या कुठल्या गोष्टीबद्दल जर तुम्ही गोंधळलेले असाल, किंवा असा कुठला प्रश्न तुमच्या मनाला सतावत आहे ज्याचं उत्तर कुणाकडेही नाही, तर हीच संधी आहे! सद्गुरूंना आपले प्रश्न विचारा, UnplugWithSadhguru.org वर.