चाणाक्ष गणपती रावणाला भारी पडतो!
गणपती त्याच्या हुशारी साठी ओळखला जातो. गोकर्ण महाबळेश्वर मंदिरात गणपतीची एक मूर्ती आहे त्यात गणपतीच्या डोक्याला खोक पडली आहे रावणामुळे कारण त्याने एकदा गणपतीच्या बुद्धिमत्तेची कदर राखली नाही. सद्गुरू या घटनेची आपल्याला गोष्ट सांगत आहेत.
रावण त्याच्या कैलासाखाली अडकलेल्या हातांसह शिवसाठीचे त्याचे प्रेम अनेक सुंदर स्तोत्र म्हणून दाखवून देऊ लागला. त्याने पूर्ण प्रेम आणि आत्मसमर्पणानेयुक्त १००१ स्तोत्रे तयार केल्यावर शिवाने त्याला सोडले आणि म्हणाले, “तुला वरदान मिळू शकेल. तुला काय हवे आहे ते माग.” पुन्हा एकदा रावणाचे स्वरुप प्रकट झाले आणि त्याने म्हटले, “मला पार्वती बरोबर लग्न करायचं आहे.” शिव म्हणाले “ठीक आहे. ती मानसरोवराजवळ आहे. तू जाऊन तिच्याशी लग्न कर.” शिव भोवतालचे सर्व गण गडबडले आणि आश्चर्यचकित झाले, “हे कसे शक्य आहे? रावण पार्वतीला कसा स्पर्श करू शकतो? हे शक्य नाही." ते सर्व जण मानसरोवरकडे, पार्वतीकडे धावले आणि तिला सांगितले, “रावण येत आहे. शिवाने त्याला तुझ्याशी लग्न करण्याची परवानगी दिली आहे.”
पार्वतीने बेडकांची राणी मंडुका हिला बोलावून या बेडकीचे रूपांतर एका सुंदर स्त्रीमध्ये केले. रावणाने पार्वतीला कधीही पाहिले नव्हते आणि जेव्हा त्याने येऊन मंडुकेला पाहिले तेव्हा तो तिच्याकडे इतका आकर्षित झाला की त्याने तिच्याशी लग्न केले. ती होती मंदोदरी.
यानंतर, रावणाने एक अत्यंत सामर्थ्यवाण साधना केली आणि शिवाकडून एक शक्तिशाली ज्योतिर्लिंग प्राप्त करून घेतले. एखाद्या गोष्टीला सामाजिक मान्यता आहे की नाही याची शिव काळजी करत नाही. जे काही खरेपणाने घडते, तो त्याच्या प्रेमात पडतो . शिवाने रावणाला सांगितले की ज्योतिर्लिंग आपल्या देशात घेऊन जा आणि तो ज्योतिर्लिंग जिथे ठेवले तिथे ते कायम राहील. एक अट अशी होती की रावण ज्योतिर्लिंग बाकी कुठेही ठेवू शकत नाही कारण जिथे तो ते ठेवले तिथेच ते स्थापित होईल.
गोकर्ण मंदिर
अत्यंत सावधगिरीने रावणाने ते ज्योतिर्लिंग मोठ्या सामर्थ्याने नेले. तो माणूस असा योगी होता की त्याने प्रत्येक बाबीचा विचार केला - त्यानं खाल्लं नाही, तो लघवीला गेला नाही, प्रत्येक माणसासाठी अनिवार्य आहे त्याने असं काही केलं नाही आणि तो कैलासापासून सुमारे 3000 किलोमीटर अंतरावर कर्नाटकातील गोकर्ण नावाच्या ठिकाणी गेला. एखाद्या माणसाला ज्या गोष्टीची गरज भासते त्याशिवाय तो चालत होता म्हणून त्याला अशक्तपणा जाणवत होता आणि त्याला लघवी करण्याची इच्छा झाली. कदाचित त्याला काही खायला मिळत नसल्यामुळे तो पाणी पीत होता. तोपर्यंत त्याचे मूत्राशय एक हजार गॅलननी भरलेलं असावं आणि तो त्यापुढे थांबवून ठेवू शकत नव्हता! परंतु तो लिंग खाली ठेवू शकत नव्हता आणि त्याच्या जवळ आहे ज्योतिर्लिंग - ज्याला तो एक अतिशय पवित्र कार्य मानतो, असे असताना - तो लघुशंकेला जाऊ ही शकत नव्हता.
मग त्याला एक अतिशय गोंडस आणि निरागस दिसत असलेला गुराखी मुलगा दिसला. मुलगा पुरेसा बुद्धू दिसत होता. जर तुम्ही हुशार अशा कोणाला एखादी मौल्यवान वस्तू दिली तर ते ती घेऊन पळून जाऊ शकतात. मुलगा पुरेसा बुद्धू दिसला, म्हणून रावण म्हणाला, “जर मी स्वतःला मोकळं करे पर्यंत तू काही मिनिटांसाठी हे हातात धरलंस तर मी तुला एक रत्न देईन. पण हे खाली ठेवू नकोस. ” मुलगा म्हणाला, “ठीक आहे” आणि रावणाने गुराख्याला ते ज्योतिर्लिंग लिंग दिले आणि लघवी करण्यासाठी मागे वळला. हा मुलगा प्रत्यक्षात गणपती होता ज्याला रावणाने लिंगाला लंकेत घेऊन जाण्याची इच्छा नव्हती कारण जर तसे झाले तर तो अगदी महाशक्तिशाली माणूस होईल. म्हणून गणपतीने ज्योतिर्लिंग खाली ठेवले आणि ते पृथ्वीच्या आत अदृश्य झाले.आजही जर तुम्ही गोकर्णला गेलात तर खडकामध्ये फक्त एक लहान छिद्र आहे ज्यामधून तुम्हाला तुमचे बोट घालावे लागते आणि लिंगाला स्पर्श करावा लागतो कारण ते आत गेलं आहे.
गोकर्ण गणपती
रावणाला इतका राग आला की त्याने त्या मुलाच्या डोक्यावर वार केले आणि म्हणूनच तुम्हाला गोकर्ण येथे त्याच्या डोक्यावर एक खोक असलेला गणपतीचा पुतळा देखील सापडेल. रावणाला कैलासाकडे परत जाण्याची शक्ती नव्हती आणि पुन्हा त्याचे कार्य करण्याची ताकद नव्हती आणि म्हणूनच मोठ्या उद्विग्नतेने आणि रागाने तो श्रीलंकेला गेला.
तुम्ही चांगले आहात की वाईट याची पर्वा न करता, तुम्ही इच्छुक असल्यास, दैवत्व प्रत्येकासाठी नेहमी उपलब्ध असतो. परंतु तुम्ही ते स्वत: साठी शाप किंवा वरदान बनवता हे तुम्ही तुमच्यामधले स्वरूप कसे प्रस्थापित केले आहे यावर अवलंबून आहे. तुम्ही स्वतःमध्ये कोणत्या प्रकारची वृत्ती आणि मन जोपासता ते तुम्ही ह्या अस्तित्वाचा कसा उपयोग करता हे ठरवते.