विरेंद्र सेहवाग: नमस्कार सदगुरू! मला आपल्या भारतीय जाती व्यवस्थेचं सत्य जाणुन घ्यायचंय. सगळ्यांचा समावेश होईल आणि समानता प्रस्थापित होईल यासाठी काय करावं?

Sadhguru: नमस्कार विरू. जाती व्यवस्थेबद्दल, तुम्ही तो प्रश्न विचारलात, आपण समजून घेतलं पाहिजे की ही व्यवस्था सुरू कशी झाली. ही व्यवस्था मुख्यत: श्रमविभाजनासाठी सुरू झाली. दुर्दैवानं काही कालांतराने हे विभाजन भेदभावात बदलंल, आणी ते एकमेकांच्या विरोधात काम करायला लागले.  

एखादा समाज कार्यरत राहण्यासाठी एका ठराविक संख्येच्या लोकांनी कौशल्य आणी कारिगिरी लागणारी कामं करायला हवी, कुणीतरी व्यवस्थापनाची काळजी घ्यायला हवी, कुणीतरी समुहाचे शिक्षण आणी अध्यात्मिक प्रक्रियेची काळजी करायला हवी, असं त्यांनी चार भागात विभाजनं केलं.

आपल्याला हे ही समजायला हवं, की प्राचीन काळी, इंजिनियरिंग स्कूल आणी मेडिकल स्कूल, असं काही नव्हतं.….जातीव्यवस्थेतून पिढी दर पिढी कौशल्य हस्तांतरीत केलं जायचं.

आणी कालांतराने याचे आणखीन भाग होत गेले. भेदभाव करण्याच्या हेतूनी नाही, पण जास्त श्रमविभाजनाच्या दृष्टीकोनातून. आणी आपल्याला हे ही समजायला हवं, की प्राचीन काळी, इंजिनियरिंग स्कूल आणी मेडिकल स्कूल, असं काही नव्हतं. जर तुमचे वडिल सुतार असतील, तर तुम्हीसुद्धा  लहानपणापासुनच घरी सुतारकाम शिकून उत्तम सुतार होता. तर, पिढी दर पिढी हे कौशल्य हस्तांतरीत झाल्यामुळॆ जाती व्यवस्था चालू राहिली.  

पण दुर्दैवानं वाटेत कुठेतरी, एक सोनार विचार करायला लागला, की तो एका लोहारापेक्षा श्रेष्ठ आहे, जरी एका लोहाराचं काम समाजासाठी सोनाराच्या कामापेक्षा जास्त उपयोगी असलं तरी. कुणीतरी एखादा विचार करतो की तो दुसऱ्यापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे, आणी येणाऱ्या पिढ्य़ांमध्ये ते श्रेष्ठत्व रुढ होत गेलं. हे श्रेष्ठत्व स्थापित करण्याच्या प्रयत्नात, सगळ्याप्रकारचं शोषण घडलं, आणी आता हे अशा स्थितीपर्यंत पोहचलंय की जाती व्यवस्था अधिक घट्ट झालीये किंवा याला वर्णभेदाचं स्वरूप मिळत चाललंय.

आज बहुतेक करून कौशल्याचं कौटूंबिक हस्तांतरण होत नाहिये. तर त्या दृष्टीने जातीव्यवस्था कालबाह्य झाली आहे.

गेल्या काही शतकात लोकांसोबत भयानक गोष्टी केल्या गेल्या आहेत. आणी आत्ता ही ते सुरू आहे. आजही भारतातल्या कित्येक खॆड्यांमध्ये खालच्या जातीचे मानले जाणाऱ्या लोकांकडे, ज्यांना दलित म्हटल जातं, मुलभुत मानवी हक्कही नाहियेत. कित्येक खॆड्यांमध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षात खुप काही बदललंयसुद्धा. पण अजुनही आपल्या देशात खुप भयानक अनिष्ट गोष्टी घडत राहतात.   

 

यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे, एक गोष्ट की हे ह्या काळासाठी कालबाह्य आहे. कारण कौशल्य तर खुप वेगवेगळ्या मार्गानं हस्तांतरीत करता येतं. आपल्याकडे शिक्षण संस्था आहेत, आपल्याकडे तंत्रञान संस्था आहेत, तर कौशल्याचं कौटूंबिक हस्तांतरण आजचा मार्ग नाहिये. तर जाती व्यवस्था भुतकाळात मुख्यत: ज्या गोष्टीबद्दल होती, ती आता त्या दृष्टीनं महत्वाची राहिलेली नाहिये.

पण एक गोष्ट आहे, ती म्हणजे सामाजिक सुरक्षेचा. जोवर आपण देशभरात प्रत्येक नागरिकासाठी  एक सामाजिक सुरक्षा प्रणालीची स्थापना करत नाही, तोवर जाती व्यवस्था काही प्रमाणात तरी सुरू राहिलच.  

देशभरात सामाजिक सुरक्षा व्यवस्था आणण्याची अत्यंत गरज आहे आणी एक अशी शिक्षण पद्धती जी सर्वांमध्ये त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार शिक्षण आणि कौशल्य प्रदान करेल.

कारण जात ही आता सामाजिक सुरक्षा प्रणालीचं कार्य करते.  देशभरात सामाजिक सुरक्षा प्रणाली आणण्याची अत्यंत गरज आहे आणी एक अशी शिक्षण पद्धती जी सर्वांमध्ये त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना शिक्षण आणि कौशल्य प्रदान करेल. जेव्हा हे घडेल, तेव्हा जाती व्यवस्थेचं महत्व पुर्णपणे नाहीसं होईल आणी ती टिकाव धरणार नाही. ती सरळ रद्द करण्याचा प्रयत्न करणं , फक्त तिच्या विरोधात कार्य करण्याचा प्रयत्न करणं, यानं काम होणार नाही. कारण अजुनही लोकं जातीव्यवस्थेला चिटकून आहेत, मुख्यत: त्यातून मिळणाऱ्या सामाजिक सुरक्षेमुळे. तर सर्वांत उत्तम म्हणजे अश्या प्रकारची सामाजीक सुरक्षा प्रस्थापित करणं जी सर्वांसाठी समान प्रकारे उपलब्ध असेल. एकदा का हे घडल, की मला वाटतं की जातीव्यवस्थेचा आपोआप लोप होईल.

संपादकीय टीप: कुठल्या वादग्रस्त मुद्द्याबाबत जर तुमच्या मनात वादळ उठत असेल, कुणीच ज्या बाबत बोलत नाही अश्या कुठल्या गोष्टीबद्दल जर तुम्ही गोंधळलेले असाल, किंवा असा कुठला प्रश्न तुमच्या मनाला सतावत आहे ज्याचं उत्तर कुणाकडेही नाही, तर हीच संधी आहे! सद्गुरूंना आपले प्रश्न विचारा, UnplugwithSadhguru.org वर.

Youth and Truth Banner Image