सद्गुरु: आतापर्यंत आपण ययातिचा मुलगा पुरु आणि त्याच्या वंशाची कथा पाहिली आहे. पुरूला एक भाऊही होता, त्याचे नाव यद , तो सध्याचे मथुरा शहर असलेल्या बाजूला दक्षिणेस खाली आला. तेथे वेगवेगळ्या जमाती राहत होत्या आणि या जमातींपैकी कोणालाही राजा किंवा सम्राटांमध्ये विश्वास नव्हता. त्यांच्यावर परिषदेचे राज्य होते. यदुचे लग्न नागा जमातीमध्ये झाले आणि वडिलांनी तू कधीही राजा होणार नाही असा शाप दिल्यामुळे तो प्रशासकीय समितीमध्ये गेला. यदु परिषदेचे प्रमुख झाल्या कारणाने हा सर्व वंश एकत्र यादव म्हणून ओळखला जाऊ लागला.

काही पिढ्यांनंतर वसुदेवाचा जन्म झाला. प्रीता आणि श्रुतादेवी या वसुदेवाच्या बहिणी होत्या. प्रीताला, तिच्या मूल नसलेल्या काकाला कुंतीभोजाला दत्तक म्हणून दिली गेली. या मुलीवर त्याचे इतके प्रेम होते की त्याने स्वतःचे नाव तिला दिले. तिला प्रीता म्हणाण्याऐवजी त्याने तिला कुंती म्हटले.

वसुदेवाच्या दोन पत्नी होत्या, देवकी आणि रोहिणी. देवकीला एक भाऊ होता ज्याचे नाव कंस होते. कंसाचा जन्म बलात्कारातून झाला होता. सर्वच ठिकाणी त्या वेळची परंपरा आणि धर्म होते, की मुलाचा जन्म कसा झाला हे महत्वाचे नाही, जर विशिष्ट कुळातील एखाद्या आईला मूल झाले तर ते त्या कुळाचा कायदेशीर भाग बनायचा. पण यादवांनी कंसाला नकार दिला. त्यांनी त्याला एक बेकायदेशीर मूल म्हटले. तो एक महान योद्धा असूनही त्यांनी त्याला प्रशासकीय समितीमध्ये समाविष्ट करण्यास नकार दिला कारण तो त्याच्या मार्गाने खूपच लबाड आणि अश्लील होता. परंतु त्याने पूर्वेच्या जरासंध या दुसर्‍या महान राजाशी मैत्री केली. जरासंधाच्या पाठिंब्याने, कंसाने स्वत: च्या आसपास अनेक लोक जमा केले आणि यादव कुळाच्या इतिहासामध्ये प्रथमच परिषद बरखास्त केली, मुकुट घातला आणि स्वतःला राजा घोषित केले.

एकदा राजा झाल्यावर, तो निर्विवादपणे अधिकारी होता. तो त्याच्या स्वत: च्या मार्गाने गोष्टी करत असे. लोकांना खूप त्रास सहन करावा लागला परंतु ते काहीही करू शकले नाहीत कारण जरासंध खूप प्रभावी होता. कंसाचा जुलूम चालू असतानाच तो देवकीच्या आठव्या मुलाकडून ठार मारला जाईल असा शाप दिला गेला. म्हणून त्याने देवकी आणि वसुदेवाला तुरूंगात टाकले आणि त्यांच्या प्रत्येक मुलाचा जन्म होताच कंसाने त्याचे पाय पकडून त्याला जमिनीवर आपटले.

जेव्हा सातवे मूल जन्माला आले, तेव्हा वसुदेवने तस्करी करुन त्याला बाहेर पाठवले आणि त्याच्या जागी इतरत्र सापडलेल्या मृतगर्भाला ठेवले. हे सातवे मूल यमुना नदी ओलांडून गोकुळात नेण्यात आले आणि वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी हिला देण्यात आले. त्या मुलाचे नाव होते बलाराम.

महाभारत भाग १0: यादव कुळ आणि कृष्णाचा जन्म

मग आठव्या मुलाचा जन्म होणार होता तेव्हा त्यांनी अघोरी विद्येची जाण असण्याऱ्या लोकांची नेमणूक केली. त्यांनी तुरूंगातील पहारेकऱ्यांना झोपवले. वासुदेव नुकत्याच जन्मलेल्या बाळाला घेऊन नदीच्या पलीकडे गोकुळात गेले. तिथे नंदाची पत्नी यशोदेला मुलगी झाली होती. वसुदेवाने आपल्या नुकत्याच जन्मलेल्या मुलाला तिथेच ठेवले, आणि मुलीला घेऊन तो परत आला.

जेव्हा सकाळी कंस आला, तेव्हा देवकीने विनवणी केली, “ती फक्त एक मुलगी आहे. तो मुलगा नाही जो मोठा होऊन तुला ठार करेल, ही एक मुलगी आहे. तिचे लग्न होऊन ती निघून जाईल. कृपा करून तिला सोड. ” कंसाने उत्तर दिले, "नाही नाही, मी संधी का घेऊ?" त्याने लगेच बाळाला उचलले, तिला गरगर फिरवले आणि तिला खाली फेकली.

पण मुलगी खाली पडली नाही. तिने एक वेगळे स्परूप धारण केले आणि म्हणाली, “जो तुला जिवे मारणार आहे तो अजूनही जिवंत आहे. मी ती नाही. ” कंस घाबरून गेला. त्या प्रदेशात जन्मलेल्या तीन महिन्यांच्या आतील सगळ्या मुलांना ठार मारण्याचा आदेश देऊन त्याने आपल्या सैनिकांना पाठवले. सैनिक गेले आणि तीन महिन्यांच्या आतील प्रत्येक अर्भकाची कत्तल करण्यात आली. पण अवघ्या काही महिन्यांचा कृष्ण तिकडे भरभराटीला आला.

तर, यदु कुळात, वसुदेवाला देवकी आणि रोहिणी या दोन बायका आहेत. देवकीचा कृष्ण हा एकमेव जिवंत मूलगा होता. आणि रोहिणीला बलराम आणि सुभद्रा होते. वसुदेवाच्या बहिणींमध्ये श्रुतादेवीचे दामागोशाशी लग्न झाले. दुसरी बहिणी प्रीता किंवा कुंतीचे कुरु कुळातील पांडूशी लग्न झाले.

पुढे चालू...