एखादी स्त्री गुरु होऊ शकते का? गुरु स्त्री आहे का पुरुष याला महत्व आहे का? महिला आणि अध्यात्मिकता या मालिकेच्या पाचव्या भागात सद्गुरू या प्रश्नाचे उत्तर देत आहे.

सद्गुरू:

सर्वसाधारणपणे, स्त्रीचे स्त्रीत्व तिला प्रभावी गुरु होऊ देत नाही. पण ती त्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी ती पूर्णतः सक्षम आहे. एखादा पुरुष अनेक गोष्टी करू शकतो, पण त्याची ग्रहणशीलता कमी असते. तो स्वतःला तयार करू शकतो, पण स्त्रीकडे मात्र ती गुणवत्ता नैसर्गिकतःच असते. त्यामुळे ज्या ठिकाणी एखादे गुरु असतील, तिथे अधिक स्त्रिया एकत्र येणे स्वाभाविक आहे, कारण त्यांची ग्रहणक्षमता अधिक चांगली असते. अनेक स्त्रीया अतिशय उत्तम गुरु होत्या, पण त्या जरा वेगळ्या प्रकारच्या होत्या. त्या एखाद्या पुरुषाप्रमाणे वावरू शकत नव्हत्या. त्यांना समाजात एक विशिष्ट प्रकारची परिस्थिती, एक विशिष्ट प्रकारची आधार व्यवस्था शोधावी लागते. समाजाने एखाद्या स्त्रीला एक गुरु म्हणून कधीही सहकार्य केले नाही. विशेषतः पाश्चिमात्य देशांत, जेंव्हा जेंव्हा स्त्रीने तिची ज्ञान कौशल्य व्यक्त करायला सुरुवात केली, जेंव्हा जेंव्हा स्त्रीला सर्वसामान्य लोकांच्या आकलना पल्याडच्या गोष्टीं ठाव मिळायला लागला, तेंव्हा तिला चेटकीण तिरस्कृत केली गेली आणि कित्येकांना ठार मारण्यापर्यंत त्यांची मजल गेली.