प्रश्न: मी जितका अध्यात्माचा मार्ग अधिक शोधू पाहतो, तितकाच जास्त गोंधळ उडतो. पण त्यातही एक वेगळीच सुस्पष्टता असते - संभ्रमात्मक स्पष्टता. अशी वेळ कधी येईल का,की जेव्हा सर्वकाही स्पष्ट होईल आणि कुठलाच संभ्रम नसेल? आणि मी ती वेळ कशी आणू शकेन?

सद्गुरू: तुम्ही अध्यात्माचा मार्ग जितका शोधता आहात, तितका तुमचा जास्त गोंधळ उडतो आहे. हा एक चांगला संकेत आहे, कारण अविचारी निष्कर्षांच्या मुर्खपणापेक्षा गोंधळलेली अवस्था जास्त चांगली असते . तुम्ही काढलेल्या मूर्ख निष्कर्षामुळे तुमच्या आयुष्यात समाधान होते, दिलासा आणि अनुकुलता देखील होती, पण तो खोटा सुरक्षिततेचा आभास होता.

पण एकदा का तुम्ही अध्यात्माचा मार्ग स्वीकारलात, की मग सगळी गडबड होते. ज्या ज्या गोष्टीत तुम्ही आरामदायी असायचा त्या सर्व आता मूर्खपणाच्या वाटू लागतात. तुमच्या मौल्यवान , तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी अचानक क्षुल्लक व निरुपयोगी वाटू लागतात. सगळं काही उलथापालथ झाल्यासारखं वाटतं. एक फार सुंदर झेन म्हण आहे : “अज्ञानात, डोंगर हे डोंगरच असतात, नद्या ह्या नद्याच असतात, ढग हे ढगच असतात, झाडी ही झाडीच असतात. एकदाका अध्यात्माच्या मार्गाला लागलात की मग, डोंगर हे फक्त डोंगरच रहात नाहीत, नद्या ह्या फक्त नद्याच रहात नाहीत, ढग हे फक्त ढगच रहात नाहीत, झाडं ही फक्त झाडंच रहात नाहीत. पण या मार्गावर स्थिरावताच, प्रबुद्ध होताच परत एकदा, डोंगर हे डोंगरच होतात, नद्या ह्या नद्याच होतात, ढग हे ढगच होतात, झाडं ही झाडच होतात.” अज्ञानातून ज्ञानाकडे जाताना एक वर्तुळ पूर्ण करून त्याच ठिकाणी पोचता पण प्रचंड फरक पडलेला असतो. एक अद्भुत फरक जो अवर्णनीय असतो.

आपल्या व्यथांची जाण असणे

एकदा का तुम्ही अध्यात्माचा मार्ग स्वीकारलात की मग सगळी गडबड आहे. सगळंच प्रश्नार्थक आहे. तुम्ही कुठे आहात हे कळत नाहीये – काहीच कळत नाहीये. आध्यात्माविषयी काही कळण्याआधी तुम्ही आरामात होतात, समाधानी होतात. तुम्ही सकाळी नाष्टा करायचात, कॉफी प्यायचात आणि हेच म्हणजे सर्वकाही असे वाटायचे. आता, काहीही फरक पडत नाही. तुम्हाला खावंसं वाटत नाही, झोपावसं वाटत नाही, काहीच करावसं वाटत नाही कारण आता काहीच अर्थपूर्ण राहिले नाहीये. ते अर्थपूर्ण कधीच नव्हतं. ते तसेच आहे असा विश्वास ठेऊन तुम्ही स्वतःलाच फसवत होता . ते खरंच अर्थपूर्ण असतं, तर ते हरवेल कसं? तुम्हाला जर ते काय आहे हे खरंच माहिती असेल तर मग हा संभ्रम कशाला? तुम्ही गोंधळलेले आहात याचाच अर्थ तुम्हाला त्याच्याबद्दल काहीच माहित नाही . केवळ समाधान आणि सुरक्षिततेसाठी तुम्ही हेतुपूर्वक चुकीचे निष्कर्ष काढलेत.

तुम्हाला केवळ समाधानीच व्हायचं असेल तर, माझं उत्तम चाललंय आणि जीवन परिपूर्ण आहे असे स्वतःच्या मनाला बजावत रहा. माझं घर छान आहे, माझा नवरा अद्भुत आहे, माझे छान चालले आहे, माझी मुलं अप्रतिम आहेत, माझा कुत्रासुद्धा मस्त आहे आणि हे असंच असतं. जीवन असंच असतं. असं रोज रोज स्वतःला सांगा. त्यात काहीच वाईट नाहीये आणि चूक तर अजिबात नाहीये. फक्त ते मर्यादित आहे आणि हा जीव, जे काही मर्यादित आहे त्यात कधीच स्तीरावणार नाही . स्वतःला कुठल्याही प्रकारे मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करा, कुठेतरी एक उत्कंठा असतेच. तुमच्या जीवनातील सुख-समाधानाचे क्षण नीट आठवा. वर वर आनंद दिसेलही, पण खोल कुठेतरी तुम्हाला व्यथा किंवा दु:ख दिसेल. मनात दडलेल्या सुप्त इच्छा हेच वाट्याला येणाऱ्या भोगाचे कारण आहे. आपल्या व्यथांची जाणीव होता होताच लोकांचं आयुष्य निघून जाता.


 

आध्यात्माचा मार्ग स्वीकारलात म्हणजेच तुम्हाला तुमच्या व्यथांची जाणीव झाली आहे. नकळत तुम्ही त्या भोगत होतात; आता त्यांची जाणीव तुम्हाला झाली आहे. व्यथांची जाणीव नसण्यापेक्षा ती असणे हे जास्त सखोल आहे. ती असणं हेच जास्त चांगलं. हि जाणीव होत नाही तोपर्यंत व्यथा कायमस्वरूपी राहणार आहेत. एकदा का जाणीव झाली तर त्या दूर होऊ शकतात. हे शक्य आहे, नाही का?

आध्यात्माचा मार्ग स्वीकारलात म्हणजेच तुम्हाला तुमच्या व्यथांची जाणीव झाली आहे.

अध्यात्मिक मार्ग अवलंबिणे ही एक शक्यता आहे, गुरुचा सहवास ही एक शक्यता आहे. शक्यतांना वास्तवात आणण्यासाठी सर्वात प्रथम, गोष्टी जशा आहेत तशा पाहायला शिकाण्याची इच्छा हवी. कमीतकमी आपल्या मर्यादा ओळखाण्याची इच्छा हवी. जर आपल्या मर्यादा लपवायच्या असतील तर मग मुक्तीचा प्रश्न येतोच कुठे? तुम्ही ती शक्यताच पूर्णपणे नष्ट केली आहे. जर तुम्हाला आत्ता साखळदंडाने बांधले आहे व कधीतरी तुम्हाला मुक्तीची अपेक्षा असेल, तर सर्वप्रथम व सर्वात महत्त्वाचे म्हणजे आत्ता आपण जेरबंद आहोत हे स्वीकारा. तुम्हाला जर तेच मान्य नसेल तर, मुक्तीचा प्रश्नच उद्भवत नाही.

जेव्हा तुम्हाला कळेल की तुम्हाला जखडून ठेवलेले आहे , तेव्हा दुःख आणि यातना होतील, संघर्ष असेल तसेच संभ्रमही असेल. पूर्व आठवणी सांगतील,”माझं बरं चाललं होतं.” असं असतं मन. तुम्ही माध्यमिक शाळेत असताना तुमचं मन सांगतं, “अहाहा, बालवाडीत काय धमाल होती.” तुम्हाला माहित आहे कि बालवाडीत तुम्ही कसे जायचा! तुम्ही कॉलेजमध्ये गेल्यावर म्हणालात, “ओह, शाळेतले दिवस किती मस्त होते,” पण सर्वांना माहित आहे तुम्ही शाळेत कसे गेलात. शिक्षण संपलं आणि तुम्ही म्हणालात, “विद्यापीठातील दिवस सर्वात आनंददायी होते!” पण आम्हाला माहिती आहे की पेपर लिहिताना तुम्ही कसे झगडला, लायब्ररीतून हवं ते पुस्तक मिळवताना किती कष्ट झाले, किती त्रास होता ते प्राध्यापक, ते क्लासेस किती त्रासदायी; आणि आता सर्व झाल्यावर तुम्ही म्हणता की किती आनंददायी होतं सगळं. जगण्याच्या तंत्राचा एक भाग म्हणून आपली स्मरणशक्ती घडून गेलेल्या अप्रिय घटना पुसून टाकते आणि आत्ता काय आहे त्यापेक्षा भूतकाळ कसा प्रसन्न होता ते सांगते. जगण्याची ती एक युक्ती आहे. नाहीतर मानसिकदृष्ट्या तुम्ही मोडून जाल. तुमच्याकडे काहीतरी कायम असतेच कि ज्या आधारे तुम्ही म्हणू शकता,”ओह, तेव्हा किती छान होतं.”

संभ्रमात्मक स्पष्टता

परंतु आता संभ्रमात्मक स्पष्टता आहे. चांगलं आहे, नाही? तुम्ही गोंधळलेले आहात तरी सर्वकाही स्पष्ट आहे. एका ठराविक दिवशी एक शेतकरी ट्रकभरून गुरे घेऊन बाजारात लिलावासाठी जात होता. वाटेत एक माणूस त्याला सोबत घेऊन जाण्याची विनंती करतो. तो त्याला घेऊन निघतो. ट्रक चालवताना एकीकडे शेतकरी घरी बनवलेले एक मद्य प्राशन करू लागतो. अचानक ताबा सुटून ट्रक रस्त्याकडेच्या एका मोठ्या खड्ड्यात आपटतो. बरोबरचा माणूस जोरात बाहेर फेकला जातो. त्याच्या बरगड्या तुटतात, पाय मोडतो, हाताला खूप लागतं, एकंदर तो फार वाईट दशेत असतो. ट्रकमध्ये गुरांचीही दुर्दशा झालेली असते. शेतकऱ्याला मात्र किरकोळ खरचटण्यापलीकडे काही होत नाही. तो ट्रकच्या बाहेर पडून गुरांकडे पाहायला जातो. कोंबड्यांचे पाय आणि पंख मोडलेले असतात. “ह्या कोंबड्या तर आता निकामी झाल्या आहेत. कोण घेईल त्यांना विकत.” चिडून तो ओरडतो. तो ट्रकमधून बंदूक घेऊन येतो आणि त्यांना मारून टाकतो. रक्ताळलेली, जखमी डुकरांना पाहून तो म्हणतो, “हीपण निरुपयोगी झाली आहेत.” त्यांनाही तो गोळ्या घालून मारून टाकतो. मग तो बकरीकडे पहातो. तिची अवस्थापण कोंबड्या आणि डुकरांसारखीच असते. “फालतू बकरी!” तो ओरडतो आणि बंदूक पुन्हा भरून तिलाही मारून टाकतो. खड्ड्यात पडलेला जखमी माणूस हे सर्व भयचकित होऊन पहात असतो. शेतकरी मग खड्ड्याजवळ जातो आणि आत डोकवून म्हणतो, “काय रे, कसा आहेस, बरा आहेस ना?” शक्य असेल तेव्हढा जोर लावून, धडपडत, रांगत तो माणूस घाईने बाहेर पडतो आणि म्हणतो, “आत्तापर्यंत आयुष्यात जितकं छान वाटलं नव्हतं तितकं आत्ता वाटतंय.”

जो पर्यंत तुम्हाला जाणीव होत नाही, व्यथा कायम रहाणार.

म्हणजे काय ...समजा तुम्हाला नरकात टाकलं तरी काही फरक पडणार नाही कारण ती स्पष्टता तुमच्यात असेल. लोकांना स्वर्गात पाठवण्यात मला काही रस नाही. मला रुची लोकांना असे घडवण्यात आहे कि ते नरकात जरी गेले तरी कोणी त्यांना यातना नाही देऊ शकणार. याला मुक्ती म्हणतात. “मला स्वर्गात जायचंय,” यात खूप मोठे दडपण आहे. जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी पोचलात तर? स्वर्गात जाताना जर तुमच्या विमानाचे कोणी अपहरण केले, त्याने ते पाडले नाही पण भलत्याच ठिकाणी उतरवले तर – तुम्ही संपलात. तुम्ही कायम अशा गोष्टीबरोबर राहत असता की ज्या कोणीही तुमच्याकडून हिरावून घेऊ शकतो. खरी मुक्ती त्यात असते की जेव्हा कोणी काहीच तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही, आणि तुमच्याकडून कोणी कधीहीकाही हिरावून घेऊ शकणार नाही असे काही असेल, तर तो तुमचा आनंद, तुमची यातना भोगायची असमर्थता. “मला स्वर्गात जायचंय,” याचा अर्थ तुम्ही अजूनसुद्धा यातना भोगायला सक्षम आहात. म्हणूनच तुम्हाला चांगल्या ठिकाणी जावेसे वाटतय.

गौतम बुद्ध वारंवार सांगे, “मला स्वर्गात नाही जायचं. मला नरकात जायचंय.” लोकांना वाटलं त्यांना वेड लागलं आहे, पण मुक्त, ज्ञानी माणसाचे असेच असतात. “मला नरकात जाण्यात काय समस्या आहेत? काही झालं तरी ते मला यातना नाही देऊ शकत, म्हणून मी नरकात जाणार.” हा मनुष्य मुक्त झालेला आहे. जर तुम्ही गोंधळलेले असाल आणि स्पष्टही असाल, तर ते चांगलं आहे. “माझे सर्व संभ्रम कधी दूर होणार? संपूर्ण सुस्पष्टता कधी येणार?” मला असा एखादा ठराविक दिवस ठरवायचा नाही, पण मी तुला आशीर्वाद देतो कि तो आजच असुदे. उद्या का ? आज अजून खूप वेळ उरला आहे. आजच.