सद्गुरु: जगात अनेक परंपरा अस्तित्वात आहेत. परंतु तुम्ही कोणत्याही परंपरेचा त्याच्या उगमापर्यंत जाऊन शोध घेतलात, तर तुम्हाला असे आढळून येईल, की ती परंपरा म्हणजे केवळ एका व्यक्तिच्या किंवा समूहाच्या आंतरिक अनुभवाच्या बाह्य अभिव्यक्तीचे किंवा प्रकटीकरणाचे एक साधन आहे. जेव्हा लोकं संगठित होऊन तो अनुभव इतर लोकांना देण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा आधी एक व्यवस्था बनते, नंतर ती परंपरा बनते, आणि काही वेळेस परंपरांचे रूपांतर धर्मात होते, आणि काही वेळेस त्याचे परिवर्तन इतर अनेक गोष्टींमध्ये होते.

या सर्व गोष्टी असंघटित प्रवाह किंवा संघटित आचाराच्या प्रक्रियेमुळे सुरू होण्याआधी एका आंतरिक अनुभवापासून सुरू होतात. तो जर एक असंघटित प्रवाह असेल, तर त्याला सामान्यतः परंपरा म्हणून संबोधले जाते, कारण ती जरा विस्कळीत संस्था आहे. त्याचं स्वरूप जर अधिक संघटित असेल, तर तो एक संघटित धर्म बनतो. परंतु, मूलत: तुम्ही जर मागे वळून पाहिलं, तर तुमच्या असं लक्षात येईल, की या सर्व गोष्टी केवळ एका व्यक्तिच्या किंवा समूहाच्या आंतरिक अनुभवातून जन्माला आल्या.  

काळानुसार परंपरेचं विकृतीकरण

कोणी; जे काही अनुभवले – शंभर वर्षांपूर्वी किंवा हजार वर्षांपूर्वी किंवा दहा हजार वर्षांपूर्वी – आम्ही त्यासाठी त्यांना वंदन करतो. परंतु तरीही, एखाद्याला आलेला कोणताही अनुभव तुमच्यासाठी फक्त एक स्फूर्तीकथा असते. जोपर्यंत तुम्ही त्याचा अनुभव घेत नाही, तोपर्यंत ती खरी नसते. त्या व्यक्तीचा अनुभव, आणि त्या व्यक्तीचे आयुष्य तुमच्यासाठी फक्त एक प्रेरणा असू शकते, परंतु तो कधीही मार्ग असू शकत नाही. प्रत्येक मनुष्यासाठी असलेला एकमेव मार्ग म्हणजे त्याने किंवा तिने स्वतःते अनुभवलं पाहिजे. कदाचित दिलेल्या मार्गदर्शनामुळे तुमची त्या दिशेने वाटचाल होऊ शकेल, परंतु ती परंपरा तुमच्यापाशी इतक्या वर्षांनंतर पोहोचे पर्यंत त्याचं विकृतीकरण झालेलं असेल.

या देशात, आपण ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी एक परंपरा स्थापित केली, एक असं विज्ञान, ज्याचा शक्य तितक्या पावित्र्यानं प्रसार होईल. ही परंपरा ‘गुरु-शिष्य परंपरा’ म्हणून ओळखली जाते.

उदाहरणार्थ, तुम्ही आज जर एखादी गोष्ट पाहिलीत, आणि तुम्ही काय पाहिले, ते कोणाला तरी जाऊन सांगितलं,आणि चोवीस तासातच जर वेगवेगळ्या पंचवीस लोकांकडून पुढे जाऊन तीच गोष्ट परत तुमच्यापर्यंत दुसऱ्या दिवशी येऊन पोहोचली, तर तुम्ही ती गोष्ट ओळखणारसुद्धा नाही. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जी काही माहिती पुढे दिली गेली आहे, तिचा मानवी मनाकडून प्रचंड विपर्यास झालेला आहे. हे मानवी मनाचे स्वरूप आहे, कारण बहुतेक लोकांनी त्यांच्यामनाकडे कधी लक्ष पुरवले नाही.

लोकांसाठी, त्यांचे मन स्मरणशक्ती पलिकडे स्वतंत्ररित्या कार्यच करत नाही. तुम्ही तुमच्या मनात कोणत्या प्रकारच्या आठवणी साठवून ठेवल्या आहेत, त्यानुसार तुमच्या मनात दूषितीकरण सुरू होतं. म्हणून या देशात, आपण ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी एक परंपरा स्थापित केली, एक असं विज्ञान, ज्याचा शक्य तितक्या पावित्र्यानं प्रसार होईल. ही परंपरा ‘गुरु-शिष्य परंपरा’ म्हणून ओळखली जाते.

A Tradition of Oral Transmission

परंपरेनुसार, जो काही आंतरिक अनुभव असेल, तो कधीही लिहून ठेवायचा नसतो, तो तोंडी प्रसारित करायचा असतो. कोणालाही त्यामधील एक अक्षरसुद्धा बदलायचा अधिकार नाही – तो अगदी जसा आहे तसा, कोणतेही अन्वयार्थ न लावता, त्याचा प्रसार झाला पाहिजे. कोणीही त्यावर टिप्पणी लिहिणे अमान्य आहे. हजारो वर्षे आपण ते यशस्वीपणे पार पाडले आहे.

जेव्हा कोणी एखाद्याने आंतरिक आध्यात्मिक अनुभवलं, त्याने ते अशा व्यक्तिला सांगितले, जो त्याने सांगितलेला अनुभवहा आपल्या आयुष्याचा एक भाग, व्यवसाय किंवा छंद न मानता, स्वतःच्या जीवनापेक्षा उच्च मानलं.त्याच्या स्वतःच्या जीवनापेक्षा ते अधिक महत्वाचं होतं आणि त्या व्यक्तिने ते भावी पिढीच्या हाती सुपूर्द केलं; जरी त्याचा त्याला स्वतःला अनुभव घेता आला नसला, तरी त्याने तो जसाच्या तसापुढील पिढीपर्यंत पोहोचवला. ही एक खूपच छान पद्धत होती, परंतु तो काळ आता इतिहासजमा झालेला आहे, आजच्या युगात दुर्दैवाने त्याचे विकृतीकरण झाले आहे..

परंपरा स्वतःहून फारशी महत्वाची नाही

परंपरा केवळ एक परंपरा म्हणून महत्वाची नाही, तर ती सध्याच्या पिढीला, त्याच वैभवशाली अनुभूतीचा अनुभव घेण्याचे एक साधन म्हणून मौल्यवान आहे, जी गोष्ट ह्या परंपरेचा उगम होती. दुर्दैवाने, आज आपण अशा अवस्थेत येऊन पोहोचलो आहोत, जिथे असे समजले जाते की, हजारो वर्षांपूर्वी जे काही घडून गेले आहे, ते आजच्यापेक्षा अधिक चांगलं होतं. परंतु ते तसं नाही. हजारो वर्षांपूर्वीसुद्धा तुमच्या माझ्यासारखी माणसं होती, परिस्थितीशी झगडा होता,अडचणी होत्या, मूर्खपणा होता, प्रत्येक गोष्ट होती.

फक्त एवढंच आहे की, लोक काही व्यक्तींच्या वैभवशाली जीवनाच्या आठवणी ठेवतात आणि असं समजतात की, त्या काळातील प्रत्येकाचं जीवन तसंच होतं. नाही, त्याकाळी तशा खूप कमी व्यक्ती होत्या. आजसुद्धा, तश्या प्रकारच्या थोड्याच व्यक्ती आढळून येतात. परंपरा ही वैयक्तिक अनुभवातून जीवंत राहिली पाहिजे. फक्त तेव्हाच ती एक जगण्याची प्रक्रिया बनते. नाहीतर, त्याचे फक्त ओझं होऊन बसतं आणि पुढील किंवा त्यापुढील पिढी त्या परंपरा सोडून देतात.

परंपरांचं जतन करणं महत्वाचं आहे का?

Namaskaram or Namaste, the Indian Tradition of greeting with folded hands
Namaskaram or Namaste, the Indian tradition of greeting with folded hands

 

सर्व परंपरा, ज्या कुचकामी ठरतात त्या साहजिकच नष्ट होतील. जर एखादी गोष्ट कामी येत नसेल, तर आपण ती आपल्या पिढीवर लादू शकत नाही. आपल्याला ती कितीही पवित्र वाटली तरी. म्हणून, सगळ्यात आवश्यक मुद्दा म्हणजे आपल्या परंपरेकडे परत प्रवास करून त्याच्या उगमस्थानी काय आहे हे अनुभवून; तेच इथे बसलेल्या लोकांसाठी तो अनुभव पुन्हा उपलब्ध करू शकता का, हे पाहणे. तसं झालं तर, “कृपया परंपरांचं जतन कराअसं तुम्हाला त्यांना सांगावं लागणार नाही, ते त्यांची जपणूक करतीलच.

Editor’s Note: Offering the rare possibility to go beyond all limitations, Sadhguru takes the seeker on a mystical journey towards ultimate liberation. In the ebook "A Guru Always Takes You For a Ride", Sadhguru delivers rare insights into the Guru-shishya relationship. Name your price and download.