प्र: आपण कृपया आम्हाला एखादी वस्तू कशी उर्जित करायची आणि एखादे क्षेत्र प्राणप्रतिष्ठित कसे करावे हे सांगू शकाल का? आपल्यात जन्मतःच ही क्षमता होती की आपण ही गोष्ट कालानुरूप शिकलात? मी सुद्धा हे शिकू शकतो का?

सद्‌गुरु: आम्ही तुम्हाला आमच्या कार्यक्रमांमधून एक अशी प्रक्रिया शिकवतो आहोत ज्याद्वारे तुम्ही स्वतःला हळूहळू प्राणप्रतिष्ठित करू शकता. सर्व प्रथम जर तुम्ही स्वतःला स्वतःला प्राणप्रतिष्ठित करत नाही, तर इतर गोष्टींना कसे काय प्राणप्रतिष्ठित करू शकाल? जीवनात तुम्हाला जे काही करायचं असेल, आधी तुम्ही तसे असल्याशिवाय तुम्हाला ती गोष्ट करता येणार नाही. तुम्ही त्याप्रकारचं सोंग करण्याचा प्रयत्न करू शकता, पण त्याने काहीही साध्य होणार नाही. एखादा विशिष्ट गुण किंवा कौशल्य एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या वस्तुत प्रक्षेपित करायची असेल, तर सर्वप्रथम ते तुमच्यात प्रस्थापित झालं पाहिजे. जे तुमच्या आत घडत नाहीये, ते तुम्ही जगात घडवून आणू शकत नाही. या संस्कृतीत साधना करत असणार्‍या व्यक्ती, जेव्हा कधी त्या जर अस्वस्थ, गोंधळलेल्या अवस्थेत असत, तेव्हा नेहेमीच त्यांना काही काळ एकांतात राहायला सांगितले जायचे. याचे कारण, तुम्ही तुमची अस्वस्थता, क्लेश जगभर पसरवू नये हेच आहे.

सर्वप्रथम, मला पाहिजे आधी तुम्ही स्वतः प्राणप्रतिष्ठित झालेले. एका अर्थी, कोणतेही ठिकाण किंवा साकार वस्तू प्राणप्रतिष्ठित करणे ही काही आदर्श गोष्ट नाही. माणसांना प्राणप्रतिष्ठित करणे फार सोपे आणि उत्तम आहे जर 98 टक्के लोकांनी मिनिटागणिक त्यांचे प्राधान्य बदलले नाही तर. जे लोक सतत त्यांच्या आयुष्याच्या प्राथमिकता बदलत यु टर्न घेत असतात, साहजिकच त्यांना कोठेही जाण्याची इच्छा नाही. आज तुम्ही इथे ईशा योग केंद्रात हजर आहात, (आदियोगी आलयम मधील लिंगाचा संदर्भ देऊन) आजाणतेपणे आदियोगी तुमच्यात पाझरेल. आज तुम्ही वास्तू, ठिकाणं प्राणप्रतिष्ठित करण्याबद्दल बोलत आहात. तुमची ही इच्छा दीर्घकाळ टिकून राहते का हे मला पाहू द्यात. जे काही तुम्हाला प्राणप्रतिष्ठित करायचे आहे, सर्वप्रथम तुम्ही एक जिवंत मंदिर बनले पाहिजे.