सद्गुरु: हे शरीर म्हणजे इतर काही नसून केवळ पृथ्वीच आहे, आणि म्हणून, पृथ्वी अनुभवत असणार्‍या भावना आणि बदल, मानवी प्रणालीमधे सुद्धा घडतात आणि जाणवतात. योग प्रक्रियेत, ग्रीष्म ऋतु (साधारण जून-जुलै) आणि मकर संक्रांतीदरम्यानच्या (साधारण जानेवारी) काळाला साधनापाद म्हणून संबोधले जाते. विशेषतः गुरु पौर्णिमेपासून, म्हणजे ग्रीष्म ऋतुमधील पहिल्या पौर्णिमेपासून मकर संक्रांतीनंतर थोडे दिवस, साधारणतः चार किंवा पाच जानेवारी हा कालावधी साधना करण्याचा काळ समजला जातो. या कालावधीत, विशेषतः उत्तर गोलार्धात, केलेल्या साधनेचे सर्वोत्तम परिणाम प्राप्त होतात.

आदियोगींच्या शिकवणुकीला प्रारंभ

दक्षिणायन म्हणून ओळखला जाणारा हा कालावधी, एक असा काळ आहे ज्यात पृथ्वीच्या अवकाशातील सूर्याचा प्रवास पृथ्वीच्या उत्तर गोलार्धापासून दक्षिणेकडे होण्यास सुरुवात होते. दक्षिणेकडे सुरू होणारा सूर्याचा हा प्रवास महत्वाचा बनला कारण हा आदियोगींच्या अध्यापनाचा प्रथम टप्पा होता जेंव्हा त्यांनी सप्तर्षीना शिकवण दिली. ते दक्षिणेकडे वळले आणि ते दक्षिणामूर्ती बनले. त्यांना तसे करण्याची लहर आली म्हणून त्यांनी केले नाही, तर सूर्य दक्षिणेकडे वळला आणि त्या वेळी तसे करण्यासाठी तो सर्वोत्तम मार्ग होता.

साधनापादाला कोणत्याही प्रकारचा योग करणार्‍या कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात अतिशय महत्वाचे स्थान आहे. काहीही घडण्याच्या प्रक्रियेत, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या हातात जे आहे त्याद्वारे योग्य गोष्टी करणे. एखादी गोष्ट तुमच्या हातात नसेल, तर तुम्ही फक्त वाट पाहू शकता. आपण जेंव्हा साधना असे म्हणतो, तेंव्हा आपण आपल्या हातात असणार्‍या गोष्टींविषयी बोलत असतो. आपण त्यासाठी काहीतरी करू शकतो - आपण ते घडवून आणू शकतो.

तुमची मुळे खोलवर रुजवणे

साधनापाद म्हणजे हे असे आहे – हे सहा महीने महत्वाचे आहेत कारण आता, तुम्ही योग्य गोष्टी करू शकता. तुम्ही जर योग्य गोष्टी केल्या, तर कापणीची वेळ येईल तेंव्हा योग्य पिक हाती येईल. उदाहरणार्थ, जेंव्हा एखादे फूल उमलते, तेंव्हा ते तुमच्यामुळे झालेले नसते. पाणी घालणे आणि रोपाला खतपाणी घालणे याचा परिणाम म्हणून ते उमलते. हे पण अगदी असेच आहे.

मी जणू झाडांसाठी वापरल्या जाणाऱ्या खतासारखा आहे. तुम्ही तुमची मुळे माझ्यात रुजवली, तर तुम्ही नक्कीच फुलाल. खताची प्रार्थना करायचा प्रयत्न करू नका – त्याने काही उपयोग होत नाही. तुम्ही फक्त तुमची मुळे घट्टपणे खोलवर रुजवणे आवश्यक आहे. खत फुलासारखे दिसत नाही, आणि त्याचा वाससुद्धा फुलासारखा येत नाही, पण रोपाला फुले मात्र नक्कीच फुलतील. तुम्ही फक्त येवढेच करणे आवश्यक आहे.

साधनापाद दरम्यान स्वयंसेवा करण्याचे काय महत्व आहे?

साधना म्हणजे केवळ डोळे मिटून बसणे नाही हे समजावून घेणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या स्वभावानुसार ध्यानी बनायचे असेल, तर तुम्हाला काही गोष्टी खर्च कराव्या लागतील. तुम्ही जर तुमच्या काही विशिष्ट कर्माच्या संरचना मोडून काढल्या नाहीत, तर तुम्ही तुमच्या आयुष्यात ध्यान करू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला योग्य परिस्थिती निर्माण करायला लागेल. आणि त्याच्या आड येणाऱ्या सर्व भिंती मोडून काढणे आवश्यक आहे आणि तसे करण्यासाठी कार्य-कृती करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. अगदी तीव्रतेने लक्ष केन्द्रित करून केलेली कृती ही डोळे मिटून केलेल्या (अर्थात ध्यान) कृतीपेक्षा कर्माच्या भिंती अधिक सहजतेने मोडून टाकेल.

आम्ही आश्रमात साधना का करावी?

काही लोकं अशी असतात, ज्यांची प्रगती कोठेही होऊ शकते, पण बहुतांश लोकांना योग्य प्रकारच्या वातावरणाची गरज असते. तुम्ही ते जर तुमच्या घरात केले, तर फारच छान, पण बहुतेक घरं तसे करू शकतात यावर माझा विश्वास नाही. एकदा तुम्हाला आमटीचा वास आला, की साधना विसरली जाईल! आश्रमात आम्ही इतकी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे कारण म्हणजे तुम्ही इथे येऊन त्यांचा उपयोग करून घेऊ शकाल.

ही पवित्र जागा हे सुनिश्चित करण्यासाठी निर्माण केलेली आहे, की तुम्ही जागे असाल किंवा झोपलेले असाल, तुम्ही भोजन करत असाल, किंवा स्वच्छतागृहात बसलेले असाल, तरीदेखील तुमची आध्यात्मिक प्रक्रिया सुरूच राहावी. तीने विश्रांती घेऊ नये. विश्रांती केवळ शरीरासाठी आहे, पण उर्वरित सर्वकाही सतत सुरू राहिले पाहिजे.