मासिक पाळी (PMS) दरम्यान होणाऱ्या मूड स्विंग्सवर योगिक उपाय

मासिक पाळीच्या जैविक प्रक्रिये दरम्यान अनेक महिलांना भावनिक अस्वस्थता आणि असंतुलनाचा सामना का करायला लागतो याच्या प्राथमिक कारणांवर सद्गुरू दृष्टीक्षेप टाकत आहेत.
Yogic Relief for PMS Mood Swings
 

प्र: मला मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी अतिशय भावनिक अस्वस्थतेचा सामना करावा लागतो. योगामध्ये यावर काही उपाय, उपचार किंवा साधने आहेत का, ज्यामुळे मला मदत होऊ शकेल.

सद्गुरू: मासिक पाळी, जे निसर्गतः शारीरिक स्वरूपाचे चक्र आहे, त्यामध्ये दुर्दैवाने अनेक स्त्रियांना, अनेक मानसिक खळबळ आणि असंतुलनाला सामोरे जावे लागते कारण या दिवसांमध्ये त्यांचे शारीरिक आणि मानसिक पैलूंमध्ये तारतम्याचा अभाव असतो. यासाठी काही मूलभूत पंचमहाभुते (पंच तत्वे) देखील कारणीभूत आहेत. शरीराची मूलभूत भौमितीय रचना करणारी पाच मुलभूत तत्वे सुद्धा सुसंगत असणे आवश्यक आहे. ईशा योग केंद्रात केली जाणारी पंचभूत आराधना यावर परिणामकारक ठरू शकते कारण ही क्रिया तुमच्या शरीर प्रणालीमधील ही तत्वे सुसूत्रित करते. हा काही कोणता चमत्कार नाही. पण खरोखर विचित्र गोष्ट ही आहे की अनेक स्त्रिया ह्या सामान्य जैविक प्रक्रियेमधून जात असताना ती जणूकाही एखादी गलिच्छ, घृणास्पद गोष्ट आहे अशा प्रकारे त्याकडे बघतात – याचे एकमेव कारण म्हणजे स्वतःच्या शरीर प्रणालीशी सुसूत्रता, समन्वय कसा साधावा हे कुणीही त्यांना शिकवले नाही.

शारीरिक प्रक्रियेमुळे निर्माण होणारा मानसिक गोधळ मुख्यतः आपण कोण आहोत याच्या विविध पैलूंमधे दुफळी निर्माण करतो. मासिक पाळीमुळे कदाचित काही शारीरिक वेदना होऊ शकतात, ज्यांना वैद्यकीय शास्त्रानुसार हाताळणे आवश्यक आहे. पण मासिक पाळी मानसिक त्रास निर्माण करता कामा नये. केवळ ईशाची भूत शुद्धी साधना केल्यामुळे तुम्हाला संपूर्ण आराम मिळू शकतो.

 
 
 
  0 Comments
 
 
Login / to join the conversation1