मत्स्यगंधी एक कोळी राजकन्या

सद्गुरू: एकेकाळी, उपरीचरा, चेडीचा राजा, काही आठवड्यांसाठी जंगलात शिकार करत होता. ह्या काळात, त्याच्यापासून एका कोळीणीला दिवस गेले. तिने जुळया मुलांना जन्म दिला ज्यांचे नाव मत्स्यराजा आणि मत्स्यगंधी ठेवण्यात आले. राजा मुलाला स्वतः बरोबर घेऊन गेला आणि मुलीला कोळी लोकांकडे ठेऊन गेला. कोळी लोकांमध्ये राहिल्यामुळे तिला मत्स्यगंधी म्हणून ओळखले जायचे ज्याचा अर्थ मास्यांचा वास असा होतो.

मत्स्यगंधी सहाजिकच पराशराकडे आकर्षित झाली होती कारण तो अफाट ज्ञान आणि विवेकबुद्धी असलेला अफाट व्यक्तिमत्त्वाचा होता.

मत्स्यगंधी मोठी होऊन कृष्णवर्णीय तरुणी बनली. कोळ्यांचा प्रमुख ज्याला दासा म्हणून ओळखले जायचे त्याने तिचे चांगल्या रीतीने संगोपन केले होते. एकदा पराशराच्या आश्रमावर- जो अफाट ज्ञान असलेला आणि जागरूक माणूस आहे- त्यावर हमला झाला आणि तो इतका जखमी झाला होता की त्याच्या पायाला खूप वाईटरीत्या दुखापत झाली होती.

तो कसातरी तिथून निसटला आणि खूपच प्रयत्नांनंतर तो एका छोट्या बेटावर पोहोचला जेथे कोळी लोकं राहात होती. त्याची अवस्था पाहून कोळी लोकांनी त्याला त्यांच्यात घेतले. त्याची काळजी घेण्याची जबाबदारी मत्स्यगंधेला देण्यात आली.

मत्स्यगंधी सहाजिकच पराशराकडे आकर्षित झाली होती कारण तो अफाट ज्ञान आणि विवेकबुद्धी असलेला अफाट व्यक्तिमत्त्वाचा होता. पूर्ण वेळ, तिच्या मनात एक प्रकारचा संघर्ष सुरू होता कारण तीचा जुळा भाऊ राजवाड्यात राहत होता आणि ती मच्छीमारांबरोबर. तिने विचार केला की जर तिने ऋषीबरोबर नाते जोडले तर ती कुठेतरी दुसरीकडे जाऊ शकेल. ते दोघे नदीतील छोट्याश्या बेटावर राहायला लागले आणि त्यांना एक पुत्र झाला. तो बेटावर जन्माला आल्याने त्याला द्वैपायन म्हणून ओळखले जाऊ लागले. आणि तो कृष्णवर्णीय असल्याने त्याला कृष्ण म्हणूनही संबोधले जायचे. नंतरच्या काळात, कृष्ण द्वैपायन वेद व्यास झाले, वेदांचे संकलक, ज्यांनी महाभारताची कथा सुद्धा सांगितली.

पराशर मुलाला घेऊन निघून गेला. जाण्याआधी त्याने मत्स्यगंधीला वरदान दिले की ज्यामूळे तिच्या शरीराला असलेला मास्याचा वास गेला आणि तिला स्वर्गीय सुवास मिळाला जो कोणत्याही मनुष्यप्राण्याने या आधी कधीच घेतला नव्हता. तिच्या अंगाला एका फुलासारखा सुगंध येत होता जे फुल ह्या पृथ्वीवरचे नव्हतेच. या अभूतपूर्व सुगंधामुळे त्यांनी तिचे नाव बदलून सत्यवती म्हणजे सत्याचा सुगंध, असे ठेवले आणि हे तिचे आकर्षण बनले.

शंतनु सत्यवतीशी विवाह करण्यासाठी विनवण्या करतो

महाभारत भाग 7: देवव्रत भिष्म बनतो

एक दिवस शंतनुची नजर ह्या स्त्रीवर पडली आणि तो तिच्या प्रेमात पडला. तो सत्यवतीच्या वडिलांकडे गेला आणि त्याने लग्नासाठी सत्यवतीचा हात मागितला. जेव्हा, दासा मच्छीमारांचा प्रमुख, जो त्याच्या छोट्याश्या समाजाचा राजा होता, त्याने पाहिले की एक सम्राट आपल्या मुलीशी लग्न करण्यासाठी विनवण्या करीत आहे, त्याने विचार केला की सौदा करण्याची ही चांगली संधी आहे. तो म्हणाला, मी तुला माझ्या मुलीशी लग्न करण्यासाठी सहमती देईन जर तिची मुले भविष्यात कुरु कुळाचे राजे बनणार असतील तर. शंतनु म्हणाला, हे शक्य नाही. मी आधीच माझा मुलगा देवव्रत ह्याला युवराज म्हणून घोषित केले आहे. तो कुरु कुळाला लाभलेला सर्वोत्तम राजा आहे.

शंतनु सत्यवतीला त्याच्या डोक्यातून काढू शकत नव्हता. तिचा सुगंध त्याच्यावर अश्या प्रकारे हावी झाला की पुन्हा एकदा त्याने राज्याच्या कारभारातील रस गमावला आणि तो नुसतंच कुठेही बसून राहायचा.

लबाड कोळ्याने राजाकडे बघितले आणि त्याने पाहिले की तो प्रेमात पूर्णपणे बुडाला आहे, आणि तो म्हणाला, "मग तू माझ्या मुलीला विसर." शंतनुने भीक मागितली. त्याने जितकी जास्त भीक मागितली तितकी मच्छीमाराला जास्त जाणीव झाली की मासा गळाला लागला आहे. मोठा मासा पकडण्याची वेळ आहे. तो म्हणाला, "आता हे तुझ्यावर आहे. जर तुला माझी मुलगी हवी असेल तर तिची मुले ही भावी राजे बनली पाहिजेत. नाहीतर तू तुझ्या राजवाड्यात आनंदाने रहा."

शंतनु राजवाड्यात परत गेला - पुन्हा एकदा उदास. शंतनु सत्यवतीला त्याच्या डोक्यातून काढू शकत नव्हता. तिचा सुगंध त्याच्यावर अश्या प्रकारे हावी झाला की पुन्हा एकदा त्याने राज्याच्या कारभारातील रस गमावला आणि तो नुसतंच कुठेही बसून राहायचा. देवव्रताने त्याच्या वडिलांकडे पाहिले आणि म्हणाला, “राज्यात सर्व काही चांगले चालले आहे. मग तुम्हाला कशाचा त्रास होत आहे? ” शंतनूने फक्त डोकं हलविले आणि लाजेने डोकं खाली केले, कारण नक्की काय अडचण आहे हे तो त्याच्या मुलाला सांगू शकत नव्हता.

त्याचा कर्तव्यदक्ष मुलगा ज्या सारथीने शंतनूला शिकरीकरता नेले होते त्याच्याकडे गेला आणि त्याला विचारले,"त्या शिकारी नंतर माझे वडील पहिल्यासारखे राहिले नाहीत. काय झालंय त्यांना?" सारथी म्हणाला "नक्की काय घडलं ते मला ठाऊक नाही. पण मी त्यांना मच्छिमारांच्या प्रमुखांच्या घरी नेले होते. तुमचे वडील त्या घरात अगदी राजसारखे प्रचंड उत्साहात आणि प्रेमाने गेले. आणि बाहेर आले ते एखाद्या भूतासारखे.

देवव्रत भिष्म बनतो

देवव्रत काय घडले ह्याचा शोध घेण्यासाठी स्वतः तेथे गेला. दासा म्हणाला," त्याला माझी मुलगी हवी आहे. माझे म्हणणे इतकेच आहे की तिची मुले हीच भावी राजे बनतील. ही साधी सोप्पी अट आहे. ह्यात तूच अडथळा बनत आहेस." देवव्रत म्हणाला,"ह्यात काहीच समस्या नाही. मी राजा बनणे गरजेचे नाही. मी तुला वचन देतो की मी कधीच राजा बनणार नाही. सत्यवतीच्या मुलांना राजा बनू दे." कोळी हसला आणि म्हणाला,"एक तरुण म्हणून तरुणाईच्या आवेशात तू अश्या गोष्टी बोलु शकतोस. परंतु नंतर जेव्हा तुला मुलं होतील तेव्हा ते राजसिंहासनासाठी भांडतील." यावर देवव्रत म्हणाला,"मी कधीच लग्न करणार नाही आणि मुलांना जन्म देणार नाही जेणेकरून फक्त सत्यवतीच्या मुलांनाच राजा बनण्याचा अधिकार मिळेल."

त्याला भिष्म म्हणून ओळखले जाते, कारण कोणीही त्याला तसे करायला भरीस न पाडता देखील तो स्वतःशी खूपच निष्ठूर वागतो.

मच्छिमार जेवत होता आणि काळजीपूर्वक माश्यातले काटे बाजूला काढून ठेवत होता. त्याने वर पाहिले आणि म्हणाला,"मुला, तू हे सगळं जे बोलतोयस त्याबद्दल मला कौतुक आहे. पण तुला जीवनाच्या तऱ्हा अजून माहीत नाहीत. जरी तू लग्न नाही केलेस तरी तुला मुलं होऊ शकतात." हे ऐकून देवव्रताने टोकाची भूमिका घेत स्वतःचा शरीराचा भाग कापून स्वतःला नपुंसक केले. त्याने शपथ घेतली,"मी मुलांना कधीच जन्म देणार नाही. आता मी देऊही शकत नाही. आता तु समाधानी आहेस का?" शेवटी मच्छिमार हो म्हणाला. प्रत्येकजण म्हणाला,"एखाद्या पुरुषाने स्वतःवर करण्यातले हे सर्वात निष्ठूर कृत्य आहे." म्हणूनच त्याला भिष्म म्हणून ओळखले जाते, कारण कोणीही त्याला तसे करायला भरीस न पाडता देखील तो स्वतःशी खूपच निष्ठूर वागतो. आणि म्हणून शंतनु आणि सत्यवतीचा विवाह संपन्न झाला.

पहा पुढील भागात....