कल्पवृक्ष

आपण या पृथ्वीवर जे काही निर्माण केले ते प्रथम मनात निर्माण केले. माणसाने केलेले सर्व काही - उदात्त आणि घृणास्पद दोन्ही - ते प्रथम मनाने केले गेले, नंतर ते बाह्य जगात प्रकट केले. योग परंपरेत सुस्थापित व स्थिर मनाला कल्पवृक्ष असे म्हणतात. 'कल्पवृक्ष' म्हणजे इच्छा पूर्ण करणारे झाड.

जर तुम्ही तुमचे मन एखाद्या विशिष्ट स्तरावर सुस्थापित केले तर ते तुमची संपूर्ण व्यवस्था सुस्थापित करते - तुमचे शरीर, भावना आणि ऊर्जा, सर्व समान दिशेने सुस्थापित होतात. जर तसे झाले तर तुम्ही स्वतः 'कल्पवृक्ष' व्हाल. तुम्हाला जे पाहिजे आहे ते पूर्ण होते.

तुम्हाला काय पाहिजे याबद्दल सावधगिरी बाळगा!

योग कथांमध्ये एक सुंदर कथा आहे. एक माणूस फिरायला बाहेर आला आणि चालत असताना अचानक त्याने स्वर्ग गाठला. भरपूर वेळ चालण्यामुळे तो थोडा कंटाळला होता, "मला थोडावेळ विश्रांती घेता आली तर किती बरं होईल" अशी कल्पना आली. त्याला एक सुंदर झाड दिसले ज्याच्या खाली सुंदर मऊ गवत होते. तो तेथे गेला आणि झाडाखालील गवतावर झोपी गेला. काही तासांची विश्रांती घेतल्यानंतर तो उठला. मग त्याने विचार केला, "अरे, मला तर भूक लागली आहे. जर मला काही खायला मिळाले तर काय चांगले होईल". त्याला खाण्याची इच्छा असलेल्या अनेक चांगल्या गोष्टींचा त्याने विचार केला आणि त्या सर्व त्याच्या समोर आल्या. पोट भरल्यावर त्याला तहान लागली आणि "मला काही प्यायला मिळाल्यास काय चांगले होईल" असा विचार केला. जेव्हा त्याने काही चांगल्या पेय पदार्थांचा विचार केला तेव्हा ते सर्व त्याच्या समोर आले.

योगामध्ये मानवी मनाला 'मर्कट' म्हणजे माकड म्हटले गेले आहे, कारण त्यांचे मन भटकत राहते. 'माकड' हा शब्दही अनुकरण करण्यासाठी समानार्थी बनला आहे. जर आपण असे म्हणालो की कोणीतरी माकड झाले आहे, तर याचा अर्थ असा आहे की तो एखाद्याची नकल करत आहे. तुमचे मन पूर्ण वेळ हेच करत राहते. म्हणून, अस्थिर मनाला माकड म्हणतात.

 

प्रस्थापित मनाला कल्पवृक्ष असे म्हणतात. या मनामध्ये तुम्हाला जे हवे आहे ते वास्तव बनते.
 

स्वर्गात गेलेल्या व्यक्तीच्या आत जेव्हा हा माकड सक्रिय झाले, तेव्हा त्याला कल्पना आली, "येथे काय चालले आहे? मला पाहिजे असलेले अन्न मला खायला मिळाले, मला जे प्यायचे आहे ते प्यायला मिळाले! इथे नक्कीच कोणीतरी आहे का?" भुते आहेत! " हा विचार समजताच तेथे भुते आली. मग तो म्हणाला, "अहो, इथे खरोखर भूत आहेत, ते माझा छळ करतील!" म्हणून भुतांनी त्याला त्रास देणे सुरू केले. मग तो वेदनेने ओरडला आणि ओरडू लागला, "हे भूत मला त्रास देत आहेत, कदाचित ते मला मारतील!" आणि तो मरण पावला.

समस्या अशी होती की तो इच्छा पूर्ण करणाऱ्या कल्पवृक्षाखाली बसला होता. म्हणून जे काही गोष्टींची त्याने इच्छा दर्शवली ते पूर्ण झाले. तुम्ही तुमचे मन त्या प्रमाणात विकसित केले पाहिजे की ते कल्पवृक्ष होते, वेडेपणाचे स्रोत नाही. प्रस्थापित मनाला कल्पवृक्ष असे म्हणतात. या मनामध्ये तुम्हाला जे हवे आहे ते वास्तव बनते.

ड्रायव्हर सीटवर कोण आहे?

समजा तुम्ही गाडी चालवत आहात आणि अचानक स्टीयरिंग व्हील निघाले! बाकी सर्व काही ठीक आहे, गाडी क्रूझ कंट्रोल मध्ये आहे, त्याच वेगाने जात आहे पण स्टीयरिंग निघाले, तुम्ही तेथे शांतपणे बसू शकाल का? नाही, तुम्ही अस्वस्थ व्हाल. बहुतेक लोकांची ही स्थिती आहे कारण त्यांचे स्टीयरिंग त्यांच्या हातात नाही. जर तुमचे शरीर, मन आणि ऊर्जा तुमच्या नियंत्रणाखाली नसेल तर ते केवळ त्यांच्या मर्यादेनुसार कार्य करतील. जेव्हा ते त्यांच्या स्वत: च्या मार्गाने कार्य करतात तेव्हा कल्पवृक्ष ही खूप दूरची गोष्ट असेल.

पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही स्पष्ट असले पाहिजे? तुम्हाला काय पाहिजे हे तुम्हालाच माहित नसल्यास ते बनवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्हाला काय हवे आहे, प्रत्येक व्यक्तीला काय हवे आहे हे जर तुम्ही पाहिले तर त्याला आनंदाने आणि शांततेने जगायचे आहे. नात्यांबद्दल बोलताना प्रत्येकाची इच्छा असते की त्यांनी प्रेमळ आणि मायाळू व्हावे. दुसऱ्या शब्दांत, प्रत्येक माणूस आनंद शोधतोय - स्वतःमध्ये आणि त्याच्या सभोवताली देखील!

पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही स्पष्ट असले पाहिजे? तुम्हाला काय पाहिजे हे तुम्हालाच माहित नसल्यास ते बनवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

जर आपल्या शरीरात ही सुखद स्थिती निर्माण झाली तर आपण त्याला चांगले आरोग्य आणि आनंद म्हणतो. जर ते आपल्या मनात असेल तर आपण त्याला शांती आणि आनंद म्हणतो . जर आपल्या भावनांमध्ये हे घडत असेल तर आपण त्याला प्रेम आणि करुणा म्हणतो. जेव्हा ती आपल्या उर्जेमध्ये असते, तेव्हा आपण त्याला आनंद आणि परमानंद म्हणतो. माणसांना हेच हवे आहे. जेव्हा तो कामावर त्याच्या ऑफिसला जात असेल तेव्हा त्याला पैसे कमवायचे आहेत, व्यवसाय वाढवायचा आहे, कुटुंब चांगले चालवायचे आहे. जरी तो एखाद्या बारमध्ये किंवा मंदिरात बसला असेल, तरीही त्याला फक्त एकच गोष्ट पाहिजे आहे - आपल्यात आनंददायी अवस्था आणि आजूबाजूची सुखद स्थिती.

हे आनंदी वातावरण निर्माण करण्यासाठी तुम्हाला फक्त ते निर्माण करण्यासाठी स्वतःला वचनबद्ध करणे आवश्यक आहे. जर दररोज सकाळी तुम्ही तुमच्या मनात या सोप्या विचाराने दिवस सुरू कराल, "आज मी जेथे जेथे जाईन तेथे शांतिप्रिय, प्रेमळ आणि आनंदी जग निर्माण करीन", जरी तुम्ही दिवसातून शंभर वेळा पडलात, काय फरक पडतो त्याने? वचनबद्ध व्यक्तीसाठी अपयश असे काहीही नाही. तुम्ही शंभर वेळा पडल्यास, शंभर धडे शिकण्यास सक्षम असाल. तुम्ही तुमच्यासाठी ज्या गोष्टींची काळजी घेत आहात त्या करायला स्वत: ला वचनबद्ध असाल तर तुमचे मन सुस्थापित होते.

आकलन हे केवळ एक यंत्र नाही

अशी साधने आणि तंत्रे आहेत ज्याद्वारे या व्यवस्थेला अशा प्रकारे सुस्थापित केले जाऊ शकते की मानसिक गोंधळ होण्याऐवजी तुमचे मन एक कल्पवृक्ष बनले. तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षणी, या सृष्टीचा स्रोत जो आहे तो तुमच्या आत काम करत आहे. एकच प्रश्न आहे की तुम्ही त्या पैलूत पोहोचला आहात की नाही? तुमच्या जीवनाची चार मूलभूत तत्त्वे एकत्रित करून तुमची तिथे पोहोचू शकाल. संपूर्ण विज्ञान आणि तंत्र - ज्याला आपण योग म्हणून ओळखतो हे फक्त एवढ्याबद्दलच आहे- तुम्हाला सृष्टीचा एक तुकडा असण्यापासून सृष्टिकर्ता बनवणे.

उदाहरणार्थ, 100 वर्षांपूर्वी, मी मोबाईल फोनसारखे एखादे उपकरण उचलले आणि जगाच्या दुसर्‍या कोपऱ्यात बसलेल्या एखाद्याशी बोललो तर तुम्हाला चमत्कार झाल्यासारखे वाटले असते. मला एक देवदूत किंवा देवाचा पुत्र किंवा कदाचित देवासारखा समजले असते . परंतु आज हे एक साधन आहे जे आपल्यापैकी प्रत्येकाकडे आहे आणि वापरलेले आहे. आज मी जगाच्या इतर भागात बसून याचा वापर न करता बोललो तर ते तुमच्यासाठी चमत्कार ठरेल. हे उपकरण तयार केले जाऊ शकते कारण एखाद्या मानवी मनाला असे उपकरण बनविण्याची इच्छा होती. 100 वर्षांपूर्वी, हे कधीही शक्य होईल असे कोणालाही वाटले नव्हते. पण आज ती एक सामान्य वस्तू आहे. तशाच प्रकारे, बर्‍याच गोष्टी ज्या अजून आपल्या आकलनात नाहीत त्या आपल्या आकलनात आणल्या जाऊ शकतात आणि आपले आयुष्य बनवण्याची आपली क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविली जाऊ शकते.

तुम्ही सृष्टिकर्ता आहात 

एकदा तुमचे मन सुस्थापित झाल्यावर - तुमच्या जाणिवेनुसार तुम्ही विचार कराल - मग तुमच्या भावना देखील सुस्थापित होतील. एकदा तुमचे विचार आणि भावना सुस्थापित झाल्यावर, तुमची उर्जा देखील त्याच दिशेने सुस्थापित होईल. जेव्हा तुमचे विचार आणि तुमच्या भावना आणि ऊर्जा एकत्र केल्या जातात, तेव्हा तुमचे शरीर देखील सुस्थापित केले जाईल. जितक्या लवकर या चौघांना एकाच दिशेने केंद्रित कराल तितक्या लवकर तुम्हाला जे पाहिजे आहे ते बांधण्याची आणि प्रकट करण्याची तुमची क्षमता आश्चर्यकारक होईल.

तुम्ही तुमच्या जीवनाचे स्वरूप आत्ता पहावे अशी माझी इच्छा आहे. केळ खाल्ल्यास चार तासांत हे केळ माणूस बनते. तुमच्यात असे काहीतरी आहे - जीवन निर्माण करण्याची प्रक्रिया - यामुळे हे शरीर बनते. या शरीराचा निर्माता तुमच्या आत आहे. तुम्ही त्याला केळ द्या, तो माणूस बनवितो. केळापासून माणूस बनवणे ही लहान गोष्ट नाही. ही एक अप्रतिम घटना आहे. फक्त एकच गोष्ट आहे की ही अद्भुत घटना तुमच्यात अजाणपणे घडत आहे. जर तुम्ही केळ्यापासून मानव बनवण्याच्या प्रक्रियेला जाणीवपूर्वक प्रकट करू शकत असाल तर तुम्ही स्वत: निर्माता आहात. तुम्ही त्यापेक्षा काही कमी नाही.

उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार, माकडाला माणूस होण्यासाठी लाखो वर्षे लागली. तुम्ही एका दुपारमध्ये केळी, ब्रेड किंवा जे काही खाल्लं त्याचा माणूस बनवलात. तर निर्मितीचा मूळ स्त्रोतच तुमच्या आत कार्य करीत आहे. जर तुमचे मन, भावना, शरीर आणि ऊर्जा या चार पैलूंना एका दिशेने सुस्थापित केले तर सृष्टीचा स्रोत तुमच्या बरोबर असेल, तुम्ही निर्माता असाल. तुम्हाला जे बनवायचे आहे ते तुमच्यासाठी प्रयत्न न करता केले जाईल. एकदा तुम्ही अश्याप्रकारे सुस्थापित झालात तर मग तुमच्यात गोंधळ होणार नाही. तुम्ही कल्पवृक्ष आहात . तुम्हाला पाहिजे ते निर्माण करण्याची शक्ती तुमच्यात असेल.