लक्ष्मी मंचू: नमस्कार सदगुरू! आपल्या पालकांबरोबर असलेलं आपलं नातं आपल्या जीवनाला प्रभावित करतं का? जर प्रभावित होत असेल तर, आपण ते कशा प्रकारे जोपासावं?

सदगुरू: नमस्कार लक्ष्मी! योग विज्ञानामधे आपण जसं जीवनाकडे पाहतो, आपण मानवी जीवनाला एक पुर्ण चक्र
म्हणून बघतो, जर एखादं कोणी ८४ वर्षांपर्यंत जगलं तर. या जीवनाच्या चक्रामध्ये ज्यात चंद्राची १००८ पेक्षा जरा जास्त चक्रांचा समावेश आहे, पहिल्या चतुर्थांशात पालकांचा आपल्यावर उर्जात्मक प्रभाव असतो. कर्माच्या प्रभावाबद्दल, फक्त २१ वर्षाच्या पर्यंतच पालक आपल्याला प्रभावित करू शकतात. त्यानंतर आपण त्यांच्याद्वारे प्रभावित व्हायचं नसतं. पण जे ही त्यांनी केलंय, पहिलं तर त्यांनी आपल्याला या जगात
आणलंय, आणि खूप गोष्टी ज्या त्यांनी प्रेमानं आणि सहभागानं केल्या आहेत. आपण त्या कृतज्ञतेत जगू शकतो.

 

एकविसाव्या वर्षानंतर, एखाद्यानं त्याच्या वंशाच्या पॅटर्न ने प्रभावित व्हायला नको. कारण सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की हे एक नवीन जीवन आहे. हे गेल्या पिढीत घडलेल्याची पुनरावृत्ती असायला नको. तर, जास्तीत जास्त एकवीस वर्षांपर्यंत, कर्माचा प्रभाव नक्कीच असतो जो सर्वांना प्रभावित करतो. पण एकवीस वर्षांनंतर अस काहीच नाहिये. ती शुद्ध मानसिक गरज असू शकते किंवा आर्थिक आणि ……अनेक
लोकांसाठी सामाजिक. पण मुळात एकविसव्या वर्षी हे बंधन तुटतं. पण त्यानंतर, तो नात्यांचा बंध असतो, प्रेमाचा, कृतज्ञतेचा, ह्या गोष्टी कायमसाठी राहू शकतात. तर, आपण एकविस वर्षांनंतर पालकांच्या संगोपनाची अपेक्षा ठेवू नये. आपण फक्त त्यांनी जे काही केलंय
त्याबद्दल कृतज्ञता बाळगू शकतो.

संपादकीय टीप: कुठल्या वादग्रस्त मुद्द्याबाबत जर तुमच्या मनात वादळ उठत असेल, कुणीच ज्या बाबत बोलत नाही अश्या कुठल्या गोष्टीबद्दल जर तुम्ही गोंधळलेले असाल, किंवा असा कुठला प्रश्न तुमच्या मनाला सतावत आहे ज्याचं उत्तर कुणाकडेही नाही, तर हीच संधी आहे! सद्गुरूंना आपले प्रश्न विचारा, UnplugWithSadhguru.org वर.

Youth and Truth Banner Image