मृत्यूची भीती का आहे? –डेथ- एनइनसाइडस्टोरी (मृत्यू: एक आंतरीक कथा या पुस्तकातील एक उतारा)

सद्गुरू: जगात बऱ्याच ठिकाणी, मुलांनाघरात "मृत्यू" हा शब्द देखील उच्चारू नका असे सांगितले जाते, कारण त्यांची वेडगळ समजूत असते की तुम्ही हा शब्द उच्चारला नाही तर मृत्यू घरात प्रवेश करणार नाही. मृत्यूची ही विकृत भीती स्वाभाविक नाही. बहुसंख्य लोकांनी याची सदस्यता घेतली आहे, ती गोष्ट वेगळी. परंतु भीती ही नैसर्गिक प्रक्रिया नाही. मृत्यू ही नैसर्गिक क्रिया आहे. जर जीवन असेल तर मृत्यू स्वाभाविक आहे. एखाद्या नैसर्गिक गोष्टीची भीती बाळगणे अस्वाभाविक आहे. फक्त आपण जीवनाची सत्यता न समजल्यामुळे मृत्यूची भीती वाटते. मृत्यूचीभीती आपल्यात निर्माण झाली आहे कारण आपली ह्या आपल्या शरीराशी खोलवर ओळख रुजली आहे. या शरीराशी आपली ओळख इतकी मजबूत झाली आहे की आपण इतर परिमाणांचा शोधच घेतला नाही. जर आपण अनुभवाच्या इतर परिमाणांचा शोध घेतला असता, जर आपण स्वत: ला इतर अनुभवांच्या परिमाणांमध्ये प्रस्थापित केले असते तर शरीर हा इतका मोठा मुद्दा बनला नसता. 

जिथे जीवन आहे तिथे मृत्यू असणे हे स्वाभाविक आहे. एखाद्या नैसर्गिक गोष्टीची भीती बाळगणे हे अस्वाभाविक आहे.

तुम्ही तुमच्या शरीराबद्दल असे बोलता जणूकाही तुम्ही शरीरासोबत इथे आलेलेआहात. नाही. तुम्ही फक्त ते साठवलं आहे. तुम्ही तुमच्या आईच्या गर्भात असताना साठवायला सुरुवात केली आणि तुमच्या जन्मानंतर ते साठवतच राहिलात. आपण जे काही साठवतो त्याला आपलं म्हणू शकतो, अर्थात “ते माझे आहे.” असे म्हणू शकतो. पण त्याला “मी” असे म्हणून शकत नाही. आता, मी ज्या पेल्यातून पाणी पितो तो घेतला आणि म्हटलं “हा माझा पेला आहे,” तर तुम्ही म्हणाल “सद्गुरुंना काही समस्या आहे असे वाटते”. तरी हरकत नाही, मला जरा अजून ऐकू दे, कारण सगळेच म्हणतात ते ज्ञानी आहेत.” परंतु काही वेळानंतर, मी म्हटलं, “तो पेला मी आहे,” तर निश्चितच तुम्ही म्हणाल, “मला या व्यक्तीपासून दूर जाऊ द्या.” परंतु तुम्ही तुमच्या शरीराबरोबर तेच तर करतआहात, म्हणूनच तुम्ही ते सोडण्याबद्दल इतका मोठा घोळ निर्माण करता.

समजा पुढच्या काही आठवड्यांत वजन वाढवून तुम्ही शरीरयष्टी कमावली आणि नंतर त्यातील काही वजन घटवले तर तुम्ही याला मृत्यू म्हणत नाही. तुम्ही काहीतरी साठवलं आणि ते परत केले. तुमच्यासाठी ही काही मोठी गोष्ट नाही. तुम्ही त्याबद्दल दु:खी न होता, आनंदी आणि निश्चिन्त राहाल. मृत्यूच्या बाबतीतही तसेच असले पाहिजे. तुम्हाला मृत्यू म्हणून जे माहित आहे ते केवळ थोडेसे शुद्धीकरण आहे. वयानुसार, देह आपला जोम कमी करू लागतो, म्हणून ते शुद्ध करणे आवश्यक असते. एकतर तुम्ही जे संचित केले ते आनंदाने परत करता किंवा रडत परत करता. तुमच्याकडे ही एक निवड आहे. मृत्यू म्हणजे असं आहे; जसं तुम्ही फावड्यामध्ये माती उचलली आणि परत टाकली. परंतु, जर तुम्ही या फावड्यामधील मातीकडे पाहिले आणि मातीशी जोडले गेलात झालात तर, फावड्यामधील माती खाली पडल्यावर तुम्ही लहान मुलासारखे रडाल. हे एखाद्या लहान मुलासारखे आहे, ज्याने कुठूनतरी छोटा दगड उचलला, घरी आणून तो गमावला. आणि तो अत्यंत दु:खी आहे. तो सांत्वन करण्यापलीकडे रडतो आहे. जर तुम्हाला जे काही माहित आहे ते फक्त शरीरचं असेल तर तुमच्या बाबतीतही असेच होईल. परंतु जर तुम्हाला तुमच्या जीवनात अशी एखादी गोष्ट माहित असेल जी शरीराबाहेर आहे तर शरीर सोडणे तुमच्यासाठी मोठी गोष्ट ठरणार नाही.

मृत्यू भितीदायक नाही

आपण भारतात मृत्यू कसा समजून घेतला आणि त्याचे चित्रण कसे केलेले आहे हे पाहिले तर आपल्याला दिसेल की मृत्यूला भितीदायक म्हणून पाहिले जात नाही. मृत्यूबद्दल असलेली भितीदायक गोष्ट म्हणजे जिवंत माणसांना गमावणे होय. जर लोकांची मौल्यवान गोष्ट गमावली - ती वस्तू असू शकते,लोकं असू शकतात - तर ते कोलमडतील. हा फक्त जिवंत लोकांसाठी अंधार आहे, परंतु मृत्यूला नेहमीच या संस्कृतीत एक भव्य घटना म्हणून दर्शविले गेले आहे. फक्त आजकाल भारतीय लोक पाश्चात्यांचे अनुकरण करत आहेत आणि कुणीतरी मरण पावल्यावर मान खाली करून चालत आहेत.

आणि यावर भर म्हणून अनेक आश्चर्यकारक कथा आहेत. आख्यायिका अशी आहे की शिवाने स्मशानासच आपले भौतिक निवासस्थान बनवले आहे आणि तिथे तो वाट पहात आहे. प्रत्येक वेळी जेव्हा कुणाचा मृत्यू होतो तेव्हा तो उत्सवाप्रमाणे नाचतो. किती विकृत माणूस आहे हा जो माझ्या प्रिय व्यक्तीचा मृत्यूमुळे नाचतो आणि उत्सव साजरा करतो?

चला आपण जीवनाचे मूलभूत पैलू पाहूया. अधिकांश माणसांच्या अनुभवात आयुष्य म्हणजे फक्त त्यांचे शरीर, त्यांचे विचार आणि त्यांच्या भावना असतात. आपण आपल्या आयुष्याच्या स्वरूपाकडे थोडे लक्ष दिल्यास हे स्पष्टपणे पाहू शकतो की शरीर आणि मन दोन्ही संचित गोष्टी आहेत. या संचया पलीकडे जीवन आहे.

साबणाचे फुगे

याचे उत्तम उदाहरण म्हणजे - जेव्हा तुम्ही लहान होतात आणि तुम्ही साबणाचा फुगा फुगवला तेव्हा तो फुगा वास्तविक होता, परंतु फुग्याच्या आत जे वातावरण होते तेच सर्वत्र आहे. जेव्हा फुगा फुटला तेव्हा साबणाच्या पाण्याचा एक थेंब फरशीवर पडला, परंतु त्या फुग्याच्या आत जे होतं ते कुठे गेलं हे तुम्ही कधीच पाहू शकला नाही कारण जे सर्वकाही आहे त्याचाच ते भाग आहे.

हे जीवनाचे स्वरूप आहे. संपूर्ण विश्व हे जीवनाचे एक जिवंत वस्तुमान आहे. जेव्हा फुगा फुटतो आणि ही हवा किंवा फुग्यामध्ये अडकलेले हे जीवन मुक्त होते, तेव्हा दुसर्‍या बाजूस जे काही घडते, ते भौतिकतेच्या चौकटीत जे घडते त्यापेक्षा खूप मोठे आहे. शिव हसत आहे, गात आहे आणि नाचत आहे कारण नश्वर चक्रातून एक जीवन मुक्त झाले आहे म्हणून.

मृत्यूची भीती - एक सामाजिक अट

प्रसून जोशी: एकदा आमच्या कुटुंबात मृत्यू झाला आणि मी तिथे गेलो. तिथे एक मूल खेळत होते आणि ते मृतदेह ओलांडून गेले, जणू काही ते तिथे पडलेली वस्तू आहे. लोकांनी त्याला बाजूला खेचले, परंतु मुलाला त्याचे कारण कळले नाही. मृत्यूची भीती ही एक सशर्त क्रिया आहे का? कोणीतरी इतक्या मोठा प्रसंग किंवा आपत्ती मधून गेला आहे ही वस्तुस्थिती आपल्या लक्षात आली पाहिजे असे आपल्या मनात बिंबवले गेले आहे का?

सद्गुरू: मृत्यूला दुःखद घटनेच्या रूपात पाहिले जाणे शारीरिक, मानसिक, भावनिकआणि सामाजिक दृष्टीने वास्तव आहे, अस्तित्त्वाच्या दृष्टीने नाही. मूल हे जीवनाचे अपत्य आहे - ते अद्याप सामाजिक जडणघडणीत गुरफटले गेलेले नाही. ते मृतदेहाबरोबर अगदी खेळूही शकेल; काही फरक पडणार नाही. परंतु प्रौढांना हे अयोग्य वाटत असल्याने ते मुलावर जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतील. जेव्हा त्यांच्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा बहुतेक लोकांना असे वाटते की हा जगाचा अंत आहे. परंतु थोड्या वेळाने ते सावरतात.

मुलांमध्ये हा अवधी नसतो - ते पटकन सावरतात, कारण समाजात जे घडत आहे त्याचा त्यांच्यावर कमी प्रभाव पडतो. समाज मृत्यू कशा प्रकारे हाताळतो याला पूर्णपणे मानसिक आणि भावनिक आधार असतो, याचा अर्थ असा आहे की तो आपण बनवला आहे- आपण ज्या प्रकारे इच्छितो त्या प्रकारे तो बनवू शकतो. कदाचित तथाकथित सुशिक्षित लोकांनी ते सोडून दिले असेल, परंतु अन्यथा, जर कोणी या देशात मरण पावला तर ते ढोल वाजवतील आणि मेजवानी करतील. मी कोणाचे दुःख कमी लेखण्याचा प्रयत्न करीत नाही. परंतु सर्व मानसिक घटक - तुमचे विचार, तुमच्या भावना, तुमची सामाजिक मते आणि परिस्थिती - केवळ काही मर्यादेपर्यंत संबंधित आहेत. अस्तित्त्वात, तुम्ही काय विचार करता, तुम्हाला काय वाटते, तुमचा समाज काय विचार करतो, हे अगदी अप्रासंगिक आहे. म्हणूनच आपण नेहमी शिव, ज्याला आपण सर्वोच्च मानतो, त्याला समाजाच्या सीमेवर स्थान देतो. तो नेहमी स्मशानभूमीवर असतो.

हे नश्वर चक्र

प्रत्येक योगी अशा प्रकारे आपल्या जीवनाची सुरुवात करतो. वयाच्या आठ ते सतरा वर्षांपर्यंत मी स्मशानभूमीत बराच वेळ घालवला- स्मशानभूमीने मला पूर्णपणे आकर्षित केले. मी तिथे फक्त बसून रहायचो. लोक येऊन मृतदेहाला अग्नी देत असत. तुम्हाला माहित आहे की सरपण खूप महाग असतं, म्हणून काही लोकांना लाकडाची बचत करायची असते. मला माहित नाही की तुमच्यातील कोणी हे पाहिले आहे की नाही - जेव्हा मृतदेह दहन करतात तेव्हा सर्वात आधी मान जळते, आणि जर त्यांनी भरपूर लाकडं जमा केली नसतील तर नेहमी, अर्धवट जळलेली कवटी जमिनीवर घरंगळत जायची. हे साडेतीन ते चार तासांनंतर घडते. तोपर्यंत, कोणताही नातेवाईक तेथे नसायचा - ते सर्व एक किंवा दोन तासांनी परत जातात. मी कवट्या उचलून पुन्हा चितेवर ठेवायचो.

तुम्ही नश्वर आहात हे समजल्यावरच, त्यापलीकडे काय आहे हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा निर्माण होईल.

सगळेजणं कितीतरी गोष्टी सांगतात - मला स्वतः ते पहायचे होते. मी स्मशानभूमीत कितीतरी दिवस आणि रात्र घालवले, का हे माहित नसताना देखील. आज आम्ही, जे लोक गंभीरपणे आध्यात्मिक मार्गावर आहेत त्यांना स्मशानभूमीत काही वेळ घालवण्यासाठी पाठवितो, कारण नश्वरता तुमच्यामध्ये भिनली पाहिजे. तुम्ही तुमच्या जीवनाचे मूलभूत स्वरूप समजून घेतले पाहिजे. तुम्ही नश्वर आहात हे समजल्यावरच, त्यापलीकडे काय आहे हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा निर्माण होईल.

मृत्यू- आत्मज्ञानाचे एक प्रवेशद्वार

शेवटच्या क्षणाची गुणवत्ता तुमच्या पुढच्या जन्मांची एक प्रमुख गुणवत्ता असेल - जर तुम्हाला पुढील जन्म हवा असेल तर. जर तुम्हाला परम तत्वामध्ये विलीन व्हायचं असेल, जर तुम्ही परमतत्वाशी एकरूप होऊ इच्छित असाल, तर मग तुम्हाला कोणताही पुढील जन्म नाही. जर तुम्ही या क्षणात तुमची जागरूकता टिकवून ठेवू शकत असाल तर तुम्ही जीवनातील एका परिमाणातून दुसऱ्यात जात आहात, भौतिकतेच्या पलीकडे, तीच मुक्ति किंवा मोक्ष आहे. तुम्ही ती प्राप्त करू शकता. लोक मला सांगत आलेत, “आम्ही विलीन होणार आणि शून्य होणार आहोत? सद्गुरू, ही नकारात्मक परिभाषा वापरू नका - यामुळे आम्हाला भीती वाटते. ” त्याऐवजी आपण असे म्हणू शकतो, “तुम्ही मुक्ति प्राप्त केल्यावर, तुम्ही सर्वकाही व्हाल.”

जर तुम्ही या क्षणात तुमची जागरूकता टिकवून ठेवू शकत असाल तर तुम्ही जीवनातील एका परिमाणातून दुसऱ्यात जात आहात, भौतिकतेच्या पलीकडे, तीच मुक्ति किंवा मोक्ष आहे.

शरीर हे एक कर्ज आहे जे तुम्ही धरणीमातेकडून घेतले आहे. जर तुम्ही ह्याला पवित्र जीवनात बदलले असेल, जर तुम्ही खरोखरच ते पूर्णपणे वापरात आणले असेल आणि तुम्ही तुमच्यातल्या गोडव्यामधून जगलात तर, जेव्हा धरणीमाता असे म्हणते की कर्जाची परतफेड करण्याची वेळ आली आहे, तेव्हा तुम्ही त्याची आनंदाने परतफेड कराल. आणि त्यावर व्याज नसते. जो आनंदाने कर्जाची परतफेड करतो, त्याच्यासाठी सगळे संपते, कारण जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा जागरूक असणे स्वाभाविकपणे येतेच. जेव्हा तुम्ही जागरूक असता, तेव्हा तुम्ही मुक्तीच्या मार्गावर असता.

Death-Book-Banner