देवयानी आणि शर्मिष्ठा

सद्गुरु: देवयानीची त्या प्रांताच्या असुर राजा वृषपर्वाची कन्या- शर्मिष्ठा हिच्याशी घनिष्ट मैत्री होती. एक विशिष्ट घटना घडली जी एक प्रकारे कुरु घराण्याचे मूळ बनली. दोन्ही तरुण मुली आंघोळीसाठी नदीवर गेल्या. शर्मिष्ठा ही एक असुर राजकन्या होती, देवयानी शुक्राचार्य या पुजारींची मुलगी होती. याचा अर्थ ती ब्राह्मण कुळातील होती, जे त्या काळात सामाजिक गटांमध्ये सर्वोच्च मानले जात असे. म्हणूनच आंघोळीसाठी गेल्यावर दोन्ही मुलींनी आपले कपडे आणि दागदागिने वेगळे ठेवले.

महाभारताच्या संपूर्ण कथेमध्ये शाप आणि वरदान आहेत. परंतु शाप हे वरदान आहे की वरदान हे शाप आहे हे तुम्हाला ठाऊक नाही कारण जीवनाची गोष्टी मिसळण्याची स्वतःची पद्धत आहे.

त्या नदीत खेळत असताना,त्यांचे कपडे मोठ्या वाऱ्याच्या झुळुकीबरोबर उडाले आणि मिसळले गेले. जेव्हा दोघी जणी नदीतून बाहेर आल्या तेव्हा साहजिकच घाईघाईने शर्मिष्ठेने चुकून देवयानीचे काही कपडे घातले. मग काही प्रमाणात चेष्टेमध्ये व तिचे श्रेष्ठत्व स्थापित करण्यासाठी देवयानी म्हणाली, “तू तुझ्या वडिलांच्या गुरुच्या कन्येचे कपडे कसे घातले आहेस? कसे वाटत आहे? आणि हे कसे योग्य आहे?”

शर्मिष्ठेला चूक लक्षात आली. पण राजकन्या असल्याने रागाच्या भरात ती म्हणाली, “तुझे वडील भिकारी आहेत. माझ्या वडिलांसमोर ते नेहमी खाली वाकतात. माझे वडिल जे काही देतात, त्यावर तुम्ही जगता. तू आपले स्थान लक्षात ठेवलस तर चांगले होईल." आणि तिने तिला एका खड्ड्यात ढकलले. देवयानी खाली पडली. शर्मिष्ठेने तिला तिथेच सोडले आणि रागाच्या भरात निघून गेली.

देवयानी जेव्हा घरी परतली, तेव्हा तिने तिच्या वडिलांच्या मांडीवर डोकं ठेवले आणि सूड घेण्यासाठी रडत म्हणाली, “तुम्हाला या राजकन्येला धडा शिकवावा लागेल.” आपल्या मुलीचा अपमान केल्याबद्दल शुक्राचार्य यांनी राजकन्या आपल्या मुलीची दासी व्हावी अशी मागणी केली. राजाला कोणताही पर्याय नव्हता कारण मृतांना पुन्हा जिवंत करू शकणाऱ्या शुक्राचार्यांशिवाय तो हरला असता.

देवयानीने आधीच शर्मिष्ठेवर सूड उगवला होता आणि ते तिथेच थांबवलं पाहिजे होते, पण तिला अजून थोडा त्रास द्यायचा होता.

महाभारताच्या संपूर्ण कथेमध्ये शाप आणि वरदान आहेत. परंतु शाप हे वरदान आहे की वरदान हे शाप आहे हे तुम्हाला कळत नाही कारण जीवनाची गोष्टी मिसळण्याची स्वतःची पद्धत आहे. शाप एक वरदान बनते - वरदान एक शाप बनते. तर शर्मिष्ठेला देवयानीची दासी असल्याचा शाप देण्यात आला. त्यानंतर देवयानीचे लग्न ययातिशी होते. तिने आग्रह धरला की शर्मिष्ठेने तिच्या नवीन घरी तिची वैयक्तिक दासी म्हणून बरोबर यावे.

देवयानीने आधीच शर्मिष्ठेवर सूड उगवला होता आणि ते तिथेच थांबवलं पाहिजे होते, पण तिला अजून थोडा त्रास द्यायचा होता. त्यामुळे लग्नानंतर शर्मिष्ठा दासी म्हणून तिच्याबरोबर आली. ययाति आणि देवयानी पती व पत्नी म्हणून एकत्र राहत असत आणि त्यांना एक मुलगा झाला ज्याचे नाव यदु. यादव हे यदुकुलातून आले आहेत.

शर्मिष्ठा देवयानीची दासी असली तरी ती एक राजकन्येप्रमाणे विशिष्ट सन्मानाने वागायची. तिने स्वत:ला देवयानीपेक्षा अधिक आकर्षक बनविले. अपरिहार्याने, ययाति तिच्या प्रेमात पडले. एक प्रेम प्रकरण सुरू झाले आणि त्यांना एक मूलही झाले. ते मूल पुरु होते, जे कुरु घराण्याच्या पूर्वाजांपैकी एक होते.

महाभारत भाग: 3 शाप की वरदान?

जेव्हा शुक्राचार्य यांना समजले की ययातीने आपल्या मुलीचा विश्वासघात केला आहे आणि त्याला दासीपासून एक मूल आहे, तेव्हा त्यांनी त्याला शाप दिला: “तू तुझे तारुण्य गमावशील.” ययाती म्हातारा झाला.

ययातीचा पहिला मुलगा म्हणून यदु राजा होणे आवश्यक होते, परंतु एका चुकीच्या कृत्यामुळे ते घडले नाही. जेव्हा शुक्राचार्य यांना समजले की ययातीने आपल्या मुलीचा विश्वासघात केला आहे आणि त्याला दासीपासून एक मूल आहे, तेव्हा त्यांनी त्याला शाप दिला: “तू तुझे तारुण्य गमावशील.” ययाती म्हातारा झाला.

तो ही गोष्ट स्वीकारू शकला नाही. जेव्हा यदु मोठा झाला आणि तो तारुण्यात आला, तेव्हा ययातिने त्याला विचारले, “मला तुझे तारुण्य दे आणि मला काही वर्ष त्याचा आनंद घेऊ दे. मग मी ते तुला परत देईन. ” यदु म्हणाला, “काही गरज नाही. आधी तू माझ्या आईची फसवणूक केलीस. आता तुला माझे तारुण्य घेऊन माझी फसवणूक करायची आहे. नाही. ” त्यानंतर ययाती यांनी यदुला शाप दिला: "तू कधीही राजा बनणार नाहीस."

ययातीचा दुसरा मुलगा पुरू, ज्याला शर्मिष्ठेने जन्म दिला होता, त्याने वडिलांना स्वेच्छेने स्वत:चे तारुण्य देण्याची तयारी दर्शवली, “बाबा, तारुण्याचा आनंद घ्या. याला माझ्यालेखी काहीही अर्थ नाही. ” ययाति पुन्हा तरूण झाला आणि काही काळ तो तरूण म्हणून जगला. जेव्हा त्याला वाटले की आपण हे पुरेपुर उपभोगले आहे, तेव्हा त्याने आपला मुलगा पुरु याला तारुण्य परत दिले आणि त्याला राजा बनवले.

पुढील भागात...