सद्गुरू चार युगांच्या चक्रामागील विज्ञान समजावून सांगतात आणि कुरुक्षेत्राच्या युद्धानंतर कलियुगाच्या प्रारंभापासून कालगणना करतात.

आकाश आणि मानवी शरीरातील कालचक्र

Sadhguru: सद्गुरु: योगिक खगोलशास्त्रात, सूर्याभोवतालच्या पृथ्वीच्या कक्षेला २७ विभागात विभागले गेले आहे, ह्याला नक्षत्र असे म्हणतात . प्रत्येक नक्षत्र पुढे चार समान क्षेत्रात विभागले गेले आहे ज्याला पद किंवा चरण म्हणतात. ४ गुणिले २७ चे उत्तर १०८ येते. ही १०८ एकके पृथ्वीने अवकाशात घेतलेल्या १०८ चरणांची नोंद करतात. प्रत्येक नक्षत्र चंद्राच्या पृथ्वीभोवतालच्या अर्ध्या परिभ्रमणाशी संबंधित आहे. मानवी शरीरातील चक्र ह्या परिभ्रमणाशी जोडलेली असतात.

नक्षत्र आणि पद

नक्षत्र आणि पद

स्त्रीच्या शरीरात, ती संपूर्णतः निरोगी असल्यास २७.५५ दिवसांची स्पष्ट चक्रे असतात. पुरुषाच्या शरीरात, चक्र स्पष्ट आणि निश्चित नसतात - ती वेगळ्या मार्गाने घडतात आणि त्यांचा कालावधी जास्त असतो. कोणत्याही परिस्थितीत ही चक्र सौर यंत्रणा आणि ब्रह्मांडामध्ये सर्व वेळ कार्यरत असतात. सूक्ष्म प्रतिकृती आणि अफाट चराचर दोघेही समान खेळ खेळत आहेत. पण कोणी कोणाचा खेळ खेळायचा? संपूर्ण सृष्टी आपला खेळ खेळत आहे असे आपल्याला वाटत असेल तर, आपण आपले जीवन वाया घालवाल. आपण सृष्टीच्या खेळात सामील झालात तर आपले आयुष्य आपल्या अपेक्षेच्या पलीकडे जाईल.

चार युगांचे कालचक्र

पृथ्वीचा अक्ष राशीच्या एका संपूर्ण चक्रातून जाण्यासाठी लागणाऱ्या कालावधीत विषुववृत्त आपल्या पूर्वस्थितीत (पृथ्वीच्या अक्षाच्या हळूहळू फिरण्यामुळे) येते. राशीच्या एका अंशातून जाण्याकरिता या ग्रहाला ७२ वर्षे आणि ३६० अंशांचे एक वर्तुळ पूर्ण करण्यासाठी २५,९२० वर्षे लागतात. अर्ध्या प्रवासाला १२,९६० वर्षे लागतात आणि यात चार युगांचा समावेश आहे. सत्य युग ५१८४ वर्षे असते. त्रेता युग ३८८८ वर्षे राहते. द्वापार युग २५९२ वर्षांचं आहे. कलियुग १२९६ वर्षे टिकते. चार युगांचा कालावधी एकत्रित केल्यावर एकूण १२,९६० वर्षे भरतात.

कलियुग कधी सुरू झाले?

महाभारतची कथा एका विशिष्ट संदर्भात पाहण्याची गरज आहे. इ.स.पू. ३१४० मध्ये कुरुक्षेत्र युद्धाचा अंत झाला आणि ई.स.पू. ३१०२ कृष्णाने त्याचा देह सोडला. युद्धानंतर तीन ते चार महिन्यात कलियुग सुरू झाले. सन २०१२ पर्यंत, कृष्णाचा कालखंड ५,११४ वर्षांपूर्वी संपला. जर आपण अक्षीय पूर्वस्थितीचे वर्णन करणार्‍या दीर्घवृत्ताच्या तळाशी असलेल्या दोन कलियुगातील वर्षांची एकत्रित संख्या म्हणजे २५९२ वजा केल्यास आपण २५२२ वर्षांवर पोहोचू. याचा अर्थ असा आहे की आपण द्वापार युगाची २५२२ वर्षे आधीच पूर्ण केली आहेत आणि त्याचा संपूर्ण कालावधी २५९२ वर्षे आहे, म्हणून अद्याप ते पूर्ण होईपर्यंत 70 वर्षे बाकी आहेत. सन २०८२ मध्ये, आपण द्वापार युग पूर्ण करू आणि त्रेता युगात जाऊ. मानवी चेतनेच्या कल्याणकारी आणि ऊर्ध्वगामी चळवळीच्या या नवीन युगाकडे जाण्यापूर्वी, जरुरी नाही की जग युद्ध परिस्थितीतून जाईल तर लोकसंख्येचा विस्फोट आणि नैसर्गिक आपत्ती अशा उलथापालथातून जाईल.

युग आणि मानवी चेतना

युगांचे कालचक्र

 
सूर्यासह सौर यंत्रणा आणि त्याच्या सभोवतालचे ग्रह आकाशगंगेमध्ये फिरत आहेत. आपल्या सौर यंत्रणेला मोठ्या ताऱ्याभोवती एक चक्र पूर्ण होण्यासाठी २५,९२० वर्षे लागतात. ग्रहावरील दुष्परिणामांवरून, आपला विश्वास आहे की ही मोठा तारा किंवा मोठी प्रणाली जीच्या भोवती आपली यंत्रणा फिरत आहे ती कक्षाच्या मध्यभागी नसून कुठेतरी बाजूला आहे. जेव्हा जेव्हा आपली सौर यंत्रणा या मोठ्या प्रणालीच्या जवळ येते तेव्हा आपल्या रचनेमध्ये राहणारे सर्व प्राण्यांच्या पातळीमध्ये वाढ होण्याची अधिक शक्यता निर्माण होते. जेव्हा जेव्हा आपली यंत्रणा त्यापासून दूर जाते तेव्हा आपल्या रचनेमध्ये राहणारे प्राणी शक्यतेच्या निम्न पातळीवर येतात - ह्यालाच आपण कलियुग असे म्हणतो.

जेव्हा आपली सौर यंत्रणा भव्य अशा ताऱ्याच्या (“सुपर सन”) जवळ असेल तेव्हा सत्य युग सुरू होईल. मानवी मन त्याच्या सर्वोच्च क्षमतेवर असेल. लोकांचे जीवन जाणून घेण्याची क्षमता, लोकांमध्ये संवाद साधण्याची क्षमता, लोकांची आनंदाने जगण्याची क्षमता सर्वात उच्च असेल. किंवा दुसर्‍या शब्दांत सांगायचे तर आपल्याकडे समजूतदार लोक असतील. या ग्रहावर चांगले जगण्यासाठी फक्त शहाण्या लोकांचा समूह असणे आवश्यक आहे.

सत्य युगात, संवाद साधण्याची मानवी क्षमता सर्वोत्कृष्ट असेल कारण आकाश (ether) अगदी जवळ असेल. आत्ता, ग्रहाचा आंतरिक्ष गोल एका विशिष्ट पातळीपर्यंत उंचावला गेला आहे. एक काळ होता जेव्हा तो खूपच जास्त होता - आता पुन्हा तो जरा जवळ आला आहे. जेव्हा आकाश खूप जवळ असेल आणि मला तुम्हाला काही सांगायचं असेल तेव्हा मला ते सांगावं लागणार नाही. माझे डोळे बंद असले तरीही मला काय म्हणायचे आहे ते आपणास कळेल. जेव्हा आकाशाचा उदय झाला आहे परंतु ते अद्याप काही अंतरांवर आहे, तेव्हा मी माझे डोळे बंद केले तर तुम्हाला कळणार नाही, परंतु जर मी माझे डोळे उघडले व तुमच्याकडे पाहिले तर तुम्हाला कळेल की मला काय सांगायचे आहे.

आकाश आणि अध्यात्मिक संभाव्यता

जर आकाश अधिक उदयाला पावले तर आपण ते श्वासोच्छवासानेसुद्धा जाणू शकता. जर आपण जंगलात गेलात, कारण आपली दृष्टी काही प्रमाणात अवरोधित झालेली असते, काही काळानंतर, गोष्टी जाणून घेण्याचा सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे वास आहे हे आपल्या लक्षात येईल. तेथे राहणारे बहुतेक प्राणी फक्त वासाने गोष्टी जाणतात. अशा एकाग्र जीवनामुळे, आकाश तत्व उच्चस्थितीला पोचलेले असते. आकाश तत्व जास्त असल्यामुळे, त्यांना पहाण्याची गरज पडत नाही. जर आपण बोललात तर ते गोंधळून जातील. जेव्हा आकाश तत्व खूप कमी असते, तेथे आपण नेहमीच बोलले पाहिजे - अन्यथा, लोकांना कळणार नाही. आपण बोललात तरी त्यांना कळणार नाही. त्यांना कळण्यासाठी फटके देणे आणि सतत बोलणे आवश्यक आहे. आपण आपल्या संवादाच्या बाबतीत किती संवेदनशील आहात हे वातावरणात आकाश तत्व किती प्रमाणात आहे ते निर्धारित करते.

त्याच वेळी, कोणती वेळ, कोणतं युग, आपण सध्या कोणत्या ग्रह स्थितीत आहोत हे काहीही असलं तरी, एक व्यक्ती या सर्वांच्या वर येऊ शकते. वैयक्तिकरीत्या मनुष्य स्वत: मध्ये सुवर्णकाळात जगू शकतो. अगदी सर्वात वाईट काळातही, त्यापेक्षा वरचढ किंवा चांगले असण्याची शक्यता स्वतंत्र व्यक्तीसाठी नेहमीच उपलब्ध असते.

आकाश तत्व वाढविण्यासाठी किंवा आकाश सामग्री तयार करण्यासाठी आपण करु शकू अशा बर्‍याच गोष्टी आहेत. म्हणूनच कृष्णाने म्हटलं आहे, कलियुगात जे भव्य ताऱ्यापासून खूप दूर आहे, आकाश तत्व इतकं कमी होईल की त्यांना योग, ध्यान, मंत्र किंवा यंत्र शिकवण्यात काही अर्थ नाही - त्यांना ते कळणार नाही. त्यांना फक्त भक्ती शिकवा. जर ते धर्मनिष्ठ असतील तर ते स्वतःचे आकाश तत्व उत्त्पन्न करतील. आणि वातावरणातील या आकाश तत्त्वामुळे, त्यांना आकलन होईल. मूर्खांसाठी भक्ती नाही - परंतु आपण मूर्खातले मुर्ख असल्यास देखील, आपण ते मिळवू शकता.

हजारो वर्षांपूर्वी ते म्हणाले होते की, सौर यंत्रणा भव्य/मोठ्या सूर्याजवळ जाताना मानवाची बुद्धिमत्ता विकसित होते. सौर यंत्रणा जसजशी जवळ जाईल तसतसे संपूर्ण शरीर आणि संपूर्ण विश्व ह्या विद्युत संरचना आहेत याची जाणीव नैसर्गिकरित्या होईल. आत्ता आपण त्रेता युगाकडे जात आहोत, ही युगांच्या चक्रात घडणारी दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम वेळ आहे.

कृष्ण असेही म्हणाला होता की ५००० हून अधिक वर्षांनंतर असा हजारो वर्षांचा कालावधी येईल जो फारच अद्भूत असेल. आपण तेव्हापर्यंत जिवंत राहू शकणार नाही, परंतु त्या काळासाठी आपण पाया घालू शकतो आणि हजारो वर्षांच्या पृथ्वीवरील सुवर्ण काळासाठी वातावरण तयार केल्याचा आनंद आपल्याला मिळू शकेल. हे सर्व अंदाज आणि अनुमान नाही - आपण ज्या ग्रहावर राहत आहोत त्याच्या संबंधात मानवी मनाचे काय होते याबद्दलच्या खोलवर आकलनशक्तीवर आधारित आहे. आपण केवळ या ग्रहावर राहतच नाही - तर आपण स्वतः ग्रह आहोत. जर आपणास हे आज समजले नाही तर आपण तेव्हा मातीत पुरले जाल तेव्हा आपणास हे समजेल. तुम्ही त्याचा भाग आहेत हे ग्रहाला समजते - फक्त तुम्हालाच असे वाटते की तुम्ही कोणीतरी वेगळे आहेत.

महाभारत - प्रत्येक मानवाची कहाणी

आपल्या स्वतःबद्दल खोट्या कल्पना असल्यामुळे ही कथा सुरू होते. महाभारत मानवांच्या जीवनाबद्दल भव्य गैरसमजांचे प्रतिनिधित्व करते; त्यांचे दु: ख, त्यांचे उदय व पतन; हे असेच घडत आहे, कारण माणूस जीवनाशी सुसंगत राहण्यासाठी धडपडत आहे. एखादा ज्याचा स्वर लागला आहे, त्याने काही सांगायचा प्रयन्त केला तर इतरांचा गैरसमज होईल. प्रकाश शब्दात सांगता येत नाही, परंतु जर तुम्ही तुमचे डोळे उघडले तर तुम्हाला प्रकाश दिसू शकेल. त्याचप्रमाणे, जर आपण हे आयुष्य खुले केले तर त्यास जीवनाची अनुभूती मिळेल, ते जीवन बनू शकेल.

आयुष्य गोष्टीसारखं सांगता येत नाही. सांगणे केवळ प्रेरणा देण्याकरिता आहे, आपली स्वत:ची स्वत:च्या मंत्रमुग्धतेमधून मुक्तता करण्यासाठी. प्रत्येक मानवाने स्वत: ला स्वत:च्या मर्यादांमध्ये संमोहित केले आहे आणि हेच सगळं जग आहे असा विश्वास त्यांना असतो. आपण संमोहनतून बाहेर काढल्यास त्यांना भीती वाटेल कारण अस्तित्व अमर्याद आहे. म्हणूनच, ते एका मार्गाने गरागरा फिरत असल्यास, त्यांना काही काळ उलट दिशेने फिरवावे म्हणजे आपण कुठेतरी जात आहात हे त्यांना जाणवते.

संपूर्ण महाभारतात फक्त हाच प्रयत्न दिसून येतो. ते काय करत आहेत हे महत्त्वाचे नाही, प्रत्येकाचे मत आहे की ते चांगल्यासाठी करीत आहेत. ते “माझे चांगले”, “तुझे चांगले”, कोणीतरी दुसऱ्याचे चांगले असो किंवा प्रत्येकाचे चांगले असो - कुठल्याही प्रकारचे चांगले असो, प्रत्येकाचे मत आहे की ते चांगल्यासाठी करीत आहेत. पण प्रत्येकजण चांगला किंवा वाईट नाही किंवा बरोबर किंवा चूक देखील नाही - ही कथा आताही अशीच पुढे चालू आहे.

ही कथा एका विशिष्ट व्यक्तीची नाही - महाभारत इतिहासाच्या वर्गीकरणात येते. भारतात, महान ग्रंथांचे तीन प्रकार आहेत: इतिहास, पुराण, वेद. वेद अमूर्त कल्पना, वैज्ञानिक सिद्धांत आणि आकाशीय घटनांच्या स्पष्टीकरणांनी परिपूर्ण आहेत. पुराण मानव नसलेल्यांच्या कथा आहेत. इतिहास ही माणसाची कथा आहे, इतिहासाच्या दृष्टीने नव्हे, त्यात ऐतिहासिक घटक असले तरीही. इतिहासामध्ये मूळ घटना असतात , परंतु ही प्रत्येक मनुष्याची कथा आहे - ती आपल्या जीवनाचा अर्थ आहे. जर ही आपली कथा असेल तरच ती आपल्यासाठी प्रगतीची प्रक्रिया ठरू शकते.