आनंद कसा शोधावा?
तेलुगु सिनेमा स्टार विजय देवरकोंडा सदगुरुंना विचारत आहे की आनंद कसा शोधावा आणि तो कसा टिकवून ठेवू शकतो. तर सदगुरू म्हणतात इतर भावनांसोबत आनंद सुद्धा एक प्रकारची रासायनिक केमिस्ट्री आहे. आणि आपल्या आत कुठल्या प्रकारची केमिस्ट्री निर्माण करण्याच्या तंत्रज्ञानाविषयी चर्चा करत आहेत.

विजय देवरकोंडा: हाय सदगुरू! आज आपल्यापैकी प्रत्येकजण पैसे कमवण्यासाठी खुप मेहनत करतो, ह्या विचाराने की पैसा आपल्याला आनंद देणार. आज आनंद अगदी बाजारु वस्तू झाली आहे. आपल्याला वाटतं की आपण मद्यपान केलं की ते आपल्याला आनंद देईल. आपल्याला एका बाईची सोबत करायचीय, ह्या हेतूने की ती आपल्याला आनंदी बनवेल. पण ते काय आहे जे आपल्याला आनंदी बनवेल, काय आहे जे आपल्याला आनंदी ठेवेल. आज आपण अशा एका ठिकाणी आहोत जिथे आपल्याला हेच माहित नाहिये की आपल्याला आनंद मिळणार तरी कुठे? तर आनंद म्हणजे काय? एक आनंदी मन दिसायला कस असत? एक आनंदी मन काय करत? असं म्हणू नका की आनंदाचा शोध आत घे, ते उत्तर माझ्या काम उपयोगाचं नाही. मला सत्य हवंय!
सदगुरू: नमस्कार विजय! तर एक आनंदी माणुस कसा दिसतो? मी तुला कसा दिसतो? तर आता, आपण आनंदाबद्दल असा विचार करतोय, की ती एक प्रकारची वस्तू आहे किंवा एक प्रकारची प्राप्ती आहे. नाही. जेव्हा तुमचं आयुष्य समाधानाच्या अवस्थेत येतं, जेव्हा तुम्ही आरामाच्या स्थितीत येता, तेव्हा आनंद हा एक स्वाभाविक परिणाम होतो. तर आरामात असण म्हणजे काय? याकडे पाहण्याचे अनेक मार्ग आहेत, तर ….कारण तु माझ्य़ावर आधीच एक अट घातलीयस.... तुला आत पाहायचं नाही.तर आज हे सिद्ध झालंय की वैद्यकीय रित्या ही आपल्याला कळत की वेदना एक प्रकारची केमिस्ट्री किंवा रासायनिक अनुभव आहे, आणी परमानंद एक वेगळ्य़ा प्रकारचा रासायनिक अनुभव आहे. प्रत्येक मानवी अनुभवाला एक रासायनिक आधार असतो.
जर तुम्ही एक जबरदस्त सूप आहात, तुमची चव चांगली असेल! दुसऱ्यांसाठी नाही, स्वत:साठी. जेव्हा तुम्ही स्वत:साठीच चविष्ट वाटता, जर तुम्ही इथं बसला, आणि जर तुम्हाला तुमच्या आत अगदी सुखावह वाटलं, कारण सूप झकास आहे, तेव्हा लोक म्हणतात तुम्ही खुश आहात. जर तुम्हाला खुप खुप सुखावह वाटत असेल, तर लोक म्हणतील की तुम्ही आनंदी आहात. जर तुम्हाला जबरदस्त सुखी वाटत असेल, तर लोक म्हणतील तुम्ही परमानंदी आहात.
तर, जर मी तुला हे शिकवल की आतमध्ये एक आनंदी रासायनिक प्रक्रिया कशी निर्माण करायची, तुझी आपली रासायनिक प्रक्रियाच सुखावह होईल. आणी तु जेव्हा आनंदावस्थेत असता, तेव्हा तुम्ही आनंदाचा पाठलाग सोडुन द्याल. आणि आज हि सर्वात मोठी चुक होत आहे, आपण आनंदाचा पाठलाग करत आहोत. तुमच आयुष्य आनंदाची अभिव्यक्ती बनायला हवी, जेव्हा तुमच आयुष्य तुमच्या अनुभवाची अभिव्यक्ती असते, तेव्हा तुम्ही काय करता, किंवा काय नाही करत, यावरून तुमच्या आयुष्याचा दर्जा ठरत नाही. तुम्ही तुमच्या आत कसे आहात, हे तुमच्या आयुष्याचा दर्जा ठरवेल.
मला माफ कर, पुन्हा मी “आत” हा शब्द वापरला. पण ही केमिस्ट्री सुद्धा तुझ्या आत नाहिये, ती बाहेरच आहे. पण चांगला सूप कस बनवायच हे जर तुम्हाला कळलं की, मग आनंदी असणं काही अडचण नाहि, तो तर त्याचा एक स्वाभाविक परिणाम असणार आहे. तर आम्ही तुला एक अस तंत्र शिकवू शकतो, आम्ही तुला एक अशी पद्धत शिकवू शकतो ज्याने तुला कळेल की स्वत:च्या आत एक उत्तम सूप कसा बनवायचा. जर तुम्हाला वाटत की तुम्ही कुणाकडुन किंवा कशातुन तरी तुम्ही आनंद पिळुन काढणार तर तुम्ही निराश व्हाल, कारण कशानेही तुम्ही तो प्राप्त करू शकणार नाही जोवर तुमच्या स्वत:च्या आत एक आनंदाची केमिस्ट्री नाहि.
संपादकीय टीप: संपादकीय टीप: कुठल्या वादग्रस्त मुद्द्याबाबत जर तुमच्या मनात वादळ उठत असेल, कुणीच ज्या बाबत बोलत नाही अश्या कुठल्या गोष्टीबद्दल जर तुम्ही गोंधळलेले असाल, किंवा असा कुठला प्रश्न तुमच्या मनाला सतावत आहे ज्याचं उत्तर कुणाकडेही नाही, तर हीच संधी आहे! सद्गुरूंना आपले प्रश्न विचारा, UnplugWithSadhguru.org वर