प्रश्न:सद्गुरु, झोपेत असताना सुद्धा आपण कसे काय ध्यान लावू शकतो?

सद्गुरु: अच्छा, तर तुम्ही तुमच्या ध्यानाबाबत एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याबद्दल बोलत आहात. तुम्हाला ध्यानाचा वापर झोपेसाठी करायचा आहे कि झोपेचा वापर ध्यान करण्यासाठी करायचा आहे? तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे- तुम्ही झोपताना ध्यान कसे करावे की ध्यान करीत असताना कसे झोपावे?

प्रश्न विचारलाय चुकीचा!

एक सूफी गुरु; इब्राहिम यांच्याबरोबर घडलेली एक सुंदर कथा आहे. त्यानी मोठ्या संख्येने शिष्य एकत्र केले होते. एक दिवस त्यांच्या आश्रमात, दोन तरूण भेटले. आणि त्यावेळी एक रमणीय सूर्यास्त होत होता, परंतु तिथे ते दोघे दुःखी कष्टी होऊन बसले होते.

ते एकमेकांच्या धूम्रपान करण्याच्या सवयीबद्दल झगडत होते. त्यांनी चर्चा केली, “आपण असच जाऊन गुरूंना का नाही विचारू शकत, की आम्ही धूम्रपान करू शकतो का? कुणास ठाऊक? ते तर जरा वेडसरच वाटतात. कदाचित ते म्हणतील; ठीक आहे किंवा ते आपल्याला तंबाखूपेक्षा काहीतरी अधिक देतील.”

तर त्यांनी विचारण्याचे ठरविले, पण वेगवेगळे जाऊन. दुसर्‍या दिवशी संध्याकाळी, पुन्हाएक रमणीय सूर्यास्त आला. त्यातील एकजण तिथे दुःखी कष्टी होऊन बसला होता आणि दुसरा धूम्रपान करायला आला होता. या दुःखी मुलाने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाला, “तुम्ही धूम्रपान कसे करता? तुम्ही गुरुचा शब्द मोडत आहात.”

तो म्हणाला " नाही. "

दुःखी मुलगा म्हणाला, “मी काल जाऊन गुरूंना विचारले, आणि त्यांनी मला सांगितले,‘ नाही, तु धूम्रपान करू नये. ’”

"तू त्यांना काय विचारलेस?"

पहिला मुलगा म्हणाला, “मी विचारले,‘ मी ध्यान करतेवेळी धूम्रपान करू शकतो का? ’ते म्हणाले, नाही.”

तर दुसरा मुलगा म्हणाला, “हीच तर तू चूक केलीस. मी त्यांना विचारले, “मी धूम्रपान करतेवेळी ध्यान करू शकतो?’ आणि ते होय म्हणाले.”

फक्त झोपा!

आत्ता, तुम्ही विचारत आहात की, "मी झोपेत असताना ध्यान करू शकतो का?" या ग्रहावरील बर्‍याच लोकांना जागृत अवस्थेत असतानाही ध्यान करण्यात समस्या येत आहेत. बहुतेक लोकांसाठी, जर त्यांनी स्वतःवर पुरेसे काम केले असेल, तर जेव्हा ते एक तास बसून राहिल्यावर कदाचित त्या वेळेत ते तीन मिनिटे ध्यानधारणा करू शकतील. त्यांची ध्यानधारणा चालू-बंद, चालू-बंद, एक क्षण इथे आहेत,आणि दुसऱ्याच क्षणी ते कुठेतरी भरकटले जातात.

तुमच्या झोपेमध्ये अध्यात्म आणण्याचा प्रयत्न करू नका. झोपायच्या वेळी फक्त मेल्यासारखे झोपा.

तुमची ध्यानाची वेळ कोणतीही असो, तुम्ही त्यावेळेची गुणवत्ता कशी सुधारेल याकडे लक्ष देणे हे योग्य आहे, त्याऐवजी ध्यान झोपेतही कसे करायचे हा निरर्थक विचार आहे. कमीतकमी निवांत झोपेवेळी तरी तुम्ही तुमच्या अशा सर्व कल्पनांना बाजूला ठेवा. सर्व काही बाजूला सारून झोपा. ते म्हणतात ना की “लहान बाळासारखे झोपावे.” जर तुम्ही लहान बाळाप्रमाणे झोपू शकत नसाल तर किमान शांत झोपा. आपल्या झोपेमध्ये अध्यात्म आणण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही फक्त मेल्यासारखे झोपा.

लहान बाळासारखे झोपा

मृत लोक शरीरात ताठर झालेले असतात, परंतु ते त्यागाच्या अत्युच्च स्थितीत असतात. ते कसे दिसतात याबद्दल त्यांना काळजी नाही. तशाच प्रकारे, तुम्ही झोपलेले असताना, काय घडत आहे याबद्दल काळजी करू नका. मला अमेरिकेत आढळणारी एक गोष्ट म्हणजे, सकाळी जेव्हा तुम्ही लोकांना भेटता, तेव्हा बरेच लोक विचारतात, “तुम्ही चांगले झोपलात काय?” मला हा प्रश्न कधीच समजला नाही, कारण यात मुद्दा काय आहे? पण मी पाहतो की बर्‍याच लोकांमध्ये हि एक समस्या आहे. जर तुम्ही झोपेमध्ये ध्यान करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला नक्कीच हि समस्या येईल. म्हणून झोपताना सर्वकाही सोडून झोपा. जर तुम्हाला मेल्यासारखे झोपण्याची इच्छा नसेल तर कमीतकमी बाळासारखे झोपा. अमेरिकेचे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जॉन मॅकेन यांनी याबद्दल खूप सुंदर सांगितले आहे. ओबामा यांच्या विरोधात निवडणूक हरल्यानंतर लोकांनी त्यांना विचारले, “कसे आहात तुम्ही?” ते म्हणाले , “मी बाळासारखा झोपत आहे. दर दोन तासांनी मी उठतो, रडतो आणि पुन्हा झोपी जातो.” हे त्या व्यक्तीबद्दल आश्चर्यकारक वाटते. पराभवातही, जर तुम्ही विनोदी असाल तर ते तुमच्यासाठी चांगले आहे.

ध्यान हा एक गुण आहे

तुम्ही ध्यानशील बनू शकता किंवा तुम्ही ध्यान होऊ शकता परंतु तुम्ही ध्यान करू शकत नाही.

ध्यान करणे ही कृती नाही; तो एक गुण आहे. हा एक सुगंध आहे ज्याठिकाणी तुम्ही पोहोचता आणि तो तुमच्या अवघ्या जीवनातून दरवळत राहतो. तुम्ही ध्यानाबद्दल काहीतरी करत आहात म्हणून ते साध्य होणार नाही - जर तुम्ही तुमचे शरीर, मन, उर्जा आणि भावना एका विशिष्ट पातळीपर्यंत परिपक्व केल्या तर तुम्ही स्वाभाविकपणे ध्यानशील व्हाल. तुम्ही ध्यानशील बनू शकता किंवा तुम्ही ध्यान होऊ शकता परंतु तुम्ही ध्यान करू शकत नाही. जर तुम्ही हा गुण तुमच्यात बाणला तर तुम्ही झोपलेले असतानाही तो तुम्हाला सोडणार नाही. एकदा हा गुण तुमच्यात एक जिवंत प्रक्रिया बनला की, शरीर सजग असो की झोपलेले, ध्यान प्रक्रिया ही अखंडपणे चालूच राहील. परंतु जर तुम्ही झोपेच्या वेळी ध्यान करण्याचा प्रयत्न केला तर फक्त एकच गोष्ट होईल, की चांगलं झोपणार नाही.