32 देशांमधील 800 पेक्षा अधिक साधक त्यांच्या आंतरिक विकासासाठी ईशा योग केंद्राच्या पवित्र वातावरणात 7 महीने घालवण्यासाठी एकत्र आले आहेत.

साधनापदामधील जीवन - सर्व लेख

जिथे आग आहे, तिथे प्रकाश असतोच. आध्यात्मिक साधना जशी तीव्र होत जाते, तसे आंतरिक प्रकाश जुनी जळमटे झटकून टाकायला सुरुवात करतो, आणि स्वतःमधे स्पष्टता आणि संतुलनाची भावना निर्माण होते. साधनापादात सहभागी झालेल्या व्यक्ती अनेक प्रकारच्या साधना करत आहेत, यामध्ये हटयोग साधना, शक्ति चालन क्रिया, शांभवी महामुद्रा, भक्ती साधना आणि आदियोगी प्रदक्षिणा यांचा समावेश आहे. खास साधनापादमधे सहभागी झालेल्या व्यक्तींसाठी भाव स्पंदन कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते, त्यामुळे त्यांचा साधनेचा अनुभव अधिकच सखोल झाला.

आम्ही साधनापादाच्या जवळ जवळ मध्यंतरापर्यन्त पोचलो आहोत आणि सहभागी व्यक्तींना प्राणप्रतिष्ठित ठिकाणी समर्पित साधना करण्याचे परिणाम जाणवायला सुरुवात झाली आहे.

स्वतःमधे डोकावून पाहणे

एखाद्या व्यक्तीने आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करत असताना, मागे डोकावून पाहून तिच्यात काय बदल घडले आहेत यावर विचार करणे नेहेमीच उपयुक्त ठरते. गेल्या काही महिन्यातील तीव्र साधनेमुळे त्यांच्या जीवनाचा अनुभव कसा बदलला हे सहभागी व्यक्ती आपल्याला सांगत आहेत.

life-in-sadhanapada-when-sadhana-begins-to-catch-fire-ishablog-participants-meditating

आंतरिक संघर्ष कमी झाला आहे

“माझ्यात घडलेला एक महत्वाचा बदल म्हणजे, जेंव्हा जेंव्हा एखादी गोष्ट ‘चुकीची’ घडते तेंव्हा मी माझ्या भोवताली नाही, तर माझ्या स्वतःमधे डोकावून पाहायला सुरुवात असते. माझ्यात डोकावून पाहण्याची, माझे शब्द आणि माझी कृती यावर विचार करण्याची माझी क्षमता खूपच वाढली आहे. यामुळे, माझ्यातला आंतरिक संघर्ष आणि माझ्या भोवताली होणारा संघर्ष मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे.” – वैष्णवी, 26, आंध्र प्रदेश

तीव्र ऊर्जा

“मला दिवसभर माझ्या उर्जेत मोठा बदल घडलेला जाणवतो, मी अधिक उत्साही, अधिक कार्यक्षम झालो आहे, आणि मी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत मनापासून सहभागी होतो आहे. साधनापाद सुरू झाल्यापासून मी नक्कीच अधिक संतुलित झालो आहे आणि मनाची स्पष्टता सुद्धा वाढलेली आहे, आणि सर्वात सुंदर बदल म्हणजे उर्जेची तीव्रता. हे जादुई आणि अविश्वसनीय आहे – त्याचा अनुभवच घ्यायला हवा. माझ्या जीवनात साधनापाद हे नक्कीच एक महत्वपूर्ण पाऊल आहे.“– कपिल, 18, महाराष्ट्र

आदियोगी प्रदक्षिणा + एकादशी = स्फोटक मिश्रण

life-in-sadhanapada-when-sadhana-begins-to-catch-fire-bakthi-sadhanapada

साधनापादाचा एक महत्वाचा भाग म्हणजे आदियोगी प्रदक्षिणा – ध्यानलिंग आणि 112 फूट ऊंचीचे आदियोगी यांना घातलेली दोन किलोमीटर अंतराची प्रदक्षिणा. मंत्राचा जप करत आणि एक विशिष्ट मुद्रा धारण करून घातलेली प्रदक्षिणा हा ईशा योग केंद्रातील विविध प्राणप्रतिष्ठित स्थळामधील ऊर्जा आपल्यात सामावून घेण्याचा एक मार्ग आहे. एकादशीच्या दिवशी, जो महिनातून दोनदा येणारा उपवासाचा दिवस आहे, आदियोगी प्रदक्षिणा अधिकच तीव्र अनुभव देते.

या अनुभवाने मला हादरवून सोडले

“एकादशीचा दिवस येतो तेंव्हा मी नेहेमीच उत्साही असतो, कारण हा दिवस माझ्या अंगात एक प्रचंड ऊर्जा आणि माझ्या आंतरिक समजुतीची संधी घेऊन येतो. एकादशीच्या दिवशी आम्हाला उपवास करायला लागत असे, आणि मी मानसिकदृष्ट्या त्यासाठी तयार होतो, मला भूक सुद्धा लागली नाही. जेंव्हा मी प्रदक्षिणा घालत होतो, तेंव्हा मी मद्यधूंद झालो आहे असे मला वाटायला लागले, पण मी जागरूक होतो आणि माझ्या स्वतःवर ताबा होता. मी भक्तीभावाने मंत्राचा जप करायला सुरुवात केली, तसे माझ्या अंगात काहीतरी संचारले. अचानक मला असे वाटले की मी येवढा हलका झालो आहे की मला माझ्या शरीराची जाणीव क्वचितच होत होती. एका विशिष्ट क्षणी, काही सेकंदांसाठी, मला असे वाटले की माझे शरीर माझ्यापासून वेगळे झाले आहे – जणूकाही चालणारी व्यक्ती आणि ही जागरूक व्यक्ती या वेगळ्या आहेत. त्यादिवशी या अनुभवाने मला हादरवून सोडले.अनेक प्रदक्षिणा झाल्यानंतरसुद्धा मी अजिबात थकलो नव्हतो. खरं म्हणजे त्यामुळे माझ्या अंगात आणखीनच उत्साह संचारला होता. प्रत्येक एकादशी माझ्यासाठी एक नवीन अनुभव घेऊन येते आणि प्रत्येकवेळा मी ते करत असताना ती मला कधीही निराश करत नाही. अशा प्रक्रियेत असल्याबद्दल मी कृतज्ञ आहे.” – मुर्चना ,24, आसाम

भक्ती साधना

जेंव्हा एखादी व्यक्तीचं हृदय भक्तीने ओसंडून वहात असतं, तेंव्हा कोणतीही बाधा अडथळा बनत नाही. हा पैलू जोपासण्यासाठी सद्गुरुंनी भक्ती साधनेची रचना केली आहे.

मी कितीतरी अधिक उत्साही आहे

“भक्ती साधना हा अतिशय समृद्ध करणारा अनुभव आहे. माझा गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोण संपूर्णपणे बदलला आहे. सुरूवातीला, मी कशाचा आदर करायला हवा आणि कशाचा नाही, काय महत्वाचे आहे आणि काय नाही याचे वर्गीकरण करत असे. भक्ती साधनेमुळे मी अशा अवस्थेत येऊन पोहोचले आहे जिथे मी जे काही पाहते, मला जे काही माहिती आहे त्याला निश्चित असे महत्व आहे आणि त्याचा मान राखायला हवा. भक्ती साधना माझा अहंकार बाजूला करते आणि मला अधिक सजग बनवते. मी जीवनासमोर नतमस्तक व्हायला शिकले आहे.” – मृदुला, 24, महाराष्ट्र

एक महत्वपूर्ण तपासणी नाका

life-in-sadhanapada-when-sadhana-begins-to-catch-fire-monthly-meet

प्रत्येक महिन्यात, संपूर्ण साधनापाद वर्ग सदगुरूंचे व्हिडिओ पहाण्यासाठी, आणि साधना सुधारण्यासाठी आणि अनुभवांचे आदानप्रदान करण्यासाठी एकत्र जमतो. मागचा महिना कसा गेला यावर विचार करण्यासाठी प्रत्येकजण एकत्र आलेले असतानाच, त्यांच्या हेतूची जाणीव पुन्हा जागृत करण्याची आणि पुढील महिन्यासाठी स्वतःला तयार करण्याची ही एक संधी असते.

तुम्हाला कुठे पोचायचे आहे त्याची पूर्वतयारी होते

“आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र जमल्यामुळे संपूर्ण वर्गाचे एक नाते असल्याची भावना निर्माण होते. आणि आम्ही जेंव्हा आमचे अनुभव एकमेकांना सांगतो, तेंव्हा मी इथे का आलो आहे याची जाणीव पुन्हा एकदा नव्याने मनात निर्माण होते. या भेटी म्हणजे प्रवासात असलेल्या तपासणी नाक्यासारख्या असतात, ज्यामुळे मागच्या महिन्यात मी कुठे होतो आणि आज मी कुठे आहे याचे पुंनर्मुल्यांकन होण्यास मदत होते. येणार्‍या काळात मला कुठे पोचायचे आहे याची पूर्वतयारी सुद्धा होते.” – इंद्रदीप, 35, टेक्सास, युएसए

बनाना स्प्लीट – एकाच नाण्याच्या दोन बाजू

life-in-sadhanapada-when-sadhana-begins-to-catch-fire-edgardo-Baran-banana

योग केंद्रात आम्हाला सतत आमच्या सीमित मर्यादा आणि आमच्या पसंती आणि नापसंतीनुसार आम्ही इतरांकडून ठेवत असलेल्या अपेक्षांची आठवण सतत करून दिली जाते.

हे खूपच पिकलेले आहे!

बरन, 35, ऑस्ट्रेलिया

भिक्षा भोजन कक्षातील भोजन पूर्व प्रार्थनेनंतर, मी जेंव्हा माझे डोळे उघडले तेंव्हा सोन्यासारखी चमकणारी पिकलेली पिवळीधम्मक केळी स्वतःला मला अर्पण करत असलेली दिसली. मी धन्य झालो.

त्याच्या बाहेरच्या काळ्या भागातून अश्रु वहात होते. एकतर ते कधीच मृत झाले असावे किंवा ते एक दिव्य केळे असावे, मला काय आहे ते पाहू दे.

त्याचे साल सोलून काढल्यावर, मला एक पिकलेले पिवळे केळे दिसले, पण त्याचा काही भाग तपकिरी आणि पांढरा होता. मी मोठ्या आशेने पिवळ्या भागाचा एक भाग तोंडात टाकला आणि तो किंचित आंबट लागला.

त्यानंतर अन्न वाढणारा स्वयंसेवक आणि माझ्यात हे संभाषण झाले:

मी: माझे केळे खराब झाले होते. मला कृपया दुसरे केळे मिळेल का?

भोजन वाढणारा स्वयंसेवक: हे खायला चांगले आहे.

मी: मला पिकलेली केळी आवडतात, पण हे खूपच पिकलेले आहे, ते खराब झाले आहे.

भोजन वाढणारा स्वयंसेवक (केळ्याची काळजीपूर्वक तपासणी करून): ही खाण्यासाठी अतिशय उत्तम आहेत. मी अशीच केळी खातो.

मी: मग तुम्हीच खा ती...

मी खाली माझ्या ताटाकडे पाहिले, आणि मला समोर एक अश्रु ढाळणारे केळे समोर दिसले ज्याने त्याचे आयुष्य मला अर्पण केल्यावर सुद्धा मी त्याला दुर्लक्षित केल्यासारखे वाटत होते. मला अपराधी वाटले आणि माझ्या मनात त्याचवेळी एक प्रतिक्रिया उमटली – “मग तुम्हीच खा ती, मग तुम्हीच खा ती, मग तुम्हीच खा ती.”

मी विचार केला, “मीच हे केळे खाणार आहे, आणि मी आज थोड्या वेळाने त्या स्वयंसेवकाची माझ्या प्रतिक्रियेबद्दल माफी मागणार आहे.” काळजीपूर्वक तपासणी केल्यानंतर, मी अतिशय सावधगिरीनी पिवळ्या, तपकिरी आणि पांढर्‍या भागांचे घास घेऊन ते केळे खाल्ले. ही प्रक्रिया एखाद्या कड्यावरून चालत असताना मृत्यू टाळण्यासाठी घेतेलेल्या काळजी सारखी होती.

हो, ते थोडेसे आंबट लागत होते, पण मी विचार केला की ते खायला काहीही हरकत नाही आणि माझ्या पसंती आणि नापसंतीमुळे माझे या केळ्याशी काही बंध निर्माण होत आहेत.

त्यादिवशी नंतर केंव्हातरी, अन्न वाढणारा स्वयंसेवक माझ्याकडे काही बोलण्यासाठी आले:

भोजन वाढणारा स्वयंसेवक: मला माफ करा.

मी: नाही. मला माफ करा. मी ते केळे खाल्ले आणि ते अगदी चांगले होते – तुमचे बरोबर होते.

भोजन वाढणारा स्वयंसेवक: नाही, मला माफ करा.

मी: तुम्ही माफी मागण्याची गरज नाही. तुमच्याशी तसे बोलल्याबद्दल मलाच वाईट वाटते आहे.

भोजन वाढणारा स्वयंसेवक: नाही, मला माफ करा, कारण मी अगदी त्याचप्रकारचं केळं खाल्लं जे तुम्ही खाल्लं, आणि आता माझे पोट बिघडले आहे. तुमचे केळे खराब झाले होते, ते तुम्ही खायला नको होते!

मी: ---

आम्ही दोघेही खाली झुकलो आणि अतिशय आनंदाने हसलो! तो एक अतिशय सुंदर क्षण होता ज्याने मला शिकवले की जरी मी संपूर्णपणे सजग झालो नसलो, तरी मी प्रत्येक दिवशी त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करू शकतो.”

life-in-sadhanapada-when-sadhana-begins-to-catch-fire-edgardo-Baran

हे खूप पिकलेले नाही!

एडगार्डो, 22, प्यूएर्तो रिको

“भिक्षा सभागृहात खाण्यापूर्वी मला अन्न वाढायला आवडते. म्हणून मी एकाला एक केळे दिले आणि तो म्हणाला की ते खूपच पिकलेले आहे आणि खराब झाले आहे. मी त्या केळ्याकडे पहिले. मला पिकलेली केळी आवडतात, म्हणून मी म्हणालो, “हे केळे चांगले आहे! आणि तो मला म्हणाला, हो, का तर मग तूच खा ते.” जेंव्हा तो तसे म्हणाला, तेंव्हा माझ्या लक्षात आले की मी परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली होती.

काही वेळाने मी जेंव्हा भोजनासाठी बसलो, तेंव्हा मी सर्वात काळे झालेले केळे शोधले. मी विचार केला, “ठीक आहे, मी जर हे एखाद्याला देऊ करत असेन, तर माझी स्वतःची ते खाण्याची इच्छा असायला हवी.” म्हणून मी सर्वात ज्यास्त पिकलेले केळे घेतले. जेंव्हा मी त्याचे साल काढले, तेंव्हा त्याला एक विचित्र वास येत होता, पण मी ते खायचे ठरवले कारण ते केळे चांगले आहे असे मला वाटले होते. ज्या क्षणी ते केळे मी तोंडात टाकले, त्याक्षणी माझ्या पोटात ढवळायला लागले! पण तरीही मी ते केळे सगळे खाऊन टाकले. मी सेवेसाठी आल्यावर सर्वप्रथम मी काय केले तर मी बरनला शोधले आणि त्याची माफी मागितली. मी त्याला संगितले की मी परिस्थितीचा चुकीचा अंदाज लावला आणि अजाणतेपणे प्रतिक्रिया दिली. तो देखील अगदी खुल्या मनाने माझ्याशी बोललाआणि त्या घटनेबद्दल त्याचे मत अगदीच वेगळे होते. आमच्या संभाषणाचा शेवट मनापासून हसण्यात झाला. यासारख्या लहान क्षणांमधुन माझी साधना किती चांगल्या प्रकारे सुरू आहे हे दिसून येते.

काम सुरू आहे

अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, पण सहभागी झालेल्या प्रत्येकाला हे समजले आहे की त्यांचा प्रवास चांगल्या प्रकारे सुरू आहे.

खरेखुरे स्वातंत्र्य

“मला नेहेमीच असे वाटत असे की मी माझ्या मनाप्रमाणे मला हवे ते केले, की मला मुक्तपणाचा आनंद घेईन, पण इथे आल्यानंतर मी हळूहळू खर्‍याखुरया मोकळीकतेच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो आहे– निवडीपासून स्वातंत्र्य. माझ्या वाट्याला जे काही काम येईल, त्यात मी स्वतःला अधिक झोकून देऊन त्याचा मनापासून आनंद घेतो आहे. मला असे वाटते की खरेखुरे स्वातंत्र्य काय आहे याची थोडीशी चव मी आता चाखली आहे.” - हिमांशु, 24, उत्तराखंड

life-in-sadhanapada-when-sadhana-begins-to-catch-fire-ishablog-participants-laughing

आता कोणताच गंभीरपणा उरला नाही

“मी माझ्याच मानसिक चौकटीत रहात असे. मी सतत गंभीर चेहरा करून वावरत असे, आणि लोकांना माझ्याशी मोकळेपणे बोलायला खूप प्रयत्न करावे लागत असत. आता मला प्रत्येकाशी अधिक सहजतेने आनंदाने आणि प्रेमाने वागता येते, जशी मी लहान असताना वागत असे. आणखी एक महत्वपूर्ण बदल म्हणजे समोरची व्यक्ती कशीही असली, परिस्थिती काहीही असली तरी, मी जाणीवपूर्वक प्रतिसाद देऊ शकते किंवा मी अपरीहार्यपणे प्रतिसाद दिला आहे याची जाणीव मला पुढच्याच क्षणी होते. असे काही शक्य आहे असे मला कधीही वाटले नव्हते, मला वाटत असे की माझ्या सक्तीने दिलेल्या प्रतिक्रिया अगदी नैसर्गिक आहेत – जे अगदी खोटे होते.” – विनीता, 30, पंजाब

शरीर आणि मनाच्या पलीकडले काहीतरी

“माझे शरीर आणि मन पूर्वीसारख्याच संघर्षातून जात आहे, पण मी काय करावे आणि मला कसे वाटावे यावर आता त्यांची हुकूमत काही प्रमाणात पूर्वी इतकी चालत नाही. त्या आता मध्यवर्तीभागाहून पाठीमागे गेल्या आहेत आणि अधिक आनंददायी गोष्टीं केंद्रस्थानी आल्या आहेत.” – अश्विनी, 27, ओहायो, युएसए

साधनापाद - आयुष्यभरासाठीचा विमा

life-in-sadhanapada-when-sadhana-begins-to-catch-fire-sadhguru-sathsang-with-sadhanapada

सद्गुरु (addressing Sadhanapada participants):(साधनापादमधील सहभागी व्यक्तींना संबोधून): अध्यात्मासाठी इच्छुक असणारा आणि केवळ संसारिक जीवनाकडे वाटचाल करणार्‍या व्यक्तींमध्ये फक्त येवढाच फरक आहे – संसारिक जीवनाकडे वाटचाल करण्या व्यक्ती आयुष्याचे फटके बसले की पळून जातात. जर एखादी आर्थिक समस्या असेल, किंवा कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी असेल, किंवा एखादे संकट आले असेल, तर ते पळून जातील. पण अध्यात्माचे इच्छुक स्वतःलाच फटके मारतात. इतर कोणी तुम्हाला मारावे याची तुम्ही प्रतीक्षा करत नाही! तुम्हाला जे काही करता येणे शक्य आहे ते तुम्ही स्वतः करता. त्यामुळे इतर कोणीही तुम्हाला काहीही करू शकत नाही. हेच स्वातंत्र्य आहे, समजले का. कारण मी अनेक वर्षे बसून राहिलो आणि स्वतःवर शक्य त्या सर्व मार्गाने संपूर्ण टीका करत बसलो, आज लोकं काहीही म्हणाली, तरी ते ठीक आहे. मी स्वतः अगोदरच ते म्हणालो आहे, तर मग काय झाले?

तुमचे शरीर, तुमचे मन आणि तुमची ऊर्जा कधीही तुमच्या आयुष्यात अडथळा बनू नयेत – ही एक गोष्ट तुम्ही करायलाच हवी. साधनापादाचा अर्थ हाच आहे. तुमच्याकडे मर्यादित वेळ आहे, आणखी फक्त तीन-साडेतीन महीने. तुम्ही त्याचा पूर्ण वापर करावा असे मला वाटते. तुम्ही जर याचा योग्य वापर करून घेतलात, तर तुमच्या उर्वरित आयुष्यात तुम्ही या काळाकडे नेहेमीच तुमचा विमा म्हणून पाहाल. आयुष्याने तुमच्यासमोर कितीही अडथळे उभे केले तरी काहीही फरक पडणार नाही. तुम्ही या कालावधीत स्वतःला सामर्थ्यवान बनवले, तर कोणतीही गोष्ट तुम्हाला पराभूत करणार नाही हे तुमच्या लक्षात येईल. एकदा तुम्हाला ती खात्री झाली, की तुम्ही या जगात महान कार्य कराल. तुम्ही तसेच करावे अशी आमची इच्छा आहे.

लवकरच येत आहे...

प्रत्येक जातीच्या, धर्माच्या आणि वर्णाच्या अध्यात्मिक साधकांचे घर असलेल्या ईशा योग केंद्राची रचना सर्व प्रकारच्या इच्छुकांमध्ये असणार्‍या आध्यात्मिक प्रक्रियांचे पोषण करण्यासाठी केलेली आहे. लोकांना त्यांच्या विकासासाठी विविध प्रकारच्या अनेक आध्यात्मिक प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत हा काही योगायोग नाही. “साधनापादामधील जीवन” च्या पुढच्या आवृत्तीत आपल्याला साधनापदामधील सहभागी व्यक्तींनी आनंदाने स्वीकारलेल्या काही सेवांची ओळख करून देण्यात येईल.