करोना महामारीमुळे जगातील लाखो लोकांचे जीवन विस्कळीत झाले आहे, या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय योग दिन जो की २१ जून ला आहे हा अतिशय महत्वाचा ठरणार आहे.

करोना मुक्त होण्यासाठी लागणारे औषध आणि लस अजूनही उपलब्ध नसल्यामुळे निरोगी शरीर आणि उत्तम अशी रोगप्रतिकारक शक्ती असणे हे करोनाच्या संक्रमणाविरूद्धच्या लढ्यात एक शेवटचा मार्ग उरला आहे

करोना मुक्त होण्यासाठी लागणारे औषध आणि लस अजूनही उपलब्ध नसल्यामुळे निरोगी शरीर आणि उत्तम अशी रोगप्रतिकारक शक्ती असणे हे करोनाच्या संक्रमणाविरूद्धच्या लढ्यात एक शेवटचा मार्ग उरला आहे.वैद्यकीय समुदायामध्ये एक अशी स्पष्ट सहमती देखील आहे की, करोनापासून संसर्ग झाल्यानंतर, निरोगी लोकांमध्ये पूर्णपणे बरे होण्याची शक्यता जास्त आहे. निरोगी राहणे ही आता चैनीची गोष्ट राहिली नसून मूलभूत अस्तित्वाचाच प्रश्न बनला आहे.

जीवन आजपर्यंत जसे जाणत होतो ते आता पार बदलून गेले आहे.

काही महिन्यांच्या कालावधीतच, या महामारीने आपल्या समाजाचे पूर्ण स्वरूपच बदलून टाकले आहे. आपण ज्याप्रकारे जगतो, कार्य करतो, खातो, खरेदी करतो, विकतो, दळणवळण आणि ज्या प्रकारे आपण समाजात वावरतो ते, ही महामारी पार बदलून टाकत आहे. हे अधिकाधिक स्पष्ट होत चालले आहे ज्या गोष्टी वर्तमान परिस्थिती अनुरूप बदलून, जुळून घेतात फक्त त्याच गोष्टी टिकून राहतील, मग तो व्यवसाय असो , संस्था असोत किंवा सरकार असो किंवा व्यक्ती.

तर प्रश्न हा आहे की तुम्ही स्वतःला कसं सक्षम बनवाल जेणेकरून आजच्या आव्हानांना यशस्वीरित्या सामोरे जाऊ शकाल? कशाप्रकारे तुम्ही स्वतःमध्ये समतोल आणि स्पष्टता बाणून अनिश्चित भविष्यात वाटचाल करू शकाल?

आयुष्याच्या नव्या वास्तवासाठी स्वतःला सुसज्ज करा

जर तुम्ही तुमचे शरीर, मन, भावना आणि प्राण-उर्जा दररोज वृद्धिंगत करू शकलात तर...? जर बाह्य परिस्थिती कशाही असल्यातरी तुमची आंतरिक स्थिती 100% तुमच्या इच्छेनुसार घडू लागली तर...?

तुमचे शरीर, मन, भावना आणि प्राण-उर्जा यांना जर तुम्ही दररोज वृद्धिंगत करू शकलात तर...?

योग- एक नवीन वास्तविकता!

योग! - या आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त, जगातील सर्वात प्रगत आणि सर्वांगीण आरोग्य आणि कल्याण प्रदान करणाऱ्या प्रणालीचा वापर करा.

सदगुरुनी रचलेली, इनर इंजीनियरिंग हे योगशास्त्रात रुजलेले आपल्या कल्याणासाठीचे तंत्रज्ञान आहे, जे तुमची मानसिक स्पष्टता, भावनिक समतोल आणि कार्य-कुशलता वृद्धिंगत करते, तसेच ताणतणाव, भीती आणि चिंता यासारख्या नकारात्मक गोष्टींपासून मुक्त होण्यास मदत करते.

ह्या प्रभावशाली साधनाने स्वतःला नव्याने घडवा

जगभरातील दोन अब्जाहून अधिक लोकं अभ्यासणारा असा हा “योग”, केवळ त्याच्या परिणामकारकतेमुळे हजारो वर्षे टिकून राहिला टिकला आहे. योगाचा कोणताही धर्म, जात, पंथ किंवा राष्ट्रीयत्वाशी संबंध नाही, असे हे योगाचे शाश्वत विज्ञान जीवनाच्या सर्व स्तरातील लोकांना सहज उपलब्ध आहे. त्याचा नुकताच झालेला प्रसार हे त्याच्या वैश्विकतेचे एक जिवंत उदाहरण आहे. या संदर्भात, सद्गुरुंद्वारे रचलेल्या, इनर इंजिनीअरिंग ऑनलाइनमध्ये सात अतिशय प्रभावशाली सत्रे आहेत, ज्यात समाविष्ट आहेतः

  • जीवन सहज, अनायास जगण्यासाठी व्यावहारिक साधने
  • प्रभावी ध्यानधारणा - जीवनातील महत्त्वाच्या पैलूंना सहज आणि यशस्वीरित्या हाताळण्यासाठी
  • स्वतःमध्ये नवचैतन्य आणि समतोल प्रस्थापित करण्यासाठी नित्याचा योग सराव
  • आयुष्यात सजगता बाणण्यासाठी प्रभावी साधने
  • निरंतर सहाय
  • ट्रेझर ट्रव्हमधील प्रश्नोत्तर व्हिडियोजची आजीवन उपलब्धी

परिवर्तनाचे युग आले आहे........स्वतःचा कायापालट करण्यासाठी आपण सज्ज आहात ना?

करोनाच्या साथीमुळे परिवर्तनाच्या नवीन युगाचा आरंभ झाला आहे आणि आपण आता अशा जगात राहत आहोत जिथे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी गुंतवणूक करणे, ही आता एक गरज बनली आहे.

Editor's Note: संपादकीय टीप: योगाच्या विलक्षण दुनियेत पहिलं पाउल ठेवा. इनर इंजिनियरिंग ऑनलाईन आत्ताच ट्राय करून बघा!