सद्गुरू: पतंजली योगाची व्याख्या अशी करतात – चित्त वृत्ती निरोध:, याचा शब्दशः अर्थ असा की जेव्हा तुम्ही मनाच्या सर्व वृत्ती आणि कार्य शांत करता, तेव्हा तुम्ही योगामध्ये आहात. तुमच्या जाणीवेमध्ये सर्व काही एक बनले आहे.

आपण आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टींच्या मागे लागलेले असू, ज्याला आपण आपले साध्य मानतो. पण मनाच्या वृत्तींच्या पलीकडे जाणे हे सर्वात मुलभूत आणि त्याच वेळी सर्वात मोठे साध्य आहे कारण ते मनुष्याला तो ज्या कशाच्या मागे धावत आहे त्यापासून मुक्त करते – आतल्या आणि बाहेरच्या - प्रत्येक गोष्टीपासून. जर त्याने फक्त त्याचे मन निश्चल केले तर तो एक पराकोटीची शक्यता बनतो. मन म्हणजे एक सपाट आणि स्पष्ट आरसा बनते, खडबडीत आरसा राहत नाही. खडबडीत आरसा एखाद्याचा जीवनाबद्दलचा सगळा बोध चुकवतो. जर तुम्ही त्याच्याकडे पाहिले नाही तर निदान तुम्हाला तुम्ही कसे आहात याची थोडीफार कल्पना असेल. पण तुम्ही त्याच्याकडे रोजच पाहिले तर तो तुम्हाला प्रत्येक गोष्टीची पूर्णपणे चुकीची प्रतिमा दाखवतो.

सध्या बहुतेक माणसं त्यांचं मन केवळ स्मरणशक्ती आणि कल्पनाशक्ती या दोन्हीमध्येच वापरत आहेत. स्मृती आणि कल्पनाशक्ती दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. स्मृती हा साठवलेला भूतकाळ आहे तर कल्पनाशक्ती त्याचं अतिरंजित स्वरूप आहे. तुम्ही मनाला जर अशा अवस्थेत आणलं जिथे ते स्मृतीने दूषित होत नाही किंवा कल्पनाशक्तीने अस्पष्ट होत नाही तर ते खऱ्या अर्थाने बुद्धिमान आणि भेदक मन असतं. जे काही पाहण्यासारखं आहे ते सगळं त्याला दिसतं - जीवन आणि त्याचा स्त्रोत. नुसतं जिवंत राहण्यासाठी तुमची स्मृती आणि कल्पनाशक्ती पुरेशी आहे, पण तुम्हाला जर जीवनाच्या इतर अयमांचा शोध घ्यायचा असेल तर स्मृती आणि कल्पनाशक्ती पुरेशी नाही कारण त्या फक्त भूतकाळ रिसायकल करत असतात. एकदा का तुम्ही भूतकाळ रिसायकल केला तर तुमचे जीवन एकाच साच्यात अडकून राहील; आणि जर तुमचं मन केवळ स्मृती आणि कल्पना यामध्येच कार्यरत असेल तर हा साचा तोडून बाहेर पडणं अशक्य होतं. एकदा का तुम्ही या साच्यात अडकला तर मग तो साचा कुणीही निर्माण केलेला असो ती एक प्रकारची गुलामगिरी आहे. मुळात, आपण मनोनिर्मित विश्वामध्ये अडकलो आहोत आणि ह्या भव्य सृष्टीच्या अस्तित्वाच्या अनुभवला मुकत आहोत याची जाणीव होणे हे मुक्तीच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे.

योगाची ज्या वेगवेगळ्या सुंदर मार्गांनी व्याख्या करता आली असती त्यापैकी पतंजलींनी ‘चित्त वृत्ती निरोधः’ याची निवड केली. योग म्हणजे तुम्हाला मुक्ती किंवा आत्मज्ञानाकडे घेऊन जाणारे तंत्रज्ञान आहे. योगाचे संपूर्ण शास्त्र वेगवेगळ्या प्रकारच्या सूत्रांच्या रुपात मांडले आहे. योगाचे सर्व ज्ञान साधारणपणे दोनशे सूत्रामध्ये सामावले आहे. पतंजलीनी योगाचा शोध लावला नाही; त्यांनी ते एका व्यवस्थेमध्ये एकत्र केलं म्हणून त्यांना आपण “आधुनिक योगाचे जनक” मानतो. योग विज्ञान अगोदरपासून वेगवेगळ्या स्वरुपात उपस्थित होते. त्यांनी ते सूत्रबद्ध केले आणि त्याला जीवनाबद्दलचा खूप सखोल ग्रंथ म्हणून ओळखले जाते. एका मनुष्याला जीवनाविषयीची इतकी समज असू शकते यावर विश्वास बसत नाही. त्यांच्या ज्ञानाची विशालता खरोखर विलक्षण आहे. आजकालचे विद्वान लोक म्हणतात की हे एका माणसाचं कार्य नाही. हे घडून येण्यासाठी बऱ्याच लोकांनी यावर काम केलं असलं पाहिजे कारण ते इतकं मोठं आहे की ते एका माणसाच्या बुद्धीमतेमध्ये बसू शकत नाही. हे एका माणसाचं कार्य आहे. कदाचित, ह्या पृथ्वीवर होऊन गेलेल्या सर्वांत बुद्धिमान लोकांपैकी पतंजली एक होते.

योगसूत्र जीवनाविषयीचे कदाचित सर्वात महान दस्तऐवज आहेत आणि त्याचबरोबर ह्या धरतीवरचे सर्वात निरस पुस्तक सुद्धा. पतंजलींनी एका खास उद्देशाने ते असे लिहिले आहे कारण हे साहित्य किंवा तत्वज्ञान नाही तर ती जीवन उघड करून दाखवणारी सूत्र आहेत. आणि त्यांचे भाषेवर असे प्रभुत्व होते की त्यांनी ते सूत्र स्वरुपात लिहिले म्हणजे कोणीही विद्वान त्यामध्ये कधीही रस घेणार नाही. ते सर्वात निरस आहेत पण त्यातलं एक सूत्र जरी तुमच्या आत वास्तवात उतरलं तर ते तुम्हाला अनुभवाच्या एका पूर्णपणे वेगळ्याच आयामात घेऊन जाईल. जर तुम्ही एक सूत्र वाचलं आणि त्याला तुमच्या जीवनाचं वास्तव बनवलं, तर तेच सर्व काही आहे. तुम्हाला सगळी सूत्र वाचायची गरज नाही.

पतंजली योग सूत्राची सुरुवात फार विचित्र प्रकारे करतात. पहिलं सूत्र आहे “....आणि आता, योग”. हे अर्ध वाक्य

पतंजली सूत्र :

योगश्चित्तवृत्तिनिरोधः
yogaś-citta-vṛtti-nirodhaḥ
Yoga is to still the patterning of consciousness

तदा द्रष्टुः स्वरूपेऽवस्थानम्
tadā draṣṭuḥ svarūpe-'vasthānam
Then, pure awareness can abide in its very nature

वृत्ति सारूप्यमितरत्र
vṛtti sārūpyam-itaratra
Otherwise, awareness takes itself to be the patterns of consciousness

वृत्तयः पञ्चतय्यः क्लिष्टाक्लिष्टाः
vṛttayaḥ pañcatayyaḥ kliṣṭākliṣṭāḥ
There are five types of patterns, including both hurtful and benign

प्रमाण विपर्यय विकल्प निद्रा स्मृतयः
pramāṇa viparyaya vikalpa nidrā smṛtayaḥ
They are right perception, misperception, conceptualization, deep sleep, and remembering

प्रत्यक्षानुमानागमाः प्रमाणानि
pratyakṣa-anumāna-āgamāḥ pramāṇāni
Right perception arises from direct observation, inference, or the words of others

विपर्ययो मिथ्याज्ञानमतद्रूप प्रतिष्ठम्
viparyayo mithyā-jñānam-atadrūpa pratiṣṭham
Misperception is false knowledge, not based on what actually is

शब्दज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्पः
śabda-jñāna-anupātī vastu-śūnyo vikalpaḥ
Conceptualization derives from linguistic knowledge, not contact with real things

अभावप्रत्ययालम्बना तमोवृत्तिर्निद्र
abhāva-pratyaya-ālambanā tamo-vṛttir-nidra
Deep sleep is a pattern grounded in the perception that nothing exists

अनुभूतविषयासंप्रमोषः स्मृतिः
anu-bhūta-viṣaya-asaṁpramoṣaḥ smṛtiḥ
Remembering is the retention of experiences

अभ्यासवैराग्याभ्यां तन्निरोधः
abhyāsa-vairāgya-ābhyāṁ tan-nirodhaḥ
Both practice and non-reaction are required to still the patterning of consciousness

एक प्रकरण आहे. या प्रकारच्या पुस्तकाची सुरुवात करण्याची ही फारच विचित्र पद्धत आहे. बुद्धीच्या दृष्टीने काहीच बोध होत नाही, परंतु अनुभवाच्या दृष्टीने ते असं म्हणत आहेत की :”तुम्हाला जर अजून असं वाटत असेल की नवीन घर बांधल्याने, किंवा नवीन पत्नी शोधल्याने, किंवा तुमच्या मुलीचे लग्न झाल्याने तुम्हाला जीवनात समाधान मिळेल, तर अजून योगाची वेळ आलेली नाही. पण जर तुम्ही पैसा, सत्ता, संपत्ती आणि सुख पाहिले असेल, तुम्ही जीवनातील प्रत्येक गोष्ट चाखून बघितली असेल आणि तुम्हाला हे उमजलं असेल की खऱ्या अर्थाने यातली कुठलीच गोष्ट तुम्हाला पूर्ण समाधानी करू शकणार नाही, तर आता योगाची वेळ आली आहे.”

संपूर्ण जग ज्या फालतूपणामध्ये गुंतलेले आहे, ते सगळं पतंजली अर्ध्या वाक्याने बाजूला सारतात. म्हणून पहिले सूत्र असे आहे:”... आणि आता, योग”. म्हणजे तुम्हाला माहित आहे की कुठलीच गोष्ट काम करत आणि खरोखर काय चालू आहे याचा तुम्हाला काहीच पत्ता नाही. अज्ञानाच्या वेदना तुमची चिरफाड करत आहेत. आता, योग. आता जाणून घेण्याचा एक मार्ग आहे.

एक योगी, द्रष्टा, आत्मज्ञानी आणि प्रसिद्ध लेखक असा लौकिक असलेले सद्गुरू हे भारतातील पहिल्या ५० अतिशय प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. सदगुरूंना भारत सरकारतर्फे २०१७ मध्येपद्मविभूषणपुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते ३.९ अब्ज लोकांपर्यंत पोहोचलेल्या कॉन्शस प्लॅनेट - सेव्ह सॉइल (माती वाचवा) या जगातील सर्वात मोठ्या लोकचळवळीचे संस्थापक देखील आहेत.

डाउनलोड करा