नद्यांचे पुनरुज्जीवन करणे हे काही सोपे काम नाही, परंतु रॅली फॉर रीवरर्सच्या स्वयंसेवकांनी (ज्यांना नदी वीर असेही म्हटले जाते) वाघाडी नदीचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रचंड मोठे आव्हान स्वीकारले आहे. दुर्दैवाने भारताची “शेतकऱ्यांच्या आत्महत्येची राजधानी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ या भागात जिथे ही नदी वाहत असायची, इथल्या लोकांनी प्रचंड दुःख सोसलेले आहे. घाटंजी गावातून नदीवीर काळजीपूर्वकपणे नियोजित प्रकल्प राबवत आहेत, जे की त्यांच्या प्रकल्पाचे ठिकाणसुद्धा आहे. ते ग्रामस्थांचे कल्याण करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. मग इनर इंजिनिअरिंग कार्यक्रमापेक्षा अधिक कल्याणकारी आणखी कोणती गोष्ट असू शकते का?

“हा योग कार्यक्रम फक्त ७ दिवसांचा नको, तो किमान २० दिवसांचा असायला पाहजे”

रिंकी: एक दिवस, एक ताई ज्यांना या कार्यक्रमामध्ये नोंदणी करण्याची इच्छा होती, त्यांच्याकडे या कार्यक्रमाची फी घेण्यासाठी मी कर्माणाला गेले होते. तिने माझे मनापासून स्वागत केले. तिच्या घरात आणि आम्ही १५ एक मिनिट चांगल्या गप्पा मारल्या. मी नदी वीरा होण्याचा निर्णय कसा घेतला, माझी रोजची दिनचर्या, आहार आणि इतर बर्‍याच गोष्टीबद्दल जाणून घेण्याची तिला खूप उत्सुकता होती. मी तिच्याशी गप्पा मारत असताना, ती फक्त माझ्याकडे पाहत होती आणि हसत होती. तिने मला तिचे आरोग्यविषयक समस्या आणि या कारणास्तव इनर इंजिनिअरिंग कार्यक्रम करण्याची तिची इच्छा या बद्दल तिने मला समजावले.

एका सत्रात, ती माझ्याकडे आली आणि तिने मला म्हटले की तिचे डोके दुखत आहे. मी तिला सांगितले की शिक्षक जे काही सांगत आहेत अगदी तसेच कर. तीला ते पटले आणि ती परत सत्रात गेली.

कार्यक्रमानंतर मी तिला भेटले, तिला कसे वाटते हे बघण्यासाठी आणि तिचा सराव कसा चालू आहे हे जाणून घेण्यासाठी. ती किती आनंदात होती हे सांगण्यास ती अगदी उत्सुक झाली होती. तिने तिच्या सर्व भावना माझ्याशी शेयर केल्या.

तिच्या शब्दांत सांगायचे झाले तर, “जर माझे लग्न झाले नसते आणि जर मला मुलं नसती, तर मी सुद्धा स्वयंसेवक झाले असते तुमच्यासारखी! मी माझ्या नवऱ्यालासुद्धा सांगत होते किती छान आणि किती शांत वाटते क्लासमध्ये. हा कार्यक्रम फक्त ७ दिवसांचा नको, किमान २० दिवसांचा असायला पाहजे.

लोकांपर्यंत पोहोचण्याचे अतिशय प्रखर प्रयत्न

दाक्षायनी: जेव्हा हा कार्यक्रम जाहीर झाला तेव्हा आमच्याकडे फक्त पाचच दिवस होते लोकांना माहिती देण्यासाठी, म्हणून त्यामध्ये स्वतःला संपूर्णपणे झोकून देऊन, आम्ही दिवसरात्र एक करून खेड्यांमध्ये भेट देत होतो. हा एकमेव मार्ग होता सदगुरूंना गावातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचवण्याचा आणि त्यांची ही शिकवण सर्व ग्रामस्थांना देऊ करण्याचा.

पण ते ५ दिवस काही तरी वेगळेच होते! आम्ही झोप काय असते तेच विसरून गेलो, आम्ही या गावांतून परत कधी माघारी जायचे हे सुद्धा विसरलो होतो, आम्हाला नाष्ट्याचे, जेवणचेसुद्धा भान राहिले नवते. कधीकधी आम्हाला आमच्या स्वतःचे शरीरच जाणवत नसायचे.

प्रजासत्ताक दिन मेळावा असो, नाहीतर बचत गटाच्या बैठका असोत, किंवा खेड्यातील सामाईक जागा असोत…... अशी आम्ही कुठली जागाच सोडली नाही जिथे गावकरी विचार करू किंवा आमच्या बरोबर इतर कशाबद्दलही बोलू शकतील. जर ते इतर कशाबद्दल बोलू लागले तर आम्ही त्यांना पुन्हा योगात परत आणत असे.

महिलांनी घेतलेला पुढाकार

मी कार्यक्रमात महिलांच्या नोंदणीची काळजी घेत होते. महिला जरी त्यांच्या शेतातले बहुतेक सर्वच काम करीत असल्या तरी आम्ही आत्तापर्यंत नियमितपणे चालू असलेल्या उपक्रमात त्यांना सामील करून घेण्यास असक्षम होतो. म्हणून आम्हाला त्यांना कसेही करून या कार्यक्रमात सहभागी करून घ्यायचे होते. यवतमाळमध्ये प्रथमच मला माझ्या आयुष्याचे ध्येय गवसले.

जेव्हा मी इनर इंजिनिअरिंग कार्यक्रमासाठी महिलांकडे जाऊ लागले तेव्हा ते ह्या ७ दिवसांसाठी का नाही येऊ शकत याची त्यांनी शंभर कारणे दिली. त्यांची दिनचर्या पाहटे ५ वाजता सुरु व्हायची. सकाळी शेतात जावे लागायचे, घरी परत आल्यावर स्वयंपाक आणि इतर साफसफाई करून परत शेतात जावे लागायचे. आणि संध्याकाळी ६ वाजता परत येऊन, जेवण बनवून, फक्त ४ तास झोप........हेच त्यांचे दैनंदिन जीवन असे. ते एवढे कामात गुंतलेले आणि तीव्रतेने काम करत असत की, ७ दिवसांसाठी येणे म्हणजे ही प्रचंड मोठी गोष्ट होती त्यांच्यासाठी. जेव्हा काही महिलांनी या कार्यक्रमासाठी येण्याची इच्छा दर्शवली, तेव्हा त्यांचे पती “जर माझी बायकोच या कार्यक्रमासाठी गेली, तर माझ्यासाठी जेवण कोण बनवणार?” असे म्हणून परवानगी देत नसत.

बचत गटाच्या महिलांच्या मुलींशी मी बोलले. एक मुलगी बी.एड करत होती आणि ती दररोज सकाळी सायकलवर तीच्या गावातून घाटंजीला जायची. तिथे सायकल लाऊन यवतमाळला जाण्यासाठी बस पकडायची आणि कॉलेजला जायची. ती मला सतत म्हणायची तिला हा कोर्स करायचा आहे पण तिच्या या दिनचर्यामुळे ती अगदी थकून जाते. आमच्यातील एक नदी वीरा आणि तिच्या भावाचे चांगले नाते होते. मला माहिती होते की जर तिला थोडीशी मदत तिच्या भावाकडून मिळाली तर ती हा कार्यक्रम करू शकेल. एक दिवस मला तिचा फोन आला, “दीदी तुम्ही कधी येणार आमच्या गावात आहात, मला आणि माझ्या बहिणीला हा कार्यक्रम करायचा आहे.”

जेंव्हा आम्ही पुरुषांकडे इनर इंजिनिअरिंग कार्यक्रमच्या संदर्भात भेटलो तेव्हा खूप सारे गमतीशीर किस्से सुद्धा घडले. काहींनी सरळ उत्तर दिले की, “माझ्या बायकोला करू देत हे, जर तिने हे केले, तर, माझ्या अर्ध्या समस्यांचे सुटतील.” आणखी एका नवऱ्याचे मत असे होते की “जर माझ्या बायकोच्या नोंदणीमुळे, जर इतर महिलांनासुद्धा प्रोत्साहन मिळत असेल, तर सर्वात पहिले माझ्या बायकोला हे करू द्या.” अशाप्रकारे मी आणि रिंकी 12 गावांमधील २० महिलांची नोंदणी करू शकलो. ७ दिवसांनतर सदगुरुबद्दल, कार्यक्रमाबद्दल आणि शांभवी महामुद्रेबद्दल त्यांच्या प्रखर आणि हृदयस्पर्शी भावना ऐकल्यानंतर, मला ही गहिवरून आले. आम्ही एवढ्या दूर होतो आश्रमाच्या, पण असे वाटत होते की सदगुरू आमच्याबरोबरच होते.

एका छोट्याशा कृतीचा भला मोठा परिणाम

कृष्णचैतन्य: इनर इंजिनिअरिंग कार्यक्रमात स्वयंसेवक म्हणून काम करताना माझे लक्ष माझ्यावरतीच केंद्रित झाले आणि ती जागा सकारात्मक भावनांनी भरून गेली. फक्त नमस्कार करून अभिवादन करणे हीच एक अद्भुत प्रकिया होती. जो कोणी कपाळावर आठ्या घेऊन चालला असेल, अचानक आम्हाला नमस्कारात बघून थोडे थांबायचा आणि आदराने तो सुद्धा झुकायाचा. काही लोक तर आमच्या जवळ यायचे काही सेकंद आमच्याकडे पाहत आनंदाने ते आम्हाला नमस्कार करायचे.”

सर्वांचा एकत्र सहभाग

सुमंत: एका साधकाच्या मते हे असे पहिल्यांदाच घडले असेल घाटंजीमध्ये की सर्व तपक्यातील लोक- शेतकरी, व्यावसायिक, मजूर, शिक्षक- सर्वजण एकत्र येऊन एखाद्या कार्यक्रमात सहभागी झाले.

माझे सौभाग्य आहे की मी या टीमचा भाग झालो. एवढे सारे वचनबद्ध लोक एकाच गोष्टीसाठी काम करतायेत, हे असे दृश्य बघायला सहसा मिळत नाही. या सत्रासाठी सर्व नदी वीरांनी स्वतःला अगदी झोकून दिले होते.

नोंदणीची कामं

हर्ष: जरी हे सर्वात पहिले सत्र होते घाटंजीमध्ये, काही लोकांना सदगुरू पहिल्यापासूनच माहिती होते. आणि आम्हीसुद्धा या गावांमध्ये मागील ८ महिन्यांपासून सक्रीय होतो, ज्या प्रमाणे आम्ही नमस्कार करून लोकांशी संपर्क साधला आणि ज्या प्रकारे प्रस्ताव मांडला लोक आमचा आदर करू लागले.

काही लोकांनी आम्हाला विचारले सुद्धा की तुम्ही नक्की काय करता, कारण त्यांनी त्यांच्या गावामध्ये एवढे आनंदी चेहरे कधीच बघितले नव्हते जे दररोज येत जात असत, जरी आम्हाला काहीच मिळणार नव्हते याच्यातून तरीही. मग आम्ही त्यांना आमचा दैनंदिन योगाभ्यास आणि सद्गुरुंची शिकवण याबद्दल सांगायचो. अशाप्रकारे, या 8 महिन्यात, अधिकाधिक लोकांची क्लासमध्ये भाग घेण्याची उत्सुकता वाढू लागली. आम्हाला वेगवेगळ्या गावांमध्ये बऱ्याच वेळा विचारण्यात आले की आपला हा योग कार्यक्रम कधी होणार आहे.

पण हा कार्यक्रम सुरू होण्याच्या फक्त 4 दिवस आधी आमच्याकडे फक्त 8 नोंदणी होत्या. माझ्या गावात ३ दिवस घालवल्यानंतर, आम्ही फक्त १५-२० नोंदणी करू शकलो. नोंदणीच्या शेवटच्या २ दिवसांमध्ये सर्व नदी वीरांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले, अगदी १००%. शेवटच्या दिवशी, आमच्याकडे ९५ साधकांची नोंदणी झाली होती. सत्राच्या १ दिवस अगोदर आम्ही सर्वजण रात्री १० वाजेपर्यंत नोंदणी कार्यालयात बसलो होतो. तिथे आम्ही एका फटक्यात २० नोंदणी केल्या. एका पूर्ण कुटुंबानेच नोंदणी केली होती. आणि अशाप्रकारे आम्ही 109 जणांची नोंदणी केली या सत्रासाठी!

पहिला कार्यक्रम घाटंजीमध्ये जो की अगदी वेळेवर घडला.

कारण इथे कधीच काही वेळेवर होत नाही, इथली लोकसुद्धा अशीच झाली आहे. आत्तापर्यंत या शहराने असा कुठला कार्यक्रमच बघितला नवता जिथे त्यांना वेळेच्या अगोदर हजर राहावे लागे. तर काही साधकांना हे काहीसे अवघड वाटत होते. आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांना असे वाटले की जरी एखादे सत्र चुकले तरी फारसा काही फरक पडणार नाही, पण इथे असे चालणार नव्हते. जर इथे तुम्ही एक जरी सत्र चुकवले, तर मग बाकीचे सत्र तुम्ही करू शकणार नाही, ज्याच्यामुळे आम्हाला बऱ्याच विरोधाला सामोरे जावा लागले, कारण आम्ही त्यांना सत्रात बसू देत नसायचो.

दीक्षेचा दिवस

इथले जेवण हे म्हणजे खूप मसालेदार असायचे जो की एक नकारात्मक प्राणिक आहार आहे. जेव्हा आम्ही साधकांना नैसर्गिक आहार दिला, तेव्हा दुसऱ्या दिवशी त्यांनी आम्हाला सांगितले की, खूप दिवसांनतर त्याचे पोट चांगले साफ झाले! कुठल्याही औषधाशिवाय त्यांची पोट साफ झाल्याने त्यांना खूप बरे वाटले.

क्लासमुळे झालेले परिवर्तन खरोखर दिसून येऊ लागलं

सत्र पूर्ण झाल्यानंतर आम्ही गावाकऱ्यांमध्ये अनेक बदल पाहिले. मागील 8 महिन्यांपासून आम्ही त्यांच्या संपर्कात होतो, मी सांगू शकतो की त्यांचे जीवन हे अगदी बदलून गेले आहे. लोक व्यसनातून मुक्त होत आहेत, ते आतून शांत झाले आहेत, मुलं साधना करतात म्हणून त्यांचे कुटुंबसुद्धा आनंदी आहे, त्यांच्या साधनेत काही व्यत्यय येऊ देत नाही.

जेंव्हा आम्ही त्यांना त्यांचा अनुभव विचारतो, तेव्हा ते म्हणतात की त्यांच्या हाती तर सोन्याची खाणच लागली आहे. लोकं आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत करण्यास सदैव तत्पर असतात. जी लोकं पहिल्या सत्राला हजर नाही राहू शकले ते पुढच्या सत्राची आतुरतेने वाट पाहत होते.

सदगुरुंच्या मते मानवी जागरूकता वाढवणे हाच एकमेव मार्ग आहे. वैयक्तिक पातळीवर मला त्याचे जिवंत उदाहरण इथे बघायला मिळाले.

परिवर्तनाचे किस्से

महादेव शिरगुरे: आम्ही नुकतेच एका व्यक्तींना भेटलो जे एक शेतकरी होते आणि त्यांनी इनर इंजिनिअरिंगचा कार्यक्रम केला होता. जेव्हा आम्ही या कार्यक्रमाबद्दल त्यांना त्यांचा अनुभव विचारला, त्यांचे डोळे पाणावले आणि ते इतके ऋणी होते की, ते म्हणाले सत्रांमध्ये जे काही शिकवले गेले, त्याचा थेट संबंध माझ्या दैनंदिन जीवनाशी आहे. आता एवढा चांगला प्रतिसाद मिळतो आहे तिथल्या लोकांकडून की, ते स्वतःहून पुढाकार घेत आहेत शक्य त्या मार्गाने आम्हाला मदत करण्यासाठी. ते आता एका हॉलमध्ये सर्वजण मिळून शांभवी साधनासुद्धा करतात.

एक चोरंबा गावची महिला, जी एक शेतकरी होती आणि त्यांचा दुध डेरीचा व्यवसायसुद्धा होता. त्या सांगत होत्या की हा क्लास करण्या अगोदर त्यांच्या कामामुळे त्या एवढ्या चिडचिड्या आणि तणावग्रस्त असायच्या की त्यांना कधीकधी असे वाटायचे की सर्व काही सोडून देऊन कुठे तरी निघून जावे. पण हा क्लास केल्यानंतर त्यांना अगदी आनंदी वाटते आहे आणि त्यांची सर्व कामे त्या स्वेच्छेने करत आहेत असे त्या स्वतः सांगतात. जे कोणी त्यांच्या डेरीमध्ये येतात, त्यासर्वांना त्या या क्लासबद्दल आणि त्यांच्या अनुभवाबद्दल सांगत असतात. इनर इंजिनिअरिंग करणारे जवळजवळ सर्वच ग्रामस्थ म्हणाले की पुढच्या वेळी जेव्हा एखादा कार्यक्रम होईल तेव्हा ते त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आणि मित्रांना नक्कीच हा कार्यक्रम करण्यास प्रोत्साहित करतील.

या 7 दिवसांसाठी 9 महिन्यांचे परिश्रम

आमच्यापैकी बरेच जण घाटंजी आणि यवतमाळमध्ये 9 महिने होते. या 9 महिन्यात जरी आम्ही हा उपक्रम सुरु होण्यासाठी सर्व गोष्टीची जमवाजमव करण्यात व्यस्त होतो तरी मला असे वाटते की इनर इंजिनिअरिंग कार्यक्रम ही ग्रामस्थांना देण्यात आलेल्या सर्वात मौल्यवान गोष्टींपैकी एक आहे. कदाचित हे 9 महिने या ७ दिवसांच्या तयारीचा कालावधी असेल.