भावनिक आसक्ती कशी हाताळावी?

जेव्हा भावनांच्या भोवऱ्यात आपण अडकतो आणि बाहेर पडण्याचा कुठलाच मार्ग सापडत नाही, अश्या स्थितीत काय करावं? सोनाक्षी सिन्हा सदगुरुंना विचारते भावनिक गुंत्यातून कसं बाहेर येऊ शकतो.
How to Get Out of Emotionally Difficult Situations?
 

सोनाक्षी सिन्हा: आदरणीय सदगुरू जी, मला एक प्रश्न विचारायचाय. मी अतिशय भावूक व्यक्ती आहे आणी बऱ्याचदा मला भावनिक दृष्ट्या अशा परिस्थितीपासून  स्वत:ला वेगळ ठेवण  खुप कठीण जात जी मला माहित असते की माझ्यासाठी चांगली नाहिये. जस की मला दिसत असत की हे तिथं जात नाहिये जिथं ते मला गेलं पाहिजे, पण  त्यापासून माझ मन आणी माझ्य़ा भावनांना दुर ठेवण अत्यंत कठीण जात, कृपा करून सांगा, मी हि स्थिती कशी हाताळू शकेन?

सदगुरू: आज  जगात हेड आणी हार्ट बिझनस बद्दल खुप काही बोलल जातय? पण जसा तुमचा विचार असतो तसा तुमचा अनुभव असतो. आणी जसा तुमचा अनुभव आहे तसे तुमचे विचार असतात. 

आज प्रामुख्याने लोकांच्या शिक्षण पद्धतीमुळॆ त्यांचे विचार त्यांच्या भावनांच्या पुढे धावतात. पण तरीही मोठ्या प्रमाणात असे लोक आहेत ज्यांच्या भावना त्यांच्या विचारांच्या पुढे धावतात.

वेगवेगळ्या लोकांसाठी, वेगवेगळ्या गोष्टी पुढे धावतात. काही लोकांसाठी त्यांचे विचार. आज प्रामुख्याने लोकांच्या  शिक्षण पद्धतीमुळॆ त्यांचे विचार त्यांच्या भावनांच्या पुढे धावतात. पण तरीही मोठ्या प्रमाणात असे लोक आहे ज्यांच्या भावना त्यांच्या विचारांच्या पुढे धावतात.  आजकाल तुम्ही पाहिलं असेल, ज्या लोकांच्या भावना त्यांच्या विचारांपेक्षा पुढे धावतात त्यांना मूर्ख म्हणून गणलं जातं कारण त्यांना भावनांची शक्ती आणि बुद्धीकौशल्याची समज नाही. तरी आज लोक इमोशनल कोशंट बद्दल विचार करत आहेत. 

दिशाबदल केव्हा होतो?

आता सोनाक्षी हे विचारतेय की, अशा परिस्थिती येतात ज्यात असण्याची तुमची इच्छा नसते पण तुमच्या  भावना त्यात गुंतलेल्या असतात, म्हणुन विचार सतत त्यांच्याकडे जात असतात, अजाणतेपणी तुम्ही त्याच दिशेने जात राहता.

विचार हे चपळ असतात, ते लवकर दिशा बदलू शकतात. पण भावना तितक्या वेगाने दिशा बदलु शकत नाहित, जरा बोजड असतात. थोडा वेळ लागतो.

तुम्हाला हे समजून घेण्याची गरज आहे-विचार हे चपळ असतात. आज माझा विचार सांगतोय ती सर्वात चांगली व्यक्तीय. उद्या जर तिने  मला नावडणारी गोष्ट केली, की तात्काळ माझे विचार म्हणतील, ती चांगली नाहिये. पण जर ह्या चांगल्या व्यक्तीच्या बाबतीत  माझ्य़ा भावना पुढे गेल्या आहेत, कारण त्या तितक्या चपळ नसतात, त्या तितक्या वेगाने दिशा बदलु शकत नाहित, जरा बोजड असतात. थोडा वेळ लागतो. पण या दरम्यान तुमची धडपड सुरु असते कारण विचार म्हणतात हे चांगल नाहिये पण भावना अद्याप त्यात गुंतलेल्या असतात.

मनातील माकडं

तर मग काय कराव? तुमच्या भावना किंवा विचारांवर नियंत्रण ठेवण्य़ाचा प्रयत्न करू नका कारण तुमच्या मनाची ही स्वाभाविक वृत्ती आहे की, मी या व्यक्तीबद्दल विचार करायचा नाही म्हटलं, की ह्याच व्यक्तीबद्दल संपुर्ण आयुष्य विचार करत राहणार आहे.  

तुमच्या मना वजाबाकी आणी भागाकार नाहिये, त्यात केवळ बेरीज आणी गुणाकार आहे.

आपल्याला ती माकडाची म्हण माहित असेलच. जर तुम्हाला म्हटलं, "पुढचे पाच सेकंद माकडांबद्दल विचार करू नका", शक्य आहे का? नाही. तुमच्या डोक्यात केवळ माकडंच नाचतील. कारण मनाचा स्वभावच असा आहे. जर तुम्ही म्हटलं "मला एखाद्या गोष्टीचा विचार करायचा नाही", नेमका तोच विचार मनात उठेल.

तर, जेव्हा अनावर विचार आणी भावना मनात येतात, तेव्हा सर्वात पहिली आणी महत्वाची गोष्ट तुम्ही करायचीय, तुम्ही त्यांच्याकडे त्या जशा आहेत तस पहा. त्यांचा प्रतिकार करू नका. ज्याक्षणी तुम्ही प्रतिकार करता, त्या अनेक पटीनं वाढतील.

तुमच्या मना वजाबाकी आणी भागाकार नाहिये, त्यात केवळ बेरीज आणी गुणाकार आहे. जर मी म्हटलं, "मला हि भावना नकोय" ती अधिक वाढत जाईल – एकाचे दोन होतील. जर तुम्ही म्हटलं, "ह्याभावना परत येत आहेत, मला त्या नकोत," त्या शंभर  पटीनं वाढतील. हा आहे तुमच्या मनाचा स्वभाव. अश्या मनातून जबरदस्तीनं तुम्ही काहीही काढू शकत नाही.

स्मृतीं पासून थोडं अंतर राखा

तर, तुम्ही एक गोष्ट केली पाहिजे, हे समजून घ्या की विचार आणी भावना केवळ जुना साठवलेला डेटा आहे ज्याचं तुम्ही रीसायकलिंग करत असता, अशी माहिती जी तुम्ही आठवता. स्मृतीना एक प्रकारचा वास असतो, त्या बस येत असतात. तुम्हाला फक्त त्यांना तस पाहायच आहे. त्याच्यापासून थोड अंतर राखायचय.

हे अस आहे, जणू तुम्ही एखाद्या ट्रफिक जॅममध्ये अडकलाय, तुम्ही एअरपोर्टला जात होता आणि ट्रफिक जॅम मध्ये फसलात, किती चिंता आणी धडपड तुम्हाला करावी लागली. मग कसे बसे पोहचून विमानात बसलात आणी टेक ऑफ झालं.  त्या उंचीवरून जेव्हा तुम्ही खाली पाहाता, तेव्हा ट्रॅफिक जॅम किती छान दिसतो ना! केवळ जरास अंतर निर्माण झालं म्हणून,  अजुनही तेच ट्रॅफिक जॅम आहे पण आता  तिथं अंतर आहे, अचानक त्याच काहीच वाटत नाही.

त्याचप्रमाणे तुमचे विचार आणी भावना – तुमच्या शारिरिक प्रक्रिया आणी मानसिक प्रक्रियेपासून थोडं अंतर राखण्याचा सराव करायला हवा. पण जर तुम्ही प्रत्येक विचार आणी भावनांना वेगळं हाताळायचा प्रयत्न केलात, तर ते हजारो पटीने वाढतील.

Sadhguru offers the free guided meditation, Isha Kriya, that helps create a little distance from your physiological and psychological process. Try Isha Kriya online or from Sadhguru App

संपादकीय टीप: कुठल्या वादग्रस्त मुद्द्याबाबत जर तुमच्या मनात वादळ उठत असेल, कुणीच ज्या बाबत बोलत नाही अश्या कुठल्या गोष्टीबद्दल जर तुम्ही गोंधळलेले असाल, किंवा असा कुठला प्रश्न तुमच्या मनाला सतावत आहे ज्याचं उत्तर कुणाकडेही नाही, तर हीच संधी आहे! सद्गुरूंना आपले प्रश्न विचारा, UnplugwithSadhguru.org वर.

Youth and Truth Banner Image
 
 
 
 
  0 Comments
 
 
Login / to join the conversation1