महर्षी व्यास हे घराघरांत पोहोचलेलं एक नाव आहे आणि भारतीय परंपरेतील एक मध्यवर्ती नाव आहे. त्यांना प्राचीन महाकाव्य, महाभारत - आतापर्यंत लिहण्यात आलेली सर्वात मोठ्या कवितेचे लेखक म्हणून गणलं जातं. पण ते त्यामध्ये एक अतिशय महत्वाची भूमिकाही बजावतात. त्यांच्याद्वारेच कुरुंचा वंश चिरायू राहतो. व्यासांचे वडील पराशर हे त्यांचे गुरु सुद्धा होते, आणि वेद व्यास वयाच्या सहाव्या वर्षीच त्यांचे शिष्य बनले. अशा अविश्वसनीय व्यक्तीची हि कहाणी आहे.

सद्गुरु:हजारो वर्षांपूर्वी, एक महान ऋषी होता ज्याचे नाव पराशर होते. ते महर्षी पराशर, अफाट ज्ञानाचे आणि एक आत्मज्ञानी मनुष्य म्हणून ओळखले जात. त्यांच्या काळात, समाजात अशी परिस्थिती निर्माण झाली होती जिथे राजे महाराजे सामर्थ्याने धुंद झाले होते आणि त्यांना धर्मगुरूंच्या वर्गाने सांगितलेल्या धर्माचा आदर राहिला नव्हता. आणि बऱ्याच मार्गांनी, ब्राह्मण देखील या भ्रष्ट आणि वाईट काळाचे बळी पडले होते, त्यांनी त्यांचा आदर आणि सत्कार गमावला होता जो त्यांचे एकेकाळी त्यांना मिळायचा. या संघर्षामुळे, समाजात बरेच वैमनस्य होते.

पराशरांनी धर्मगुरूंच्या वर्गाचा धर्म, ब्रह्मतेज आणि सत्ताधारी वर्गाचा धर्म, क्षात्रतेज यांच्यात समन्वय साधण्यासाठी चळवळ उभी केली. त्यांनी देशभर भ्रमण करून शेकडो आश्रमांची स्थापना केली आणि तत्कालीन राजांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जेणेकरून त्यांना समाजातील विविध घटकांमध्ये काही प्रमाणात नियोजन आणता येईल. त्यांनी हे अफाट कार्य हाती घेतल्यामुळे, त्यांचा खूप आदर केला गेला आणि त्यांच्याकडे मोठ्या सन्मानाने पाहिले जायचे. त्याच वेळी, त्यांनी स्वाभाविकच शत्रूही बनवले जे त्यांच्या चळवळीला विरोध करत होते.

पराशरांनी ब्रह्मतेज आणि क्षात्रतेज यांच्यात समन्वय साधण्यासाठी चळवळ उभी केली.

एकदा, पराशरांच्या आश्रमावर हल्ला झाला आणि त्यात ते एवढे जखमी झाले कि त्यांच्या पायाला खूप गंभीर इजा पोहचली होती. त्यांनी कसेतरी तिथून सुटका करून घेतली, आणि मोठ्या प्रयत्नाने एका होडीमध्ये बसले आणि एका छोट्या बेटावर पोहचले जिथे काही मच्छीमार लोकं राहत होती. त्यांची हि अवस्था पाहून, मच्छीमार लोकांनी त्यांना घरी नेले. त्यांना मत्स्यगंधीच्या, टोळी प्रमुखाच्या मुलीच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. मत्स्यगंधी म्हणजे "ती जीला माश्यांसारखा वास येतो."

मत्स्यगंधी, जी त्यावेळी केवळ एक तरुणी होती, तिने पराशरांच्या आरोग्याकडे लक्ष दिले. ती नैसर्गिकरित्या त्यांच्याकडे आकर्षित झाली कारण ते अफाट ज्ञान आणि बुद्धिमत्तेचे एक उत्तुंग व्यक्तिमत्व होते. पराशर त्यांच्या गंभीर जखमेतून बरे होत असताना एक वर्षाहून अधिक काळ मच्छीमारांसोबत राहिले. त्यांच्या जखमेतून बरे झाल्यानंतर देखील, ते पुन्हा कधीही सरळ चालू शकले नाहीत.

व्यासांचा जन्म

पराशर आणि मत्स्यगंधी यांच्यात एक विशिष्ट संबंध निर्माण झाला, आणि तिला एक मुलही जन्माला आले. पण पराशर तोपर्यंत बऱ्यापैकी ठीक झाले होते आणि त्यांनी आपले काम चालू ठेवण्यासाठी गाव सोडले. जन्मलेल्या मुलाचे नाव कृष्ण द्वैपायन असे ठेवण्यात आले. त्यावेळीही कृष्ण हे एक प्रचलित नाव होते. कृष्ण या शब्दाचा शब्दशः अर्थ म्हणजे "आकर्षक" किंवा "जो आकर्षित करतो तो." "द्वैपायन" म्हणजे "बेटावर जन्मलेला." म्हणून त्यांना हे नाव देण्यात आले कारण त्यांचा जन्म यमुना नदीतील एका बेटावर झाला होता. हे मुल मोठे होऊन महान ऋषी व्यास बनतो - महाभारताचे लेखक.

जसे कृष्ण द्वैपायन मोठे झाले, जेंव्हापासून त्यांना बोलायला आणि समजायला लागले, तेंव्हापासून ते त्यांच्या आईला विचारत, "माझे वडील कोण आहेत?" त्यांच्या आईने त्यांना पराशरांबद्दल विलक्षण गोष्टीं सांगितल्या आणि ते किती महान व्यक्ती होते हे सांगितले. तिच्या सोप्या पद्धतीने, तिने हे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला कि मुलावर त्याच्या वडिलांच्या बुद्धीचा आणि ज्ञानाचा प्रभाव पडेल, आणि तिथे राहणाऱ्या फक्त मच्छीमार समुदायाचाच प्रभाव नाही राहणार.

पूर्वी कधीही न पाहिलेल्या वडिलांबद्दल प्रचंड आश्चर्याने मुलगा मोठा झाला. दर वेळी, द्वैपायन त्याच्या आईला विचारायचा, "वडील आपल्यासोबत का नाहीत?" आई मुलाला त्याचे वडील करत असलेल्या महान गोष्टींबद्दल सांगायची आणि असं सांगायची कि त्यांना खूप प्रवास करावा लागतो कारण त्यांचे ज्ञान आणि बुद्धिमत्ता पसरवण्यासाठी देशात त्यांना सगळीकडे बोलावलं जातं. मग मुलगा विचारायचा, "जर ते आपल्यासोबत राहू शकत नाहीत, तर आपण त्यांच्यासोबत का जाऊ शकत नाही?" आई उत्तर द्यायची, "ते आपल्याला त्यांच्यासोबत घेऊन जाऊ शकत नाही कारण त्यांना खूप वेगवेगळ्या परिस्थितींना तोंड द्यावे लागते आणि ते सतत प्रवास करत असतात.

त्याचे वडील किती अद्भुत आहेत याच्या बर्‍याच कथा ऐकून कृष्ण द्वैपायन आपल्या वडिलांसोबत प्रवास करण्याची तीव्र इच्छा बाळगत मोठा झाला. वडिलांसोबत जाणे हे त्याचे एकमेव लक्ष्य होते.

त्याचे वडील किती अद्भुत आहेत याच्या बर्‍याच कथा ऐकून कृष्ण द्वैपायन आपल्या वडिलांसोबत प्रवास करण्याची तीव्र इच्छा बाळगत मोठा झाला . वडिलांसोबत जाणे हे त्याचे एकमेव लक्ष्य होते. तो मच्छीमार गावातल्या मुलांना सांगत असे, "माझ्या वडिलांना ताऱ्यांविषयी माहित आहेत, त्यांना सूर्य माहित आहे, त्यांना चंद्र माहित आहे. असं काहीच नाही जे त्यांना माहित नाही." तो अचूकतेपासून फार दूर नव्हता कारण पराशर त्याप्रकारचा माणूस होता.

त्यानंतर, जेंव्हा द्वैपायन सहा वर्षांचा होता, तेंव्हा पराशरांनी पुन्हा एकदा त्या गावाला भेट दिली. या मुलाचं स्वप्न सत्यात उतरलं होतं! त्या सहा वर्षांचा मुलाचा त्या रात्री बिलकुल डोळा लागला नव्हता. त्याला फक्त त्याच्या वडिलांसोबत बसायचं होतं आणि त्याच्या वडिलांना जे काही माहित होतं ते सर्व काही त्याला समजून घ्यायचं होतं कारण त्याच्या वडिलांना सर्व काही माहित होतं, आणि त्याला सुद्धा त्यातील प्रत्येक अंश समजून घ्यायचा होता. त्याने त्याच्या वडिलांना खूप, खूप प्रश्न विचारले, आणि एखाद्या स्पंजासारखे, द्वैपायनाने सर्व काही शोषून घेतले जे त्याचे वडील बोलले. त्याची शिकण्याची आणि ग्रहण करण्याची क्षमता एवढी प्रचंड होती कि जे काही एकदा उच्चारलं गेलं, ते पुन्हा कधीही त्याच्या आयुष्यात पुनरुच्चार करावं लागले नाही. जर एकदा का त्याला काही सांगितलं गेलं, कि बस्स तेवढंच! मुलाची क्षमता बघून पराशर चकित झाले होते.

जेंव्हा पराशरांची निघण्याची वेळ आली तेंव्हा द्वैपायन म्हणाले, “मला तुमच्याबरोबर जायचे आहे.”

पराशर म्हणाले, "तू फक्त ६ वर्षांचा आहेस. तू एक अविश्वसनीय मुलगा आहेस, पण तुला फक्त ६ वर्षांचा आहेस. तू माझ्यासोबत प्रवास करू शकत नाहीस."

द्वैपायनाने त्यांना विचारले, "ठीक आहे, असं काय आहे जे मी दोन वर्षांनी करू शकतो पण आता करू शकत नाही? मला सांगा."

जेंव्हा पराशरांनी त्या मुलाकडे पाहिले तेंव्हा त्यांना या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही कारण बौद्धिकदृष्ट्या तीस वर्षांचा मनुष्य जे करू शकत नाही, ते करण्यास तो मुलगा सक्षम होता.

मग पराशर म्हणाले, "तू माझ्यासोबत माझा मुलगा म्हणून प्रवास करू शकत नाहीस, मी माझ्या मुलाला सोबत घेऊन जगात फिरू शकत नाही. केवळ माझे शिष्य माझ्यासोबत जाऊ शकतात. माझा मुलगा जाऊ शकत नाही."

द्वैपायनाने उत्तर दिले, "मला तुमचा शिष्य बनवा."

पुन्हा एकदा पराशर म्हणाले, "तू अजून छोटा मुलगा आहेस. तू फक्त सहा वर्षांचा आहेस. तुझ्या आई बरोबर आणखी काही वेळ घालव.

पण द्वैपायन आग्रही होता, "ते काही नाही, मला जायचंच आहे. तुमचा शिष्य म्हणून तुम्ही मला आत्ताच दीक्षा द्या. मी तुमच्या सोबत येत आहे."

मग पराशरांकडे कोणताही पर्याय उरला नाही. त्यांनी सहा वर्षांचा मुलाला ब्रह्मचर्याची दीक्षा दिली, त्याला त्यांचा शिष्य बनवला, आणि मुंडण केलेल्या डोक्याने आणि एक भिक्षा पात्र घेऊन, हा लहान मुलगा त्याच्या वडिलांच्या मागे चालू लागला जे आता त्याचे गुरु बनले होते.

व्यासांचे ब्रह्मचर्य

त्याच्या ब्रह्मचर्याच्या पहिल्या दिवशी, द्वैपायन त्याच्या अन्नासाठी भिक्षा मागण्यास बाहेर पडला. हा ६ वर्ष्यांचा लहान मुलगा, मुंडण केलेले डोके आणि लाकडाच्या सालीपासून बनवलेल्या कपड्यानी, भिक्षा मागण्यासाठी बाहेर गेला आणि त्याच्या पोरकट वरच्या पट्टीतल्या आवाजात म्हणाला, "भिक्षांदेही." लोकांनी या गोंडस मुलाकडे पाहिले आणि त्याला भरपूर प्रमाणात अन्न दिले. ते देऊ शकतील अशा सर्वोत्तम गोष्टीं त्यांनी त्याला दिल्या कारण त्यांनी रस्त्यावर एकटेच चालणाऱ्या आणि स्वतःसाठी व आपल्या गुरुसाठी अन्नाची भिक्षा मागणाऱ्या या लहान मुलामध्ये सामर्थ्य पाहिले.

इतके अन्न त्याच्याकडे आले की तो ते सर्व घेऊन जाऊ शकत नव्हता. पण तो परत जात असताना, त्याला रस्त्यावर अशी बरीच मुलं दिसली, जी त्यांच्या चेहऱ्यावरून वाटत होते त्यांनी खूप दिवस चांगले खाल्ले नव्हते. त्याने त्यांना सर्व अन्न देऊन टाकले आणि रिकामं भिक्षा पात्र घेऊन तो त्याच्या गुरुकडे परत आला.

रिकामं भिक्षा पात्र घेऊन आलेल्या मुलाकडे पराशरांनी पाहिले आणि विचारले, "काय झाले? तू भिक्षा मागितली नाहीस? का तुला कोणी काहीच दिलं नाही? रिकामं भिक्षा पात्र घेऊन तू का आलास?" द्वैपायन म्हणाला, "त्यांनी मला अन्न दिले पण मी हि लहान मुले पहिली ज्यांनी काहीच खाल्ले नव्हते म्हणून मी सर्व अन्न देऊन टाकले." पराशरांनी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, "ठीक आहे. छान केलंस." मग द्वैपायन त्या दिवशी भुकेला राहिला.

जसं व्यास त्यांच्या वडिलांच्या देखरेखीखाली वाढत होते, त्यांनी अविश्वसनीय बौद्धिक क्षमता दर्शवली

तो जरी भुकेलेला होता, तरी हा सहा वर्षांचा मुलगा तिथे दृढनिश्चयाने बसला आणि त्याने त्याची अध्ययन प्रक्रिया पुढे चालू ठेवली. हे असं दिवसागणिक घडत राहिलं आणि मुलाने कधीच काही खाल्लं नाही. व्यासांनी त्यांच्या नंतरच्या आयुष्यात देखील हि सवय लावून घेतली कि नेहमी, त्यांच्या आजूबाजूच्या प्रत्येकाने खाल्ल्याशिवाय त्यांनी कधीही भोजन केले नाही. त्यांनी नेहमी खात्री केली कि प्रत्येकाने खाल्ले आहे, आणि जर काही शिल्लक राहिले असेल, तरच ते खायचे. अन्यथा ते काहीच खायचे नाहीत.

जेंव्हा पराशरांनी मुलाचे सामर्थ्य पहिले - हा सहा वर्षांचा मुलगा तीन चार दिवस उपाशी पोटी राहतो आणि आपली सर्व कर्तव्य पार पडतो आणि अभ्यासही चालू ठेवतो - त्यांना प्रचंड संभावना दिसली आणि त्यांनी स्वतःला त्याच्यात पूर्णपणे ओतला. शंभर वर्षांत त्यांनी एखाद्याला जे काही शिकवलं असतं, ते त्यांनी या मुलामध्ये फार कमी वेळात ओतून टाकलं.

जसं व्यास त्यांच्या वडिलांच्या देखरेखीखाली वाढत होते, त्यांनी अविश्वसनीय बौद्धिक क्षमता दर्शवली. हळूहळू त्यांचे शिक्षण असे झाले, पराशरांच्या लक्षात आले की जर त्यांनी द्वैपायनला एक गोष्ट शिकविली तर द्वैपायनला त्याच्याशी जोडलेल्या दहा गोष्टीं समजून जातात. वडिलांकडून गोष्टीं समजावून घेण्याची त्याची क्षमता इतकी प्रचंड बनली कारण त्यांच्याकडे तो पूर्णपणे एकाग्र होता. अगदी लहान वयातच द्वैपायन उच्चकोटीच्या बुद्धिमत्ता आणि ज्ञान असलेला मनुष्य बनला. तो सोळा वर्षांचा झाल्यावर त्याच्यासारखा दुसरा कुणीही कुठेही नव्हता; तो तेवढा शिकलेला होता.

वेद व्यास

हे व्यासच होते, ज्यांनी महाथर्वण, आणखी एक महान ऋषी यांच्या सोबत समाजाला पटवून दिलं कि चौथा वेद - अथर्ववेद - इतर तीन वेदांसारख्याच स्तरावर समाविष्ट करण्यात यावा. अथर्ववेद गूढ विज्ञान किंवा जगात गोष्टीं घडवून आणण्यासाठी उर्जेला कुशलतेने हाताळण्याच्या विज्ञानाबद्दल आहे. वैदिक परंपरेने हे नाकारले होते आणि पवित्र चारचा एक भाग म्हणून अथर्ववेद समाविष्ट करण्यास ते तयार नव्हते. तेंव्हा फक्त तीन वेद होते आणि अथर्ववेद बहुतेक समुदायाने नाकारला होता कारण लोकांचा कल त्याचा गैरवापर करण्याचा होता. परंतु स्वतः विज्ञानामध्ये काहीही गैर नव्हते. त्याचा कसा वापर केला जातो हे महत्वाचे आहे. व्यास म्हणाले, काही लोकांनी त्याचा गैरवापर केला होता म्हणून विज्ञानावरच बंदी घालण्याची गरज नाही. या समजदारीने, त्यांनी निश्चित केले कि अथर्ववेदाला आधीच प्रस्थापित झालेल्या इतर तीन वेदांइतकाच प्रवित्र ग्रंथ म्हणून दर्जा देण्यात येईल.

व्यासांनी वेदांचे संकलन कसे केले

कृष्ण द्वैपायन यांनी केवळ महाभारतच लिहिले नाही तर वेदांचे संकलनही केले. वेद पिढ्यानपिढ्या मौखिकपणे प्रसारित केले गेले. लोकांना ध्वनीचे महत्त्व आणि परिणाम समजले होते, म्हणून त्यांनी ते लिहून ठेवण्यास नकार दिला. आपण वापरत असलेल्या सर्व गोष्टींपैकी, भौतिकतेचा सर्वात सूक्ष्म रूप ध्वनी आहे. त्यापुढील स्तर, तुमच्या मेंदूत जे काही होतं यासहित, इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहे. त्यांनी विचारांना, भावनांना, आणि इतर काहीही यांना फार महत्व दिले नाही पण ध्वनी महत्वपूर्ण मनाला जायचा कारण ते भौतिकतेचा सर्वात सूक्ष्म रूप आहे, आणि त्याचा उपयोग अफाट प्रभाव निर्माण करण्यासाठी केला जाऊ शकतो.

कधी काळी समृद्ध गंगेच्या मैदानावर १४ वर्षांहून अधिक काळ दुष्काळ पडला होता तोपर्यंत वेद एक मौखिक परंपरा होती. असं म्हणतात की त्या सर्व वर्षांत एक थेंबही पाऊस पडला नाही. पिके वाळून गेली आणि त्या काळाची सभ्यता नाहीशी झाली. लोकं वेदांचे पठण करण्यास विसरले कारण ते आपल्याला जे काही अन्न मिळेल ते गोळा करण्यात व्यस्त होते. त्यांनी त्यांच्या परंपरा पूर्णपणे विसरल्या. जेंव्हा पुन्हा एकदा पाऊस पडला, आणि व्यासांनी त्या सभ्यतेचे झालेले नुकसान पहिले कारण त्यांनी वेद गमावले होते, त्यांनी विचार केला हे लिहून ठेवलेलेच उत्तम होईल. ते चार विभागात वर्गीकृत करण्यात आले, ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद, आणि यजुर्वेद. हा पारंपारिक अनुक्रम आहे, आज जे लोकं वापरतात तो नाही. आजही, हे चार वेद मानवतेने आतापर्यंत निर्माण केलेल्या सर्वात महान दस्तैवजांपैकी एक मानले जातात.

जे महाभारत आज आपल्याला माहित आहे तो फक्त एक अंश आहे जो वैशंपायनला आठवला, ज्याप्रकारे गणपतीने लिहिले होते ते नाही.

पुढील गोष्ट त्यांना करण्याची इच्छा होती ती हि कि एक महान, शाश्वत कथा संकलित करणे जी लोकांशी निरंतर संबंधित राहू शकेल. ती त्यांनी दोन लोकांना सांगितली - एक होता वैशंपायन, त्यांचा शिष्य, जो आश्चर्याने ऐकत होता. पण शिष्य गोष्टींचे विपर्यास करू शकतात. मानवी स्मरणशक्तीद्वारे तोंडी प्रसारित करण्याची पद्धत सत्य युगात चालली जेंव्हा लोकं एका विशिष्ट मानसिक क्षमतेचे होते. जसं कलियुग चालू झाले, मानवी मनाची क्षमता आणि स्मरणशक्ती कमी झाली. व्यासांनी विचार केला कोणताही धोका न पत्करणे हेच उत्तम होईल, म्हणून त्यांनी वेद लिहून घेण्यासाठी एका देवाची - गणपतीची सेवा घेतली.

तिथे एक माणूस लिहून घेत होता, तर दुसरा माणूस फक्त ऐकत होता. पण दुर्दैवाने, लिखित ग्रंथ एवढा आकर्षक होता, ती इतकी भव्य साहित्यकृती होती कि देवांनी येऊन ते चोरून नेले. जे महाभारत आज आपल्याला माहित आहे तो फक्त एक अंश आहे जो वैशंपायनला लक्षात राहिला, ज्याप्रकारे गणपतीने लिहिले होते ते नाही. युद्ध संपल्यानंतर, वैशंपायनने हस्तिनापुरचा सम्राट जनमेजय, युधिष्ठिरचा दुसरा उत्तराधिकारी याला ही गोष्ट सांगितली. जे आज आपल्याला माहित आहे ते व्यास जे काय म्हटले त्याचा फक्त एक अंश आहे.