प्रश्नकर्ता: आपल्या दैनंदिन जीवनात, आपल्या अनेक इच्छा, आकांक्षा असतात, आणि त्या दृष्टीने आपले अनेक प्रयत्न सुरू असतात. आपल्याला काय हवे आहे आणि आपण कोठे जात आहोत हे देवीला आपोआप समजते का?

सद्गुरु: तुम्ही तुमच्यासाठी जर सायकल किंवा बोट विकत घेतलीत, तर तुम्ही कुठे जायचे हे तुमची सायकल किंवा बोट ठरवेल का? तुम्हाला जिथं कुठं जायचं असेल, तो प्रवास ती सुखकर करेल. तुम्ही कुठे चालला आहात यात देवी भैरवीला अजिबात रस नाही. भैरवीला तुम्ही कुठे चालला आहात हे जाणून घेण्याची आवश्यकता नाही, ती तुमची त्या दिशेने जाण्याची कार्य-क्षमता बळकट करते. तुम्ही तुम्हाला हवे तिथे जाऊ शकता. म्हणूनच मी ती एक मशीन म्हणजे एक यंत्र आहे असे म्हणतो. जर आपण भैरवीला तुम्हाला एका विशिष्ट दिशेने घेऊन जाण्याच्या दिशेने तिची जडणघडण – असे समजू की तुमच्या मुक्तीच्या दिशेने – तर मग तुमची कुठेही जायची इच्छा असेना का, तरीसुद्धा ती तुम्हाला मुक्तीच्याच दिशेने खेचेल आणि तुम्हाला तिथेच घेऊन जाईल. परंतु जरी ती तुम्हाला सर्वोच्च शक्यतेच्या दिशेने घेऊन आत असली, आणि त्यासाठी तुम्ही राजी असाल, तर तुमच्यासाठी ते एक क्लेशदायक आयुष्य असेल. भैरवी आपल्याला एका विशिष्ट दिशेने घेऊन जाईल अशा प्रकारे नियंत्रित आपण तिला नियंत्रित केले तर मग तुमची कोठेही जायची इच्छा असेल तरीसुद्धा ती तुम्हाला त्या ठिकाणीच घेऊन जाईल 

जर आपण भैरवीला तुम्हाला एका विशिष्ट दिशेने घेऊन जाण्याच्या दिशेने तिची जडणघडण – असे समजू की तुमच्या मुक्तीच्या दिशेने – तर मग तुमची कुठेही जायची इच्छा असेना का, तरीसुद्धा ती तुम्हाला मुक्तीच्याच दिशेने खेचेल आणि तुम्हाला तिथेच घेऊन जाईल.

पण तिला कोणत्या एका ठराविक दिशेने घडवलेले नाही. ती तुम्हाला जे हवे आहे त्यात वृद्धिंगत करेल, ती स्वतः काहीही ठरवत नाही. म्हणून एकदा तुम्ही तुमची जीवनात प्रगती करण्याची क्षमता वाढवली की तुम्हाला नक्की कुठे जायचे आहे हे तुम्हाला स्वतःला निश्चितपणे माहिती असणे अतिशय महत्वाचे आहे. तुम्ही जर प्रत्येक दिवशी तुमची दिशा, लक्ष्य बदलत राहिलात, तेव्हा तुम्ही करत असलेल्या चुका सुद्धा मोठ्या असतील, कारण त्या यंत्राने तुमच्यात कार्यक्षमता वाढवली आहे. तुम्ही जर चालत असाल आणि जर तुम्ही चुकीच्या दिशेला वळलात, तर तुम्ही परत फिरू शकता. तुम्ही जर विमान चालवत असाल, तर तुम्ही अचानकपणे उलट फिरू शकत नाही, त्यासाठी मोठा वळसा घालावा लागेल. म्हणून एकदा तुम्ही क्षमतेच्या सुधारित पातळीवर पोहोचलात, की तुम्हाला कुठे जायचे आहे हे अतिशय स्पष्टपणे निश्चित करणे अतिशय महत्वाचे आहे. प्रत्येक दिवशी दिशा बदलत राहिलात तर आयुष्य केवळ वाया जाईल.

“ती मला काहीतरी देणार आहे” अशा दृष्टीकोणातून विचार करत बसू नका. केवळ भक्तिभावाने तिच्याशी एकरूप व्हा. तिने काहीही करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही केवळ तिची काळजी वाहिली पाहिजे. जे काही घडायचे असेल ते घडेल. काहीही न ‘मागणे’ हेच सर्वोत्तम. तुम्ही त्या आयामाच्या सहवासात किती प्रेमाने राहू शकता हे पाहणे हे सर्वोत्तम. तुम्ही जर काही मागितले, तर तुम्ही फक्त तुम्हाला जे माहिती आहे त्या चौकटीतूनच मागाल. तुम्हाला जे माहितीच नाही ते तुम्ही मागूच शकत नाही. तुम्हाला जे माहिती आहे ते मागणे म्हणजे काही काळ प्रगतीचे लक्षण वाटेल, पण प्रत्यक्षात तसे करणे म्हणजे एक पाऊल मागे जाणे आहे.

तुम्हाला जे माहिती नाही ते घडून येण्यासाठी, तुम्ही मागणे थांबवले पाहिजे. तुम्ही फक्त त्या ऊर्जेच्या संपर्कात राहिलात, तर गोष्टी आपोआप घडतील.

तुम्हाला जे माहिती नाही ते घडून येण्यासाठी, तुम्ही मागणे थांबवले पाहिजे. तुम्ही फक्त त्या ऊर्जेच्या संपर्कात राहिलात, तर गोष्टी आपोआप घडतील. त्या कोणत्याही मार्गानी घडल्या तरी आमच्यासाठी ते चांगलेच आहे. या सर्व गोष्टी घडण्यासाठी, तुम्ही स्वतःला अशा प्रकारे घडवले असले पाहिजे की तुमच्या भोवताली जे काही घडते ते तुमच्या आयुष्याची गुणवत्ता ठरवणार नाहीत. तुमच्या भोवताली जे काही घडते त्यामुळे तुमच्या कामाची गुणवत्ता आणि तुम्ही या जगात काय करता हे ठरवले जाईल – तुम्ही कोण आणि काय आहात हे ठरवले जाणार नाही. एकदा हे निश्चित झाले, की तुमच्या असे लक्षात येईल की एखादी गोष्ट मागणे हा किती मूर्खपणा आहे, कारण तुम्ही तुम्हाला अगोदरच माहिती असणार्‍या गोष्टीच मागत आहात.

तुम्ही दिव्यत्वाला चालवावे की दिव्यत्वाने तुम्हाला चालवावे? हे जर तुम्हाला उमजले, तर मग काही अडचण नाही. पण सध्या, तुम्ही दिव्यत्वाला चालवण्याचा प्रयत्न करत आहात, जो जगण्याचा एक मूर्खपणाचा मार्ग आहे.

तुम्हाला जे काही माहिती आहे त्याच्या पलीकडे असणारी एखादी गोष्ट घडण्यासाठी, सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ‘मागणे’ हा जगण्याचा मार्ग नाही हे समजावून घेणे. मागणे हा जगण्याचा एक अतिशय क्षुल्लक, ढोबळ मार्ग आहे. त्यापेक्षा अधिक चांगले, आणखी बरेच मार्ग आहेत. माझेही तसेच आहे – मी इथे बसून कोणतीही गोष्ट ठरवत नाही. मी शिवाला माझा ५०% भागीदार म्हणून घेतो, तो माझ्यासाठी काहीही करतो म्हणून नव्हे. तो काहीही करत नाही. सर्व काम मीच करतो. पण कोणत्या दिशेला वळायचे याच्या सूचना तो मला देत राहतो. वाहन मीच चालवतो पण केवळ ती सोपी दिशा देण्यासाठी त्याला पन्नास टक्के मिळतात. ज्या दिशेने इंडिकेटर चमकत असतात त्या दिशेने मी जातो. मी इंडिकेटर लावत नाही – ते आपोआप लागतात. एकदा ते पेटले, की मी त्या दिशेने वळायला हवे हे मला माहिती आहे. मूर्ख चालकांसाठी ही व्यवस्था आहे.

त्यामुळे मी एखादी गोष्ट घडणार आहे का नाही याबद्दल फारसा अधीर, चिंताग्रस्त होत नाही. तसे जर घडले – तर छानच. तसे जर घडले नाही – तर फारच छान. “तर मग, भैरवी कशासाठी? मी तिच्यासोबत माझा वेळ वाया घालवतो आहे का? ”तुम्ही दिव्यत्वाला चालवावे की दिव्यत्वाने तुम्हाला चालवावे? तुम्हाला जर ते समजले, तर मग काही अडचण नाही. पण सध्या, तुम्ही दिव्यत्वाला चालवण्याचा प्रयत्न करत आहात, जो जगण्याचा एक अगदी मूर्खपणाचा मार्ग आहे.

https://youtu.be/6GSjCDzMmBs