सद्गुरु: गंगेला एक सुंदर मुलगा झाला, पण ताबडतोब ती मुलाला घेऊन नदीकडे गेली आणि तिने मुलाला बुडवून टाकले. शंतनूचा यावर विश्वास बसत नव्हता. त्याचे हृदय फाटले पण त्याला आठवले की त्याने गंगेला असे का केले हे विचारले तर ती निघून जाईल. हा माणूस जो आनंदात आणि प्रेमात तरंगत होता, तो शोकाकुल झाला आणि आपल्या बायकोला घाबरायला लागला. पण तरीही, तो तिच्यावर खूप प्रेम करत होता आणि दोघे एकत्र राहत होते. आणखी एक मूल जन्माला आले, परंतु एकही शब्द न काढता, तिने या मुलाला घेतले आणि त्यालाही नदीत बुडविले. शंतनुला वेड लागायची पाळी आली होती, पण गंगेची अट त्याच्या लक्षात होती. हे असेच सुरू राहिले आणि त्याची सात मुले बुडाली.

महाभारत भाग 6: देवव्रताचा जन्म

आठव्या मुलाचा जन्म झाल्यावर शंतनु असहायपणे गंगेच्या मागे नदीकडे गेला. ती मुलाला बुडवणार तितक्यात त्याने बाळाला पकडले आणि म्हणाला, “पुरे! तू अश्या अमानवीय गोष्टी का करीत आहेस? ” गंगेने उत्तर दिले, “तु माझी अट मोडली आहेस. आता माझी जाण्याची वेळ आली आहे. पण मी तूला स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे, म्हणून मी कारण सांगते.”

फार पूर्वी, ऋषी वसिष्ठ त्यांच्या आश्रमात राहत होते, तेथे दैवी गुण असलेली त्यांची नंदिनी नावाची एक गाय होती. एक दिवस आठ वसू त्या भागात सुट्टीवर आले होते. शास्त्रात वसुंचे वर्णन असे केले गेले आहे की जे लोक विमान किंवा काही प्रकारच्या वाहनात प्रवास करतात. ही स्वयंचलित वाहने होती. ते इतकही सांगतात की अगदी वाहनाचा पृष्ठभाग हा द्रव पाराच्या पृष्ठभागासारखा कसा गुळगुळीत होता. ते म्हणतात की या वाहनांच्या आत दिवे होते, परंतु त्यात आग किंवा तेल नव्हते. ते स्वयंप्रकाशित होते.

हे वसु तेथे फेरफटका मारत होते आणि ते वसिष्ठांच्या आश्रमात फिरताना तिथे त्यांना नंदिनी दिसली. त्यापैकी एक वसु - ज्याचे नाव प्रभास होते - त्याची पत्नी म्हणाली, " ती गाय मला हवी आहे." विचार न करता प्रभास म्हणाला, “चला, चला, गाईला घेऊन येउया.” त्यातील एक-दोन जण म्हणाले, “पण ही गाय आपली नाही. गाय ऋषींची आहे. आपण ती का घ्यावी? ” प्रभासच्या पत्नीने उत्तर दिले, “भित्रे लोक नेहमी कारणे देत असतात. तुम्ही गाय मिळवू शकत नाही म्हणून तुम्ही धर्माला मधे घेऊन येत आहात.” हे ऐकून प्रभासला खूप चेव आला आणि त्याच्या साथीदारांच्या मदतीने तेथे जाऊन त्याने गाय चोरली.

या आठ जणांनी गंगेला विनवणी केली, “खात्री करा की आम्ही तुमच्या गर्भाशयातुनच जन्म घेऊ. त्या ग्रहावर आमचे जीवन शक्य तितके संक्षिप्त करा.

आपली प्रिय गाय चोरीला जात असल्याचे वसिष्ठांना समजताच त्याने त्यांना पकडले आणि शाप देऊन म्हटले, “तुझी हिम्मत कशी झाली? तुम्ही पाहुणे म्हणून येता. आम्ही तुमचा चांगला पाहुणचार करतो आणि शेवटी तुम्हाला माझी गाय चोरुन न्यायची आहे. तुम्ही सर्व मानवी मर्यादांसहित मानव म्हणून जन्माला याल. तुमचे पंख झडून जाऊन तुम्ही उड्डाण करू शकणार नाही. तुम्हाला या पृथ्वीवर चालावे लागेल, तुमची शरीरे घेऊन वावरावे लागेल, तुम्हांला जन्म घ्यावा लागेल आणि इतरांसारखे मरावेही लागेल.” मग या आठ जणांनी गंगेला विनवणी केली, “खात्री करा की आम्ही तुमच्या गर्भाशयातुनच जन्म घेऊ. त्या ग्रहावर आमचे जीवन शक्य तितके संक्षिप्त करा.”

गंगेने शंतनूला सांगितले, “मी फक्त त्यांची इच्छा पूर्ण करीत होते. त्यांना फक्त जन्म घायचा होता आणि शापातून सुटका हवी होती. मी त्यांच्यापैकी सात जणांना वाचवले परंतु तुम्ही आठव्या मुलाला बुडवायला दिले नाहीस. असो, हा प्रभास आहे ज्याने चोरीसाठी उद्युक्त केले होते. कदाचित तो या ग्रहावर दीर्घ आयुष्यासाठी पात्र असेल, परंतु तो अर्भक असल्यामुळे मी आत्ता त्याला माझ्याबरोबर नेईन. तो सोळा वर्षांचा झाल्यावर मी त्याला परत आणीन. मी खात्री करेन की तो आपले शिक्षण पूर्ण करेल. त्याला उत्तम राजा होण्यासाठी जे काही आवश्यक असेल ते मी त्याला शिकवीन आणि सोळा वर्षांचा झाल्यावर मी त्याला तुझ्याकडे सोडीन.” असं म्हणत ती मुलाला घेऊन निघून गेली.

शंतनू अर्धमेला झाला आणि हरवून गेला. तो निराधारपणे भटकत होता आणि त्याला राज्य करण्यात काही रस उरला नव्हता. एकेकाळी जो एक महान राजा होता तो अगदी निराश मनुष्य बनला. काय करावे हे न कळता तो असाच इथे तिथे भटकत असे.

सोळा वर्षांनंतर, गंगा त्यांच्या मुलासह म्हणजे देवव्रतासह परत आली आणि तिने त्याला शंतनूच्या स्वाधीन केले. देवव्रताने आपली धनुर्विद्या खुद्द परशुरामांकडे शिकली होती. त्याने बृहस्पतिकडून वेद शिकले. त्याने सर्वोत्तम शिक्षकांकडून सर्व काही शिकले होते, आणि तो राजा होण्यासाठी पूर्णपणे तयार होता. जेव्हा शंतनूने त्याला पाहिले तेव्हा त्याचे नैराश्य निघून गेले आणि मोठ्या प्रेमाने आणि उत्साहाने त्याने त्याच्या मुलाला जवळ केले आणि युवराज म्हणून त्याचा राज्याभिषेक केला.

देवव्रताने प्रशासनाची जबाबदारी स्विकारली आणि शंतनुच्या सांगण्यानुसार सर्व काही तो चांगल्यारितीने करीत होता, म्हणून शंतनू पुन्हा एकदा जबाबदारीतुन मुक्त झाला आणि आनंदी झाला. एक दिवस, शंतनु शिकार करायला बाहेर गेला आणि पुन्हा प्रेमात पडला!

पुढील भागात…