अध्यात्मिक मार्गावर प्रगती होताना दिसत नसल्यामुळे एक साधक निराशा व्यक्त करतो. आपण कुठपर्यंत पोहोचलोय याची चिंता करणाऱ्या लोकांना साऱ्या चिंता, आकांक्षा बाजूला मागे टाकून फक्त साधना करत राहण्याचा उपदेश सद्गुरू देतात.

प्रश्न : मी दीड वर्षांपासून योग करतोय. मी जितकी जास्त वाट पाहतो, तितका निराश होतो. मी अध्यात्माच्या मार्गावर आहे हे मला कसे कळेल? मी कोणत्या पातळीवर पोहोचलो आहे?

सद्गुरू : सर्व स्तर तुलनात्मक आहेत. तुम्ही दुसर्‍या एखाद्या व्यक्तीपेक्षा एक पाऊल पुढे जाऊ इच्छिता, ज्याने केवळ एक वर्षापूर्वी सुरुवात केली? जोपर्यंत हा तुलनात्मक-व्यवसाय तुमच्या डोक्यात आहे तोपर्यंत अध्यात्म नाही. जेव्हा नैराश्य पुरेसे वाढते, जेव्हा तुम्ही असा विचार करता की “हा योगावगैरे गेला खड्ड्यात, काहीच साधले जात नाहीये याने,” तेव्हा फक्त साधना करत रहा. संपूर्ण योगिक प्रक्रिया अशा प्रकारे रचली गेली आहे की आपण सतर्क न होता ते करू शकत नाही. ज्या दिवशी आपण सतर्क रहाल त्या दिवशी कोठेही जाण्यात रस न घेता, तुम्ही एक साधी प्रक्रिया केली तर तुमच्यात काहीतरी विस्फोट घडून येईल. जोपर्यंत तुम्ही विचार करत राहता, "मी कोणत्या पातळीवर आहे? मी कोणापेक्षा पुढे जात आहे का?”, म्हणजे तुम्ही अद्याप उंदराच्या शर्यतीत आहात – तुम्ही कोठेही जात नाही. म्हणून तुलना विसरा.

गुंतागुंत की मुक्ती?

सामील होणे परंतु न गुंतणे हेच सार आहे. सकाळी फक्त तुमची साधना करा. आणि दिवसभर, तुमच्यावर संस्कारीत केलेल्या इतर पैलूंबद्दल जागरूक रहा. तुम्ही ते अशा प्रकारे आत्मसात करावे की तुमच्या जीवनातील प्रत्येक पैलू योग बनेल. बसणे, उभे राहणे, खाणे, झोपणे - सर्वकाही योग आहे. योगाचा अर्थ असा आहे जो आपल्याला आपल्या उच्च स्वभावापर्यंत पोहोचण्याची संधी देतो. एकतर तुम्ही तुमच्या शरीराने, मनाने, भावनांने आणि ऊर्जेने स्वत: ला गुंतवण्यासाठी आणि गोंधळात टाकण्यासाठी वाया घालवू शकता, किंवा आपण स्वतःला मुक्त करण्यासाठी, आपल्यात आनंद आणि उल्हासाच्या उच्च-अतिउच्च परिमाणांमध्ये जाण्यासाठी त्याच चार साधनांचा उपयोग करू शकता. बंधनं वा मुक्तीची साधने वेगळी नाहीत.

आपले शरीर, मन, भावना आणि ऊर्जा सर्व कार्य करत आहेत, परंतु वेगवेगळ्या लोकांसाठी आणि भिन्न-भिन्न स्तरांवर. एखाद्या व्यक्तीमध्ये, शरीराचे वर्चस्व असू शकते, दुसर्‍यामध्ये मनाचे वर्चस्व असू शकते, आणखी कोण्या व्यक्तीमध्ये भावना प्रबळ असू शकते, तर इतर कुठल्या व्यक्तीमध्ये ऊर्जा प्रबळ असू शकते. या मिश्रणाचे प्रमाण प्रत्येक व्यक्तीसाठी विशिष्ट आहे, परंतु ते चार घटक समान आहेत. तुम्ही चारीही आहात. जोपर्यंत आपण आपल्यासाठी योग्य प्रमाणात सर्व चार घटक हाताळणारे योग करत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही.

'साधनेचे समर्पणात रूपांतर करा'

मूलभूत साधना मूलभूत बाबी उलगडण्यासाठी रचल्या केल्या आहेत. साधनेत वेगवेगळ्या व्यक्तींसाठी विशिष्ट प्रमाणात वेळ लागण्याची अनेक कारणे आहेत. त्याविषयी काळजी करू नये. तुम्ही स्वतःला वचनबद्ध केले आहे; तेवढे फक्त करा. तुम्हाला ते कसे करावे हे माहीत नसल्यास, समर्पण म्हणून करा. “हे माझ्यासाठी नाही. मी रोज गुरुचरणांत समर्पण करुन हा योग करीन.” आपल्यातील उंदीरची शर्यत दूर करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे.

साधना समर्पित करणे, हा मूर्खपणा थांबविण्याचा एक सोपा मार्ग आहे.

तुम्ही “मी कोणत्या पातळीवर आहे?” असे विचारत राहिल्यास ही अनंत विचार प्रक्रिया होऊ शकते. माझ्या आधी किंवा नंतर ज्याने सुरुवात केली त्यापेक्षा मी चांगला आहे काय?” साधना समर्पित करणे, हा मूर्खपणा थांबविण्याचा एक सोपा मार्ग आहे. मग ते अध्यात्म असो किंवा आणखी काही, तुम्हाला फक्त वाटतं म्हणून आयुष्य काही देणार नाही. आयुष्य तुमच्यासाठी काहीतरी उत्पन्न देते कारण तुम्ही स्वत:ला सक्षम बनविता. पैसा असो, प्रेम असो की अध्यात्मिक प्रक्रिया, या जगातील कोणतीही गोष्ट तुम्हाला नफा देते कारण तुम्ही योग्य गोष्टी करता, अन्यथा तसे होणार नाही.

एके दिवशी, एक माणूस गळ्यापर्यंत घाण असणाऱ्या सेप्टीक टॅंकमध्ये पडला. त्याने जिद्दीने बाहेर येण्याचा प्रयत्न केला पण तो येऊ शकला नाही. काही वेळाने तो ओरडला, “आग, आग!” शेजारच्यांनी हा 'आग' शब्द ऐकला आणि मग घाईघाईने अग्निशमन दलाला फोन केला. त्यांनी सगळीकडे पाहिले - कोठेही आग नाही. मग त्यांना हा माणूस सेप्टीक टॅंकमध्ये पडलेला दिसला, त्यांनी त्याला बाहेर खेचले आणि विचारले, “तुम्ही 'आग-आग' का ओरडत होता? आग कुठे आहे?” तेंव्हा त्या माणसाने उत्तर दिले, “जर मी, 'शीट, शीट’ म्हणालो असतो तर तुम्ही आला असता का?” त्याचप्रमाणे आयुष्यात आपल्याला योग्य गोष्टी कराव्या लागतील, अन्यथा योग्य गोष्टी आपल्या बाबतीत घडणार नाहीत.