प्रश्न: सदगुरू, सर्वात पहिली खरोखर आत्मज्ञानी व्यक्ती कोण होती? जेंव्हा ती व्यक्ती प्रकट झाली, तेंव्हा मानवी चेतनेच्या संदर्भात जगात काय परिस्थिती होती?

सद्गुरु: योग परंपरेत, शंकराकडे एक देव म्हणून नाही, तर आदियोगी म्हणजे विश्वातील पहिला योगी आणि आदिगुरु अर्थात विश्वातील पहिला गुरु म्हणून पाहिले जाते. त्यांनी हिमालयातील केदारनाथापासून काही किलोमीटर  उंचीवर असलेल्या कांती सरोवराच्या तीरावर त्यांच्या सात शिष्यांना – म्हणजे सप्तर्षीना योग विज्ञानाचे ज्ञान प्रसारित केले. विश्वातील हा पहिला योग कार्यक्रम होता. काही लोकांच्या मते ही घटना 60,000 वर्षांपूर्वी घडली, इतर काही लोकांच्या मते ही घटना 30 किंवा 35,000 वर्षांपूर्वीची आहे, पण आमची खात्री आहे की ही घटना किमान 15,000 वर्षांपूर्वी घडलेली आहे.

आदियोगींनी 112 मूलभूत मार्ग प्रदान केले आणि त्यावर आधारित अनेक निरनिराळे प्रकार आज विकसित झाले आहेत.

आदियोगींपूर्वी इतर कोणीही व्यक्ती जागृत झाली नव्हती का? मला खात्री आहे की नक्कीच अशी कोणीतरी जागृत व्यक्ती असेल. परंतु जागृती ही एक गोष्ट आहे, तर ज्ञान ही दूसरी गोष्ट आणि जाणून घेण्याची एक पद्धतशीर, सविस्तर प्रणाली असणे ही आणखीनच वेगळी गोष्ट आहे.

आदियोगींनी केवळ ज्ञानप्राप्ती केली म्हणून ते महत्वाचे आहेत असे नाही, तर त्यांनी शोधून काढलेल्या केलेल्या योग प्रणालीद्वारे ही शक्यता त्यांनी सर्वांसाठी उपलब्ध करून दिली म्हणून त्यांना महत्व आहे. आपण कोण आहोत याच्या अदभूत स्वरूपात प्रस्थापित होणे हे त्यांनी वैज्ञानिक पद्धतीने, त्याची सर्व परिमाणे शोधून काढून सिद्ध करून दाखवले, ज्यामुळे ही एक सुसंघटीत प्रक्रिया – म्हणजे अंतर्गत कल्याणचे एक शास्त्र किंवा विज्ञान बनले. त्यांनी 112 मूलभूत मार्ग दाखविले, आणि त्यांच्या वेगवेगळ्या संमिश्रणाने अनेक विविध प्रकार आज विकसित झाले आहेत. त्यांच्या आधी किंवा नंतर इतर कुणीच, त्यांच्याएवढं सखोल, सविस्तर आणि स्पष्टपणे विषद केले आहे. आणि या अमूल्य वरदानासाठीच आपण त्यांना पुजतो आणि गौरवितो.

कृतीसाठी सज्ज!

आदियोगी प्रकट झाले तेंव्हा काय परिस्थिती होती? योगकथांमध्ये असा उल्लेख केलेला आढळून येतो, ते खाली बसलेले असत तेवढे वगळता, नेहमी “ते कृतीसाठी सज्ज” या अवस्थेत असल्यासारखा आविर्भाव त्यांच्या चेहेर्‍यावर दिसून येत असे. ते शस्त्रसज्ज असत असे त्यांचे वर्णन केले गेले आहे आणि त्यावरून त्याकाळच्या समाजाचे स्वरूप आपल्या लक्षात येते. ते प्रकट झाले त्या काळात तुम्ही मागे डोकावून पहिले तर असे आढळून येईल की लोकं अनेक जाती आणि वंश ओळखींच्या विभागणीनुसार पसरले होते. प्रत्यक्ष परिस्थितीबद्दल आपल्याकडे खूपच थोडी माहिती आहे, पण मानवी मानसिक स्थिती कशी होती हे आपल्याला माहिती आहे. आपण असे अनुमान काढू शकतो की लोकांना एका विशिष्ट परिस्थितीत ठेवले, तर ते कसे वागू शकतील. त्या काळात उदरनिर्वाहाची नैसर्गिक प्रवृत्ती अतिशय तीव्र असू शकते. जेंव्हा लोकं मर्यादा ओलांडत असत, तेंव्हा साहजिकपणे त्याचे पर्यवसान मृत्यूत होत असे. शारीरिक हिंसा साहजिकच होत असे, आणि आदियोगींनी स्वतःला त्या परिस्थितीशी जुळवून घेतले होते. ते जसे एक ध्यानस्थ योगी होते, तसेच ते एक योद्धे सुद्धा होते.  

पण उदरनिर्वाहाची तीव्र नैसर्गिक प्रवृत्ती असून सुद्धा, कोठेतरी या संस्कृतीमधील लोकांच्या मनात जीवनाचे यथार्थ सत्य जाणून घेण्याची ओढ निर्माण केली गेली असावी.

पण उदरनिर्वाहाची तीव्र नैसर्गिक प्रवृत्ती असून सुद्धा, कोठेतरी या संस्कृतीमधील लोकांच्या मनात जीवनाचे यथार्थ सत्य जाणून घेण्याची ओढ निर्माण केली गेली असावी.  जेंव्हा ते पहिल्यांदा प्रकट झाले – आज ज्यांना आपण सप्तर्षी म्हणून ओळखतो त्यांच्यासह अनेक लोकं कुतुहलाने त्यांच्याभोवती एकत्र जमा झाली. जर कोणत्याही प्रकारचा परम सत्याच्या शोधाचा इतिहास नसेल, तर ते त्यांच्या भोवती एकत्र जमा झाले नसते. आम्हाला जे ज्ञान नाही, ते तुमच्याकडे आहे” असे म्हणण्यासाठी त्यांच्याकडे नक्कीच काहीतरी ज्ञान असावे.

जगातील बहुतांश भागात आपल्या अलौकिक स्वरूपाचा ध्यास घेण्याच्या इच्छेला योग्य अभिव्यक्ती मिळाली नाही, पण या संस्कृतीत मात्र ते शक्य झाले. मला असे वाटते की त्याकाळी समाजात स्थैर्य असावे, कालांतराने लोकं परिपक्व झाली आणि त्यांच्या लक्षात आले की उदरनिर्वाहाची नैसर्गिक प्रवृत्ती परिपूर्णता लाभण्यास असमर्थ आहे – आपण आपल्यामधील इतर पैलू सशक्त करणे आवश्यक आहे ज्यांची सतत अमर्याद होण्याची आणि अमर्याद मार्गाने विस्तार होण्याची इच्छा असते. आम्हाला त्यांची परमार्थाच्या शोधाची ओढ कितीमोठी होती याची कल्पना नाही, पण ती जाणीव मात्र त्यांच्यात नक्कीच निर्माण झाली होती. लोकं त्यांच्या भोवती भीतीपोटी जमा झाली नाहीत, त्यांच्याकडे आपल्याला देण्यासारखे काहीतरी असेल या आशेने ते त्यांच्या सभोवती जमा झाले. म्हणजेच एका अर्थी, अधिक शक्यता, अधिक उच्च संभावना उपलब्ध आहेत याची त्यांना जाणीव होती.

Editor's Note: Guru Purnima, the sacred festival which honors the ancient lineage of enlightened beings who have graced the world with their presence, falls on July 9 this year. Join us at the Isha Yoga Center for a special satsang with Sadhguru (in-person or live webstream) or celebrate at your local Isha Center or at home.

Celebrate Guru Purnima