प्रश्न: सद्गुरू, नमस्कार. मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे, आणि मी माझ्या महाविद्यालयात योग आणि शांभवी करण्याविषयी बोलतो, तेंव्हा लोकं माझ्याकडे तुच्छतेने बघतात आणि म्हणतात, “तू विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहेस, आणि तू या गोष्टीबद्दल कसे काय बोलू शकतोस?

प्रथम वर्षात असताना, मला त्याबद्दल खूप वाईट वाटत असे, पण नंतर मी त्याकडे दुर्लक्ष केले. आता माझा प्रश्न असा आहे की आपल्या स्वतःच्या देशात उगम पावलेल्या विज्ञानाला भारतीय तरुण का विरोध करत आहेत. मला असे म्हणायचे आहे की भारतीय विज्ञान सर्व गोष्टींचा सखोल विचार करून प्रस्थापित झालेले आहे. तर मग त्याला विरोध का होत असेल? आणि या विरोधाचे रूपांतर स्वीकृतीत करणे महत्वाचे आहे, का किमान त्यांना त्याचा पूर्णतः ते एकदा अनुभवल्याशिवाय त्याची उपेक्षा तरी करू नका असे त्यांना सांगायला हवे? आणि जर तसे असेल, तर आपण सध्याच्या प्रस्थापित शिक्षण पद्धतीत या आंतरिक विज्ञानाचा समावेश कसा करून घेऊ शकतो?

सद्‌गुरु: दुर्दैवाने आज कोणत्या गोष्टीना आपण वैज्ञानिक म्हणू शकतो याकडे फार संकुचित नजरेने पाहिले जाते. मुख्यतः ज्याला आपण विज्ञान असे म्हणतो, जर त्यात एखादी गोष्ट समजण्याचा आणि तिचा उपयोग करून घेण्याचा एक स्पष्ट, तर्कशुद्ध, पद्धतशीर मार्ग आहे आणि ती प्रक्रिया अचूकपणे पुन्हा पुन्हा करता येत असेल तर त्याला विज्ञान मानले जाते. मूलभूतरित्या विज्ञान हे फिजीक्स म्हणजे भौतिकशास्त्र आहे, पण त्यामधून इतर विज्ञान शास्त्रांची निर्मिती झालेली आहे, उदाहरणार्थ; जीवशास्त्रीय अभ्यास, मानसशास्त्रीय अभ्यास, आणि समाज शास्त्र वगैरे. म्हणूनच, ज्या कुठल्या गोष्टींमागे तिला समजण्याचा आणि तिचा उपयोग करून घेण्याचा एक स्पष्ट, तर्कशुद्ध आणि पद्धतशीर मार्ग आहे आणि ती फक्त एकाच व्यक्तीला नव्हे तर अधिकाधिक लोकांना लागू पडत असेल, तर ते विज्ञान किंवा वैज्ञानिक दृष्टीकोण समजला जातो.

त्या अर्थाने, योग विज्ञान मानवजातीला जितके मोठ्या प्रमाणावर लागू होते तितके इतर अन्य कोणतेही विज्ञान लागू होत नाही. पण आज लोक योगाविषयी जे काही ऐकत आले आहेत तो भारतीय योगच आहे पण अमेरिकेतून जाऊन जरा पाश्चात्यीकृत होऊन परत आलाय इतकंच. त्यांना वाटते की योग म्हणजे एक विशिष्ट प्रकारची पँट घालून फिरणे. ही एक प्रकारची फॅशन झाली आहे. पण नाही. योगाचा अक्षरशः अर्थ “ऐक्य किंवा मिलन” हा आहे. ऐक्य किंवा मिलन म्हणजे काय? आज तुम्ही जे शरीर धारण केलेले आहे, त्याला एक दिवस इतर कोणीतरी पुरून टाकतील किंवा जाळून टाकतील. जाळा किंवा पुरा, धूर किंवा धूर रहित, यापैकी कोणत्या ना कोणत्या मार्गानं पृथ्वीशीच तुमचं पुनर्मिलन होणार, हो ना?

सहभागी व्यक्ती: हो

सद्‌गुरु:अगदी आत्ता देखील, तुम्ही या पृथ्वीच्या आतून आलेलं पृथ्वीचंच एक छोटसं कोंब आहात. आपल्यात हालचाल करण्याची क्षमता निर्माण झाल्यामुळे तुम्ही तुमचे भान गमावून बसला आहात. तुम्हाला वाटलं जग म्हणजे ‘मीच’. पण जर तुम्ही एखाद्या झाडासारखे एकाच ठिकाणी जमिनीत अडकून राहिला असता, तर मी या पृथ्वीचाच एक भाग आहे हे तुम्हाला समजले असते, हो ना? पृथ्वीने तुम्हाला चालण्या, फिरण्याची मुभा काय दिली, किती बेदरकार, अहंकारी आपण बनलो आहोत! हे केवळ शारीरिक पातळीवर सत्य आहे असे नाही – हे संपूर्ण ब्रह्मांडाशी आणि तुमच्या प्रत्येक पैलूच्या दृष्टीकोनातून सत्य आहे.

योग शास्त्रासारखं जगात आणखी कोणतंच विज्ञान नाही जे मानवजातीला एवढ्या मोठ्याप्रमाणावर लागू होतं.

तर, योग म्हणजे ऐक्य (मिलन), आणि “ऐक्य” याचा अर्थ असा आहे की हे एक असे विज्ञान आहे जे तुमच्या व्यक्तित्वाच्या संकुचित, मर्यादित सीमा खोडून टाकते जेणेकरून तुम्ही आत्ता आहे त्याहून एक विशाल जीवन बनाल आणि अनुभवाल. तुम्ही एकतर या ठिकाणी एक संकुचित, मर्यादित जीवन जगू शकता किंवा एक अद्भुत, उत्साही जीवन जगू शकता. मर्यादित म्हणजे अगदी क्षुल्लक, हप्त्या हप्त्यानं होणारं. सध्या, बहुतांश लोकांचे जीवन असेच, अगदी क्षुल्लक होत चालले आहे. तुम्ही जर त्यांना विचारलत; तुमच्या जीवनातील सर्वोत्कृष्ठ क्षण कोणते? तर ते म्हणतील, “मी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर मला खूपच आनंदी झालो होतो.” त्यानंतर मी दूखीः होतो, मग मला नोकरी मिळाली आणि मी पुन्हा खूप आनंदी झालो, पण त्यानंतर सर्वांनी मला दूखीः केलं. त्यानंतर माझे लग्न झाले, तो फारच अदभूत क्षण होता, त्यानंतर माझी सासू आली आणि मग काय विचारता!” अशा रीतीने हे चक्र चालूच असतं. लोक त्यांच्या जीवनातील केवळ पाच महत्वाच्या घटना आठवू शकतात. तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण जर उत्स्फूर्त उत्साहाचा नाही आहे, तर ते एक अतिशय कुचकामी आयुष्य आहे.

आपणास जर उत्साही, आनंदी जीवन जगायचे असेल, तर एका मर्यादेपर्यंत तुमच्या व्यक्तित्वाच्या सीमा नष्ट होणे आवश्यक आहे. तेव्हाच, तुम्ही जीवनाचा अधिक व्यापक अनुभव घेऊ शकता आणि तुमच्या भोवताली घडणार्‍या सर्वसामान्य घडामोडींचा अधिक आनंद लुटू शकता. तुम्ही लहान असताना साबणाचे फुगे उडवले आहेत का?

सहभागी व्यक्ती: आम्ही आजही ते उडवतो, आम्ही अजूनही तरुणच....

सद्‌गुरु: अरे वा! तुम्ही लहान असताना साबणचे फुगे उडवले होते का?

सहभागी व्यक्ती: हो

सद्‌गुरु: समजा तुमचा फुगा फक्त एवढा मोठा झाला. पण इतर कोणाचा तरी फुगा तुमच्या फुग्यापेक्षा जरा अधिका मोठा. असे का? तुमच्याकडे सुद्धा हवेनी भरलेली फुफुस्से आहेत, तुमच्याकडे पण साबणाचं पाणी आहे, पण एका व्यक्तीचा फुगा मात्र खूप मोठा फुगतो. कारण तुम्हाला जर तुमच्या अस्तित्वाच्या सीमा विस्तारायच्या असतील, तर त्याप्रती फक्त इच्छा असणे ही महत्वाची गोष्ट नसून उपलब्ध असलेल्या सीमित शक्यतेत अधिकाधिक हवा बंदिस्त करणे महत्वाचे आहे. तेव्हाच तो तेवढा मोठा होऊ शकतो.

त्याचप्रमाणे, माझे शरीर आणि तुमचे शरीर वेगवेगळे आहे. आपले दफन होईपर्यंत, आपण सर्व त्याच मातीचा हिस्सा आहोत हे आपल्या लक्षात येत नाही. पण आत्ता ह्या क्षणी हे शंभर टक्के स्पष्ट आहे की हे माझे शरीर आहे, आणि ते तुमचे शरीर आहे, हे माझे मन आहे आणि ते तुमचे मन आहे. हे ते होऊ शकत नाही, आणि ते हे होऊ शकत नाही. परंतु माझे जीवन आणि तुमचे जीवन अस्तीत्वात असं काही नाहीये. इथे फक्त जीवन आहे. त्यापैकी किती तुम्ही किती आत्मसात करणार यावर तुमच्या जीवनाची व्याप्ती आणि स्तर अवलंबून आहेत, जीवनाबद्दल तुम्ही किती माहिती गोळा केली आहे यावर नाही. जीवन याप्रकारे अनुभवायचे असेल, तर सक्त झालेल्या तुमच्या व्यक्तिगत अस्तित्वाच्या सीमा तुम्ही लंघून पुढे जाणे आवश्यक आहे. जेव्हा या सीमा विरून जातात, तेव्हा तुम्ही योगामध्ये आहात असे आपण म्हणू शकतो. एखाद्या व्यक्तीला जेव्हा या सीमा विरून, वैश्विक ऐक्याचा अनुभव येतो, तेव्हा आपण त्या व्यक्तीला योगी असे म्हणतो. एखादी व्यक्ती सीमा लंघून किती पुढे जाऊ शकेल हे इतर अनेक पैलूंवर अवलंबून आहे, पण आपण किमान त्या दिशेने लक्ष केन्द्रित करून आपणच निर्माण केलेल्या या मर्यादांना कसे मोडून टाकता येईल या दृष्टीने एक शास्त्रशुद्ध प्रयत्न करणे आवश्यक आहे.

माझं संपूर्ण जीवनच योग आहे कारण माझ्यामधील आणि इतर सर्वांमधील ह्या सीमित मर्यादा पुसून टाकणे हेच माझं आयुष्य आहे.

तुमच्या सर्व सीमा ह्या तुम्हीच निर्माण केल्या आहेत, होय ना? तुम्ही ह्या सीमा निर्माण करतो, आणि मग त्याच सीमांचा तुम्हाला त्रास होऊ लागतो – हे कशा प्रकारचे जीवन आहे? जर निसर्गाने कोणती मर्यादा घालून दिली असेल आणि त्याचा तुम्हाला त्रास होत असेल, तर आपण ते समजून घेऊ शकतो. पण तुम्ही भिंती उभारून तुमच्या व्यक्तिगत सीमारेषांची तटबंदी निर्माण करता ते निव्वळ स्वरक्षणापोटी. स्वसंरक्षणासाठी बांधलेल्या या भिंतीच एक दिवस तुमच्यासाठी तुरुंगाच्या भिंती बनतात. तसे होऊ द्यायचे नसेल, तर तुम्हाला योगाची गरज आहे. “तर मग मी माझे शरीर वेडेवाकडे वळवावे का, मी अंग इकडेतिकडे वळवावे का, डोके खाली पाय वर करून मी उभे राहावे का?” नाही, योगाचा अर्थ अंग वेडेवाकडे पिळणे असा नाही. तुम्हाला जमेल आणि शक्य त्या पद्धतीने तुम्ही योगा करू शकता – श्वासोच्छवास करताना, चालत-फिरत असताना, बोलताना, वाचताना, झोपेत किंवा उभे असताना तुम्ही योग करू शकता. त्यासाठी कोणतीही विशिष्ट ठराविक कार्य-कृती, क्रियेची गरज नाही, तो जीवनाचा एक विशिष्ट आयाम आहे.

मला लोक विचारत असतात, “सद्गुरू, आपण किती तास योगासने करता?” मी सांगतो, “वीस सेकंद!” होय. वास्तविक हे खरंय. मी केवळ वीस सेकंदांची साधना करतो. मी सकाळी उठतो, आणि केवळ वीस सेकंद साधना करतो आणि मी तयार. म्हणजे मी दिवसाच्या इतर वेळी योगा करत नाही का? नाही! कारण मी योग जगतो कारण माझ्यातील आणि इतर सर्वांमधील सीमित मर्यादा सतत पुसून टाकणे हेच माझे आयुष्य आहे. हाच योगा आहे. आत्ता आपण या ठिकाणी जे काही करत आहोत, हा सुद्धा योगाच आहे.

संपादकीय टीप: कुठल्या वादग्रस्त मुद्द्याबाबत जर तुमच्या मनात वादळ उठत असेल, कुणीच ज्या बाबत बोलत नाही अश्या कुठल्या गोष्टीबद्दल जर तुम्ही गोंधळलेले असाल, किंवा असा कुठला प्रश्न तुमच्या मनाला सतावत आहे ज्याचं उत्तर कुणाकडेही नाही, तर हीच संधी आहे! सद्गुरूंना आपले प्रश्न विचारा, UnplugWithSadhguru.org वर.

Youth and Truth Banner Image