तरुणांमध्ये दारू आणि मादक (Drugs) पदार्थांचे सेवन का वाढतंय?
चित्रपट निर्देशक आणि स्क्रीन रायटर, नाग अश्विन सदगुरुंना विचारताहेत, तरुणांमध्ये दारू आणि मादक पदार्थांचे सेवन वाढत आहे. सदगुरू याचं विश्लेषण करताना म्हणतात, याची अनेक करणं आहेत ज्यामुळे तरुण याकडे ओढले जात आहेत आणि यावर काय उपाय केले जाऊ शकतात हे विशद करत आहेत.

नाग अश्विन: मला दारुचं वाढतं व्यसन आणी इतर व्यसनांबाबतचं सत्य जाणुन घ्यायचंय, माझ्या पिढीसाठी आणि तरुण पिढीसाठी. अगदी लहान मुलं, शाळॆतली मुल ही मादक पदार्थांचं सेवन करू लागली आहेत पळवाट म्हणून आणि हे अतिशय भीतीदायक आणी धोकादायक आहे. मला हे जाणुन घ्यायचंय की तुम्हाला काय वाटत की मुले याचा वापर का करत आहेत, आणि मला जाणून घ्यायचंय की यातून लोकांना बाहेर काढण्याचा सर्वोत्तम मार्ग, जास्त नैसर्गिक उपाय काय आहे?
सदगुरू: नमस्कार नाग! मला तुझ नाव आवडलं. कोब्रा मला नेहमीच प्रिय आहेत. आणि जर तुम्हाला हे माहितनसेल, की नागाच विषही एक नशा निर्माण करतं जर त्याचा एका विशेष प्रकारे वापर केला तर.
समाजात नशेची गरज का वाढतेय, याची कित्येक कारणॆ आहेत. एक मुलभुत गोष्ट ही आहे, की लोकांना आता जिवंत राहण्यासाठी संघर्ष करावा लागत नाहिये, समाजाचा एक खुप मोठा भाग आता जिवंत राहण्याच्या धडपडीतुन बाहेर पडलाय. जेव्हा लोक जगण्याचा संघर्षातुन बाहेर पडतात, त्यांनी दुसऱ्या आवडी आणि कराव्याश्या वाटणाऱ्या गोष्टी शोधायला हव्यात. जर असं घडल नाही, तर शारिरिक सूख आणि नशेची गरज स्वाभाविकपणॆ त्या समाजात वाढेल. म्हणुन हे फार महत्वाच आहे की जरी आई-वडील श्रीमंत असले तरी, एका ठराविक वयापर्यंत मुलांना त्या श्रीमंतीचा अनुभव मिळता कामा नये.
या संस्कृतीत, राजे-महाराजे सुद्धा आपल्या मुलांना गुरुकुलात पाठवत जिथे ते इतर मुलांसोबत शिक्षण घेत, जिथे प्रत्येकजण अतिशय मुलभुत गरजांसोबत राहायचा. कारण आवश्यक शिस्त, सहभाग, आणि जीवनाशी जवळिक कुणाच्याही आयुष्यात धन येण्यापुर्वी यायला हवी. नाहितर धन एक असं एक ओझं बनेल जे तुम्ही तुमच्या डोक्यावर. आणि या पिढीसोबत हेच घडतंय.
मुलांमध्ये लक्ष आणि कृतिशीलतेची कमतरता
एक कारण हे ही आहे, की आजकाल आई वडिल दोघे ही कामानिमित्त दिवसभर बाहेर असतात. लहान वयात, मुलाकडे जे लक्ष पुरवलं गेलं पाहिजे, ते त्याला मिळत नाहिये. त्यामुळे स्वाभाविकरित्या मुलांच लक्ष विचलित होत आहे. आणि त्यांच्यात पुरेशी शारिरिक कृती नाहीये. जर तुमच्याकडे शरीर स्वस्थ असल्याचा आनंद नसेल, तर तुम्हाला नशा करण्य़ातच आनंद मिळेल. जर तुम्ही तुमच्या शरिराच्या जिवंतपणाचा आणी उर्जेचा आनंद घेत नसाल, तर नशा हाच एकमेव उपाय उरतो. ड्रग्समुळॆ तुम्हाला फक्त नशाच चढत नाही, तर त्यांना काही तास ताजंतवानं झाल्याचाही अनुभव येतो. म्हणुन ही पिढी मोठ्या प्रमाणात त्या दिशेनं चालली आहे.
आणखी एक महत्वपुर्ण कारण ज्यामुळॆ ही पिढी ड्रग्सकडे ओढली जातेय, ते हे की त्यांना जी स्वर्गाची स्वप्न दाखवली होती, ती उद्ध्वस्त झाली आहेत. कदाचित हे त्यांना स्पष्टपणे व्यक्त करता येत नाहिये. त्यांच्याकडे हे सांगण्यासाठीची स्पष्टता किंवा धाडस नाहिये. पण दिर्घकाळापासुन आपण लोकांना हे सांगून थोपवून धरलं, की जर तुम्ही या गोष्टींपासुन दुर राहिलात, तर स्वर्गात तुम्हाला भरभरून या सर्व गोष्टी मिळतील… मोठ्या संख्येनं. आता स्वर्ग तर उद्ध्वस्त होतायत, म्हणुन ते इथेच पिण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, याचे…अशाप्रकारे
कित्येक पैलू आहेत. मुळात एका मनुष्याला आपल्या जीवनासाठी शारिरिक संघर्ष करण्याची गरज उरली नाहीये. हेच नशेची गरज वाढवतं.
आयुष्यातील इतर सुखं आनंदायला शिकूयात
यावर उपाय काय? हे अतिशय, अतिशय महत्वाच आहे की तुमच्यापैकी ज्यांची वाढती मुल आहेत, तुम्ही त्यांना खेळात सामिल करा, इतर गोष्टींमधे त्यांना गुंतवा ज्यानं ते निसर्गाशी जोडले जातील, जसं की, ट्रेकिंग, गिर्यारोहण, पोहणं . एखादी जोरदार शाररीक कृती आणि निसर्गाशी जवळिक. कला, संगीत, त्यांच्यात कोणत्या ना कोणत्या गोष्टिचं वेड असलं पाहिजे. त्यांनी सूख अनुभवावं, आपल्या बुद्धीच, आपल्या
भावनेचं, आपल्या चेतनेचं. जेव्हा व्यक्ती आनंद घेऊ लागतो, मनाच्या सुखाचा, बुद्धीच्या तीक्ष्णतेचा, भावनांच्या सुखाचा, आपल्या चेतनांच्या सुखाचा, तेव्हा, शरिराच्या सुखात डुंबणं , स्वाभाविकपणॆ खूपच कमी होऊन जातं.
म्हणुन हे खुप गरजेचं आहे की मुलांनी अनेक प्रकारच्या गोष्टी करायला हव्या. आणी खुप साऱ्या गोष्टींमध्ये उत्साहानं सहभाग घ्यायला हवा. हे दारू आणी ड्रग्सच्या गरजेला कमी करेल.
पण आपल्याला हे समजून घ्यायला हवं, आजकाल याची अतिशय जाहिराताबाजी सुरू आहे. आणि माफ करा, पण चित्रपट याचा प्रचार करत आहेत. सगळीकडे असं दर्शवलं जातं, जणू जोवर तुम्ही पित नाही, तुमच्या जगण्याला काही अर्थ नाही. लोक मला विचारतात, “सद्गुरू, तुम्ही पिता का?” मी म्हणतो ‘हो, मी पाणी पितो.’ ते मला अस पाहतात, जणू मी कुणी विचित्र प्राणी आहे. “फक्त पाणी?” हो, सर्वात ….सर्वात विलक्षण गोष्ट जी तुम्ही पिऊ शकता ती म्हणजे पाणी कारण हे शरीर पाण्यानं बनलंय, दारूनं नाही. हे शरीर सत्तर टक्के पाणी आहे, नक्कीच दारू नाहिये.
आपल्या आतील नशा
पण सर्वांपेक्षा, माझी केस वेगळी आहे, कारण मी आपल्या आत शोध घेतलाय की, कसा… हा सर्वात मोठा रासायनिक कारखाना आहे. जर तुम्हाला नशा हवीय, तर तुम्ही ती तुमच्या आत निर्माण करू शकता. एक अशी नशा जी तुम्हाला अगदी धुंद आणि जागरूक एकाच वेळेस बनवते. आपण आपल्या मुलांना आणी तरूणांना या नशेबद्दल सांगायला हवं. म्हणूनच आम्ही योगाचं तंत्रज्ञान प्रत्येकाच्या जीवनात आणण्याच्या प्रयत्नात आहोत. जर तुम्ही स्वत:मध्ये काही विशेष अवस्थांमध्ये गेलात, तर तुम्हाला अशी नशा चढेल जी कुठल्याही दारू किंवा ड्रग्जनं येणार नाही. त्याचबरोबर, तुम्ही पुर्णपणॆ जागरूकही राहाल आणि हे…. तुमचं आरोग्य आणि कल्याणामध्ये ही चमत्कार घडवुन आणेल.
वेळ आलीय की आपण टेक्नॉलॉजिकली आणखी उत्तम प्रकारे गोष्टी करायला हव्यात. आपल्याकडे अशा पद्धती आहेत की लोक आपल्या आत डोकावून जीवनातील सर्वात सूंदर सुखांना जाणुन घेऊ शकतात. आपण आपल्या तरूणांना याचा अनुभव करवुन द्यायला हवा. जोवर तुम्ही त्यांना पर्याय देणार नाही, ते पुन्हा बाटली आणी गोळ्य़ांकडे परत जातील.
सध्या, आरोग्यासाठी तुम्हाला रसायनांची गरज भासते. शांतीसाठी तुम्हाला रसायनांची गरज भासते, आनंदासाठी तुम्हाला रसायनांची गरज भासते. आपल्या आतमध्ये कुठल्याही अनुभवासाठी तुम्हाला रसायनांची गरज भासते. तर तुम्हाला समजून घ्यायला हवं, की जेव्हा एखादी पिढी असा रसायनांचा वापर करते, जेव्हा नव्वद टक्के लोक औषधं आणि इतर प्रकारच्या रसायनांचा वापर सुरु करतात, तेव्हा आपण जी
नवी पिढी निर्माण करू, ती कित्येक बाबतीत आपल्यापेक्षा कमी असेल.
हा मानवजातीविरुद्ध अपराध आहे. आपल्या सर्वांना आता जागं व्हायला हवं आणि ज्याची गरज आहे ते करायला हवं.
संपादकीय टीप: कुठल्या वादग्रस्त मुद्द्याबाबत जर तुमच्या मनात वादळ उठत असेल, कुणीच ज्या बाबत बोलत नाही अश्या कुठल्या गोष्टीबद्दल जर तुम्ही गोंधळलेले असाल, किंवा असा कुठला प्रश्न तुमच्या मनाला सतावत आहे ज्याचं उत्तर कुणाकडेही नाही, तर हीच संधी आहे! सद्गुरूंना आपले प्रश्न विचारा, UnplugWithSadhguru.org वर