प्रश्नः नमस्कारम सद्गुरु, मला प्रामाणिक आणि सरळ राहायचे आहे. परंतु मला असे दिसत आहे की जे लोक धूर्त असतात ते भौतिक जगात सर्व गोष्टी वेगाने मिळवतात. मग मी त्याबद्दल काय करावे?

सद्गुरु: तुमच्या कामाचे स्वरूप काय आहे, तुम्ही कोणत्या प्रकारच्या व्यवहारामध्ये सहभागी आहात हे आम्हाला माहित नाही. काही व्यवहारांमध्ये धूर्तपणा हेच नितीतत्व आहे. समजा तुम्ही दोन राष्ट्रांमधील वाटाघाटीत सहभागी आहात. तर सरळ असून काम चालणार नाही. धूर्तपणा हाच नियम आहे,नाही का? हे नेहमीच दुसऱ्यावर मात करण्याबद्दल आहे. ही योग्य गोष्ट आहे की चुकीची? हा निर्णय मी किंवा तुम्ही ठरवू शकत नाही. ही आपल्या काळाची वास्तविकता आहे.

जीवन का उदरनिर्वाह?

मी धूर्त असल्यास, मी यशस्वी होईल? प्रयत्न करा आणि पहा. तुम्ही संकटात पडू शकता. काही मर्यादा ओलांडल्यास तुम्ही कदाचित तुरूंगात जाऊ शकता. तुम्ही तुरूंगात गेला नाहीत, तर इतर लोकांपासून दूर जाऊ शकता. तुम्ही इतर कोठेही प्रयत्न करण्यापूर्वी, तुमच्या कुटूंबामध्ये प्रयत्न करून पहा. सुरक्षित वातावरणात प्रयोग करणे चांगले! दररोज, त्यांना काहीतरी फसवून पहा. काही काळ, ते फसवले जातील आणि तुम्हाला काही गोष्टी मिळतील. काही काळानंतर जेव्हा त्यांना कळेल की तुम्ही काय करीत आहात - जे त्यांना कळेलच - तुम्हाला हळूहळू हे समजेल की; आता तुम्ही या कुटूंबाचे घटक नाही. ते कदाचित तुम्हाला काही काळ सहन करतील परंतु तुम्हाला कधीच समाविष्ट करणार नाहीत. जर तुम्ही काही मर्यादा ओलांडत असाल तर तुमच्याबरोबर काय करावे लागेल, हे त्यांना ठाऊक आहे.

जेव्हा देण्या-घेण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही खूप चलाख असल्यास तुम्ही अधिक घेऊ शकता.

विश्वासाच्या वातावरणाची निर्मिती-- प्रत्येकामध्ये हा आत्मविश्वासाची निर्मिती की, “तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. कदाचित तुमचा माझ्या निर्णयावर विश्वास नसेल, परंतु तुम्ही माझ्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवू शकता"- जर तुम्ही हे निर्माण केले तर तुम्ही ज्या समाजात राहाल त्या समाजात तुमचे जीवन सुकर होईल. कदाचित तुम्ही एखाद्यापेक्षा कमी पैसे कमवाल, परंतु तुमचे आयुष्य सहजसुंदर होईल. अन्यथा,बऱ्याच गोष्टी तुमच्या मागे लागतील.

जेव्हा देण्या-घेण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही जर थोडे जास्त हुशार असाल तर तुम्ही अधिक घेऊ शकता. काही लोक,त्यांच्या अत्याधिक हुशारीने, एखाद्यापेक्षा चांगले आयुष्य उभे करू शकतात. तुमचे जीवनमान चांगले होईल. पण ते कधी ‘जीवन’ होणार नाही. सुखाच्या काळातल्या लोकांचे, तुम्हाला माहित आहे काय होते! त्यास बळी पडू नका.

जीवनाची सहजता जाणून घ्या

जेव्हा तुम्ही खोटे बोलता, जेव्हा तुम्ही फसवणूक करता तेव्हा तुम्ही काही पैसे कमवू शकता - मी त्यावर आक्षेप घेत नाही - परंतु तुम्हाला किती प्रयत्न मनात करावे लागतात याचा विचार केला तर ते फायदेशीर नाही. समजा, एखाद्या गोष्टीची तुम्ही एकाला एक आवृत्ती, दुसर्‍याला दुसरी आवृत्ती आणि तिसर्‍या व्यक्तीला तिसरी आवृत्ती सांगितली तर तुमच्या मनात किती अतिरिक्त काम करावे लागेल हे तुम्हाला माहिती आहे काय? जर तुम्हाला जीवनाची सहजता जाणून घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्याभोवती एक विश्वासार्ह वातावरण राखणे महत्वाचे आहे. अन्यथा आयुष्य खूप गुंतागुंतीचे होते आणि काही वेळाने बरेच लोक वेडे होतात.

प्रेम प्रकरणात, तुम्ही शक्य ते सर्व काही देता. तुम्हाला काही मिळेल की नाही याचा तुम्ही अजिबात विचार करत नाही

अलिकडच्या काळात भारतामध्ये विलासी जीवनशैली जगणारे बरेच लोक एकतर तुरुंगात आहेत किंवा इकडे-तिकडे लपले आहेत. एकेकाळी लोकांना वाटत होते की ते छान जगत आहेत - आता नाही. या गोष्टी तुम्हाला पकडतील. जरी बाह्य जगात तुम्ही पकडले गेला नाहीत,जरी बाह्यजग तुम्ही नीटपणे ताब्यात ठेवले तरीही आतून ते तुम्हाला गाठेल.

तुमच्या मनातील ही अनावश्यक अतिरिक्त क्रिया तुम्हा स्वतःला त्रास देईल. तुमचे संपूर्ण जीवन एक व्यवहार होईल. याचा अर्थ तुम्ही एक बाजार आहात. बाजारपेठ हे चांगले ठिकाण नाही. कदाचित तेथे नफा असेल, परंतु हे एक सुंदर ठिकाण नाही कारण मी कसे कमी देऊ शकतो आणि अधिक घेऊ शकतो याबद्दल आहे. हे प्रेम प्रकरण नाही. प्रेम प्रकरणात, तुम्ही शक्य ते सर्व काही देता. तुम्हाला काही मिळेल की नाही याचा तुम्ही अजिबात विचार करत नाही. आणि यात उदात्तता आहे. यात जीवन आहे.

आयुष्याला काही निष्कर्ष नाही

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुमचा जीवनाचा अनुभव किती खोलवर आहे? तुम्ही तुमच्याकडे किती जमवले आहे, ते मेल्यावर बरोबर घेऊन जाता आले तर उपयोग. मी लंडनमध्ये बोलत होतो, एक प्रभावशाली लोकांचा गट तेथे होता. मी दीड-दोन तास बोलल्यानंतर एक माणूस म्हणाला, “हे सर्व ठीक आहे, पण यात संदेश काय घ्यायचा आहे?” मी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणालो,“तुमच्या आयुष्याच्या शेवटी,जो काही निष्कर्ष आहे, तोच या मधे आहे.”

जीवनाचा कोणताही निष्कर्ष नाही. तुम्हाला या जीवनाचा स्पर्श झाला आहे की नाही? तुम्हाला अति कोमलतेचे अश्रू माहित आहेत? तुम्हाला प्रेम माहित आहे का?

भारतातील काही समुदायांमध्ये, दफन करताना एखाद्याचे वजन सुमारे पन्नास किलो असेल तर शरीराच्या खाली आणि शरीरावर शंभर किलो मीठ ठेवतात; जेणेकरुन सर्व हाडे विरघळली जाऊन लवकरात लवकर मातीत मिसळून जातील. पण पाश्चात्य समाजात लोक त्यांना शवपेटीत ठेवतात, जेणेकरुन किडे त्यांना आतून खाऊ शकतील! त्यांना विलीन होण्याची इच्छा नाही. प्रथम,लाकूड नष्ट होणे आवश्यक आहे. याला बराच वेळ लागेल. आजकाल हे रासायनिक उपचार केलेले लाकूड वापरतात,त्यामुळे बऱ्याच वेळा ते कधीच नष्ट होणार नाही. विशेषत: तुम्ही स्वत: साठी सोन्याची शवपेटी तयार केली तर तुम्ही कधीही विलीन होणार नाही. आणि नक्कीच,काही काळानंतर कोणीतरी ती चोरेल आणि तुमचे अवशेष इकडे तिकडे फेकून देईल!

जीवनाबद्दल खूप धूर्त होऊ नका. तुम्हाला कोणापेक्षा दहा रुपये अधिक मिळाले,पण जर तुम्ही जीवनाकडे दुर्लक्ष केले; तर मला असे वाटत नाही की ती हुशारी आहे. तुम्ही इतर कोणापेक्षा जास्त सोन्याच्या साखळ्या घातल्या,परंतु तुम्ही जीवनातल्या महत्वाच्या गोष्टी गमावल्या, तर यामध्ये काहीच हुशारी नाही. ही सर्वात मूर्खपणाची गोष्ट तुम्ही कराल.

जीवनाचा कोणताही निष्कर्ष नाही. तुम्हाला या जीवनाचा स्पर्श झाला आहे की नाही? तुम्हाला अति कोमलतेचे अश्रू माहित आहेत का? तुम्हाला प्रेम माहित आहे का? तुम्हाला आनंद माहित आहे का? तुम्हाला परमानंद माहित आहे का? सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुम्ही हे सर्व घडवून आणणारा सर्वात आतला गाभा ज्ञात आहे काय?

संपादकाची टीप: सद्गुरूंच्या “महत्वाकांक्षा ते दृष्टी” या पुस्तकात समावेशक अर्थशास्त्राबद्दल अंतर्दृष्टी आणि मानवी कल्याणसाठी व्यवसाय तयार करण्याबद्दल अधिक माहिती मिळवा. इ-बुक आणि अमेझोन वर उपलब्ध.