सद्गगुरु: पौराणिक कथांनुसार, कैलास पर्वताचा परिसर म्हणजे शंकराने प्रत्यक्ष निवास केला असू शकेल ते ठिकाण. जेंव्हा आपण कैलासाविषयी बोलतो, तेंव्हा त्याला तीन आयाम आहेत. एक म्हणजे या पर्वताचे केवळ अस्तित्व आणि त्याची प्रचंड उपस्थिती. दुसरे म्हणजे या ठिकाणी प्रचंड प्रमाणात उपलब्ध असलेले ज्ञानभांडार. तिसरे म्हणजे कैलासाचा स्त्रोत, जो सुद्धा येथे अस्तीत्वात आहे.

कैलास – दृश्यमान सौंदर्यापलीकडील त्याची उपस्थिती

 

हिमालयीन पर्वतरांगांमध्ये कितीतरी अशी शिखरे आहे जी कैलासापेक्षा कित्येक पट अधिक मोठी आणि अधिक सुंदर आहेत. 24000 फुटांपेक्षा अधिक उंच असलेली शंभराहून अधिक शिखरे हिमालयामध्ये आहेत. विशेषतः, जर लोकं भारताच्या विशिष्ट भागातून चालत गेली, तर त्यांच्या मार्गात त्यांना माऊंट एव्हरेस्टचे सुद्धा दर्शन होईल. त्यानंतर आकार आणि भव्यतेच्या संदर्भात पाहण्यासारखे आणखी काहीही शिल्लक राहत नाही.

म्हणजेच आपण नैसर्गिक सौंदर्याचा आनंद लुटायला कैलास पर्वतावर जात नाही. परंतु लोकांनी ते शिखर ओळखले आणि ते त्या विशिष्ट शिखरावरच ते गेले, आणि त्या पर्वतरांगांमधील इतर कोणत्या अधिक उंच शिखरांवर ते गेले नाहीत, कारण कैलासाची उपस्थितीच अफाट आणि अतिभव्य आहे.

 

असे समजू, की तुम्ही एक लहान मूल आहात ज्याला बाराखडीतील फक्त पहिली तीन अक्षरे माहिती आहेत, अ,ब,क. नंतर तुम्हाला कोणीतरी एका प्रचंड वाचनालयात घेऊन जाते जिथे लाखो पुस्तके ठेवलेली आहेत. तुम्ही कित्येक पुस्तकांवर “अ” अक्षर पाहिलेत. त्यानंतर कित्येक पुस्तकांवर “ब” अक्षर पाहिलेत, आणि त्यानंतर कित्येक पुस्तकांवर “क” अक्षर पाहिलेत. कोट्यवधी अक्षरे असलेली लाखो पुस्तके. तुम्ही भारावूनच जाल! कैलासाचा अगदी तसाच अनुभव येतो.

तुमचे सगळे लक्ष जर कैलासाला तुमच्या दोन बोटांमध्ये “पकडून” फोटो घेण्यातच असेल, तर तुम्ही कदाचित ते चूकवू शकाल. अन्यथा, कोणीही त्याची उपस्थिती चुकवू शकत नाही. तो अतिभव्य आहे.

त्या ठिकाणी असलेल्या भव्य उपस्थितीच्या अनुभवाची जाणीव प्रत्येकाला होऊ शकते. जर तुम्ही कैलासासोबत सेल्फी घेण्यात सदैव मग्न झालेले नसाल, तर तुम्ही ते चुकवूच शकत नाही. तुमचे सगळे लक्ष जर कैलासाला तुमच्या दोन बोटांमध्ये “पकडून” फोटो घेण्यातच असेल, तर तुम्ही कदाचित ते चूकवू शकाल. अन्यथा, कोणीही त्याची उपस्थिती चुकवू शकत नाही. तो अतिभव्य आहे.

आणि तरीही तो तुम्हाला चुकवायचा असेल, म्हणजे समजा एका खोलीत हवा सदैव असतेच. तुम्ही केवळ अजाणतेपणे श्वास घेत असता, आणि तरीही ती तुम्हाला जीवंत ठेवते आणि तुमचे पोषण करते. पण तुम्ही जर लक्षपूर्वक श्वास घेतलात, तर तुम्हाला वेगळा अनुभव येतो. किंवा तुम्ही आज रात्रीच्या जेवणात वेगळा प्रयोग करून पाहू शकता. थोडेसे खूप पोषणमूल्य असलेले अन्न घ्या, ते व्यवस्थित घुसळून घ्या आणि सराळ्याच्या मदतीने एक लीटरभर अन्न तुमच्या घशात ओता. त्याने तुमच्या पोषणाची काळजी घेतली जाईल, परंतु तुम्ही अन्नाच्या चवीचा आणि सौंदर्याचा अनुभव घेऊ शकणार नाही. कैलासात हे असं तुमच्या सोबत घडू शकतं. पोषण काही केल्या होईल यात शंका नाही पण त्याची चव चाखणे छान असतं.

ज्ञान आणि आकलनाचे विशाल ग्रंथालय

Sadhguru's Poem "Kailash" | The Three Dimensions of Kailash

 

त्याचे दुसरे परिमाण हे आहे, की त्याठिकाणी ज्ञानाचा अमर्याद साठा उपलब्ध आहे. तुम्ही वाचनालयामुळे भारावून जाता, परंतु तुम्हाला जर ती पुस्तके वाचायची असतील, तर ती वेगळी गोष्ट आहे. अगदी इंग्रजी भाषा योग्यरित्या शिकण्यासाठी सुद्धा, थोडेसे आकलन करून घेण्यासाठी – प्रभुत्व नाही – भाषेचे थोडेसे आकलन करून घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला दहा, पंधरा वर्षे लागली. तुम्हाला जर कैलासावरील ज्ञानापर्यन्त
पोहोचायचे असेल, तर त्यासाठी अत्यंत वेगळ्या स्वरुपाच्या तयारीची आणि सहभागाची आवश्यकता असते.

काही दिवसांपूर्वी, कोणीतरी मला विचारले होते, “एखाद्या सामान्य माणसाला कैलास पर्वताची अनुभूती होण्यासाठी काय करावे लागते?” तुम्ही जर खरोखरच एक सामान्य माणूस असाल, तर तुम्हाला त्याची अनुभूती करून घेणे खरच खूप सोपे आहे.

काही दिवसांपूर्वी, कोणीतरी मला विचारले होते, “एखाद्या सामान्य माणसाला कैलास पर्वताची अनुभूती होण्यासाठी काय करावे लागते?” तुम्ही जर खरोखरच एक सामान्य माणूस असाल, तर तुम्हाला त्याची अनुभूती करून घेणे खरच खूप सोपे आहे. तुम्ही सामान्य माणसाची काय व्याख्या करता ते मला माहिती नाही. तुम्ही कधी कोठे सामान्य माणूस पाहिला आहे का? तुम्ही सामान्य मनुष्य आहात असे तुम्ही तुमच्या पत्नीसमोर सांगू शकाल का?

तुम्ही खरोखरच जर सामान्य मनुष्य असाल, तर मी ते तुमच्याआत ओतून देईन – ते खूप सोपे आहे. सामान्य म्हणजे तुम्हाला काहीही माहिती नाही. पण तुम्ही त्या प्रकारचे नाही. तुम्ही खूप चालाख आहात – किमान तुम्ही तसा विचार करता, इतरजण तसा विचार करत असतील किंवा नाही. प्रत्येक व्यक्ती त्याच्या छोट्याश्या क्षेत्रात स्वतःला खूप चालाख समजते. कोणीतरी त्याच्या छोट्या घरात चालाख असते. कोणा दुसर्‍या व्यक्तीची सीमा कदाचित आणखी थोडी मोठी असू शकते, पण प्रत्येकजण स्वतःला विशेष मानतो. साधा सामान्य माणूस कोठेही नाही.

तुम्ही जर खरच बुद्धीमान असाल, आणि तुम्ही तुमच्या भोवताली असलेल्या गोष्टींकडे लक्षपूर्वक पाहिलेत – केवळ एका फुलाकडे किंवा पानाकडे – तर तुम्हाला समजेल की तुमची बुद्धी किती लहान आहात ते.

आपण खरोखरच जर, पर्वतांमधून ओढून ताणून किंवा आणखी काही प्रकारांनी एखादा सामान्य मनुष्य निर्माण केलेच, आपण जर त्यांना येवढे सामान्य बनवू शकलो की तुम्ही त्यांना जे काही सांगाल, ते ऐकायला ते तयार होतील, तर मग आपण हे त्यांच्याआत ओतू शकतो.

नाहीतर मग ते खरोखरच अतिशय बुद्धीमान असायला हवेत. कोणा दुसर्‍या व्यक्तीच्या तुलनेत बुद्धिमान नाही. चालाखी नेहेमीच तुलनेमध्ये असते. जेंव्हा आपण असे म्हणतो, “तुम्ही चालाख आहात,” तेंव्हा त्याचा अर्थ असा होतो की तुमच्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींपेक्षा तुम्ही थोडेसे वरचढ आहात. चालाखीला काहीही महत्व नाही. चालाखी तुम्हाला थोडे पैसे कमवायला आणि समाजात ताठ मानेने जगायला उपयोगी
पडेल, पण जीवनाच्या दृष्टीने ती निरर्थक आणि निरुपयोगी आहे.

बुद्धीमान म्हणजे तुलनेच्या शोधात जाणे नाही. बुद्धीजवळ तुलनेसाठी वेळही नसतो आणि त्यामध्ये रससुद्धा नसतो, कारण बुद्धिला याची जाणीव झालेली असते की ती किती क्षुल्लक आहे. तुम्ही जर खरच बुद्धीमान असाल, आणि तुम्ही तुमच्या भोवताली असलेल्या गोष्टींकडे लक्षपूर्वक पाहिलेत – केवळ एका फुलाकडे किंवा पानाकडे – तर तुम्हाला समजेल की तुमची बुद्धी किती लहान आहात ते. मर्यादा ओळखणे हे बुद्धीचे स्वरूप आहे.

एक सामान्य मनुष्य हा बुद्धीमान मनुष्य असतो कारण तुम्ही जर तुमच्या भोवताली असलेल्या सर्व गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष दिलेत, तर तुम्हाला कळेल, की एक साधे पान किंवा फूल, किंवा वाळूचा एखादा कणसुद्धा तुम्ही स्वतःला जितके बुद्धीमान समजता, त्यापेक्षा अधिक बुद्धीमान असतो. आणि म्हणून तुम्ही सर्वसामान्य बनता.

कैलासाचा स्त्रोत

 

तिसरा आयाम म्हणजे कैलासाचा स्त्रोत. आणि तो सुद्धा त्यात उपस्थित आहे. पण ते खूप सूक्ष्म आहे. तुमच्याकडे जर अतिशय उच्च पातळीवरील कटिबद्धता असेल, शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि उर्जात्मक – तर तुम्ही जो कैलासाचा स्त्रोत आहे त्याला स्पर्श करू
शकता. कैलासाचा स्त्रोत एखादी रिकामी जागा किंवा पोकळी सारखा आहे – तो निरंतर तिथे उपस्थित असतो. 

तुम्ही जर वरती आभाळाकडे पाहिलेत, तर तुम्हाला चंद्र आणि चांदण्या दिसतात, पण बहुतांश लोकांना त्यामधील पोकळी दिसत नाही जी अवकाशातील अनंत, महाकाय उपस्थिती आहे. नव्याणव टक्के ब्रम्हांड रितं आहे पण बहुतांश लोकांच्या ते कधीच लक्षात येणार नाही. ते त्याला अनुभवू शकत नाहीत कारण ते खूपच सूक्ष्म आहे.

जर तुमच्या आत अतिशय उच्च पातळीची सत्यनिष्ठता असेल - शारीरिक, मानसिक आणि उर्जात्मक – तर तुम्ही जो कैलासाचा स्त्रोत आहे त्याला स्पर्श करू शकता.

ते खूपच सूक्ष्म आहे, परंतु ती एक शक्यता आहे, कारण तिला कार्यक्षमतेची आवश्यकता नाही. त्यासाठी फक्त सत्यनिष्ठतेची आवश्यकता आहे. एका निश्चित स्वरूपाची शारीरिक, मानसिक आणि ऊर्जात्मक सत्यनिष्ठता. ऊर्जेची सत्यनिष्ठता थोड्याशा कालावधीत निर्माण होणे शक्य नाही. त्यासाठी एका निश्चित प्रमाणातील कार्यकृतीची गरज असते. परंतु तुम्ही शारीरिक आणि मानासिक सत्यनिष्ठता थोड्या दिवसांमध्येच निर्माण करू शकता. त्यासाठी केवळ काही सोप्या गोष्टी कराव्या लागतात.

तुम्ही जर कैलासावर जात असाल, तर त्या काही दिवसात, तुम्ही दिवसभरात किती वेळ खाता याकडे लक्ष द्या. किती वेळा खायचे ते तुम्ही ठरवा, आणि त्यादरम्यान काहीही खायचे नाही. आणि तुम्हाला केंव्हा बोलायचे आहे किंवा फोन पाहायचा आहे त्याची वेळ निश्चित करा. तुम्ही जर ते सर्वस्वी बंदच केलेत, तर फारच छान. अन्यथा तुमच्या आवश्यकतेनुसार ती वेळ ठरवून घ्या.

तुम्ही गप्प राहू न शकणे हे अनिवार्य आहे. तुम्हाला त्याच त्याच वेडगळ गोष्टी पुन्हा पुन्हा बोलाव्या लागतात. किमान तुम्ही जेंव्हा कैलासाकडे निघालेले असता, तेंव्हा या सर्व गोष्टी बाजूला ठेवा. शांतपणे एका ठिकाणी बसून रहा, नामस्मरण करा, एकाग्र व्हा, तुमच्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक गोष्टीप्रती सतर्क व्हा, कारण तुमच्या प्रणालीला त्यासाठी तयार व्हायचे आहे. अन्यथा सर्वकाही तुम्ही मुकाल.

ही ऊर्जा, जिला आपण कैलास असे म्हणतो, ती एक प्रचंड मोठी शक्यता आहे.

ही ऊर्जा, जिला आपण कैलास असे म्हणतो, ती एक प्रचंड मोठी शक्यता आहे. “मी अन्नग्रहण न करणे गरजेचे आहे का, सद्गगुरु? मी तीन दिवस काहीही खाणार नाही!” तर मग तुम्ही परत येऊच शकणार नाही! मुद्दा तो नाहीये. तुम्ही ठरवा अन्नग्रहण करण्यासाठी तुम्ही दिवसातून किती वेळा तोंड उघडणार आहात, आणि बोलण्यासाठी तुम्ही दिवसातून किती वेळा तोंड उघडणार आहात. तुम्हाला जर दिवसातून तीन वेळा भोजन करायचे असेल, तर त्या तीन वेळा निश्चित करा – चौथी वेळ नको. वेळ कोणती निवडायची ते तुमच्या पसंतीनुसार असेल, पण ती निश्चित करा. ठरवणे आणि तुम्ही ठरवले आहे त्याप्रमाणे वागणे, “मी ते करीन” हा प्रामाणिकपणा आहे. दिवसातून केवळ एका वेळेस अन्नसेवन करणे, किंवा पाच वेळा अन्नसेवन करणे, यात प्रामाणिकपणा नाही, तर “मी ती वेळ निश्चित करीन आणि त्याचप्रमाणे वागेन” यात प्रामाणिकपणा आहे..

मी शिस्तीबद्दल बोलत नाहीये. तुम्ही जे ठरवता त्याप्रमाणे वागा - हि सत्यनिष्ठता आहे. मी सामाजिक सत्यनिष्ठतेविषयी बोलत नाहीये, मी शारीरिक आणि मानसिक सत्यनिष्ठतेबद्दल बोलतोय. ती बाणलीच पाहिजे. तेव्हाच एखादी व्यक्ती समर्थ होते काही वेगळं असं अनुभवण्यासाठी आणि स्पर्शिले जाण्यासाठी.

Editor’s Note: Kailash Sacred Walks, a program by Isha Sacred Walks, offers you a once-in-a-lifetime opportunity of embarking on this journey to Kailash Manasarovar. Learn more at sacredwalks.org