साधक सद्गुरूंना विचारतो: "तंत्र म्हणजे काय?" सद्गुरू तांत्रिक परंपरेकडे पाहतात आणि गुरू-शिष्य नातेसंबंध कसे निश्चितपणे भावनोत्कट असू शकतात,परंतु लैंगिक नव्हे, हे स्पष्ट करतात.

प्रश्न: तंत्र म्हणजे नक्की काय?असे म्हटले जाते की तांत्रिक परंपरेत, जेव्हा गुरु आणि शिष्य यांच्यातील संबंध घनिष्ट आणि पवित्र होतात, तेव्हा एक जवळीक असू शकते जी लैंगिक देखील असू शकते. कृष्ण-गोपी परंपरेनुसार प्रेमळ शिष्य-गुरु आकर्षण लैंगिक मिलन म्हणून प्रकट होऊ शकते. तर तंत्र खरोखर काय आहे आणि ते आपल्या लैंगिकतेशी कसे संबंधित आहे?

सद्गुरु: दुर्दैवाने, पाश्चात्य देशांमध्ये तंत्र अशा प्रकारे सादर केले जात आहे की याचा अर्थ अनिर्बंधित लैंगिक संबंध असा निघतो. याचा इतक्या वाईटपणे चुकीचा अर्थ काढला गेला आहे. याचे कारण असे आहे की तंत्रयोगावर पुस्तके अशा लोकांनी लिहिलेली आहेत ज्यांना फक्त पुस्तके विकायची आहेत. ते कोणत्याही प्रकारे तांत्रिक नाहीत.

तंत्र म्हणजे काय?

“तंत्र” या शब्दाचा शाब्दिक अर्थ कौशल्य किंवा तंत्रज्ञान आहे. हे एक आंतरीक तंत्रज्ञान आहे. या व्यक्तिनिष्ठ पद्धती आहेत, वस्तुनिष्ठ नाहीत. परंतु समाजातील सध्याच्या समजुतीनुसार, "तंत्र" हा शब्द अगदी अपारंपरिक किंवा सामाजिकरित्या न स्वीकारल्या जाणार्या पद्धतींचा आहे. हे असे आहे की विशिष्ट पैलू विशिष्ट प्रकारे वापरले जातात. हे योगापेक्षा काही वेगळे नाही. हे योगाचे एक अंग आहे ज्याला तंत्र योग म्हणतात.

“मला लैंगिक गरजा आहेत म्हणून मी तांत्रिक मार्गाचा अवलंब करीन,” या दृष्टीने लोकांनी विचार करणे हे मूर्खपणाचे आहे.

मानवी यंत्रणा ही तीन प्रकारच्या शरीरांची एक संमिश्र घटक आहे - भौतिक शरीर- खाल्लेल्या अन्नाचा संग्रह; मानसिक शरीर - आज्ञावली आणि स्मृतीचा भाग जो विशिष्ट मार्गांनी व्यक्तींकडून कार्य करवतो; आणि उर्जा शरीर - मूलभूत- ज्यावर हे दोन ठेवले गेले आहेत. यापलीकडे जे आहे ते अभौतिक आहे.

शरीर आणि मनाचे सक्तीचे आणि चक्रीय गुणधर्म अधिक उच्च शक्यतांसाठी अडथळे प्रस्तुत करतात. तंत्र म्हणजे पलीकडे जाणे, जेणेकरून शरीर आणि मन यांची सक्ती आपल्याला आपल्या मर्यादेत अडकवत नाही. हे म्हणजे आपले शरीर वापरण्यास शिकणे आहे. आपल्या स्वतःच्या रूपात नाही, तर या जीवाला शक्य तितक्या उच्च परिमाणापर्यंत पोहोचवण्यासाठी, एक पायरी म्हणून.

तंत्रयोग: वरच्या बाजूने स्फोट

तंत्र योग म्हणजे काय?

तंत्र हे अनिर्बंधित लैंगिकतेबद्दल नाही, जसे बरेच जण गृहीत धरतात. लैंगिकता ही आपल्या शरीरात भिनलेली एक मूलभूत सहजप्रवृत्ती आहे, प्रजाती टिकवून ठेवणे सुनिश्चित करण्यासाठी. ही मूलभूत गरज आहे. त्याच वेळी एखाद्याला याच्या मर्यादा ओळखता आल्या पाहिजेत की ज्या पलीकडे ती आपल्याला घेऊन जाणार नाही. फक्त मर्यादा ओळखल्यानंतर आणि इतर आयामांना स्पर्श करण्याची तळमळ येते, तेव्हा योग आणि तंत्र दोन्ही समर्पक बनतात.

“मला लैंगिक गरजा आहेत म्हणून मी तांत्रिक मार्गाचा अवलंब करीन,” या दृष्टीने लोकांनी विचार करणे हे मूर्खपणाचे आहे. तंत्रांमध्ये असे नाही की कोणी आपली वृद्धी करण्यासाठी फक्त लैंगिकता वापरत आहे. ते वृद्धी करण्यासाठी प्रत्येक पैलू वापरत आहेत. दुर्दैवाने असे लोक असू शकतात जे चुकीच्या कारणांमुळे अशा मार्गाकडे आकर्षित झाले. ते तिथे जातात कारण त्यांना त्यांच्या लैंगिकते साठी अध्यात्मिक मंजुरी हवी असते. तुम्ही स्वतःला अध्यात्मिकतेविषयी भ्रमात का ठेवू इच्छिता? तुमची जैविकता जैविकता म्हणून हाताळा. त्याला इतर काही नाव देण्याची तुम्हाला आवश्यकता नाही.

लैंगिकतेच्या गरजा त्या उद्देशाने त्या समूहात किंवा बाहेर संबंध बनवून पूर्ण केल्या जाऊ शकतात. लैंगिक आसक्ती पूर्ण करण्यासाठी अध्यात्मिक प्रक्रिया वापरणे निंदनीय आणि बेजबाबदारपणाचे आहे. यामुळे विविध प्रकारचे नुकसान होऊ शकते कारण तांत्रिक प्रक्रिया केवळ व्यक्तिगत अध्यात्मिक वाढीसाठीच नव्हे तर बऱ्याच लोकांच्या भल्यासाठी व त्यांच्यातील इतर संभाव्यतेसाठी एक ऊर्जायुक्त जागा तयार करण्यासाठी देखील वापरली जाते.

लैंगिकतेच्या विपरीत, जी ऊर्जा प्रणालीच्या खालच्या भागात व्यक्त होऊ पाहते, तंत्र हे ऊर्जा प्रणालीच्या सर्वोच्च असलेल्या कारंज्यारुपी उगमस्त्रोताशी आपल्या ऊर्जांची बांधणी करण्याबद्दल आहे.

तंत्र योगाचे साधे तत्त्व आहे: जे तुम्हाला खाली आणू शकते तेच तुम्हाला वरही नेऊ शकते. मनुष्य आयुष्यात ज्या मार्गांनी बुडतो ते म्हणजे अन्न, मद्यपान आणि लैंगिकता याद्वारे. तंत्र योग हीच तीन वाहने वर येण्यासाठी वापरते. लैंगिकतेच्या विपरीत, जी ऊर्जा प्रणालीच्या खालच्या भागात व्यक्त होऊ पाहते, तंत्र हे ऊर्जा प्रणालीच्या सर्वोच्च असलेल्या कारंज्यारुपी उगमस्त्रोताशी आपल्या ऊर्जांची बांधणी करण्याबद्दल आहे, जेणेकरून आपल्या ऊर्जा वरच्या बाजूने उतू जातात. शरीरातील वेगवेगळ्या ऊर्जा अभिव्यक्तींपैकी- जी 114 चक्रे म्हणून ओळखली जातात- सर्वात वरच्या तीन मधून ऊर्जा गळती होणे सर्वोच्च मानले जाते. तुम्हाला जर अशी रचना करायची असेल तर लैंगिक वृत्ती, भावना, बुद्धी आणि जगण्याची प्रक्रिया यांसह प्रत्येक मूलभूत वृत्तींचा उपयोग या प्रणालीच्या बांधणीसाठी आणि वृद्धीसाठी केला जाणे आवश्यक आहे. उद्देश असा आहे की ज्या सर्व प्रवृत्तींसाठी शरीरात काही प्रमाणात ऊर्जा वाटलेल्या आहेत त्या सर्वांना कामी लावणे. जर एखादा प्रत्यक्ष लैंगिक कृती करत असेल तर समर्पित केलेल्या ऊर्जेचे हे बांधकाम आणि त्याचा हेतू हरवून जातील.

परंतु लोक जेव्हा विशिष्ट पदार्थांचा वापर करण्यास सुरुवात करतात तेव्हा त्यांनी एका विशिष्ट अवस्थेत असणे आवश्यक आहे. अन्यथा ते फक्त व्यसन बनते. यासाठी कडक शिस्त आवश्यक आहे. अशी शिस्त ज्यासाठी बहुतेक लोकांना प्रयत्न करणे देखील शक्य नाही. जेव्हा लोक अशा प्रकारच्या मार्गावर चालतात, जर 100 लोकांनी सुरुवात केली तर 99 केवळ मद्यधुंद बनतात.

डावा आणि उजवा तंत्र योग

तथापि हेच डाव्या बाजूचे तंत्र म्हणून ओळखले जाते जे ढोबळ तंत्रज्ञान आहे. यात वेगवेगळ्या विधींचा समावेश आहे. एक उजव्या बाजूचा मार्गही आहे जे खूप शुद्ध तंत्रज्ञान आहे. हे दोन्ही संपूर्णतः वेगवेगळ्या गुणधर्माचे आहेत. उजव्या बाजूचा मार्ग आंतरिक आणि ऊर्जेच्या दृष्टीने, हा पूर्णतः तुमच्याबद्दल आहे. यात कुठल्याही प्रकारचा विधी किंवा बाह्य कृतीचा समावेश नाही. हे तंत्र आहे का? एक प्रकारे आहे, परंतु योग या शब्दात सर्वच एकत्र सामावलेले आहे. जेव्हा आपण योग म्हणतो तेव्हा आपण कुठलीही शक्यता नाकारत नाही- यामध्ये सर्वकाही आहे. हे असे आहे की काही विकृत लोकांना काही विशिष्ट प्रकारची प्रक्रिया दिसली, जे निव्वळ डाव्या बाजूचे तंंत्रज्ञान आहे आणि त्यात शरीराचा विशिष्ट वापर होतो. त्यांनी फक्त तेवढाच भाग घेतला, ते फुगवून मोठे केले आणि सर्व विचित्र प्रकारच्या संभोगासह त्यावर पुस्तके लिहिली. ते तंत्र नाही.

तर तंत्र हा काही विचित्र मूर्खपणा नाही. ही एक विशिष्ट क्षमता आहे. त्याशिवाय कोणतीही संभवता नाही.

तंत्र म्हणजे काही गोष्टी घडवून आणण्यासाठी तुम्ही तुमच्या ऊर्जांचा वापर करण्यास सक्षम आहात. तुम्ही सर्व काही कापून काढण्यासाठी तुमचे मन अगदी धारदार बनवले तर तेही एक प्रकारचे तंत्र आहे. तुम्ही तुमच्या ऊर्जांना तुमच्या हृदयावर अतिशय प्रेमळ बनवण्यासाठी काम करू दिले आणि तुमच्या हृदयाला प्रचंड प्रेमाचा पाझर फोडू शकलात की ज्यामुळे सर्वजण भारावून गेले, तर तेही तंत्र आहे. जर तुम्ही तुमचे भौतिक शरीर अविश्वसनीय पराक्रम करण्यासाठी प्रचंड शक्तिशाली बनवले तर तेही तंत्र आहे. किंवा तुम्ही तुमच्या ऊर्जांना शरीर, मन व भावना यांचा वापर न करता आपले आपणच कार्य करू दिले तर तेही तंत्र आहे. तर तंत्र हे काही विचित्र मूर्खपणा नाही. ती एक विशिष्ट क्षमता आहे. त्याशिवाय कोणतीही संभाव्यता नाही. प्रश्न असा आहे की, "तुमचे तंत्र किती शुद्धीकृत आहे?" तुमच्या ऊर्जांना जर चालना द्यायची असेल तर तुम्हाला दहा हजार विधी करावे लागतात की तुम्ही फक्त इथे बसून ते करू शकता? हा मोठा फरक आहे. कमी प्रतीचे तंत्रज्ञान की उच्च प्रतीचे तंत्रज्ञान हा प्रश्न आहे, पण तंत्राशिवाय कोणतीही अध्यात्मिक प्रक्रिया नाही.

तंत्र योग: हे धापा टाकण्याबद्दल नाही

मी आपल्या तंत्रज्ञानाची श्रेणी सुधारण्याची विषयी बोलतोय भावनोत्कट स्थितीत जाण्यासाठी तुम्हाला धापा टाकण्याची गरज नाही. तुम्ही जर डोळे बंद करून बसलात तर तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीतून भावनोत्कटता ओसंडून जाऊ शकते.

गुरू-शिष्य संबंध हे शिष्याला लैंगिकतेच्या सक्तीच्या जाळ्यात न अडकवता जाणिवेच्या अधिक उच्च पातळीवर पोहोचवण्यासाठी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे पवित्र संबंध भावनोत्कट नक्कीच आहेत पण लैंगिक नाहीत. मी तुमच्या तंत्रज्ञानाची श्रेणी सुधारण्याविषयी बोलत आहे. तुम्हाला भावनोत्कट होण्यासाठी धापा टाकण्याची आवश्यकता नाही. तुम्ही जर डोळे बंद करून बसलात, तर तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीतून भावनोत्कटता ओसंडून जाऊ शकते. जे लोक भावनोत्कट अस्तित्व साध्य करण्यात अपयशी ठरले आहेत ते हर्षोन्मादित स्थितीला लैंगिकतेशी जोडतील कारण बहुधा तो त्यांना माहीत असलेला परमोच्च अनुभव असावा.

लोक नेहमी कृष्ण गोपीच्या नात्याचा आधार घेण्याचा प्रयत्न करतात. आख्यायिकेप्रमाणे कृष्णाने एकाच वेळेस सोळा हजार महिलांना भावनोत्कटतेचा अनुभव दिला. हे लैंगिक मिलनात होऊ शकत नाही. एक शिष्य एखाद्या गुरूशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध स्थापित करू शकतो. सामान्यतः दोन शरीरे एकत्र आली म्हणजे जवळीक साधली गेली असे समजले जाते. जो अध्यात्मिक मार्गावर आहे त्याची शरीराशी तितकीशी जवळीक नसते. भौतिक शरीर हे बाह्य गोष्टींच्या संचयाने बनले आहे, म्हणून तांत्रिक आणि योगिक प्रणालीमध्ये शरीर हे कधीच तुमचा जवळचा भाग मानले गेले नाही. फक्त जेव्हा ऊर्जा एकमेकांशी भिडतात आणि मिसळतात आणि गुरूंच्या ऊर्जा शिष्यांच्या ऊर्जांना व्यापून टाकतात आणि अधिलिखित करतात, तेव्हा भावनोत्कटतेचा अनुभव येतो- एक मिलन परंतु लैंगिक नाही.

जर तुम्हाला फक्त ध्यान किंवा अध्यात्मिक सराव करायचा असेल, तर तुम्हाला खरं तर गुरूची आवश्यकता नाही. मूलतः गुरुची उपस्थिती ही तुम्हाला अनामिक परमानंदाने भारावून टाकण्यासाठी आहे. तर तंत्र हे मुक्तीचे तंत्रज्ञान आहे, गुलामगिरीचे नाही./p>